सांत्वना
<विडंबनः नसतेच मिपा हे जेव्हा...>
(मिपा बंद असताना मिपाला चरफडत खूप शिव्या दिल्या. अर्थात प्रेमाने! मग शनिवारी रात्री हे विडंबन सुचले आणि खफवर सोमवारी मिपा परत आल्यावर टाकले. तिथल्या आमच्या हितचिंतकांनी -कोण म्हणाले रे कंपू कंपू ते! - वा वा! वा वा! बोर्डावर पण टाकून बाकीच्यांनाही छळा, असे आम्हांस भरीला पाडल्याने - दू दू कुठले - खफवरच्या पुरात वाहून गेलेली आमची रचना महत्प्रयासाने वर काढली आणि इथे डकवायचे धारिष्ट्य करत आहे...
आमचाही पाउस.....
मित्रहो, मिपावर सुंदर कवितांचा एवढा पाउस पडतो आहे की सारे वातावरणच बदलले. त्यातच संमं ने पण छायाचित्रकलास्पर्धेचा विषयपण पाउस निवडला आणि मग हे कवी लोक जास्तच पेटले. आमची प्रकृती थोडी नाजुकच. या बदललेल्या वातावरणाचा नाही म्हटले तरी परिणाम होतोच.
काल रात्री शेवटी विडंबनारीष्ट घेउन झोपावे लागले. तेव्हा कुठे सकाळी मोकळे मोकळे वाटले.
फ्रेश झाल्यावर ठरवले की चला पावसाळ्यात थोडी रंगपंचमी खेळूया...
पावसात जळाया लागलो...
प्रेरणा: उभ्या पावसात जळायला लागलोय...
चाल: तुझी घागर नळाला लाव, पाणी सुटाया लागलं
सोडून गेली रं मैना
दोस्त टाळाया लागलो
तुम्ही बोलवा फायरबंब
पावसात जळाया लागलो
आज काल दिस रात
मला सुचंना कायी
पार झालो देवदास
आन्न पोटात जात न्हाई
येईना हो झोप मला
कुशीवर वळाया लागलो
तुम्ही बोलवा फायरबंब
पावसात जळाया लागलो
कसं सांगू काय झालं
खेळ खल्लास झाला
उडवलेला पैसा सगळा
आता वाया तो गेला
पैलवान मी मर्द गडी
आसू गाळाया लागलो
तुम्ही बोलवा फायरबंब
पावसात जळाया लागलो
काव्यरस
झिंग बोचर्या अहंपणाचे चगिन्यांचेदा चकानदु
दागिन्यांचे वळण नशिले, प्रतिसादातून उरात घुसले
उद्धट ललना उर्मट बोले, टेम्पोमाजी जरा बसविले
वृंदगान : दु दु दु दु
काय तरी हे लक्षण मेले,विडंबुनिया मिपा हलविले
खरपूस तळल्या जिल्ब्यांसंगे, कहासुनीचे तुमन्त छोले
वृंदगान : ऑ अच्च जालं तल
नटवे थटवे जमवी ठिक्कर, तार गुंफिली नक्षी त्यावर
कंपू देई थाप डफावर, कुत्सित ललना राग शिरावर
वृंदगान : नाच गं घुमा
तोडूनि तारे काथ्या कुट्टी, उठता कट्टी बसता बट्टी
गडबडगुंडा वरची पट्टी, दागिन्यांची मधली सुट्टी
वृंदगान : ड्रीमम वेक्कपम क्रिटीकल कंडिशनम्
श्वेतलाजरी गिर्जा नाचे, बिरुटे आले धागा टाके
खट्टू होऊनि भरभर धावे, धागा उडवा कन्या बोले
वृंदगान : आयला गो गौ
काव्यरस
विश्वास श्वासावरचा
रोज पुन्हापुन्हा तो बाहेर पडतो
संगे फक्त कोरडा उःश्वास घेतो
हजारो वर्षापासुन तो तिला शोधतो
ती अजुनही असल्यावर विश्चास ठेवतो
प्रत्येकाच्या शरीरात जावुन तो पाहतो
तिच्या अोळखीच्या खुणा शरीरात शोधतो
पवनाच्या रुपातुन तो मला रोज भेटतो
पुन्हापुन्हा तिचे कुशल मला विचारतो
प्रत्येक श्वासातुन मी समजावु पाहतो
श्वासाशिवायच्या शरीरास मी तरी नाकारतो
तो मात्र अजुनही विश्वास ठेवतो
तिच्या श्वासहिन शरीरास शोधत राहतो
श्वासाशिवाय तो तरी भटकत राहतो
श्वासावरच्या विश्वासास ठोकरु पाहतो.....
काव्यरस
हं ! ते तुला कधी जमलेय
आमची प्रेरणा
http://www.misalpav.com/node/31151
(मूळ कवीची मनापासून क्षमा मागून हे विडंबन शोलेकालीन व्यथा वेदनांना वाचा फोडण्यासाठी प्रसृत झाले. कळावे आपला नकवी - खट (नक्वी नव्हे) )
अरे द्यायचेच असेल तर दे
गब्बरलाही पकडीत घेवु पाहणारे ते हात
हं ! ते तुला कधीच जमलेय
तोडलेल्या हातांवरती, कशास शाली अन बंदुकी
रामलाल काकांना या कसली आहे निवांत डुलकी
अरे गायचेच असेल तर गा
ते स्वर मेहबुबी हेलनेचे...
हं ! ते तुला कधी रे जमलेय
हिंडत्या बसंतीचे ..
काव्यरस
पोपट....
माझ्यासाठी ठेवलेल्या पिंडाकडे पहात, मी हटवाद्या सारखा बसलो होतो,
जाताजाता तिला अडकवल्या शिवाय, मी पिंडाला मुळी शिवणारच नव्हतो,
तिच्या एका निर्दय नकारा मूळे, मी हे जग सोडले, हे सर्वांना ठाउक होते,
तेव्हा मी अगतिक होतो, आता तिलाही तसेच झालेले मला पहायचे होते,
बर्याच शपथा घेतल्या आणि घालल्या गेल्या, मी कशालाही बधलो नाही,
आजूबाजूचे कावळेही प्रचंड दबाव टाकत होते, पण मी जागचा हललो नाही,
मला खात्री वाटत होती, अजुन थोडेसे ताणले, की ती नक्की येईल,
या जन्मी जरी नाही जमले, तरी पुढच्या जन्मीचे वचन नक्की देईल,
मग दिमाखात पिंडाला चोच मारुन, तिच्या समोरुन मला उडून जायचे होते
त्या आधि, एकदातरी माझ्यास
पुरुशाचे अस्तित्व...!
एका महान कवितेवर तितकेच टुकार विडंबन... मंडळी गोड माणुन घ्या.
कर्तव्याच्या नावाखाली छळ मांडलाय पुरुषांचा.
जन्मापासुन ते मृत्युपर्यंत कर्तव्याच्या दोरखंडाने बांधलंय त्याला.
या दोरखंडातुन कधी सोडवण्याचा प्रयत्न केलाय कुणी? नाही!
कारण प्रत्येक मनुष्याला फक्त आणि फक्त घेणंच माहीत आहे.
एक पुरुष जेव्हा लहान कोंब असतो,
तेव्हा आईच्या पोटातच त्याला इंजिनेर, डॉक्टर होण्याचे फर्मान सोडले जाते.
कसा तरी करत जन्म घेतलाच त्याने, तर
आई-बापाची स्वप्ने पुरी करायच्या बोझाखाली कोमेजुन टाकले जाते.
आणि मोठेपणी हुंड्यापायी आईवडिलांना हवी
असलेली मुलगी पुढ्यात आणून टाकली जाते.
स्मशान शांततेची शिकवण
अरे, वर्गात कितीरेही गडबड
सगळे शांत बसा बघू
प्रश्न विचारु नका
उत्तरे शोधू नका
चर्चा करु नका
सगळे पास होणार आहात तुम्ही
आपोआप परिक्षेशिवाय
पुढच्या वर्गात जाणार आहात
काय म्हणता?
काव्यरस
मिसळपाव