मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शांतरस

आमची बी एक

मुक्तसुनीत ·
आमची प्रेरणा : ही भयभीषण कविता कुंथताति अक्षरे गे आदिती तू बास कर विसर षंढ-गंध आता , जाळुनीया राख कर वेड होते त्या मिपाला, मांडिशी तू भोंडला वेड 'तात्या'ला तुझे जो, कायमीचा झोपला यायचे ते ना पुन्हा, तू वाट बघणे बास कर.. कुंथताति अक्षरे गे आदिती तू बास कर टांगण्या वेशीवरी तव लक्तरे सारे पुढे चिंधड्या तव "कव्वितेच्या" फ़ाडती शेंबडी मुले ना कुणी तुज तारीफेला , तू अपेक्षा लाख कर!! कुंथताति अक्षरे गे आदिती तू बास कर कोण झोपे, काय झाले, ना इथे पडले कुणा "भीक नाही , काव्य आवर" बाकी कुणी काही म्हणा "जळ्ळीं मेली लक्षणे ती, हे रसीका तूच मर!"

चांदणपक्षी

विजुभाऊ ·
लेखनविषय:
काव्यरस
मी एक होतो जागा चांदणपक्षी झेलीत विस्फारल्या नजरा भुभुक्षी विरलेले होते घाव सारे. थिजलेले होते डाव कोरे. घन तिमीर दाटे काय कोसळत्या जलधारांचा प्रकोप पाखरांचा होता आक्रंदत दिवस रात तो कोण होता कैसा चाखेन म्हणे मुक्त ऐसा मोकाट होतो वारा गात्री पिसासुन घे भरारी जळ काय झाकोळले कर्दमात पारवे बुडाले क्षितीजाच्या पलीकडले एक झाड जळाले. ते स्वप्न कोणी माळले वक्षी जेंजारूनी भाळले भात्यांच्या नशीबी शेवटी रीकामेच प्राक्तन आले. घे एक भरारी काय आभाळाला फुटती पाय कोण कोण मागे पडती ते सारे बैल आणि गाय सरीसृप सारेच होते राजे आपापल्या बिळात वणवा पेटवी रान तोडून तंद्री बेभान प्राशूनी रक्त सारे सुरे तेजाळ

कान्हा माझ्या भुकेची वेळ आता झाली

पाषाणभेद ·
लेखनविषय:
काव्यरस
कान्हा माझ्या भुकेची वेळ आता झाली
अरे कान्हा माझ्या भुकेची वेळ आता झाली निट जपून वाढ माझी फाटकी रे झोळी ||धृ|| सकाळीच उठले मी अजाणतेपणी काय घडेल दिसभर नव्हते ध्यानी पोट नाही भरले जरी न्याहरी केली कान्हा माझ्या भुकेची वेळ आता झाली ||१|| पंचपक्वांन्न आहे सोबतीला शिरापुरी भरलेलं ताट आले समोर दुपारी किती खावे किती नको झाले त्यावेळी कान्हा माझ्या भुकेची वेळ आता झाली ||२|| कधीतरी आराम मिळो ह्या पोटाला संध्यासमय जवळ हा आला पाषाणगवळण तुझ्या चरणी लीन झाली कान्हा माझ्या भुकेची वेळ आता झाली ||३|| - पाषाणभेद (दगडफो

प्रेम

amirohi ·
लेखनविषय:
काव्यरस
शेवटपर्यंत दोघेही, मनातले ओठांवर आणू नाही शकले, साता जन्माच्या नात्यापुढे प्रेम हे, पुन्हा एकदा झुकले...!

माफ

निखिलचं शाईपेन ·
लेखनविषय:
काव्यरस
माफ मी माफ करायचं ठरवलंय ज्यांच्या मागे वेड्यासारखं धावलो ... धावतो आणि त्याचं सोयरसुतक नसलेल्या दगडांना. मी माफ करायचं ठरवलयं केसांनी गळा कापनाऱ्यांना पाठीत खंजीर खुपसानाऱ्यांना आणि शब्दांनी रक्तबंबाळ करणाऱ्यांना... ज्यांनी त्रास दिला त्यांनाही ..

भंगलेल्या मनाचा अभंग ३

चन्द्रशेखर गोखले ·
लेखनविषय:
काव्यरस
कसे त्यागू देवा "मी" पण माझे वाटे जरी ओझे टाकवेना आत्म अभिमान आणि स्वाभिमान सांगेल का कोण भेदाभेद एकतत्त्वनाम झाले बदनाम धर्माधर्म स्तोम भोवताली "मी" पणाचा शोध घेतो आहे "मी"च आता बाबा तूच धाव देवा राहिले रे आता कितीसे रे दिन चरणी मी लीन दीनानाथा प्रार्थणारा मीच ऐकणारा मीच जन्मोन्मी हाच नाच देवा एकतत्त्व नाम धरितो मी दृढ बालक सुदृढ अहंकारी

ध्यास विठ्ठलाचा -

विदेश ·
लेखनविषय:
काव्यरस
ध्यास मनी घेता दिसली पंढरीची वाट विठ्ठलाचे नाम घेता सरला पहा घाट | तुळशीमाळ हाती घेऊ मुखी ठेऊ नाम जीवनात राहू देऊ सदोदित राम | संसारात नित्य कष्ट आपुल्या जिवाला नाम घेणे ठरते इष्ट घोर ना जिवाला | करू यातना अर्पण चंद्रभागेपोटी नाम नेईल तारून सुखाच्याच भेटी | दु:ख हानी दूर पळते येऊनिया वीट शांती समाधान मिळते मंदिरी अवीट | डोळ्यामध्ये घेऊ आता रूप साठवून विठ्ठलाला शरण माथा चरणी टेकवून | जीवनाला अर्थ गाता ग्यानबाची ओवी राम राम घेऊ जाता तुकोबाच्या गावी |

बुल्ला की जाणा मै कौण....

कवितानागेश ·
लेखनविषय:
काव्यरस
एक भावानुवाद: बुल्लेह शा चे हे एक काव्य. राबी शेरगिलनी गायले आहे.

हेज्यायची कटकट...

भारी समर्थ ·
लेखनविषय:
बर्‍याच दिवसांनी काल माझी जात आठवली होती सहज बोलता बोलता कोणीतरी तिची आठव काढली होती आमची जात लागत नाही प्रवेशाला, फी माफीला की आंदोलनवाल्यांना पैसा बक्कळ पडलाय, कोण विचारतोय आम्हा ओपनवाल्यांना नाही, मान्य की देशाच्या गरीब जनतेचा उत्कर्ष झाला पाहिजे पण मग आमच्याच शिटातला का बरं सगळ्यांना वाटा पाहिजे आमचे शेजारचे सूचीतले गेल्याच महिन्यात फॉरेन ट्रीपवरून आले पोराला फार शीण झालेला परीक्षेचा, त्याने चांगले ९०% की हो काढले त्यांच्या सुपुत्राला मुंबईबाहेरील जागा नको होती म्हणून आग्रह धरला आणि आरक्षण कोट्यातील जागेसाठी त्याने आपला फॉर्म भरला आम्ही म्हटलं द्या ना काका सोडून ही जागा एखाद्या गरीबास