नोकरी कि धंदा ?
सध्या माझ्या घराचे बांधकाम चालू आहे.मी बर्याच ठेकेदारा मार्फत काम करून घेतले.उदा. टाइल बसवणारे लोक UP मधून आलेले आहेत. त्यांचा ठेकेदार साधारण १७ वर्ष पुण्यात आहे. सुरवातीला बिगारी काम करून ३-४ वर्षातच ठेकेदारी करू लागला. शिवाय तिकडून येथे मजुरी काम करायला येणारे लोक बरेच असल्यामुळे त्यांना मजूर मिळवायला विशेष अडचण येत नाही. काही लोक जे इथे ३० -३५ वर्ष आहेत त्यंनी तर इतकी संपत्ती साठवून ठेवली आहे कि आपण सामान्य माणस फक्त कल्पनाच करू शकतो.