Skip to main content

शांतरस

महत्त्वाकांक्षेचे रॉकेट ..

लेखक निमिष सोनार यांनी बुधवार, 26/10/2011 12:36 या दिवशी प्रकाशित केले.
महत्त्वाकांक्षेच्या रॉकेटला लावा आशेच्या लांब फुलबाजीचे जळते टोक... आकाशात सर्वात उंच जावून व्हावा नेत्रदिपक महान यशाचा स्फोट.. सर्व वाचकांना दिवाळीच्या शुभेच्छा....!! - निमिष न. सोनार, पुणे
काव्यरस

जीवनाचे गाणे !

लेखक विदेश यांनी गुरुवार, 20/10/2011 20:10 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्व जन्मी पुण्य गाठी चालू जन्मी पाप पाठी गॅस नाही हो मिळत घास नाही तो गिळत पेट्रोलचा किती जाळ रॉकेलचाही दुष्काळ रेशनला रांग मोठी माल संपल्याची पाटी दिसे भांग तुळशीत असे माल भेसळीत म्हणे पापभीरू मन हवे पांढरेच धन नको लाचलुचपती नको भ्रष्ट उचापती नेकीनेच चालू रस्ता खात खात खूप खस्ता एका डोळयात ते हासू दुजा डोळ्यात ये आसू महागाईची अंगाई रोज सरकार गाई दरबारी झोप जडे डोळे आमचे उघडे असे कष्टातले जिणे बने जीवनाचे गाणे !
काव्यरस

दगडाची गोष्ट

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 01/10/2011 03:42 या दिवशी प्रकाशित केले.
दगडाची गोष्ट
(सदरची कविता शिक्षकांनी अंगविक्षेपासहीत विद्यार्थ्यांच्या पुढे सादर केली तर परिणामकारक होते.)
प्रास्ताविक: निट बसा सगळे लक्ष द्या इकडे एक गोष्ट सांगतो लक्ष द्या तिकडे आरंभ: एक खेडेगाव असते तिथे एक नदी वाहते विषयविवेचन: त्या नदीत असतो एक दगड मोठ्या दगडांसारखाच छोटा दगड इतर दगड खुष असत हा मात्र असतो सतत रडत नायकाचे आत्मकथन: "मी काही कामाचा नाही कोणाच्या उपयोगाचा नाही देव करण्याइतका मोठा नाही वाळूत मावण्यासारखा छोटाही नाही कु
काव्यरस

हळूच तू मला पाहीलेले

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 28/09/2011 01:44 या दिवशी प्रकाशित केले.
हळूच तू मला पाहीलेले
हळूच तू मला पाहीलेले मी तुला पाहीले नजरेला मिळता नजरा, मी न माझी राहीले ||धृ|| कधीतरी ओळखीचे हासू पाहीले तुझ्या ओठी नकळत स्मित माझे आले त्याच्या उत्तररासाठी कळले का रे तेव्हा हृदयात काही झाले? नजरेला मिळता नजरा, मी न माझी राहीले ||१|| पुस्तके देता घेता थरथरती भेट झाली अलवार स्पर्श होता काटा फुले शरीरी प्रित पुष्पे अशी कितीतरी मी मनी माळले नजरेला मिळता नजरा, मी न माझी राहीले ||२|| ठेवले वहीत मी पिंपळपान आठवांचे बघ ते आता झाले बदलून जाळीचे तेवढेच जून झाले प्रेम पहील
काव्यरस

)माझं सामान हे...(

लेखक राजेश घासकडवी यांनी शुक्रवार, 23/09/2011 07:42 या दिवशी प्रकाशित केले.
शैलेंद्र यांनी रसग्रहणाची परंपरा पुढे चालवत धनाजीराव वाकडे यांच्या 'माझं हे सारं सामान गं सखू...' या कवितेवर लेख लिहिला. ती कविता व तो लेख या दोन्हीवर एकंदरीतच धमाल, हहपुवा वगैरे प्रतिसाद पाहून थोडी निराशा झाली. शैलेंद्र यांनीदेखील ही कविता काहीशी गमतीदार असल्याप्रमाणे तिचा अर्थ लावलेला आहे. माझं नेहेमीच असं मत पडलेलं आहे की लेखकाच्या रचनेचा अभ्यास हा त्याच्या इतर रचनांच्या संदर्भात घेतला पाहिज.
काव्यरस

अर्घ्य

लेखक राजेश घासकडवी यांनी बुधवार, 21/09/2011 08:17 या दिवशी प्रकाशित केले.
संध्याकाळ इतक्यात कशी झाली, काही कळलंच नाही. आत्ता आत्ता डोक्यावर दिसणारा सूर्य उतरला क्षितिजाकडे कधी? कळलंच नाही. आणि अचानक अंधार झाला, मिणमिणत्या पणत्यांनी जेमतेम दिसणारा, थरथरणारा केविलवाण्या, धूसर सावल्या हलवणारा एकएक करून त्याही विझल्या.
काव्यरस

वेळ लावू नका

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 20/09/2011 03:55 या दिवशी प्रकाशित केले.
वेळ लावू नका
रात नवेली आली चालून विडा ठेवला चुना लावून तुमच्या येण्याचा नाही भरवसा वेळ लावू नका बेगीनं या राजसा वाट तरी पहावी कितीक बाई दिस गेला हि रात सरत जाई ऐन मोक्याला धोका कसला? जीव झाला येडापीसा वेळ लावू नका बेगीनं या राजसा लाडीगोडीचं तुमचं बोलनं गोडगुलाबी कोडं घालनं आधारासाठी हात उशाला पांघराया अंग द्या न विसरता वेळ लावू नका बेगीनं या राजसा शिनगाराचा असल्या येळी आठव तुमची डोळा आली दोन्ही पापण्या न्हाती पाणी विरह सहन होईना जरासा वेळ लावू नका बेगीनं या राजसा - पाषाणभेद (दगडफोड्या) २०/०९/२०११
काव्यरस

प्रिय मित्र...!गणपती बाप्पा ..!!

लेखक प्रकाश१११ यांनी सोमवार, 19/09/2011 00:18 या दिवशी प्रकाशित केले.
किती वर्षे झाली आपली घट्ट दोस्ती होऊन नाव तर ऐकून होतो नवसाला पावतोस म्हणून मग अचानक ओळख झाली ७ -८ वर्षाचा होतो तेव्हापासून तेव्हाच तुला मी मित्र केला परीक्षेच्या दिवशी तुला नमस्कार केला नि पेपर मला सोपा गेला शप्पत ...! हे अगदी खरे सांगतोय बाप्पा तुला ...! अगदी मनापासून...
काव्यरस

श्लील अश्लील

लेखक चित्रगुप्त यांनी रविवार, 18/09/2011 13:18 या दिवशी प्रकाशित केले.
श्लील अश्लील जन्मताक्षणी मी आईला विचारलं माते माझा जन्म श्लील की अश्लील माता म्हणाली बाळा श्लील रे श्लील मग मी धर्ममार्तंडांना म्हणालो मार्तंडहो माझा जन्म श्लील की अश्लील ते एकरवानं उद्गारले अश्लील अश्लील

माझं गाव

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 18/09/2011 02:05 या दिवशी प्रकाशित केले.
माझं गाव
याहो याहो पाव्हने तुम्ही; या हो माझ्या गावाला वाहता ओढा ओलांडा; तेव्हा गाडी लागेल शिवेला वेशीवरती आहे मारूतीचे मंदिर दर्शन घ्या त्याचे; मुर्ती पुरातन सुंदर थोडं पुढं या; तुम्हाला लागेल बावडी वेशीतून शिरा आत; तिच्यावर आहे चावडी डाव्या हाताला ईमारत नवी कौलारू ग्रंथालय अभ्यासिका तेथे सुरू; तुम्ही बोला हळू बँक अन व्यायामशाळा ती बघा समोर पोरं खेळतात कब्बडी; ते गावाचे मैदान या की जरा पुढे; पहा दवाखाना सरकारी पंचक्रोशीचे रुग्ण इथं येती होण्यासाठी बरी इथून पुढं लागेल माळी गल्ली, शिंपी आळी फाल्गूना
काव्यरस