मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सांत्वना

<"ऊभारू का पण डु आय्डी">

नाखु ·
मूळ कलाकृती

संदर्भ फक्त चालीसाठी आणि गाभा हेतु: मिपावर पुन्हा पुन्हा प्रवेश करणार्या आणि मिपावर दंग्यासाठी ठरावीक आयडीने येणार्या महाभागांना हा भाग समर्पीत आहे

( हल्ली मिपावर वावर आहे ‘एक्स्पर्ट(?) टॉकर’चा! अशीच एक टॉकर येतो ‘डु आय्डी बनून’. जुन्या आय्डीने बदल्यासाठी नवी कोरी डु आयडी सलामत! मग काय? जुन्या आय्डीची 'फुकाची घालमेल'. नव्या डु आय्डीची 'उत्साही सुरर्सुरी. पण, त्या जुन्या आयडीला काय बरे सांगायचे असावे?

< मिसळपावात... >

नीलमोहर ·
नेटावर जे नामी मोट्ठं संस्थळ आहे ना तिथे खूप वाचक असतात, जबर ट्यारपी मिळतो डुप्लिकेट आयडी तिथे पडीक असतात ते अगदीच पकाऊ असतात मला अशा सायटी आवडत नाहीत ऐसे खचाखच पाडलेले धागे बघितल्यावर मला भोवळ येते तैसे ज्ञानामृत पाजू संस्थळावर जिलबीबरोबर पिठल्याचा आस्वाद घेतल्यावर मला अशीच भोवळ आली होती तेव्हापासून पिठलं हा पदार्थ मी व्यर्ज केलाय जिलब्या खाल्ल्यावर नेहमी पोट दुखते मग तीही मी कधी खात नाही गुगलवर फिरता फिरता 'त्या' साईटीकडे मी ढुंकूनही कधी पाहत नाही तिथले लेखन वाचतांना माझी मती कुंठीत झाली होती मग तिकडे मी कधी गेलोच नाही मा...

चाफा

शिव कन्या ·
वाटेवरी कुणाच्या आहे अजून चाफा! मंद परी जीवघेणा, आहे तसा पसारा! ऊन उठून येते रात्री, घर गोळा होते नेत्री! कुणी दिसते, कुणी विरते! परी चाफ्यापाशी सारे, हताश होऊन बसते! मंद परी जीवघेणा आहे तसा पसारा वाटेवरी कुणाच्याही असू नये गं चाफा! -शिवकन्या

सोने की चिड़ियां

संदीप डांगे ·
हे गाणं माझं खूप म्हणजे खूप फेवरेट आहे. जेव्हा जेव्हा हे कानावर पडतं तेव्हा स्वर्गात विहरत असल्यासारखे वाटते. लहानपणी २६ जानेवारीला युनिफॉर्ममधे शाळेत ध्वजारोहणाला सकाळी सकाळी जायचो तेव्हा हे गाणं कुठे न कुठे चालू असायचं. तेव्हा मन देशाभिमानानी भरून यायचं. आपल्या मनात ही भावना येते याचंच अप्रूप वाटायचं. आपण अशा एका देशाचे नागरिक, वंशज, मालक आहोत ही भावना भारावून टाकायची. कालांतराने सँटाक्लॉसला सत्य मानणार्‍या लहान मुलाचे वय वाढल्यावर जेव्हा त्याला खरे समजते आणि त्याचे जे होते ते माझं झालंय बहुधा असं वाटतं. तरीही हे गाणं अजूनही गारूड करतंच.

मिशी नृत्य

माहितगार ·
असणे नसणे जाणीव स्मृती खर्‍या गूढ आभासी मिशी नृत्य अधाशी पुस्तक घेऊनी डोईवरी शिष्या राहे उपाशी असे ते शीष्ट दिसे उष्टवी शब्द पिशी मांडीने डाव मांडले मिशीने शब्द पुसले-खुपसले आपल्या जगण्यासाठी शब्दांवरी नाच नाचला तीने लेऊनी त्यांची मिशी -स्वल्प प्रेरणा 'फ्रिडा काहलोची मिशी' Frida_by_Josefina_Aguilar_Alca¦üntara Frida_by_Josefina_Aguilar_Alca¦üntara छायाचित्र सौजन्य

म्हणूनतर नाही ना चांदोबा निंबोणीमागे लपला ?

माहितगार ·
चांदोबा असतोच तसा आजन्म उपाशी तुपात पडलीयेना त्याच्या माशी ! तुपरोटी तो कसला खातो चिरेबंदी गाण्यातली अंगाई ऐकत मामा होऊन भटकत राहतो ! निंबोणीच्या झाडात गंधर्व होऊन विराणी कुठलीशी गात राहतो. बाबा ?, की आईनेच चांदोबाचा भागाकार केला, म्हणूनतर नाही ना चांदोबा निंबोणीमागे लपला ? * माझ्या उपरोक्त विडंबनास खरे तर एका पेक्षा अधिक शीर्षके सुचत होती, तुम्हाला काही चपखल शीर्षक सुचलेतर प्रतिसादातून जरुर नोंदवा. * उपरोक्त विडंबन खालील बडबड गीताचे आहे : चांदोबा चांदोबा भागलास का निंबोणीच्या झाडामागे लपलास का निंबोणीचं झाड करवंदी मामाचा वाडा चिरेबंदी मामाच्या वाड्यात येऊन जा तूपरोटी खाऊन जा तुप

साकल्यसूक्त

मितान ·
समईचा घेऊन हार ही रात उभी तलवार गात्रात पौर्णिमा काळी भरजरी तलम अलवार उन्मुक्त नदीसे जगणे या अधोवदन वेलीचे वृक्षाचा खांदा नीरव पर्युत्सुक मंत्र भुलीचे संन्यस्त शिळेच्या माथी का डाग तप्त चंद्राचा अतृप्त भग्न वैरागी जोगवा त्यास गीताचा नखखुडल्या माडांनाही का तृषा जहरभरणीची जळतीच्या पागोळ्यांची का दिशा पार्थ बाणांची साकल्यसूक्त गंगेचे भय लोभस हिरवे कहरी हंबरून गायी सार्‍या उधळीत दिशा गिरिकुहरी निर्लज्ज उगवती अंकी उन्मादी गातो पक्षी पांघरी डोह काळोखी नवरातकिड्यांना रक्षी अस्तांकित चकवे गहिरे लपवून वनातिल राई अन राख होऊनी शून्य रंध्रात निनादत राही !!!

दिव्यचक्षु

अभ्या.. ·
दिव्य पेर्णा : http://www.misalpav.com/node/33935 अ‍ॅडव्हर्टायझिंग एजन्सीच्या ऐसी केबिनात सगळ्यात सामसूम पीसीवरच्या स्क्रीनसमोर सगळ्यात शेवटच्या अ‍ॅड डिझाईनच्या सगळ्यात शेवटच्या टॅगलाईनवर मी काम करतो. रास्टर फोटोशॉप अन् व्हेक्टर कोरलवर अनिर्बंध सत्ता चालते ज्याची आणि कम्प्युटर ग्राफिक्सध्ये ज्याचे चालतात हात डिझाईनर पॅडवर हवे तसा माऊस वळवत तो मी एज्युकेटेड क्रियेटिव्ह डिझाईनर. एजन्सीचे मालक सतत नजर ठेवतात पाठलाग करतात चुकलेली प्रुफे घेऊन चुका काढतात स्वतःलाच न कळणार्‍या स्क्वेअरसेमीच्या व्यवहाराचा एकटाच हा शत्रू. डिझाईनर होतोय क्रियेटिव्हली नि:संतान. गडगंज क्लायंट आणतो आधीच फसलेली येडझवी

लंगोट तुझा ना राहिला, ना अस्थीही तुझ्या राहिल्या

माहितगार ·
प्रेरणा १ प्रेरणा २ प्रेरणा ३ आणि कदाचित अत्यल्प प्रभाव अशा चार चार कवि आणि कवितांची माफी मागून हि भूछत्री विडंबन जिलबी वाचक सेवेत सादर. लंगोट तुझा ना राहिला ना अस्थीही तुझ्या राहिल्या ना याद तुझी राहिली, ना कर्म तुझे राहिले चरत होतास तू या जगी पोट आणि पोपटी वासना स्वप्नांचा खेळ ठेऊनी पोपट मैना उडाले ततक्षणा यातनांची ती राख तुझ्या पंचप्राणांनी का वाहिली ? आहुती देऊनीही तुझे येथे काही ना राहील

गॅलरी .....

शिव कन्या ·
एक हात कठड्यावर ठेऊन, अन दुसरा उगाच पाठीमागे घेऊन, मी उभा आहे गॅलरीत! तुझ्या झुलत्या अक्षरां बरोबर मन रमून गेले फार! इथेच बसून नाही का लावत तुझ्या शब्दांचे अत्तर मनाला! नाही.....वेडा नव्हतोच कधी समंजस होतो खूप म्हणून गॅलरी नाही ओलांडत आजही! मला नाही जमत लिहायला, तुझ्या अंत:करणापर्यंत पोहोचायला! इतकं जग पाहूनही प्रेमबीम पण नाही कळत मला! पण....तू तिथे कुस बदललीस कि इथे माझी झोपमोड होते, एवढेच बारीक जाणवते! अन, अवेळी उठून मी एक हात कठड्यावर ठेऊन उभा राहतो गॅलरीत कुणी हाक मारेपर्यंत.....!