प्रश्न

तिमा's picture
तिमा in काथ्याकूट
5 Mar 2013 - 3:12 pm
गाभा: 

हे यक्षाचे प्रश्न नाहीत. एका सश्रद्ध आदरणीय व्यक्तीने एका विज्ञाननिष्ठाला म्हणजे (माझ्यासारख्या माणसाला) विचारलेले बेसिक प्रश्न आहेत. त्याला मी माझ्या बुद्धीला झेपेल अशी उत्तरे दिली आहेत. संभाषण वैयक्तिक निरोपातून असल्यामुळे आत्तापर्यंत अप्रकाशित आहे. त्यावर चर्चा व्हावी या हेतूने इथे देत आहे.

१. मन खंबीर नसेल तर माणसाने अश्या प्रसंगी काय करावे?

मन खंबीर नसेल तर माणसाने परमेश्वराचा जरुर आधार घ्यावा.

२. विज्ञानाभिमुख होण्याने मन खंबीर होते काय?

माझे तरी झाले आहे.

३. कर्मकांड करणार्‍या सर्व लोकांची मने खंबीर नसतात काय?

असे मी म्हणणार नाही. ती व्यक्ती प्रत्यक्ष समोर असेल तर त्यावर भाष्य करता येईल.

४. विज्ञानाभिमुख असणार्‍या सर्व लोकांची मने खंबीर असतात काय?

उत्तर प्रश्न नं. २ प्रमाणेच.

५. "हिंदूंनी मयतानंतर दिवस घालू नये" हे ज्या हिरीरीने मांडता तितक्याच हिरीरीने "मुसलमानांनी-ख्रिश्चनांनी मृतदेह पुरू नये, जाळून टाकावेत" असे आपण सांगता का?

मी फक्त माझे मत नोंदवले. इतरांनी तसेच करावे असा माझा आग्रह नाही.

६. विज्ञानाभिमुख होणे म्हणजे सर्व मानवी भावनांना भडाग्नी ("मंत्राग्नी" शब्द टाळला आहे) देणे असा अर्थ आहे काय?

अर्थातच नाही. मानवी मन हे भावनांपासून मुक्त होणारच नाही. पण त्यावर ताबा मिळवता येणे शक्य आहे.

७. धर्म आणि विज्ञान मानवी जीवनांत गुण्यागोविंदाने नांदू शकत नाहीत काय?

नांदतील की. फक्त आपण जे आचरण करतो ते आपल्या बुद्धीला पटते का हा प्रश्न ज्याचा त्याने स्वतःला विचारावा.

८. ज्या ठिकाणी श्रद्धेचा प्रश्न येतो तेथे प्रत्येकाला आपापला मार्ग चोखंदळण्याची मुभा आहे असे आपणांस वाटते का?

नक्कीच, समाजसुधारणा जबरदस्तीने कधीच होणार नाही.

९. इतर लोकांची मानसिक अथवा शारीरिक हिंसा न करता जो-तो आपली श्रद्धा-अश्रद्धा बाळगण्यास स्वतंत्र आहे असे आपणांस वाटते का?

होय.

१०. जसे आस्तिकांनी आपल्यावर आस्तिकपणाची सक्ती करू नये असे नास्तिकांना वाटते. तसेच नास्तिकांनी आपल्यावर नास्तिकपणाची सक्ती करू नये यात आस्तिकांचे काय चुकले बरे?

अशी सक्ती मी माझ्या घरच्यांवरही करत नाही.

११. असेच शाकाहारी विरुद्ध मांसाहारी वादाबद्दलही म्हणता येईल असे वाटते का?

हो, नक्कीच.

१२. मग असेच विज्ञानाभिमुख विरुद्ध कर्मकांड करणारे याबद्दलही म्हणता येईल असे वाटते का?

हो येईल ना, पण विज्ञानवाद्यांना फक्त मत मांडण्याचा अधिकार असावा. मत दिले म्हणजे सक्ती केली असे नाही.

प्रतिक्रिया

नीलकांत's picture

5 Mar 2013 - 3:16 pm | नीलकांत

दोन्ही बाजूनी संयत भूमिका आहे. प्रत्यक्षात असे कमीच दिसते. वरच्या सारखा संवाद असला तर वाद होणारच नाही.
सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया...

मृत्युन्जय's picture

5 Mar 2013 - 8:00 pm | मृत्युन्जय

चांगला प्रयत्न होता ;)

प्रश्नोत्तरे चांगली आहेत पण त्यातला सूर साधारण असा वाटला:

"सर्वांना आपापलं मत असण्याचा अधिकार आहे आणि आपण आपलं स्वतःचं वैयक्तिक मत दिलं..

जे काही मी म्हणतो ते फक्त माझं वैयक्तिक मत आहे. ते दुसर्‍यांनी स्वीकारलं पाहिजेच असं नाही. किंबहुना त्यांनी ते स्वीकारलं काय किंवा नाही स्वीकारलं काय, मला काही फरक पडत नाही."

अशा प्रकारच्या मांडणीमधे वादावादीच्या बरोब्बर उलट दिशेचा एकतर्फीपणा येतो. अशावेळी मग कोणत्याही पार्टीने मत व्यक्त तरी कशाला करायचं? कशानेच काही फरक पडत नाही असा निर्विकार किंवा उदासीन भाव उत्पन्न होतो.

प्रश्न आहेत. त्यावर चर्चा व्हावी या हेतूने इथे देत आहे.

आणि शेवटी तुम्ही म्हटलंय :

मत दिले म्हणजे सक्ती केली असे नाही

हे देखील योग्य आहे.

पण मग एक प्रश्न उरतो : मतं बदलणारच नसतील तर प्रश्नोत्तरांचा उपयोग काय?

पैसा's picture

5 Mar 2013 - 6:08 pm | पैसा

Don't waste your time with explanations, people only hear what they want to hear.

नाना चेंगट's picture

5 Mar 2013 - 6:15 pm | नाना चेंगट

तुम्ही काय म्हणता हे ऐकण्यासाठी कान आतुर होते पण कानावर जी काही भाषा आदळली ती काही कळली नाही ब्वा ! मराठीतून बोलता का वाईच...

पैसा's picture

5 Mar 2013 - 6:24 pm | पैसा

पण मी काय म्हणते ते ऐकायला कोणी आतुर आहे म्हटलं की भ्या वाटतं. आता काय आणखी ऐकायला लागेल म्हणून. सुद्द मर्‍हाटीत सांगते की वो.

पावलो कोएल्हो म्हन्तोय, स्पष्टीकरणं देऊन आपला वेळ फुकट घालवू नका, कारण लोक त्यांना जे ऐकायला हवं असतं त्येवढंच ऐकतात.

आता तुमचं ऐकून माझी सही बदलते बरं का!

नाना चेंगट's picture

5 Mar 2013 - 6:27 pm | नाना चेंगट

याला म्हणतात पालथ्या घड्यावर पाणी.
पावलो कोएल्हो म्हन्तोय, स्पष्टीकरणं देऊन आपला वेळ फुकट घालवू नका अन तरीही तुम्ही मला स्पष्टीकरण देत बसलात. हि हा हा हा हा हा

पैसा's picture

5 Mar 2013 - 6:32 pm | पैसा

=)) =)) =))

मांडणी आवडली. तुलनेने हलकट व असमंजस लोकांची संख्या जास्त असते.
पण उगाच आपली सखाराम गताण्याची आठवण झाली.

अग्निकोल्हा's picture

5 Mar 2013 - 6:36 pm | अग्निकोल्हा

१. मन खंबीर नसेल तर माणसाने अश्या प्रसंगी काय करावे?
परमेश्वर सोडुन कशाचाही आधार घ्यावा. कायमस्वरुपि खंबीर मन निर्माण करायचा हा एकमेव राजमार्ग आहे. हे करण्यामधे कोठलाही गर्विष्ठपणा वा माज असायचा/निर्माण व्हायचा संबध येत नाही.

२. विज्ञानाभिमुख होण्याने मन खंबीर होते काय?
मानसिक आरोग्याचा अध्यात्म वा विज्ञानभिमुख असण्याशी कसलाही संबंध नाही. तरीही विज्ञान म्हणजे माणसाच्या नजरेतुन जग पाहायचा प्रयत्न करणे व अध्यात्म म्हणजे प्रथम इश्वर निर्माण करणे व मग त्याच्या नजरेतुन जग पहायचा प्रयत्न करणे असं ढोबळ मानाने म्हणता येइल.

३. कर्मकांड करणार्‍या सर्व लोकांची मने खंबीर नसतात काय?
खंबीर मनाला कर्मकांडाची आवश्यकता भासु शकते हाच विरोधाभास होय.

४. विज्ञानाभिमुख असणार्‍या सर्व लोकांची मने खंबीर असतात काय?
मने खंबीर असण्याचा अध्यात्म, विज्ञान, कर्मकांड याचा कसलाही संबध नाही. खिषात पैका बक्कळ असेल तर मात्र फार मोठ्या प्रमाणात लोकांची मने खंबीर/ आत्मविश्वासयुक्त बनु शकतात हे मात्र नक्कि. तेव्हां आतापर्यंत विचारलेल्या सर्व प्रश्नांचे उत्तर जवळपास एकच होय... ते म्हणजे खिषात पैका बक्कळ असेल तरी मन सहजासहजी कोणत्याही प्रसंगात अजिबात डगमगत नाही.

५. "हिंदूंनी मयतानंतर दिवस घालू नये" हे ज्या हिरीरीने मांडता तितक्याच हिरीरीने "मुसलमानांनी-ख्रिश्चनांनी मृतदेह पुरू नये, जाळून टाकावेत" असे आपण सांगता का?
दिवस घालणे म्हणजे काय ? असो मृतदेहाची विल्हेवाट कोणी कशी लावावी हे सागायचा मला अधिकार नाही... माझ्या देहाचे काय करायचे हे मात्र मी नक्किच अधिकाराने ठरवेन.

६. विज्ञानाभिमुख होणे म्हणजे सर्व मानवी भावनांना भडाग्नी ("मंत्राग्नी" शब्द टाळला आहे) देणे असा अर्थ आहे काय?
नाही. विज्ञानाभिमुख होणे म्हणजे डोक्याला निव्वळ कल्पनांचा फार ताप करुन न घेणे होय.

७. धर्म आणि विज्ञान मानवी जीवनांत गुण्यागोविंदाने नांदू शकत नाहीत काय?
नाहीच. धर्माला मी श्रेष्ठ आहे ठसवायची विषेश हौस असते तर विज्ञानाच्या आहारी जाणे मानवाला जिथुन सुरुवात केली तिथेच परत आणुन सोडते.

८. ज्या ठिकाणी श्रद्धेचा प्रश्न येतो तेथे प्रत्येकाला आपापला मार्ग चोखंदळण्याची मुभा आहे असे आपणांस वाटते का?
होय.

९. इतर लोकांची मानसिक अथवा शारीरिक हिंसा न करता जो-तो आपली श्रद्धा-अश्रद्धा बाळगण्यास स्वतंत्र आहे असे आपणांस वाटते का?
होय.

१०. जसे आस्तिकांनी आपल्यावर आस्तिकपणाची सक्ती करू नये असे नास्तिकांना वाटते. तसेच नास्तिकांनी आपल्यावर नास्तिकपणाची सक्ती करू नये यात आस्तिकांचे काय चुकले बरे?
प्रश्नातच उत्तर दिलय तरीही केवळ वरील(१०) विधानाचा विचार करता आस्तिकांची इतरांवर आस्तिकपणाची सक्ती चुकिची आहे असे वाटते. कोणताही माणुस आस्तिक जन्मजात नसतो.

११. असेच शाकाहारी विरुद्ध मांसाहारी वादाबद्दलही म्हणता येईल असे वाटते का?
होय. इतकच काय फाजील अट्टहास अगदी संस्थळासही लागु होतो.

१२. मग असेच विज्ञानाभिमुख विरुद्ध कर्मकांड करणारे याबद्दलही म्हणता येईल असे वाटते का?
नाही. विज्ञानाभिमुख व कर्मकांड करणारे मुळात व्रुत्तिने एकच.. फक्त प्रत्येकाचं बायबल वेगळ. म्हणुन जे बायबल स्वर्गातुन फॅक्सने पृथ्विवर आलेले नाही असे ठामपणे म्हणते ते जास्त योग्य. पण आफ्टर ऑल वाइअजनेस इज नॉट एव्हरिथिंग.. त्यामुळे.. चालुद्या.

कवितानागेश's picture

6 Mar 2013 - 1:41 pm | कवितानागेश

मन खंबीर असणं म्हन्जे नक्की काय?

इरसाल's picture

6 Mar 2013 - 2:01 pm | इरसाल

लहान्पणी अबीर वगैरे शब्द ऐकुन ते खंबीर पण तसलाच प्रकार असावा असे मला फार दिवस वाटत राहीले होते.

;)

मनाची खंबिरता म्हणजे मनात निर्माण होणार्‍या सुख, दुख, क्लेश, वा इतर कोणत्याही प्रकारच्या भावनांच्या आवेगाच्या आहारी न जाण्याची असलेली क्षमता होय.

कवितानागेश's picture

6 Mar 2013 - 3:38 pm | कवितानागेश

आहारी न जाणे म्हणजे नक्की काय? कृती न करणे की काय?
बाकी आपले शिवाजीमहाराज खंबीर होते की बिनखंबीर?

उपास's picture

6 Mar 2013 - 7:54 pm | उपास

माऊ, एखादी व्यक्ती खंबीर असणे वा नसणे ह्यापेक्षा एखाद्या प्रसंगात ती खंबीर राहिली का असं बघणं योग्य. म्हणजे, शिवाजी महाराज अफझलखानाला मारले तेव्हा खंबीर राहिले, आग्र्याहून सुटका झाली तेव्हा खंबीर राहिले पण बाजी गेला, ताना गेला तेव्हा ढसढसा रडले. ह्यावरून ते एकूणात खंबीर होते/ नव्हते हे सरसकटीकरण झालं, तरीही जास्तीत जास्त प्रसंगात धैर्याने तोंड देण्याच्या, कच न खाण्याच्या वृत्तीमुळे, बुद्धी/विवेक स्थिर ठेवण्याच्या उदाहरणांवरुन महाराजांना खंबीर म्हटले तर गैर ठरु नये!
आणि हो, बिनखंबीर असा शब्द नसावा, लेचापेचा म्हणता येईल.

एकंदर मोठ्ठा आवाका असलेला विषय.. वाचतोय!
- उपास
(प्रश्नच न पडलेला..)

कवितानागेश's picture

8 Mar 2013 - 11:49 pm | कवितानागेश

म्हन्जे मूळात खंबीरपणाच खंबीर नसतो तर! ;)

-बिनखंबीर माउ