censor ने बंदी घातलेला
तरीही पायरेटेड सीडी शोधून घेतलेला
निव्वळ प्रौढासांठी गोलातलं A चिन्ह असलेला
कुठलातरी तमीळ चित्रपट
पाहतोचकी आपण
एकही 'सीन' नसलेला
कधी pause, play, fast forward
तर कधी zoom, backward, resume करत
दुसरं काय असतो
एकांत म्हणजे तरी?
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1499
प्रतिक्रिया
4
मिसळपाव
प्रतिक्रिया
एक मण = किती कीलो ?
झ्यबर्र्दस्त!!
+१
In reply to झ्यबर्र्दस्त!! by चांदणे संदीप
हाही एक एकांत. आवडलं.