आपल्याकडे लहान बाळाचे - दर महिन्याला (एक वर्षापर्यंत) वाढदिवस साजरे करण्याची प्रथा आहे.
दर महिन्याला वेगवेगळे पदार्थ करुन हे साजरे केले जातात, हे पदार्थ बाळाची वाढ-दर्शवणारे असतात.
उदा: १ महिना -घावन / धिरडे, महिना २ - जिलेबी / कडबोळी - रिंगण घातल्यावर / गोल फिरल्यावर
महिना ३ - करंजी (कुशीवर झाल्यावर)
असे आणि या पुढील वाढदिवस कसे साजरे केले जातात याविषयी माहिती हवी आहे !
"लोकांची सत्ता येईल तेव्हाच लोकशाही मजबुत होईल. लोकांच्या हितासाठी कायदे येतील तेव्हाच लोकसत्ता येईल."
कायदा कितीही उपयुक्त बनला तरीही तो अंमलात आणण्याची राजकीय ईच्छा शक्तीही तितकीच महत्त्वपुर्ण आहे. पण या नोकरशाही-भ्रष्टाचारयुक्त समजात योजनांचा लाभ गरजुंपर्यत पोहोचवणे ही स्वप्नवत भासणारी गोष्ट केवळ अशक्यप्राय आहे.
मंडळी मागच्या वर्षी मी एक घरगूती पवनचक्की बनविण्याचा प्रयत्न केला.
खेळण्याची मोटर वापरून केलेली पवनचक्की
एक खेळण्यातील डिसी मोटर वापरून एक पवनचक्की केली. त्यात थोड्याप्रमाणात मिली व्होल्टस मध्ये डिसी व्होल्टेज जनरेट होत होते. हे कमी प्रमाणातील व्होल्टेज पुढे बॅटरीत साठवता येईल का? त्यासाठी एखादा रेडीमेड बॅटरी चार्जर असतो तो वापरला तर चालेल काय? पुढील दिशा कशी असावी? आपल्यापैकी कुणी यात प्रयोग केला आहे का?
माझा प्रयत्न हा एखाद्या शाळेत वापरण्यासाठी केलेला प्रयोग आहे.
ती - तुला हे २-४ ओळींचे धागे, लोणची/थालिपीठांचे कौल, काथ्याकूट आवडतात?
तो - नाही
ती - अरसिक कुठचा!
तो - मी अरसिक म्हणून तर मिपा आवडते. ;)
ती - चूप्प . एकदम चूप्प!!
तो - तुला कुठे विडंबने आवडतात?
ती - त्यात काय असतं आवडण्यासारखं?
तो - तेच जे तुमच्या २ ओळींच्या धाग्यांत, लोणची/थालिपीठांच्या कौलांत, काथ्याकूटांत असतं
ती - तुझी विडंबने लई खवट आहेत.
तो - असल्या धाग्यांवरूनच तर ती सुचतात. मग ते धागे फालतू की विडंबने ? :P
ती - मी नाही ज्जा!! विडंबनेच का नाही लिहीत?
तो - कारण ती तुझ्या धाग्यांसारखी मनात आले की पाडता येत नाहीत, आणि फार काळ मालक/ संपादकांपासून सुरक्षित राहातही नाहीत. :)
ती - अजून काही?