Skip to main content

भंगलेल्या मनाचा अभंग ३

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी सोमवार, 11/07/2011 22:09 या दिवशी प्रकाशित केले.
कसे त्यागू देवा "मी" पण माझे वाटे जरी ओझे टाकवेना आत्म अभिमान आणि स्वाभिमान सांगेल का कोण भेदाभेद एकतत्त्वनाम झाले बदनाम धर्माधर्म स्तोम भोवताली "मी" पणाचा शोध घेतो आहे "मी"च आता बाबा तूच धाव देवा राहिले रे आता कितीसे रे दिन चरणी मी लीन दीनानाथा प्रार्थणारा मीच ऐकणारा मीच जन्मोन्मी हाच नाच देवा एकतत्त्व नाम धरितो मी दृढ बालक सुदृढ अहंकारी
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1168
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

चांगले काव्य एकतत्त्व नाम धरितो मी दृढ बालक सुदृढ अहंकारी हे आवडले.

सुंदर अभंग मनापासुन आवडला.
कसे त्यागू देवा "मी" पण माझे वाटे जरी ओझे टाकवेना
जास्त आवडला अवांतर : तरीही दूसर्या ओळीतील ६ ऐवजी ५ च अक्षरे आली आहेत. तेथे काही योग्य बदल ?