मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

~ गंध धुंद ~

किल्लेदार ·

सुंदर सुगंधित लेख. परफ्युमची लहानपणापासूनच ऍलर्जी असल्याने कधीच फार वापरता येत नाही. मध्ये एकदा धीर करून एक बाटली आणली पण लगेच त्रास चालू झाला. तशीच पडून आहे कपाटात.

विजुभाऊ 07/11/2025 - 10:35
खल्ल्लास....... वाचूनच एकदम धुंद झालो. लै भारी लिहीलेय भाऊ. गंध , वाईन आणि स्कॉच मधे प्रायमरी नोट्स आणि सब नोट्स चे प्रकरण तसे क्लासेस साठीच असते. पानडी आणि व्हाईट रोझ हे आमच्यासाठी चे अस्सल देशी गंध. त्यानंतर कॉलेजात असताना कधीतरी इंटीमेट हे नाव ऐकन्यात आले. डीओ वगैरे प्रकार फारसे जमले नाहीत म्हणून आजमावले नाहीत. कधीतरी आणलेले आणि फक्त खास कार्यक्रम वगैरे साठी जपून ठेवलेले इंटिमेंट , सँडलवुड वगैरे चे फवारे कॉलेजवयीन चिरंजीवाने सढळ हाताने वापरून संपवले. मग ठरवले की फक्त फवारे न आणता अत्तरे च आणायची तेंव्हा पारिजात आणि सोनचाफा या गंधात अडकलो. एकदा बहारीन वरून येताना ओउध ( ऊद) आणले. पण तो वास उग्र ठरला. काही गंध आठवले तरी बर्‍याच जुन्या आठवणी जागृत होतात. हे मात्र खरे

Bhakti 07/11/2025 - 11:38
वाह! खुपच सुवासिक लेख आहे.फुलांचे सुगंधित परफ्यूम भारतात तरी अधिक प्रचलित आहेत.तेव्हा प्राणीजन्य गोष्टी यासाठी कशाप्रकारे वापरल्या जातात हे नव्यानेच समजलं.

किल्लेदार 08/11/2025 - 03:35
नचिकेत जवखेडकर- अरेरे. बाटली तशीच असेल तर मी येऊन घेऊन जातो :) कर्नलतपस्वी - हाहा...धन्यवाद. सिरुसेरि, Bhakti - धन्यवाद विजुभाऊ - उद जरा उग्र असतो खरा. मी एकच वापरला. Versache Oud Noir. मस्त आहे. अत्तरे चांगली असतात पण जरा एकसुरी असल्यामुळे थोडी बोअरिंग वाटतात.

प्रचेतस 10/11/2025 - 12:52
एकदम धुंद फुंद करणारा लेख. बाकी काही पर्फ्युम कितीही महागडे आणि भारी असले तरी आपल्याला आवडतील असे नव्हे. आपल्याला आवडणारा एखादाच मिळतो आणि आपण त्याचे पंखे होऊन जातो. मला आवडलेला आणि रुचत आलेला म्हणजे डियोर सॉवेज. तो एकदा वापरला पण इतका महागडा सतत वापरायला परवडणे शक्य नाही मग त्याचा क्लोन अजमलचा झील वापरतो. अजमल, अर्माफ ह्या दोन्ही प्रतिष्ठित कंपन्या महागडया पर्फ्युम्सचे उत्तम दर्जाचे क्लोन्स तयार करतात. अर्थात अजमल, अर्माफ वापरणेही तसे महागातच जाते ही गोष्ट वेगळी.

In reply to by प्रचेतस

सुबोध खरे 11/11/2025 - 11:37
सुगंधच नव्हे तर कोणतीही कला आपल्याला आवडेल तीच महत्त्वाची आहे उगाच ती महाग आहे किंवा जास्त लोकांना आवडते म्हणून आपण आवडून घ्यावे असे काहीही नाही. मुळात कला चित्रकला हस्तकला शिल्पकला गायन वादन सुगंध किंवा कपडा या गोष्टी आपल्या पंचेंद्रियांना आनंद देणाऱ्या असाव्यात. तुमचा पिंड नसेल तर उगाच खादीचे जाडे भरडे कपडे घालून कोणत्यातरी अगम्य चित्रकलेच्या प्रदर्शनात आपली अभिरुची उच्च आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करणारे असंख्य लोक आढळतात तसेच अरमानी किंवा गुच्ची चं "औ द तॊईलेत" केवळ महाग आहे म्हणून तुम्हाला आवडलं पाहिजे असं मुळीच नाही. आपण चार पैसे मिळवतो म्हणून आपल्याला भरपूर महाग सुगंध आवडेलच पाहिजे असे नव्हे. हि केवळ गतानुगतिकता आहे. आपल्याला नाट्यसंगीत आवडत असेल तर आवडत नसलेल्या कोणत्यातरी कंटेम्पररी गझल गायकाच्या कार्यक्रमाला १५००० रुपये देऊन निमंत्रितांच्या रांगेत जाण्याची आवश्यकता नाही. एके काळी कॉर्पोरेट जगात आपण सी इ ओ असलो तर आपल्या कडे काळं बेरं (BLACKBERRY) असलाच पाहिजे असा अलिखित नियम होता या गतानुगतिकतेते आजही असंख्य लोक दिसतात आणि उगाच तसाच असायला पाहजे म्हणून स्वतः;ला त्रास होत असताना सुद्धा अट्टाहासाने आपण कसं एन्जॉय करतो आहोत हे जगाला पटवून देण्याचा अट्टहास करताना आढळतात चालायचंच

किल्लेदार 11/11/2025 - 16:03
प्रचेतस - डियोर महागडा आहे खरा पण क्लोनही चांगले आहेत. सुबोध खरे - खरंय. उगाच महाग आहे म्हणून काहीही आवडून घेण्यात अर्थ नाही. पण पैसे टाकले की गुणवत्ता सहसा चांगली मिळते, अर्थात त्यालाही बरेच अपवाद आहेतच. खिशाला परवडत असेल, आवड असेल आणि खर्च केलेले पैसे वसूल होत असतील तर काहीच हरकत नाही पण उगाच हाईपच्या मागे लागण्यात अर्थ नाही. महागड्या ब्रँड च्या किंमतीत बराचसा भाग हाइपचा आणि ब्रॅण्डिंग चा असला तरी चांगला कच्चा माल वापरलेला असल्यामुळे ब्रँडेड प्रॉडक्ट वापरण्यातले समाधान आणि मजाही वेगळी असते.

गामा पैलवान 05/12/2025 - 00:49
किल्लेदार, लेख चांगलाच खुसखुशीत झालाय. गंधांची दुनिया अजब असते. लेखातल्या बऱ्याच गोष्टींशी नातेगत ( = रीलेट ) होऊ शकलो. विशेषत: सुगंधी पट्टीशी अगदी घट्टपणे ! ;-) आयुर्वेदांत नासिकेस मेंदूचे द्वार म्हंटलंय. म्हणूनंच गांधांमुळे स्मृती चटकन जागृत होत असाव्यात. आ.न., -गा.पै.

गवि 05/12/2025 - 08:37
लेख बेहद्द आवडला. शैली, कोटीबाजपणा, विस्तार .. सगळंच एकदम भारी. एखादा सुगंध आपल्याला टेलिपोर्ट करून विशिष्ट जागी, विशिष्ट जगात नेतो हे अगदी पटलं. पॅरिसमध्ये आणि युरोपात कुठल्या कुठल्या परफ्युमरीज फिरून बघितल्याचं आठवतं. फ्रॅगोनार्ड किंवा तत्सम एक नाव आठवतं. कागदाच्या पट्ट्यांवर फवारा आणि मग त्या खिशात घेऊन फिरणे वगैरे सर्व आठवले. मिट्टी परफ्यूम. भारी कंपनीचा घेतल्यास खरा शुद्ध मातीचा सुगंध मिळतो. बाकी ठिकाणी त्यात इतर कायकाय घातलेले असते.

परफ्यूम आवडतं, त्यामुळे लेख थेट भिडला. शैली भारी. खुसखुशीत आणि तितकेच भारी संदर्भ. सकाळ गंधीत झाली. खरं, म्हणजे लेखनाचं कौतुक करायला खूप पानभर लिहायला पाहिजे. इतका भारी लेख आहे. अतिशय सुंदर. लै म्हणजे लै आवडलं लेखन. भावना पोचल्या असतील. दै. लोकमतच्या दीपोत्सवात २०२५ यावेळी कन्नौजच्या अत्तरावर खूप सुंदर लेख आहे. दीडहजार वर्षापासून या कन्नौजला अत्तराचा गंध आहे, तेथील ग़टारांना अत्तराचा गंध आहे, इतके अत्तर तिकडे तयार होतं. कन्नौजवर फिर कभी बोलूया...........! -दिलीप बिरुटे

वेदांत 05/12/2025 - 12:46
खुप मस्त लेख झाला आहे. अत्तर / परफ्युम हा माझा खूप आवडता विषय.. अत्तर पासुन सुरू करता करता, आता आवडत्या परफ्युम्स ची पूर्ण बोटल मागावण्या पर्यंत मजल गेली आहे. Mancera Cedrat Boise हा तर माझ्या सर्वात आवडता परफ्यूम.. Creed Aventus च्या डीएनए चा क्लोन असला तरीही थोडा वेगळा आहे. कोणत्याही ऋतूमध्ये वापरता येतो आणि नेहमीच कॉम्प्लिमेंट्स मिळतात. Armaaf चा CDNI पण याच वाटेने जातो. सध्या मिडल ईस्टर्न परफ्युम्स पण चांगले येत आहेत , उदाहरण द्यायचे म्हटले तर Afnaan che 9PM, 9PM एलेक्सिर, सुप्रीमसी कलेक्टर एडिशन /नॉट ओन्ली इंटेन्स, लत्ताफा चे खामरा , खमराह कवाह इत्यादि. Silage & Longetivity बद्दल मिडल ईस्टर्न परफ्युम्स नेहमीच एक पाऊल पुढे.. सध्या हिवाळा चालू असल्याने फ्रेंच Avenue चे Liquid ब्राउन पण वापरून बघितले , ज्यांना गोडवासाचे पर्फुम्स आवडतात त्यांच्यासाठी हा खूप छान आहे, उन्हाळ्यासाठी स्वस्त आणि मस्त म्हणजे Rue Broca Theoreme perfume , या विषयाची कितीही माहिती घेत गेलो तरी, अजुन बरेच काही शिकायचे आहे असे नेहमीच वाटत रहाते..

टर्मीनेटर 05/12/2025 - 14:38
काय त्या 'शाब्दिक कोट्या', काय ती 'ओघवती लेखनशैली, आणि काय ते 'दर्दी' मंडळींचे प्रतिसाद... सगळंच एकदम जबरदस्त 👍 काहीसा उशिराने वाचनात आलेला हा 'सुगंधी' लेख प्रचंड आवडला आहे. अर्थात ही फक्त पोचपावती आहे, ह्यावर एक स्वतंत्र सविस्तर प्रतिसाद लिहावाच लागणार आहे!

किल्लेदार 12/12/2025 - 00:05
गामा पैलवान, गवि, प्रा.डॉ.दिलीप बिरुटे - खणखणीत प्रतिक्रियांबद्दल आभार. आपलेही काही अनुभव सांगा. वेदांत - धन्यवाद. Cedrat Boise Intense जास्त चांगला वाटला. OG जास्त टिकत नाही पण आहे चांगला. मिडल ईस्टर्न थोडे उग्र वाटतात म्हणून त्यांच्या वाट्याला अजून फार गेलो नाहीये. टर्मीनेटर - सविस्तर प्रतिसादाची वाट बघतो :). लेखात अजूनही बरंच काही राहून गेलं आहे. तुमच्या शैलीत लिहून काढा.

In reply to by किल्लेदार

टर्मीनेटर 13/12/2025 - 20:00
सविस्तर प्रतिसादाची वाट बघतो :)
येस सर... लक्षात आहे, पण हल्ली इथे आल्यावर संजय राउत काय, संजय आवटे काय अशा एक से एक दलिंदर लोकांनी प्रसवलेले भंकस विचार वाचण्यात काहीवेळ खर्ची पडतो आणि त्यामुळे हाताशी असलेला फावला वेळ कमी पडतो,. (सब गंदा है पर धंदा है ये... त्या लोकांचा, माझा नाही बर्का 😀) पण ते असो, वर मदनबाण साहेबांच्या प्रतिसादात ''Gucci Flora' ह्या माझ्या (कुठल्याही स्वरुपातील) आवडत्या फ्रॅग्रंसचा उल्लेख वाचला आणि रहावले नाही म्हणुन हा छोटासा प्रतिसाद प्रपंच!

In reply to by टर्मीनेटर

किल्लेदार 15/12/2025 - 21:16
निवडक खावं आणि निवडक वाचावं म्हणजे डोक्याचं आणि पोटाचं अपचन होत नाही.

मदनबाण 13/12/2025 - 11:16
सुगंधावर लिहलेला अत्यंत रचनात्मक लेख! माझा अगदी आवडता विषय ! अत्तर- परफ्युम आणि मग डिओ असा माझ्या आवडीचा क्रम आहे. सध्या Hawas Ice,Sauvage,Arabians Tonka,Gucci Flora, Musk Al Tahara अनुभवुन पहात आहे [ क्लोन व्हर्जन ]. तर डिओ मध्ये अजमल चे परफ्युम डिओ अनुभवणे सुरवात केली आहे. यात Aurum Wisal & Wisal Dhahab आणि Sacred Love आहे. याचा काँबो सेट मिळतो.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Kiliye Kiliye... | Lokah Chapter 1: Chandra |

In reply to by मदनबाण

मदनबाण 13/12/2025 - 13:48
एक दुवा द्यायचा राहुन गेला होता: How to Smell Rich: Perfume Hacks, Men vs Women & Lasting Tips - Abdulla Ajmal | FO387 Raj Shamani

किल्लेदार 15/12/2025 - 21:07
हो. बघितलाय हा. अजमल चा सगळा पैका उद प्लांटेशन मधून येतो. परफ्यूम त्याच्यासाठी चिरीमिरी आहे. हवास आईस घ्यायचा राहून गेला. हवास ट्रॉपिकल घेतला. चांगला आहे. Sauvage चांगला आहे पण खूपच कॉमन झाल्यामुळे थोडा कंटाळवाणा झाला.

In reply to by किल्लेदार

मदनबाण 18/12/2025 - 14:32
Sauvage चांगला आहे पण खूपच कॉमन झाल्यामुळे थोडा कंटाळवाणा झाला. मला क्लोन परफ्युम्स बद्धल काहीच माहित नव्हते आणि मी मुख्यत्वे अत्तर वापरण्यावरच बराच काळ भर दिला आहे. अचानक मला या क्लोन प्रकरा बद्धल कळले आणि मी बर्‍याच काळाने परफ्युवर परतलो. पारध्यां पेक्षा पक्षांचे नाक अधिक संवेदनाशील असते आणि त्यांना तीव्र गंध आवडत नाहीत त्यामुळे Sauvage आणि इतर ट्राय मारले. सध्या Black Opium अनुभवत आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- PASSO BEM SOLTO (SLOWED) : ATLXS

In reply to by मदनबाण

किल्लेदार 18/12/2025 - 18:28
पक्ष आणि पक्षी दोघांच्याही कधी नादी लागलो नाही त्यामुळे माझ्या नाकाला भावतो तो मला आवडतो. एक दोन परफ्यूम्स तर असे आहेत की पक्षी स्थलांतरच करतील. अंटोनियो पुइज कोरम, टेड लॅपिडस हे त्याच कॅटेगरी मध्ये येतात पण मधून मधून स्वतःसाठी वापरतो. एखादा जुना इंग्रजी चित्रपट किंवा सीरिज बघतांना हमखास उडवतो.

In reply to by किल्लेदार

मदनबाण 18/12/2025 - 21:11
हा.हा.हा... स्वतःला आवडणारे आणि आपण लावल्यामुळे आपल्या सकट दुसर्‍यांना आवडणारे अशी मी अगदी माझ्यासाठीची विभागणी केलेली आहे. तुम्ही म्हणता तसे मी देखील मला आवडणारे परफ्युम जे कदाचीत इतरांना आवडणार नाहीत वापरले आहेत. प्रदीर्घकाळ विविध सुंगध प्रकार वापरल्या नंतरी मी माझ्यात बदल केला, मी असे सुगंध टाळतो जे तीव्र गंधाचे असतील, कारण काही वेळा अश्या गंधाने इतरांचे [ आपल्या आजुबाजुचे ] डोके ठणकते आणि माझ्यामुळे कोणा इतर व्यक्तीस त्रास होऊ नये ही गोष्ट मला महत्वाची वाटली. माझ्या नोकरीत कामाच्या स्थळी सर्व वयातल्या पक्षांचे प्रमाण बर्‍यापैकी असते,त्यामुळे त्यांचे नाक अधिक संवेदनाशील असते हे मला अनुभवातुनच समजले. करोनाच्या आधी एका स्थळी काम करताना माझ्या आजुबाजुला जवळपास ७ पक्षी जीव होते आणि त्यांच्या गराड्यात मी एकटा... :))) साधारण एक आठवड्यात त्या सगळ्यांना हे समजलेले होते की हा काहीतरी भन्नाट लावुन येतो, दुसर्‍या आठवड्यात त्यांच्यावर पूर्णपणे प्रभाव झालेला होता, तिसर्‍या आढवड्यात पक्षी जीव स्वत: परफ्यूम घेउन हापिसात प्रकटले होते! :))) तर, मलाही फार आवडेल आणि आजुबाजुला असलेल्या सर्व लोकांनाही जबराट वाटेल अश्या सुगंधावर पोहचण्याचा, काय म्हणतात ते... हं... सुवर्णमध्य मी गाठला! :) सुंगधाची आवड ही प्रत्येकाची वेगवेगळी असते,त्यामुळे त्यातल्या त्यात जरा इझी गो, उदा.Sauvage सारखे गंध कॉमन जरी वाटले तरी तितकेच प्रभाकारी असतात व साधरणता कोणाला [स्वतः सकट ] त्रास होत नाही, त्यामुळेच ते बहुधा कॉमनली वापरले देखील जातात. :) वयानुसार आवडीत देखील फरक पडतो. आधी मला व्हाईट उद आवडायचा पण आता मला ब्राऊन किंवा कंबोडी मधुर उद अधिक आवडतो. [ आपला आवडता उद मिळणे ही बहुधा कठीण गोष्ट असावी? ] वरती Black Opium चा उल्लेख केला आहे, तो बर्‍यापैकी तीव्र आहे. मला सगळ्यात आवडलेल्या क्लोन चे नाव सांगायचे राहिलेले ते म्हणजे LIBRE. जसे स्त्रियांना फुलांचे गंध आवडतात तसे पुरुषांना देखील ते आवडतात. उत्तम उदाहरण म्हणजे चांगल्या दर्जाचे मोगरा अत्तर. मला कलोन बेस्ड परफ्यूम्स देखील विषेष आवडतात. जाता जाता: तुमचा फेवरेट मस्क असलेला परफ्यूम कोणता? तसेच काही सुचवाल तर आभारी राहेन. :)

किल्लेदार 20/12/2025 - 07:49
माझ्याकडे मस्क असलेला कुठलाच नाहीये. मसाल्यांमध्ये माझा आवडता टोबॅको. त्यात बरेच आहेत. उद मधे Versace Oud Noir आणि Mancera Aoud Lemon Mint आहेत. Mancera Red Tobacco मध्ये उद आणि तंबाखू दोनही आहेत.

कांदा लिंबू 13/12/2025 - 18:01
व्वा! काय त्या 'शाब्दिक कोट्या', काय ती 'ओघवती लेखनशैली, आणि काय ते 'दर्दी' मंडळींचे प्रतिसाद... सगळंच एकदम जबरदस्त हेच मनात आले होते! मी काही सुगंधांचा जाणकार नाही, पण सुगंधांचा अत्याधिक चाहता मात्र आहे. पर्यटनाची आवड असल्याने जिथे जातो तिथून कोणते ना कोणते सुगंध घेऊनच घरी येतो. डियो कधी आवडले नाहीत, अल्कोहोल-बेस्ड परफ्यूम्स पूर्वी वापरायचो, आता फारसे वापरत नाही. माझी पहिली पसंती ऑइल-बेस्ड अत्तरांना. अगदी नेहमीच्या मोगऱ्यापासून ते सफेत ऊद ते कस्तुरी ते अजून काहीही, सर्व गंधांची अत्तरे मनाला वेड लावतात. त्याशिवाय गंध देणारे मूळ स्रोतही जसे ताजा मोगरा, ताजा किंवा सुकलेला सोनचाफा, दालचिनीची साल, विलायची, कॉफीच्या बिया, भीमसेनी कापूर, गवती चहाची पाने, पेट्रोल (हो!), गाईचे ताजे दूध, पिकलेला बंगनपल्ली आंबा... हेही आवडतात. छान लेख लिहिलाय किल्लेदार!

In reply to by कांदा लिंबू

किल्लेदार 15/12/2025 - 21:14
अत्तरं मलाही आवडतात पण थोडी एकसुरी असतात. अंतरा आणि मुखडा सेम टू सेम. काही आहेत माझ्याकडे पण परफ्यूम्स मधली कलाकारी जास्त भावते. तुमच्याप्रमाणेच मूळ गंध देणारे स्त्रोतही आवडतात. पेट्रोल, नेल पॉलिश, दिवाळीची दारू ( आणि पिण्याचीही अर्थात) हे इतरांना बकवास वाटणारे वासही प्रिय आहेत.

लेखनविषय:
कोणे एके काळी विमानतळावर ड्युटी फ्री शॉप दिसलं की दारू गोळा करणे ही एक “ड्युटी” मानून, मी ती अगदी निष्ठेनं पार पाडत असे. नाकासमोर चालण्याचा स्वभाव, नाकाला इतर कुठल्याही प्रलोभनांना बळी पडू न देता नेमक्या दुकानात घेऊन जाई. हव्या त्या बाटल्या मिळाल्या की त्या ड्युटी मधून एकदाचं फ्री झाल्यासारखं वाटायचं. जरा वेळापूर्वी मुक्त असलेले दोनही कर, करमुक्त दुकानातून घेतलेल्या जड बाटल्या सावरण्यात गुंतले की इतर जाणिवा मुक्त होत ज्यात सर्वत्र दरवळणाऱ्या सुगंधाचीही एक असे.

मिताली राजला आउट करणारी नांदेडची मुलगी

मार्गी ·
लेखनप्रकार
नमस्कार. भारतीय मुलींच्या टीमबरोबर त्यांचं कौतुक करणार्‍यांचंही अभिनंदन! एक खूप वेगळी क्रांती घडते आहे. मुलींच्या खेळाबद्दल आणि एकूणच खेळाच्या जगताबद्दलसुद्धा. परवा मुलींचा सन्मान करणार्‍या मिताली राजला बघून तिला आउट करणारी नांदेडची मुलगी मात्र सारखी आठवते! मिताली राज १९९९ ते २०२२ ही २३ वर्षे भारतासाठी खेळत होती. सर्वांत कमी एकदिवसीय सामन्यांमध्ये एक हजार रन्स करणारा भारतीय खेळाडू हा विक्रम तिच्याच नावावर आहे. २००८ मध्ये ती कॅप्टन असताना अनेक ठिकाणी नवीन खेळाडू शोधायला जायची. तेव्हा ती नांदेडला आली होती. आणि ज्युनियर क्रिकेट खेळणार्‍या एका १६ वर्षांच्या मुलीने तिला आउट केलं होतं!

मुलांच्या निसर्ग शिबिराचा आनंद सोहळा!

मार्गी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
मुलांच्या निसर्ग शिबिराचा आनंद सोहळा! ओढा, स्विमिंग पूल, बेडकं, खेकडोंगर ट्रेक‌ आणि मस्ती की पाठशाला ✪ पानी‌ में शिरा और मस्त पोहा! ✪ अंजवेलमधलं भूताचं झाड… ✪ जोडसाखळी, विष- अमृत, नौकायुद्ध आणि रस्सीखेच ✪ "विराट कोळी" आणि झाडावरच्या लढाऊ मुंग्या! ✪ तोडलेल्या फेविकॉलच्या जोड्या आणि पाठलाग ✪ खजिन्याचा शोध आणि तुंग- तिकोना ✪ हेलिकॉप्टर उडवणारे काका आणि वेगळ्याच गप्पा ✪ अंजनवेलची आपुलकी आणि घरपण ✪ सारखी तीच ती‌ संख्या कशी येतेय? ✪ चंद्र- सूर्य आणि ग्रह- तारे ✪ मुलांचा स्वत: खेळण्याचा उत्साह आणि आनंद ✪ शिबिरातले खास टॉम अँड जेरी! ✪ मस्ती, खेळ, लढाई, टीम वर्क आणि

धूमकेतू C/2025 A6 (Lemmon) बघण्याचा रोमांच

मार्गी ·

सतत चार साडेचार महिने ढगाळ आकाशानंतर मोकळे आकाश पाहून बरे वाटले. लेखातले वर्णन सुरेख जमले आहे. आकाशाचा पटच डोळ्यांसमोर उभा राहिला. पण वर्णनाशी जुळणारे फोटो नसल्यामुळे खट्टू झालो. तरीही सुंदर लेखाबद्दल धन्यवाद.

मार्गी 12/10/2025 - 20:55
@ सुधीर कांदळकर सर, हो, खरं आहे. पण एस्ट्रो फोटोग्राफी खूपच वेगळी गोष्ट आहे. वेगळं डोमेन आहे. आणि धुमकेतूचा चांगला फोटो हवा असेल तर डीएसएलआर, ट्रॅकर असं सगळं हव. हे फोटो पाहा कसे वाटतात- अपडेट- धन्यवाद! अपडेट- दोन धूमकेतूंचं एकाच रात्री निरीक्षण अतिशय निरभ्र आकाशातला दीपोत्सव नमस्कार. मावळमधल्या अंजनवेल कृषि पर्यटनमध्ये एकाच रात्री‌ C/2025 R2 (SWAN) आणि C/2025 A6 (Lemmon) हे दोन धूमकेतू बघता आले. पाऊस गेल्यानंतरचं अतिशय निरभ्र आकाश. धनुराशीपासून श्रवण आणि थेट अभिजीत तार्‍यापर्यंत आकाशगंगेचा दुधाळ पट्टा दिसला. एका वेळेस तर देवयानी आकाशगंगा नुसत्या डोळ्यानी पुसटशी दिसत होती. कित्येक तारकागुच्छ बघता आले. त्याशिवाय इतरही कित्येक ऑब्जेक्ट बघता आले. हे फोटो नक्की पाहाल. 1: धनुराशीतील आकाशगंगेचा पट्टा 2: फाय ओफिउशी तार्‍यालगत C/2025 R2 (SWAN) धूमकेतू 3: श्रवण ते अभिजीत तार्‍याच्या परिसरातील आकाशगंगेचा पट्टा 4: व्याध, मृग आणि रोहिणी नक्षत्र 5. व्हिडिओ- धनुरास भागातील आकाशगंगेचा टाईमलॅप्स 6. व्हिडिओ- श्रवण- अभिजीत परिसरातील आकाशगंगेचा टाईमलॅप्स 7- 8: चंद्र धन्यवाद.

मार्गी 14/10/2025 - 16:43
नमस्कार. प्रोसेस केलेले फोटो अतिशय अविश्वसनीय आलेत! माझाच विश्वास बसत नाहीय. २० सेकंद एक्स्पोजरच्या ५० इमेजेस सीक्वेटरमध्ये स्टॅक केल्या. तेव्हा हे मिळालं- धन्यवाद.

अंजनवेलमधील निसर्गाचे नयनरम्य अविष्कार! ✪ दोन धूमकेतू सध्या छोट्या टेलिस्कोपने बघता येतात ✪ धूमकेतू C/2025 A6 (Lemmon)- १३९६ वर्षांनी भेटायला आलेला पाहुणा! ✪ सब्र का फल मिठा- अखेर झाले मोकळे आकाश! ✪ अंजनवेलमधला निसर्ग- ढग, पाऊस आणि दवाचा पाऊस ✪ निरव शांततेत ओढ्याची कोसळधार, नितळ आकाश आणि तारेच तारे ✪ सितारों की महफील में कर के इशारा ✪ धुक्याच्या दुलईत पहुडलेले पर्वत ✪ विविधरंगी फुलांचा बहर आणि सह्याद्रीची श्रीमंती ✪ अंजनवेलमध्ये धूमकेतू निरीक्षण सत्र आणि मुलांसाठी हिवाळी शिबिर नमस्कार.

माहिती: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शंभर वर्ष

विवेकपटाईत ·

शाम भागवत 30/09/2025 - 16:59
https://youtu.be/bSdo96LusOY?si=mbhUVpizpfht7P5Q संघाबाबत अभ्यासपूर्ण विवेचन केलंय. तेही संघाशी संबंधीत नसलेल्या महाराष्ट्र टाइम्समधल्या माणसाने.

In reply to by शाम भागवत

न राज्यं न च राजाS सीत् न द्ण्ड्यो न च द्ण्डिकः धर्मेणैव प्रजा: सर्वा: रक्षन्ति स्म प्रस्परम ! शासनयंत्रणा नाही, शासक नाही, कोणी अपराधी नाही, शिक्षा करणाराही कोणी नाही, धर्मानेच सर्व लोक परस्परांचे रक्षण करतील, ही महाभारतातील आदिम साम्यवादी कल्पना. अर्थात अशा कल्पनेने काही काळ मनोरंजनही होईल. परंतु समाज परिवर्तनाची प्रेरणा मिळणार नाही. ( झोत ) आपण कायम ज्या 'गोबरयुगा'ची कल्पना करतो त्याची पायाभरणी म्हणता येईल ती शंभरवर्षापूर्वी झाली आणि त्याचे दुष्परिणाम आज आपण पाहात आहोत. राष्ट्रीय स्वयंसेवक खेळाच्या, व्यायामाच्या, माध्यमातून तरुणांना गोळा करतात. काही तरुण व्यायाम, खेळ यासाठी येतात आणि हळुहळु यांना धर्म अभिमानाचे (आपोआप धर्मद्वेश सुरु होतो) धडे देणे सुरु होते. धर्माभिमान उभा करता करता, धर्मद्वेष चिंतन शिबिरातून तरुणांना मिळायला लागतात. 'भगवा ध्वज हाच राष्ट्रीय धव्ज, हिंदुस्थान हिंदूंचा आणि एकचालकानुवर्तित्व तत्वांची संघाच्या बौद्धि कात पुनराव्रुत्ती होत असे. शिस्त आणि संघटनेसाठी जर्मनी, इटली, यांचे आदर्श असत. एखाद्या वेळी चवबदल म्हणूण हिंदूंचा उज्ज्वल गतेहितिहास, लोकशाही, संस्थापद्धतीची चेष्टा आणि कॉंग्रेसचा अधिक्षेप या सामग्रीवरच संघाची बौद्धिक आणि संघटनात्माक उभारणी झाली होती' असे अनुभव अनुभव संघात अनेक वर्ष घालवलेल्या स्वयंसेवकांनी नमुद करुन ठेवलेले आहेत. (संघातले दिवस् स.ह.देशपांडे- मौज दिवाळी अंक १९७४) झोत. रावसाहेब कसबे, पृ.क्र. ३७ आज शंभरवर्षानंतरही संघाच्या धोरणात फार बदल झालेला नाही. हिंदू संघटनाच्या नावाखाली भाजपला मदत करणे आणि कॉंग्रेस सहित इतर पक्षांचा द्वेष, मुस्लीमांविषयी द्वेष पसरविण्याचे काम ही संघटना आता छुप्या मार्गाने करतांना दिसते, गाय गोबर संस्क्रुतीवर प्रेम दाखवतांना त्यापोटी इतरांचा द्वेष शिकवणारी संघटना म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे पाहता येते. राष्ट्रीय स्व्यंसेवक संघाच्या जन्माचा विचार पाहता ब्रिटीश भारतात वर्गीय शोषण होत होते. सर्व सत्ता केंद्रे ही उच्च वर्णियांच्या हाती होती, स्वातंत्र्यांनंतरही, ही शोषण सत्ता व्यवस्था आणि वर्गीय व्यवस्था आपल्या हाती कशी राहील याची काळजी त्यांना पडली होती. सरंजामदार आणि नवीन भांडवलदारांना हाताशी धरुन ते संघाला जमले होते, तशी भारतीय स्वातंत्र्य चळवळ हीच त्यांच्या मार्गातील अडसर होती. स्वातंत्र्योत्तर भारताची राज्यघटना ही संसदीय लोकशाहीवर उभी राहणार होती अशा वेळी तेव्हा सत्ता आणि वर्चस्व शक्य नव्हते. बहुजन समाज जागृत होत होता. १९०९ व १९१९ च्या कायद्यामुळे लोकशाही विचारांनी डोके वर काढले होते. टीळकांच्या निधनामुळे काँग्रेसवरील हिंदुत्ववाद्यांची पकड सैल झाली होती. म.गांधींच्या स्वातंत्र्य चळवळीत मुस्लीम, अस्पृश्य यांनाही सहभागी करुन घेतले होते. म. गांधीच्या उदारमतवादी धोरणामुळे लोकशाहीचा विचार रुजेल ही भिती होती. म.गांधीजींच्या मुळेच संघाचा जहालवाद फोफावला नाही. म. गांधीचा द्वेष असा सहजा सहजी संघाच्या मनात आलेला नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्वातंत्र्य चळवळीपासून दूर का राहिला. राजकारणापासून अलिप्त का राहिला तर, राजकारणातून सत्ता नको तर, वर्चस्व असले पाहिजे, दबाव गट असला पाहिजे याच हेतुने संघाची स्थापना झालेली दिसते. आज शंभर वर्षानंतरही त्यांच्या धोरणात विविध धर्म एकता,आधुनिक विचार, विज्ञान, प्रगती, डोळसपणा, वैश्विक भाव दिसत नाही त्याची कारणे सहज शोधली तर सहज सापडतील. अशा संघटनापासून सावधान राहिलं पाहिजे इतकंच. एवढे बोलून दोन शब्द संपवतो. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शाम भागवत 12/10/2025 - 15:17
अगदी. अगदी. सावध राहिलंच पाहिजें. पण संघविरोधी लोकं एवढा प्रयत्न करत असूनही त्यांची संख्या कमी का होते आहे? बऱयाच वेळेस बंदी घातली. अर्धी चड्डी म्हणून हिणवलं. केंद्र व राज्य सरकार हातात असतानाचे हे सगळे प्रयत्न करून झाले. आता हातात सरकार नाही तर लोकांना सावध करून, सावध लोकांची संख्या कशी वाढवणार असा प्रश्न आहे हो. मोहन भागवत आल्यावर संघ बराच बदलला म्हणतात. पण संघविरोधी लोकींनी संघाला विरोध करण्याचे मार्ग बदलले का? जर नसतील बदलले तर मग संघविरोधी राजकारणाला यश कसं येणार? संघ संपणारच हा आदर्शवाद असेल तर माझी काहीच हरकत नाही. एवढं गोड बोलून थांबतो.

In reply to by शाम भागवत

युयुत्सु 12/10/2025 - 16:37
श्री० शाम भागवत ज्या क्षणी काँग्रेस आणि इतर पक्ष आपले आत्मपरिक्षण/शोधन करून पुनर्बांधणी करतील त्या़क्षणी संघप्रेमाला ओहोटी लागेल. तुम्हाला बेल कर्व्हचा नियम्/परिणाम ठाऊक आहे का? अविवेकी लोकांची संख्या विवेकी लोकांच्या संख्येपेक्षा नेहेमीच जास्त असते कारण निसर्ग क्षमतांचे वाटप समान करत नाही. अविवेकी/अडाणी लोकांना समूहात नेहेमीच सुरक्षित वाटते. समूहात जोपर्यंत गरजा भागतात तो पर्यंत समूह एकसंध राहतो. संघात राहून भ्रमनिरास झालेल्यांची संख्या थोडी नाही. ही संख्यापण कमी होण्याची लक्षणे नाहीत. ज्या प्रश्नांकडे संघ जाणून-बुजून डोळेझाक करतो ते संघाबद्दल भ्रमनिरास आणि संघाचा पराभव करण्यास पुरेसे आहेत. त्यामुळे संघ संपणार नाही हा उन्मादच शेवटी केव्हा तरी घात करेल हे नक्की...

In reply to by युयुत्सु

शाम भागवत 12/10/2025 - 20:37
उपजे ते नाशे. इतके सोपे आहे ते तत्वज्ञान. पण त्यात जो आपले ममत्व किवा राग/द्वेष घालतो त्याला त्रास होतो. त्यामुळे मी सतत फक्त वस्तूस्थिती मांडतोय. त्यात काही चुकत असेल तर सांगा.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मदनबाण 05/01/2026 - 19:38
मुस्लीमांविषयी द्वेष पसरविण्याचे काम ही संघटना आता छुप्या मार्गाने करतांना दिसते मी माझ्या लहानपणी संघाच्या शाखेत रोज जात असे. त्या नंतर ही मला त्यांच्या बद्धल आस्था होती. अनेक संघ कार्यकर्त्यांचे उल्लेखनिय काम मला माहित अहे. तुम्ही जे मुस्लीमांविषयी द्वेष पसरविण्याचे काम म्हणत आहात ना, त्याच्या अगदी उलटे आजच्या काळात दिसते. श्री. मोहन भागवत यांची विधाने पहाला तर ते हिंदुंच्या भल्यासाठी आहेत असे वाटत नाही. त्यांची विधाने पाहिली असता ती हिंदू संघटना राहिली आहे का? असा प्रश्न पडतो! माझ्या वाचनात त्यांची आलेली त्यांची काही विधाने खाली देत आहे. १] मुसलमानों के बिना हिंदुत्व भी नही बचेगा| २]मुसलमानों के बिना हिंदू राष्ट्र नही| ३]आरक्षण को संघ का पेहला से समर्थन है ,सदा रहेगा, जबतक उस आरक्षण के लाभार्थीं को ये लगता नही इसकी आवशकता नही, ये भेद समाप्त हो गया हम अब अपने बलबुते खडे रहेंगे,ये दुसरे किसी को दो ये ऐसा जबतक उनको लगता नही हम उसके समर्थन मे रहेंगे| ४] जब से इस्लाम भारत में आया उस दिन से इस्लाम यहा है और रहेगा! इस्लाम नही रहेगा, ये सोचने वाला हिंन्दू सोच का नही है! ५] मुसलमानो के बिना हिंदुत्व नही| ६] हम कहेंगे कि मुसलमान नही चाहिए तो हिंदुत्व भी नही बचेगा| ७] हिंदुत्व में मुसलमान पराए नही| ८] हर मस्जिद मे शिवलिंग की तलाश क्यो? ९] मंदिरो को लेकर अब कोई आंदोलन नही करेगा संघ| १०] पेहले दिन इस्लाम भारत आया तबसे आजतक इस्लाम यहा है और रहेगा,इस्लाम नही रहेगा ऐसे सोचने वाला हिंदू सोच का नही| ११] परिवार के अंदर बच्चों से बातचीत से रोका जा सकता है लव जिहाद| १२] ब्राह्मणों की बेटी दलितों के घर ब्याहने से मिटेगा जातिवाद| १३] परशुराम जी "बढई / लोहार समाज के लक्कड हारे थे वो हमेशा अपने पास फरसा कुल्हाडी रखते थे वो कोई ब्राह्मण पुत्र नही थे|[ हे विधान सत्य आहे का? ते मला पडताळता आलेले नाही.] १४] उठसूट कोणत्याही प्रर्थनास्थळांच्या खाली हिंदू मंदिरं असल्याचा दावा करणं योग्य नाही. राम मंदिरासारखी आंदोलने अन्य प्रार्थनास्थळी करणे चूक आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- शीशा हो या दिल हो आख़िर टूट जाता है... : आशा [ 1980 ]

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मदनबाण 05/01/2026 - 20:16
हा.हा.हा... मग मोदी संघाचे ना? त्यांनी कोट्यावधी रुपये मुसलमानांसाठी का खर्च केले? कढी भात खायला? बरं ते जी दरवर्षी चादर चढवतात तो तर जिहादी आहे नै का? खरंच ते जर हिंदूत्ववादी असते तर ही घृणास्पद प्रथा त्यांनी ताबडतोब बंद केली असती ना? [ एका अंध भक्ताने ती चादर भगव्या रंगाची आहे असे मला सांगुन मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला होता.] मोदींनी नक्की किती हजार कोटी रुपये मुस्लिम योजनांवर खर्च केले? तो आकडा शोधणे कठीण आहे म्हणतात! आनंद रंगनाथन म्हणतात की जे मोदींनी मुसलमानांसाठी केले ते हिंदुंच्यासाठी देखील केले नाही. संदर्भः Modi Done More For Muslims Than Hindus" Anand Ranganathan “PM Modi Has Done More For Muslims Than Hindus” - Anand Ranganathan Dr Anand Ranganathan Podcast : BJP AND Congress | PM Modi | Hindu Discrimination | Hindu-Muslim मला संघ कधीही मुस्लिम द्वेष्टा असल्याचे कोणताच चष्मा न लावता दिसलेले नाही. ज्यांना खरंच देशात हिंदूची स्थिती नक्की काय आहे? हे तथ्या सकट जाणुन घ्यायचे असेल तर आनंद रंगनाथन यांचे हिंदूराष्ट्रातील हिंदू हे मराठीत उपलब्ध असलेले पुस्तक जरुर वाचावे असे मी सुचवतो.

स्वधर्म 30/09/2025 - 17:34
संघ ही नोंदणीकृत संस्था आहे का? पटाईतजी, या एका प्रश्नाबाबत लोकांच्या मनात फार गोंधळ आहे. कृपया आपण माहिती देऊन तो दूर करावा. उपप्रश्नः १. संघाच्या स्वयंसेवकाला काही ओळखपत्र, सभासद क्र. असे काही असते का? २. संघाचे पैशाचे व्यवहार सरकारला, आयकर विभागाला दाखवले जातात का? त्याचे ऑडीट होते का? लोकांना व देणगीदारांसाठी त्याचा हिशोब प्रसिध्द केला जातो का? नोंदणीकॄत संस्था असेले तर वरील दोन्ही होत असणार. आपण आता रिसर्च केलाच आहे, तर वरीलप्रमाणे नोंदणी आहे का या मुख्य व उपप्रश्नांची उत्तरे मिळाली तर लोकांच्या शंकांचे निरसन होईल.

In reply to by स्वधर्म

समाधान राऊत 01/10/2025 - 15:57
1. संघ ही संस्थाच नाही, नोंदणी करण्याचा प्रश्नच येत नाही , 2.संघामध्ये ओळखपत्र वैगेरे काही दिले जात नाही , खूप खूप तर वर्ग असताना ओळख व्यवस्था म्हणून तात्पुरते ओळख पत्र या काही वर्षात देऊ लागले आहेत , वर्ग पूर्ण झाला की ते जमा करून घेतात , ही पद्धत संपूर्ण भारत भर असेलच असे नाही , नवीन छोटेखानी प्रयोग फक्त काही ठिकाणी झाले 3. संघामध्ये फक्त वर्षातून एकदाच गुरुपौर्णिमेला भगव्या ध्वजासमोर समर्पण म्हणून काही निधी स्व ईच्छेनुसार निधी जमा केले जातो , आणि ह्या निधीमधूनच वर्षभराचा सर्व खर्च केला जातो . पुन्हा समर्पण गोळा केले जात नाही . ह्याचा हिशोब संघ कार्यालयात ठेवला जातो , कोणीही स्वयंसेवक हा हिशोब पाहू शकतो , परंतु सहसा कोणताही स्वयंसेवक हा हिशोब पाहत किंवा विचारत नाही , तेवढा विश्वास तेथे ठेवलेला असतो . याचे अंतर्गत ऑडिट होत असते . फक्त राम मंदिराच्या वेळी संघाने समाजातून निधी गोळा केला होता , ते ही मंदिर समितीच्या अध्यक्षतेखाली , तो सुद्धा हिशोब संघ देऊ करतो/ त्या वेळी दिला . परंतु ज्यांनी एक रुपया सुद्धा राम मंदिरासाठी दिला नाही ते हिंदू बांधव देणगीचा हिशोब मागतात .राम मंदिरावरच आणि रामा वरतीच प्रश्न चिन्ह निर्माण आपले हिंदू बांधव करत , आहेत हे खेदाने नमूद करतो.

In reply to by समाधान राऊत

स्वधर्म 02/10/2025 - 16:25
श्री पटाईत काकांनी काही उत्तरे दिली नाहीत. तुंम्ही दिलीत, हरकत नाही. त्याबद्दल धन्यवाद. आपण संघाकडे पाहताना एक विशिष्ट दृष्टीकोन ठेवून उत्तरे दिली आहेत. तथापि, या दिलेल्या माहितीकडे एका अपरिचिताचा पर्यायी दृष्टीकोन ठेवूनही पाहता येते. >> 1. संघ ही संस्थाच नाही, नोंदणी करण्याचा प्रश्नच येत नाही मग संघ हे काय आहे? '२०२५ मध्ये, देशभरातील पूरग्रस्त भागांमध्ये संघाने पुन्हा ९२,६५६ ठिकाणी सेवा शिबिरे उभारून लाखो गरजूंना अन्न, औषधे, निवारा आणि वैद्यकीय सेवा पुरवली.' असे पटाईत काका यांनी लिहिले आहे. याचा अर्थ लाखाहून जास्त स्वयंसेवक तर आहेतच. एवढे मोठे संगठन नोंदणी न करता चालवावे याचे कारण काय? >> 2.संघामध्ये ओळखपत्र वैगेरे काही दिले जात नाही नोंदणी नाही, सभासदत्व नाही, ओळखपत्र नाही. म्हणजे जवळजवळ भूमीगत संघटना असल्यासारखेच झाले. हे खरोखरच असे का चालवतात हा प्रश्न पडतो. समजा कोणी सभासदाने संघाच्या वतीने काही बेकायदेशीर काम केले, तर त्याच्यापासून संघाला हवे तेंव्हा वेगळे दाखवता येऊ शकते व जर चांगले काम केले तर संघाचा संबंध दाखवता येतो. हे कितपत पारदर्शक आहे असे आपणांस वाटते? >> 3. संघामध्ये फक्त वर्षातून एकदाच गुरुपौर्णिमेला भगव्या ध्वजासमोर समर्पण म्हणून काही निधी स्व ईच्छेनुसार निधी जमा केले जातो हा निधी असा कितीसा असणार? काही माहिती खुली करण्यात आली आहे का? एवढ्या अल्प निधीमध्ये फक्त २०२५ या एका वर्षात ९२,६५६ ठिकाणी सेवा शिबिरे घेतली असा दावा करण्यात आला आहे. एक शिबीर घ्यायचं तर केवढा निधी लागेल? हे काम चांगलेच आहे व त्यासाठी संघाने कितीही पैसे गोळा करायला कोणाचाच आक्षेप असायचे कारण नाही, फक्त संस्थेची नोंदणी नसल्याने धर्मादाय आयुक्त, आयकर विभाग व सरकारच्या सर्व संस्था संघाला काहीही विचारू शकत नाहीत. एखादी साधी चार माणसांची संस्था काढली तरी केवढे नियम पाळावे लागतात, हिशोब ठेवावे लागतात व मुख्य म्हणजे जे कराल त्याची जबाबदारी संस्थेच्या पदाधिकार्‍यांना घ्यावीच लागते. संस्थेची व सभासदांची नोंदणीच न केल्यामुळे संघाला हे काहीच लागू होत नाही. त्यामुळे देशातील यंत्रणेला तिथे कसलाच प्रवेश नाही. संघ ही एक राष्ट्रप्रेमी संघटना आहे, तर देशाचे कायदे पाळायच्या कक्षेतच येऊ नये अशा प्रकारे ही संस्था का चालविली जाते हे आपण सांगू शकाल का? आपल्यासारख्या संघाबद्दल अभ्यास असणार्‍या व्यक्तीकडून नीट माहिती घेण्यासाठी प्रश्न विचारले आहेत, कृपया गैरसमज नसावा.

In reply to by स्वधर्म

विवेकपटाईत 08/10/2025 - 11:54
आरएसएस ही पंजीकृत संस्था नसली तरी ही Audited Reports & Annual Activities RSS khud registered nahi hai, lekin uski Akhil Bharatiya Pratinidhi Sabha (ABPS) har saal ek Annual Report publish karti hai इत्यादि इत्यादि.

संघाची स्तुती संघाचे लोक सोडून कुणीही करत नाही, संघाचे लोक काम करताना संघाच्याच लोकाना दिसतात इतरांना नाही, स्वातंत्र्यलढ्यात संघाने सहभाग का घेतला नाही? हे कुणीही सांगत नाही, संघाचे लोक टाईट इस्त्रीचे कपडे घालून मदतीला जातात नि तसेच टाईट इस्त्रीचे कपडे घालून घरी येतात, (फोटो काढून), राबून राबून पांढरा शर्ट चिखलाचा झालेला, घामेघाम झालेला संघ कार्यकर्ता कधीही दिसलेला नाही दिसणारही नाही, संघातील काकांची मुले ख्रिस्ती देशात तसेच अरबी मुस्लिम देशात जाऊन डॉलर नी दिनार कमावीत असतात पण तेच काका इथे हिंदूंच्या रक्षणासाठी बहुजनांच्या मुलाना “दंडप्रहार” शिकवत असतात. थोडक्यात संघ ही समाजाला काहीही फायदा न देणारी तसेच उपद्रवही न देणारी संघटना आहे. सामान्य माणसाने संघा पासून आपली मुले कशी दूर ठेवता येतील हे पाहावे. १०० वर्षे पूर्ण करूनही सांगण्यासारखं काहीही न केलेली संघटना म्हणजे आरएसएस!

In reply to by अमरेंद्र बाहुबली

समाधान राऊत 01/10/2025 - 15:33
मलाही संघाबद्दल जास्त काही माहिती नाही परंतु शाखेत न जाता त्याच्याबद्दल काहीच माहिती नसताना टिप्पणी करणे जास्त सोपे असे दिसते . संघाचे स्वंयसेवक केलेल्या कामाचा गाजावाजा करत नाहीत , जे करतात ते सोशल मीडिया वापराने आणि account trp वयक्तिक जास्त करतात , संघ बामनांचा आहे ह्या मिथ्या गोष्टी आहेत, कित्येक प्रचारक ब्राह्मणच आहेत , ज्यांनी स्वतःचे आयुष्य देव देश धर्म ह्या गोष्टी साठी वाहून घेतले. तुमच्या म्हणण्यानुसार संघाचा स्वयंसेवक फक्त दुसऱ्या संघी माणसाला दिसतो , तुम्हाला दिसत नाही , तर तो घामाने भिजला आहे किंवा नाही हे तुम्हाला कसे कळणार . जरी काकांचा मुलगा अरबी देशात गेला असला तरी तो दंड प्रहार वैगेरे शिकला आहे फक्त बहुजन मुलांना शिकवता हे मिथ्या पसरवू नका , आणि तसेही बहुजनांच्या मुलांना अरब देशात जायला संघ अडवत नाही, वयक्तिक आयुष्यात संघ किमान गरज असेल तर मदत करते , दखल देत नाही. संघाने बरेच लहान मोठे कार्यकर्ते देशाला दिले आहेत हे विसरू नका. स्वातंत्र्य लढ्यातील संघाचे योगदान असे पुस्तक ऑनलाईन सुद्धा उपलब्ध आहे , एकदा वाचा.

In reply to by समाधान राऊत

परंतु शाखेत न जाता
संघाच्या शाखेत जाऊन एक दोन वर्ग करून, संघाच्या लोकांचे खरे चेहरे नी संघाचा खरा चेहरा पाहून मगच बोलतो आहे, “विशिष्ट” लोकांनी “विशिष्ट” लोकांसाठी बनवलेली संघटना एस संघा बद्दल म्हणता येते, संघाचा छुपा अजेंडा भयानक आहे, संघाच्या वरगांमध्ये काही विशिष्ट कुजबुजे महापुरुषांची बदनामी करण्यासाठी सोडलेले असतात, गांधी, नेहरू, नी अनेक स्वातंत्र्यविरुद्ध नको नको ते बोलले जाते, आपण स्वत स्वातंत्र्यलढ्यात काय दिवे लावले ह्याबद्दल चकार शब्द बोलत नाहीत, तुमची मुले संघात जाऊन भडकलेल्या माथ्याची होतात, संघात जे काका लोक जातात त्यांच्या मुला बाळाना, नातेवाईकांना ते तिथे आणत नाहीत, त्यांची मुले शिकून सावरून विदेशात पळ काढतात, पण बहुजनांची मुले इथे भडकलेली टाळकी घेऊन फिरतात, मागेच भय्याजी जोशी ह्या संघी माजी अध्यक्षाने महाराष्ट्रात मराठी बोलायची गरज नाही असे मराठी द्वेष्टे विधान केले होते.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

Bhakti 03/10/2025 - 10:44
अरे जाऊ‌दे!कोणाला सांगतो.. संघाचा अनुभव घेऊन त्यापासून दूर झालेल्यांचा १०१ कोटींचा एक मोठा ग्रुप होईल. संघातील जनांचे महिलांविषयक संकुचित वृत्ती पाहून मीही दूर झाले.शाखा चालवली,दुर्गा वाहिनीचे शिबिरही केले पण महिलांवर कर्मकांडाचे खुप मोठे ओझे असावे या मतातून ते लवकर बाहेर पडणार नाहीत. माणसाला स्वतःचा शोध घ्यायचा असेल तर त्याने‌ कोणत्याच संघटना,विचारसरणीचा भाग होऊ नये,freedom हेच खरे आयुष्य आहे.

In reply to by Bhakti

संघातील जनांचे महिलांविषयक संकुचित वृत्ती पाहून मीही दूर झाले. खरे आहे ताई, संघी लोकांना बहुजनांच्या मुली शिकलेल्या आजीबात सहन होत नाहीत. माणसाला स्वतःचा शोध घ्यायचा असेल तर त्याने‌ कोणत्याच संघटना,विचारसरणीचा भाग होऊ नये,freedom हेच खरे आयुष्य आहे. क्या बात! एकदम खरे.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

विवेकपटाईत 08/10/2025 - 12:00
डोळ्यांवर द्वेष आणि अंधाराचा चष्मा लागला असेल तर मध्यानाचा सूर्य दिसणार नाही. तसेच तुम्हाला संघाचे कार्य दिसू शकत नाही. बाकी नेहरूजी मूर्ख होते म्हणून त्यांनी 1963 गणतंत्र परेडसाठी संघाला आमंत्रित केले. गांधी आणि आंबेडकरांनी संघाची प्रशंसा केली. मुलांनी संघात जाण्याचे अनेक फायदे असतात. 1. सकाळी लवकर उठण्याची सवय लागते. 2. अनुशासन शिकतात. 3 शारीरिक व्यायाम होतो. 4. भाषा शुद्ध होते. 5. लोकांशी संपर्क वाढतो. 6. संघात जाणारा तरुण कधीच बेरोजगार राहणार नाही. 7. रस्त्यावर भाजी लावणारा असो एलआयसी अजेंट सर्वांचा धंधा वाढतो.

In reply to by विवेकपटाईत

आग्या१९९० 08/10/2025 - 14:02
बाकी नेहरूजी मूर्ख होते म्हणून त्यांनी 1963 गणतंत्र परेडसाठी संघाला आमंत्रित केले.
शाबास! उठता बसता नेहरूंना नावं ठेवणाऱ्या संघाला आज त्यांचे सर्टिफिकेट घ्यावे लागते.

In reply to by आग्या१९९०

सुबोध खरे 10/10/2025 - 10:32
छे हो संघाला सर्टिफिकेट ची मुळीच गरज नाही नेहरू घराण्याच्या गुलामांना त्यांच्या सर्टिफिकेट शिवाय खात्री पटणार नाही म्हणून

In reply to by अमरेंद्र बाहुबली

सुबोध खरे 10/10/2025 - 19:54
पण इतका आटापिटा का पटवून द्यायचा? हांगाश्शी तेच मी इतके दिवस सांगतोय खांद्याखाली बळकट असणाऱ्या माणसांना कशाला समजावून देताय? पालथ्या घड्यावर पाणी

In reply to by युयुत्सु

आग्या१९९० 10/10/2025 - 19:41
गांधी, नेहरूंची निंदा करणे हा एक प्रकारचा " उद्योगच " आहे. हा " उद्योग " नोंदणी न केल्याने सर्वसामान्यांना माहीत नाही.

In reply to by विवेकपटाईत

अभ्या.. 11/10/2025 - 22:45

हा आयडी तर परत परत सांगूनही खोटेपण पसरवण्याचे काही थांबवत नाही. संघाला जे काही श्रेय त्यांच्या सेवाकार्यातून मिळाले आहे ते असल्या काहीही फेकणार्‍या अतिउत्साही व्हाटसपअंकलमुळे वाया चालले आहे. १९६२ च्या चीन-भारत युद्धामुळे, १९६३ च्या परेडमध्ये लष्करी उपस्थिती कमी करण्यात आली आणि पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनी मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होऊ शकतील अशी मोठी "नागरी परेड" आयोजित करण्याचा निर्णय घेतला. यामुळे दिल्लीतील विविध संघटना आणि स्वयंसेवक गटांना अधिक सहभाग घेता आला. युद्धादरम्यान गटाच्या स्वयंसेवकांच्या कार्याची दखल घेऊन नेहरूंनी त्यांना परेडमध्ये सहभागी होण्यासाठी वैयक्तिकरित्या आमंत्रित केले होते असा आरएसएसचा बराच काळ दावा आहे. काही अहवालांवरून असे दिसून येते की या कार्यक्रमात सुमारे ३,००० ते ३,५०० आरएसएस स्वयंसेवकांनी पूर्ण गणवेशात मार्च केला होता. तथापि, भारतीय संरक्षण मंत्रालयाकडे परेडमध्ये आरएसएसला अधिकृतपणे आमंत्रित केल्याची कोणतीही नोंद नाही. विशेष आमंत्रण नाही. अभिलेखागारातील नोंदी आणि लेखा असे सूचित करतात की आरएसएसला विशेष आमंत्रित करण्यात आले नव्हते तर त्यांनी नागरी गटांना सहभागी होण्यासाठी खुल्या आमंत्रणाचा फायदा घेतला. महात्मा गांधींच्या हत्येनंतर संघाची तपासणी सुरू असल्याने, संघाला वैधता मिळवण्यासाठी हा प्रयत्न होता, असा युक्तिवाद इतिहासकार आणि पत्रकारांनी केला आहे. नेहरूंचे विधान. वृत्तांनुसार, नेहरूंनी २७ जानेवारी १९६३ रोजी संसदीय पक्षाला संबोधित करताना म्हटले होते की ते संघाला येण्यापासून रोखू शकत नाहीत, परंतु त्यांनी त्यांना कधीही विशेष आमंत्रित केले नव्हते नाही तर सरळ नाही म्हणावे पण गांधी पटेल नेहरुंचे व्हॅलिडेशन घेतल्याशिवाय संघाला जमत नाही आणि काही जमवता येत नाही हेच खरे. पण आता ह्या व्हाटसपआंकलना काहीही बोलण्यात अर्थ राहिला नाही कारण खुद्द पक्षानेच ह्या खोट्या घटनेला अधिकृत बनवण्यासाठी त्याचे पोस्ट तिकिट प्रकाशित केलेले आहे. चला, निदान ह्या कारणाने तरी बंद पडायला आलेल्या पोस्टात थोडीफार म्हातार्‍यांची वर्दळ होईल थोडे दिवस.

In reply to by अभ्या..

स्वधर्म 12/10/2025 - 02:58
त्याला संघ स्वयंसेवक व संघाचे समर्थक कधीही खोटे म्हणू शकत नाहीत. याचे कारण या चर्चेतच उघड झाले आहे. ते म्हणजे संघाचा मूळ संस्कारच असा आहे की प्रश्न विचारायचे नाहीत, चिकित्सा करायची नाही, सत्याचा शोध चुकूनही घ्यायचा नाही! त्यामुळे परंपरेने, धर्मग्रंथांनी व सर्वात महत्वाचे म्हणजे सरसंघचालकाने जे सांगितले, त्याच्या पलीकडचे काही म्हणजे काहीच स्विकारण्याची मानसिकता दिसत नाही.

In reply to by अभ्या..

युयुत्सु 12/10/2025 - 08:21
संघाला जे काही श्रेय त्यांच्या सेवाकार्यातून मिळाले आहे ते असल्या काहीही फेकणार्‍या अतिउत्साही व्हाटसपअंकलमुळे वाया चालले आहे. +++++++++++१ बेछूट आणि बेलगाम वक्तव्ये फक्त मंदबुद्धी लोकांना फसवू शकतात.

निपा 01/10/2025 - 17:59
शालेय जीवनात म्हणजे १९९५-२००० च्या सुमारास माझे अनेक मित्र संघात होते नागपुर ला. ते नेहमीच मुस्लिमांवर विनोद करायचे आणि महारांचा प्रचंड द्वेष करायचे. बरं हि मंडळी वेग वेगळ्या शाखेत होती. तरी त्यांचे विनोद आणि त्यांचा इतिहास हा सारखाच असायचा. आंबेडकर त्याकाळी तरी त्यांचा शत्रू न. १. आता हे विचार संघाचे कि त्यांचे स्वतःचे होते हे काही सांगता येत नाही . बाकी हि मुलं जवळपास सगळी ब्राह्मण ! हे कधी शिव्या द्याचे नाही. विनोद पण कमरेखालचे नसायचे . राष्ट्रीयता नसानसात नुसती ओसंडून वाहायची . म्हणजे बाकीचे देशभक्त नव्हते असे नाही, पण हि मंडळी दाखवून देण्यात समोर होती.

हम्म. "संघाची सेवा आणि आत्मत्याग यावर आधारित प्रेरणा ही संघाला बळकट करणार आहे" सामाजिक कार्य असेलही पण स्वातंत्र्यलढ्यात नावड्त्या विचार्सरणीच्या लोकांना बदनाम करण्याचे काम कुजबुज आघाडीतर्फे कोण करते? कुजबुज आघाडीची जागा आता वॉट्स-अ‍ॅपने घेतली आहे. १)सुभाषचंद्र बोसांवर नेहरू पाळत ठेउन होते. त्याही पुढे जाउन, नेहरूनी त्यांना बाजुला केले.. २)लालबहादुर शास्त्रींची हत्याच झाली.. ३)राहुल गांधींचे खरे नाव वेगळेच आहे. हजारो कोटींची मालमत्ता इटालीमध्ये आहे. ह्या अफवांचे जनक कोण होते/आहेत ?शाखेवर येणार्या तरूणांमध्ये काँग्रेसबद्दल/नेहरू गांधींबद्दल तिरस्काराची भावना निर्माण झाली पाहिजे हा उद्देश नसतो का?स्व्तःच्या मुलांना युरोप्/अमेरिकेत सेटल करुन देउन बहुजन समाजातील लोकांना त्रिशुल घेउन 'जय श्रीराम' करायला लावणे हे निंदनीय आहे. ह्यांचा ईस्लाम/ख्रिश्चनद्वेष कधीतरी जाईल अशी वेडी अपेक्षा बाळगुन आमच्यासारखे अनेकजण होते. पण गेल्या काही वर्षात तो द्वेष पसरवण्याचे काम अधिक जोमाने होउ लागले असे दिसते. भाषणात "सगळे आमचेच.'..म्हणायचे आणी मागे द्वेष पसरवायचा. आता तो अनुपम खेरचा 'ताजमहल की तेजोमहल' असा चित्रपट येतोय. भारतातील किती लोकांची टाळकी फिरवण्यात हा चित्रपट यशस्वी होतो ते बघु.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

+१ संघ फक्त द्वेष पसरवण्याचे काम करतो, समाजोपयोगी काम संघाने कधीही केले नाही नी करणारही नाही.

विजुभाऊ 03/10/2025 - 11:26
मी विद्यार्थी परिषदेत जायचो त्या वेळेस संघाच आ आणि अभाविप चे काय नाते आहे असे विचारले तेंव्हा उत्तर मिळाले की थेट काहीच संबन्ध नाही. पण अभाविप मधील बरेच लोक संघात जातात. काही बरे केले की तो संघाचा कसा आहे आणि त्याच इसमाने काही वाईट केले की जबाबदाती नाकारायची हा संघाचा कातडीबचाऊपणा नेहमीचाच असतो.

In reply to by विजुभाऊ

स्वधर्म 03/10/2025 - 15:55
>> काही बरे केले की तो संघाचा कसा आहे आणि त्याच इसमाने काही वाईट केले की जबाबदाती नाकारायची हा संघाचा कातडीबचाऊपणा नेहमीचाच असतो. म्हणूनच वरती विचारले आहे की सभासद नोंदणी, ओळखपत्र दिले जात नाही याचे हे कारण आहे का? समाधान किंवा पटाईत काकांच्या उत्तराची वाट पहात आहे. तुंम्ही तर अनुभवच शेअर केलात.

शाम भागवत 03/10/2025 - 13:24
संघ इतका वाईट असून कसा काय मोठा होत जातोय काही कळत नाही. कॉंग्रेस व तिचे शिर्ष नेते इतके चांगले असूनही ती रसातळाला का जातीय काही कळत नाही. कलीयिग कलीयुग दुसरं काय म्हणणार? ;)

In reply to by शाम भागवत

संघ इतका वाईट असून कसा काय मोठा होत जातोय काही कळत नाही. वाईट शक्तीदेखील मोठ्या होत असतात! उदा, तालिबान.

In reply to by शाम भागवत

अभ्या.. 12/10/2025 - 18:04
बघा बाबा कोण मोट्ठे आहे ते. tsj बाकी प्रेस कॉन्फरन्सला महिलांना बोलावायचे नाही हा बालहट्ट पुरवला म्हणे मोठ्या दादाने. बरोबरच आहे म्हणा. एका बावळट गुरुजीने तेच म्हणलेले काही दिवसांपूर्वी. bg मला तर "सौदामिनी आधी कूंकू लाव" वाला कॅप्टन रणगाडेच आठवला तेंव्हा.

In reply to by शाम भागवत

अभ्या.. 13/10/2025 - 15:58
नका इतके गोड हसू. केविलवाणे दिसते आहे ते.. . आता सवयच झाली असेल तर हरकत नाही.

In reply to by अभ्या..

सोत्रि 13/10/2025 - 16:15
:) मी हसलो तर चालेल का? - (अंमळ हसू आलेला) सोकाजी

सोत्रि 03/10/2025 - 15:30
माझा संघाशी प्रत्यक्ष संबंध फारसा आलेला नाही
बरं झालं!
तरीही मी विचार केला अंतराजलावर फिरून आपणच माहिती घ्यावी आणि मिसळपावकरांसाठी सादर करावी
हे काही बरं झालं नाही!! :) :) - (सघंशाखेत गेलेला) सोकाजी

सोत्रि 03/10/2025 - 16:46
मी सहावीत असताना वडील संघाच्या शाखेत घेऊन गेले. त्यानंतर नियमीत शाखेत जाणे, तालुका, जिल्हा स्तरावरील शिबीरांना जाणे, असे करीत बाबरी-मशिद पडेपर्यंत संघाशी संबंध होता. त्यावेळी खेळायला मिळायचे आणि शारिरीक उर्जेचा निचरा चांगल्या प्रकारे करता यायचा त्यामुळे शाखेत जायला मजा यायची. गावातील सगळीच मुलं यायची त्यामुळे जरा जास्तच मजा यायची. पण पुढे बौद्धिकं चालू झाली आणि 'ब्रेन वॉशिग'ला सुरुवात झाली. त्या अजाणत्या वयात पद्धतशीरपणे इतर धर्मांविषयीचा आकस मनात कोरला गेला. त्यावेळी रथयात्राचे दिवस होते. तालुका शिबिरांना गेल्यावर 'आपल्यावर' कसा अन्याय होतोय आणि 'आपण' कसे आपल्याच देशात असुरक्षित आहोत हे इतकं बिंबवलं गेलं होतं की त्यावेळची मानसिक विचारधारा अत्यंत असहिष्णू झाली होती. (इतकी की एका तरी 'परधर्मियाला' संपवणे हे इतिकर्तव्य आहे असे वाटू लगले होते). तेल लगाओ डाबर का नाम मिटाओ बाबर का, एक धक्का और दो बाबरी को तोड दो....अशा आत्यंतिक आणि पराकोटीच्या घोषणा देत फिरत होतो त्याकाळी. बाबर कोण, बाबरी म्हणजे काय, तिला धक्का देऊन पाडायचे म्हणजे नेमकं काय होणार ह्याची काहीही अक्कल नव्हती, पण शाखेत जाऊन आपण देशासाठी आणि धर्मासाठी काहीतरी प्रचंड महत्वाच करतोय असं मनात बिंबवलं जात होतं. नशिबाने जरी वडीलांनीच संघशाखेचा रस्ता दाखवला होता तरी ते मात्र समाजवादी होते. त्यामुळे माझ्या वैचारिक उधाणाला आवर घालायचे. त्यामुळे मी वाहवत जाण्यापासून वाचलो. पुढे बाबरी पाडल्यावर लालकृष्ण अडवाणींनी त्या घटनेचा निषेध केल्यावर मी अवाक झालो होतो आणि वडील कसे बरोबर होते ह्याची प्रचिती येऊन, त्यादिवसापासून संघशाखेपासून जो दूर झालो तो आजपर्यंत. ह्या संघाचं परदेशातलं रूपडं आहे 'विश्व स्वयंसेवक संघ'. अमेरिकन नागरिकत्व घेऊन हिंदू धर्माची धुरा वाहण्याचं पुण्यकर्म ते करत असतात. ह्याचाही मी दुर्दैवाने सक्षिदार आहे. एका अशाच विश्व स्वयंसेवच्या घरी सॅन होजेला असतना गेलो होतो. एक लाचार राष्ट्रिय संघी त्या विश्व स्वयंसेवच्या देणगी साठी भारताच्या तत्कालीन परिस्थीविषयी काहिही ऐकून घेत होता. मी ह्या सगळ्या संघींना पूर्ण कोळून प्यायलो असलो तरीही मला प्रचंड राग आला होता. तो त्या विश्व स्वयंसेवच्या लक्षात आला आणि माझ्याकडे बघत वर तोंड करून म्हणाला, " अरे लगता है इनके देश के बारे मे बोला तो बुरा लगा रहा है|" मग त्याला मी विचारले 'नमस्ते सदा वत्सले मातृभुमे' म्हणता का इथे? त्यावर त्याचा झालेला कसनुसा चेहरा अजूनही लक्षात आहे :) तर ते असो, १०० वर्ष पूर्ण केलेल्या संघाविषयीचा पटाईतकाकांचा हा, त्यांच्या निवृत्तकाळातला वेळ घालवायचा अजून एक उद्योग असलेला धागा, करमणूकीसाठी वाचला आणि त्यांचे इतर धागे वाचल्याबत येते तसे अंमळ हसू आले. - (पूर्वाश्रमीचा संघी) सोकाजी

In reply to by सोत्रि

इतकी की एका तरी 'परधर्मियाला' संपवणे हे इतिकर्तव्य आहे असे वाटू लगले होते हा हा हा. कॉलोनीत राहणारे काहीजण तेव्हा कामाला जाताना बॅगेत सुरी ठेवत.चुकुन हल्ला झाला तर प्रतिकार करायला हवे म्हणून! अर्थात त्या सुरीने बटाटेही नीट कापता येत नसावेत. ग्रुहिणींनी अशा सुर्‍या आपल्या नवर्याना दिल्या होत्या. कॉलोनीचे 'संरक्षण' करण्यासाठी काही तरूण्/कॉलेजकुमार रात्रभर गेटजवळ बसत. एकदा खरोखर 'ते'(परधर्मीय तलवारी घेउन येत आहेत) अशी कुजबुज झाली आणि आमच्या तरूणांची पळता भुई थोडी झाली. धावत आपापल्या घरी जाउन बसले. तलवारी घेउन कोणी येत नव्हते.. ती अफवा होती हे नंतर कळले.

स्वधर्म 03/10/2025 - 18:42
या धाग्यामुळे संघाबाबत बरीच माहिती समजली. तसेच अनेक आक्षेपही समजले. पटाईत काका किंवा समाधान राऊत हे थोडा वेळ काढून मिपाकरांच्या आक्षेपांना आणि माझ्या प्रतिप्रश्नांना उत्तरे देतील अशी आशा आहे.

In reply to by स्वधर्म

समाधान राऊत 06/10/2025 - 08:45
तरी हरकत नाही, बऱ्याच वेळा संघ शब्द ऐकला की समजून घेण्याची प्रवृत्ती कमी होते.असो. 1&3 समाज कार्य करणारा संघ हा पूर्णपणे स्वयंसेवकांवरती उत्स्फुर्तपणे चालतो , त्यांना इथे कुठलाही पगार , मानधन दिले जात नाही , नोंदणी न करण्याची मुभा स्वतः कायदा यांना देतो, आपला कायदाच लवचिक आहे त्याला आपण काहीं करू शकत नाही, संघाच्या स्थापनेच्या काही वर्षांनी देश स्वतंत्र झाला ,तरी तत्कालीन सरकारने संघाला कायद्याच्या कक्षेत आणण्यासाठी वेगळे कायदे का केले नाहीत किंवा का आणु शकले नाहीत ,(( tax बद्दल बोलायचे झाले तर सरकारी अधिकारी केव्हाही ह्यांचे ऑडिट करू शकते , तिथे सरकारला मज्जाव केला नाही , परंतु असे ऑडिट झाल्याचे ऐकिवात नाही , वरचेवर बोलण्यात ही मंडळी पटाईत असते ,पण काही सरकार व पक्ष ह्यांना पैशाच्या हिशोबापेक्षा बंदी घालण्यात जास्त इंटरेस्ट होता !!)) परंतु त्यांच्या सह संस्था ची नोंदणी केल्या जाते , जसे की सेवा भारती , आणि यांच्या मार्फत पैशाच्या उलाढाली होत असतात , ती 92000 शिबिरे फक्त एकट्या संघाने नाही तर त्यांच्या सह संस्था यांच्या मार्फत सुधा झाली आहेत , परंतु आपसुकच नाव संघाचे लागते , ह्या संस्था कर स्वरूपणाच्या कक्षेत येतात , समांतर उदाहरण देतो , वारकरी संप्रदायाचे , संघ यापुढे काहीच नाही , आता वारकरी सांप्रदायाची नोंदणी कशी करणार आणि कुठे करणार नोंदणी करताना कुणाच्या नावे करणार आणिं करावी का , आणि सगळ्यात महत्वाचे ओळखपत्र तरी कसे द्यायचे , गंध लावेल ते वारकरी , पताका हाती घेईल तो वारकरी , विठोबाचे नाम घेईल तो वारकरी , इथे जात धर्म काही पाहिले जात नाही , सामाजिक , धार्मिक आणि देशाच्या विरोधात काम न करणाऱ्या संस्थात्मकतेची ची नोंदणी करण्याची गरज नाही , वारकरी संप्रदायाचे जरी कुठे नोंदणी नसली तरी त्यांच्या सह संस्था / उपसंस्था , वारकरी दिंडी मंडळ , गड संस्थाने , ह्यांची नोंदणी असते , वारकरी संप्रदायाचा आर्थिक कारभार सुधा ह्याच संस्था मार्फत चालतो, असेच संघ सुधा काम करतो , ह्या उदाहरणामार्फत समजून घेण्यास काही अडचण असणार नाही अशी अपेक्षा करतो , 2.बेकायदेशीर कामे किंवा अजेंड्याच्या व्यतिरिक्त कामे केल्यानंतर कुठली व्यवस्था किंवा कंपनी,संस्था,पक्ष त्याचे समर्थन करतो , आणि कुठली संस्था चांगले काम केल्यानंतर स्वतःचे नाव लावत नाही , कितीही लांबचा नातेवाईक असला तरी बरेच जण तो जसे काही ते घरातलाच आहे अशी ओळख दाखवतात , चांगल्या कामाचा पुरस्कार नाही तर कशाचा करायचा , संघ बेकायदेशीर कामे , देशविघातक कामे करतच नाही , संघ मुस्लिम विरोधी नाही , वरती कुजबुज वैगेरे कुणीतरी लिहिले आहे , परंतु सर तन जुदा बद्दल त्यांचे काहीच म्हणणे नाही असे दिसते , ही असली वाक्य देशाच्या समर्थनार्थ आहेत काय?? देव देश धर्म याबद्दल बोलत असताना ते कुणाला चुकीचे वाटत असेल तर अवघड आहे , हे लोक कोण आहेत हे वेगळे सांगणे लागत नाही

In reply to by समाधान राऊत

शाम भागवत 06/10/2025 - 11:32
चमच्याने चांगले भरवलंय. पण मला वाटते पहिल्या प्रतिसादात दिलेली लिंक पाहिली तर मराठीत सगळी माहिती मिळेल. अजिबात तोचतोच पणा नाही. मुलाखतकार व मुलाखत घेणारे अजिबात संघाशी संबंधीत नाहीत. असो.

In reply to by समाधान राऊत

स्वधर्म 06/10/2025 - 17:06
आपल्या प्रतिसादाचे शिर्षक 'अर्थात , प्रश्नांची उत्तरे देतो आहे म्हणून मी संघी असं काही असेल..' हे समजले नाही. म्हणजे आपण संघाच्या वतीने उत्तरे देत आहात पण संघाला जबाबदारीतून मुक्त करत आहात काय? खरे तर संघ सभासदांना सोयीनुसार आपले किंवा संबंध नसलेले म्हणतो, हाच एक आक्षेप होता. सर्वप्रथम आपण द्वेषपूर्ण भाषा न वापरता उत्तरे देण्याचा प्रयत्न केला आहे त्याबद्दल आभार. द्वेषपूर्ण प्रतिसादांची उदाहरणे या धाग्यावर अनेक आहेत. शिवाय इतर प्रतिसादकांनी सांगितलेले द्वेष पेरण्याच्या बाबतीतले संघातील अनुभव दुर्लक्षित करता येणार नाहीत. त्यामुळे द्वेष हे संघाचे एक महत्वाचे इंधन आहे व संघप्रेमींचा तो एक खास पैलू आहे असे मानावे लागेल. गामा पैलवान यांचा प्रतिसाद हे 'संघ व द्वेष' कसे अविभक्त आहेत याचे याचे उत्तम उदाहरण आहे. ते संघस्वयंसेवक आहेत किंवा कसे ते आपल्याप्रमाणे परिस्थितीनुसारच ठरेल हेही आलेच. दुसर्‍या अनेक संघप्रेमींच्या बहुतेक प्रतिसादात दुसर्‍यांच्या हेतूबद्दल संशय, त्यांना कमी दाखवण्याची वृत्ती व 'आपण, आपला इतिहास, आपले काम, आपले नेते' हे सर्व जगात भारी आहेत असा ठाम विश्वास हे दिसून येतात. आपणच वर म्हटल्याप्रमाणे सहसा कोणताही स्वयंसेवक हा हिशोब पाहत किंवा विचारत नाही. असे प्रश्नच न विचारणारे व दुसरा पर्यायी विचार न स्विकारणारे कट्टर स्वयंसेवक तयार करणे, संघाचे यशच आहे. परंतु ते देशाला हितकारक आहे असे मात्र म्हणता येणार नाही. आपण वारकरी संप्रदायाचे दिलेले उदाहरण थोडेसे वेगळे आहे असे वाटते. संत तुकाराम महाराज संस्थान, देहू व संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदी हे वारीचे अनुक्रमे तुकाराम व ज्ञानेश्वर पालखी सोहळ्याचे मुख्य आयोजक आहेत व दोन्ही संस्था नोंदणीकृत आहेत. त्यांचे जबाबदार पदाधिकारी असावेत असे वाटते. शिवाय वारकर्‍यांचे सर्व ध्येय हे आंतरमुखी भक्ती, परमेश्वर प्राप्ती इ. असून आपल्या मताशी जुळणार्‍या पक्षाच्याच हातात सत्ता असावी इ. प्रकारची ध्येये ते ठेवत नाहीत असे वाटते. नर नारी बाळें अवघा नारायण । ऐसें माझें मन करीं देवा ॥1॥ न यो काम क्रोध द्वेष निंदा द्वंद । अवघा गोविंद निःसंदेह ॥ध्रु.॥ या अभंगात द्वेष मनात नसावा अशी प्रार्थना केलेली आहे तर संघ प्रेमी व स्वयंसेवक इथे कसे व्यक्त झालेत ते स्पष्टच आहे.

In reply to by स्वधर्म

स्वधर्म 06/10/2025 - 17:38
माझ्या परिचयात एक संघस्वयंसेवक आहेत. ते रुग्णोपयोगी साहित्याचे केंद्र चालवतात. त्यांच्या मुळे व संघाच्या या उपक्रमामुळे अनेक गरजू रुग्णांना मदत झाली आहे. तसेच ते महिन्यातून एकदा ठराविक खेड्यात जाऊन औषधे व वैद्यकीय सेवा पुरवतात. असे अनेक उपक्रम चालू असतील व संघाचे काही निरलस कार्यकर्ते तिथे काम करत असतील. त्याचे मूल्य मान्य करायला मला तरी हरकत नाही.

In reply to by स्वधर्म

रामचंद्र 06/10/2025 - 23:44
मूळचे संघाचे पण पुढे संघनेतृत्वाशी मतभेद झाल्याने/स्वतंत्रपणे संघतत्त्वज्ञानावर आधारितच पण खरेखुरी, उपयुक्त समाजसेवा करणारे असे अनेक आहेत, म्हैसाळच्या मधुकरराव देवलांपासून ते अगदी अविनाश धर्माधिकारी इ. पर्यंत. आणि या सगळ्यांच्या निरलस कार्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष लाभ 'परिवार' म्हणून मातृसंस्थेला होतोच. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे कितीही मतभेद असले तरी आपल्या मतभेदांमुळे मातृसंस्थेला हानी पोहोचू नये, याबाबत संबंधित व्यक्ती कमालीच्या दक्ष असतात. 'परिवारा'चा पाया घालण्याच्या देवरसांच्या कार्यामुळेच खरं तर मातृसंस्थेला आजचे सर्वार्थाने सोन्याचे दिवस आले आहेत असं म्हणता येईल. अन्य प्रचारतंत्रांच्या जोडीला सोशल मीडियाचा इतका परिणामकारक वापर हा खरं तर अभ्यासाचा विषय ठरावा. नीतिनियमांचे अनावश्यक ओझे अजिबात न बाळगणे, लवचिकता, व्यवहारवाद, उपयुक्ततावाद, डावपेच, दीर्घसूत्री धोरण, अद्भुत चिकाटी यांसारख्या बाबी विरोधक लक्षात घेत नाहीत.

In reply to by स्वधर्म

सुबोध खरे 06/10/2025 - 18:39
काही जण कधी संघाशी संबंधित होते आणि नंतर त्यांनी अशोभनीय वर्तन केले म्हणून बहुसंख्य लोक संघाला दोषी धरतात याचे आश्चर्य वाटत नाही. कारण नथुराम गोडसे हे केवळ एकेकाळी संघाशी संबंधित होते म्हणून गांधीहत्येनंतर काँग्रेसी लोकांनाही ७५ वर्षे संघालाच जबाबदार धरले आहे. गांधीहत्येच्या खटल्यात कोणताही पुरावा सापडला नाही तरीही. अशी स्थिती गेली ७५ वर्षे असताना संघ प्रेमी अरे ला का रे उत्तर देणारच ठकासी असावे महाठक। उद्धटासी उद्धट। खटनटासी खटनट। झालेची पाहिजे॥ जय जय रघुवीर समर्थ या अभंगात द्वेष मनात नसावा अशी प्रार्थना केलेली आहे तर संघ प्रेमी व स्वयंसेवक इथे कसे व्यक्त झालेत ते स्पष्टच आहे. बाकी इथलेच अनेक प्रतिसाद बिनबुडाचे पण संघद्वेषाने परिपूर्ण असे आहेत एवढे नोंदवून मी खाली बसतो.

In reply to by सुबोध खरे

अभ्या.. 07/10/2025 - 20:21
गांधीहत्येच्या खटल्यात कोणताही पुरावा सापडला नाही तरीही.
कसा सापडणार पुरावा? नथुरामला लेटरहेडवर वर्क ऑर्डर दिलेली का मिटिंग मिनिटस रेकॉर्ड? जी संस्था साधी नोंदणीकृत नाही, कितीजण येतात आणि काय करतात त्याची माहिती नाही, कागदोपत्री कसलाच व्यवहार नाही त्यांचा काय पुरावा मिळणार? मिळाला तरी मातृसंस्था तिची लेकरे काय उपद्व्याप करतात आणि त्यांना पाठबळ कशाचे हे सोयीस्करपणे लपवतात ते काय पुरावा सोडणारेत. . त्याण्तर संघावर बंदी घालताना संघाला नुकतेच प्रातःस्मरणीय झालेले देशाचे गृहमंत्री वल्लभभाई पटेल ह्यांनी स्रसंघचालक गोळवलकरांना लिहिलेल्या पत्रात स्पष्ट मुद्दे मांडलेत. त्यांनी म्हटले की संघाने द्वेषाने भरलेले "जातीय विष" पसरवले आहे. "विषाचा अंतिम परिणाम" "गांधीजींच्या मौल्यवान जीवनाचे बलिदान" होते. पटेल यांनी नमूद केले की संघाने सर्व सार्वजनिक सहानुभूती गमावली आहे, विशेषतः त्यांच्या सदस्यांनी मिठाई वाटून गांधींच्या मृत्युचा आनंद साजरा केल्याचा आरोप केल्यानंतर. गांधीजींच्या हत्येच्या कटात "हिंदू महासभेचा अतिरेकी गट सहभागी होता" आणि संघाच्या कारवायांमुळे "सरकार आणि राज्याच्या अस्तित्वाला स्पष्ट धोका" निर्माण झाला होता, असा त्यांचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आणि ही काही अटींवर जुलै १९४९ मध्ये ही बंदी उठवण्यात आली, ती मन बदलल्यामुळे नाही तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने काही अटी मान्य केल्यानंतर. यामध्ये हे समाविष्ट होते: औपचारिक संविधान स्वीकारणे. भारतीय संविधान आणि राष्ट्रध्वजाशी निष्ठा राखण्याची शपथ घेणे. लोकशाही आणि शांततापूर्ण मार्गांनी वचनबद्ध राहणे आणि एक संघटना म्हणून राजकारणापासून दूर राहणे. गोलवलकर यांनी या अटी मान्य केल्यानंतर ते "बंदी उठवण्यास उत्सुक" असल्याचे पटेल यांनी सांगितले. . ह्यांनंतर आजही ७५ वर्षानी रास्व संघाची शंभरी, विजयादशमी आणि म. गांधीची जयंती अशा योगावर g असे बोर्ड लागतात. द्वेष असा असतो आणि दिसतो सुध्दा. बोर्डावर कुणाचेही नाव नाही. काही ठिकाणी सकल हिंदू समाज. कोण आहे हा सकल हिंदू समाज हे उत्तर : या गटाच्या कारवायांना कायदेशीर आव्हाने आणि तपासणीचा सामना करावा लागला आहे, विशेषतः द्वेषपूर्ण भाषणाच्या आरोपांबाबत. सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश: २०२३ च्या सुरुवातीला, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने समाजाच्या मेळाव्यांमध्ये संभाव्य द्वेषपूर्ण भाषणाविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आणि त्यांच्या कार्यक्रमांचे व्हिडिओग्राफी करण्याचे आदेश दिले. पोलिसांच्या निष्क्रियतेचा आरोप: महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला आश्वासन देऊनही, २०२४ च्या अखेरीस आलेल्या अहवालांमध्ये असे सूचित केले गेले आहे की राज्यात द्वेषपूर्ण भाषणाच्या प्रकरणांचा खटला चालवणे थांबले आहे. सकल हिंदू समाजाने "लव्ह जिहाद", धार्मिक धर्मांतर आणि गोहत्या विरोधी कायदे यासह सरकारकडून विशिष्ट कायदे करण्यासाठी सक्रियपणे लॉबिंग केले आहे. हिंदू संघटनांचा युती: या युतीमध्ये विश्व हिंदू परिषद (VHP), बजरंग दल, सनातन संस्था, हिंदू जनजागृती समिती आणि इतर सारख्या उजव्या विचारसरणीच्या गटांचा समावेश आहे. सकल हिंदू समाजाचे वर्णन औपचारिक, श्रेणीबद्ध संघटना नसून एक केंद्रीकृत "बॅनर" किंवा सामूहिक म्हणून केले जाते. हे युती विविध हिंदू गटांना आणि त्यांच्या सदस्यांना रॅलींमध्ये सहभागी होण्यासाठी एकत्र आणते, जे बहुतेकदा सोशल मीडियाद्वारे समन्वयित केले जातात. कीती छान ना. १०० वर्षे एकच पॉलीसी चालवायची.

In reply to by अभ्या..

सुबोध खरे 08/10/2025 - 10:07
१०० वर्षे एकच पॉलीसी चालवायची. जळजळ दिसून येते आहे. बरंच अवडंबर काढून टाकलं तर सत्य फारसं दिसत नाही. गांधीजींना काँग्रेसने देवत्वाला पोचवलं त्यामुळे त्यांच्या विरुद्ध काहीही बोललं तरी ते अब्रह्मण्यमच होईल याची काँग्रेस ने काळजी घेतली त्याचाच हा परिपाक आहे. असं असतं तर नथुराम गोडसे यांचे न्यायालयात केलेले पाच तासाचे वक्त्यव्य यावर प्रतिबंध आणण्याची काँग्रेस वर पाळी का यावी? सरदार पटेलांना तसं बोलणं भाग होतं याची अनेक कारणं आहेत. पण ती समजून घेण्यासाठी विवेकवादी विचारसरणी असावी लागते. काँग्रेसने संघावर अनेक वेळेस बंदी आणण्याचा प्रयत्न केला/ बंदी आणली. पण तरीही १०० वर्षानंतर संघ जिवंत असून वाढतोच आहे. कारण तुम्हीच शोधा नाही तर द्या सोडून. नाही तरी भोंगळ समाजवाद्यांनी द्वेष सोडून केलंच काय आयुष्यभर.

In reply to by सुबोध खरे

पण तरीही १०० वर्षानंतर संघ जिवंत असून वाढतोच आहे. जगात, देशात अनेक संस्था आहेत ज्या पडीक आहेत, १०० काय २०० वर्षापासून त्यात आणखीन एकाची भर दुसरे काय? जी संस्था नोणदणीकृत नाही, कोण येतय कोण जातंय ह्याचा काही हिशेब नाही, ती वाढते आहे की संपते आहे हे कसे कळले? संघ १९२५ ला स्थापन झाला आणी त्या नंतर उण्यापुर्या २२ वर्षांनी भारत देश स्वतंत्र झाला एवढ्या वर्षात संघाने काय डाइव लावले? काहीही नाही? कसे लावणार? इंग्रजांच्या चाकरीतच होते म्हणतात संघवाले, बरं हिंदूधर्मासाठी काही केले म्हणावे तर जातीनिर्मूलन, सामनात, हिंदूसेवा? ह्यापैकी संघाने काय केले? संघाचा अजेंडाच जातीनिर्मूलन होऊ नये असा आहे! काँग्रेसने एकाच वेळी इंग्रजांविरुद्ध लढा, जातीनिर्मूलन, सामाजिक सुधारणा केल्या! संघाचा ना देशाला फायदा होता ना हिंदूना! आणी आजही नाही. नेहरुद्वेष केल्याशिवाय त्यांची सकाळ होत नाही नी गांधीद्वेष केल्याशिवाय त्यांना झोप येत नाही! नेहरूनी १० वर्षे जेल मध्ये काढले, गोळवलकर, हेडगेवार हे किती वर्ष जेल मध्ये होते? संघ असूनही उपयोग नाही, नसला तरीही देशाला शष्प फरक पडणार नाही! संघ म्हणजे फक्त वयाने वाढलेली संस्था, बुद्धी अजुआनही मध्ययुगीन विचारसरणीची आहे!

In reply to by स्वधर्म

द्वेष आणी प्रेम परस्पर विरोधी भाव असले तरी बघण्याचा दृष्टीकोन महत्वाचा. एखादी संस्था शभंर वर्ष प्रतिकूल परिस्थितीशी झगडून आपले अस्तित्व टिकवून ठेवते आणी एक्सपोनेनशियली वाढते यातच सर्व आले. कितीही स्पष्टीकरण दिले तरी इथे कुणाचेही मतपरिवर्तन होणे शक्यच नाही उलट वाद वाढेल आणी मला त्यात रूची नाही एवढेच बोलून खाली बसतो.

In reply to by कर्नलतपस्वी

अभ्या.. 07/10/2025 - 20:25
उलट वाद वाढेल आणी मला त्यात रूची नाही एवढेच बोलून खाली बसतो.
" तुम्ही खूप छान सुरळीच्या वड्या आणि फतफतं करता पण मला आज भूक नाहीये " इतकुसं सांगायला हॉटेलात आला?

सुबोध खरे 03/10/2025 - 18:45
बरेच समाजवादी मी संघाच्या शाखेत गेलो होतो तेथे माझा भ्रमनिरास कसा झाला अशा अनेक कहाण्या नेहमी प्रसारित करत असतात. संघाबद्दल प्रचंड द्वेष त्यांच्या मनात असतो. यामुळेच समाजवाद्यांनी संघाला उत्तर म्हणून राष्ट्र सेवा दल हि काढले होते पण त्यात काम करणाऱ्या समाजवाद्यांची लग्ने जमवण्यापलीकडे राष्ट्र सेवा दलाने भरीव असे काही केले नाही. त्यामुळे ते काही काळाने बंद पडले. बाकी एकंदर भोंगळ विचारसरणी आणि अनुयायांपेक्षा नेते जास्त अशी स्थिती असल्याने भारतभर सर्वत्र समाजवादाची पीछेहाट झाली. आता केवळ संघावर खार खाण्यापलीकडे त्यांच्याकडे इतर काही उद्योग राहिलेला नाही. त्यामुळे असे बरेच वैफल्यग्रस्त समाजवादी संघावर टीका करताना सर्वत्र दिसणारच.

In reply to by सुबोध खरे

शाम भागवत 04/10/2025 - 07:09
मला असं वाटतं की द्वेष करणाऱ्यांची शक्ति कमी कमी होत जाते आहे. त्यामुळे द्वेष करणारे संघाच्या फायदा करून देतात असंच दिसून येतं. गेल्या १०-१५ वर्षात संघ खूपच बदलला आहे. विरोधकांना मात्र संघ फक्त हाप पॅंट वरून फुलपॅंटीत एवढाच बदल झालेला दिसतोय. :) विरोधक त्याच भ्रमात असलेले बरे. _/\_ जागे झाले तर कदाचित संघाशी लढण्यासाठी एखादा उपाय शोधून काढायचे. ;)

भृशुंडी 04/10/2025 - 00:23
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शंभर वर्ष भरली. बाकी वेळ काय ते ठरवील. चालू द्या.

In reply to by भृशुंडी

शंभर वर्ष भरली. बाकी वेळ काय ते ठरवील. चालू द्या. कुणाची भरली याबद्दल आता तरी शंका नाही. बाकी वेळ काय ठरवेल ते बघू......

रामचंद्र 04/10/2025 - 01:00
शंभर वर्षे तितकीशी अनुकूल परिस्थिती नसूनही एखादी विचारसरणी जिवंत राहते, इतकेच नव्हे तर भौतिक-व्यावहारिकदृष्ट्या सामर्थ्यवान झालेली दिसते असे तर असेल तर विरोधकांनी त्या कारणांचा बारकाईने अभ्यास करायला हवा. याच्यासारखे उदाहरण म्हणजे त्यातल्या त्यात एकोणिसाव्या शतकात मूळ धरलेली ज्यू लोकांची चळवळ म्हणता येईल. दोन्हींच्या प्रणेत्यांचे व्यवहाराचे भान, चिकाटी आणि झोकून देण्याची वृत्ती या गोष्टींत विलक्षण साम्य आहे.

In reply to by रामचंद्र

शाम भागवत 04/10/2025 - 06:57
गेल्या १० वर्षात संघ खूप बदललाय. पण जुन्या अनुभवांवर आधारित संघ विरोधक त्याच जुन्या भूमिकेत असलेले बरे. ते त्यांचे विचार मांडत राहतील तेवढे ते संघाच्या फायद्याचे आहे. :)

आज संघ परिवाराला शंभर वर्षे झाली. देशभरात सर्वदूर देखणं संचलन पाहायला मिळालं. आदरणीय पंतप्रधानांनी त्याबद्दल एक पोस्टाचे तिकीटही जारी केलं. सगळं भव्य दिव्य दिसलं.... कारण संघ परिवाराचं कामच तेवढं भव्य दिव्य आहे. केव्हाही कोठेही संकट येवो... देशाचा कोणताही कोपरा असो हा परिवार कसलीही अपेक्षा न करता रुजु होतो... न बोलता न काही आवाज करता काम करत राहतो. खरोखर अभिमान वाटावा असं हे संघटन आहे... हा विषय आज लिहावासा वाटला कारण आदरणीय मोहन भागवतांचं भाषण ऐकत होते. संघप्रमुख म्हणून अतिशय आदर्श व्यक्तिमत्व आहे ते! ते आजच्या भाषणात म्हणत होते, मला माझा देश जसा हवा, तसं मी वागायला हवं हे वाक्य सकाळपासून मनात रूंजी घालत होतं. देश जसा हवा तसं वागायला हवं.... केवढा मोठा आशय असलेलं वाक्य आहे हे! मला देश स्वच्छ हवा मला स्वतः स्वच्छता घरात घराबाहेर पाळायला हवी. मला देश भ्रष्ट नको तर मला शपथ घ्यायला हवी... मी भ्रष्टाचार करणार नाही, मी पैसे देणार नाही, घेणारही नाही. मला माझा व्यवसाय धंदा नीट चालावा असं वाटत असेल, तर मी स्वतः स्वदेशी उत्पादनांवरच भर देईन, तीच वापरेन. मी माझ्याच देशवासीयांचे पाय न ओढता पुढे जाईन. माझा माझ्या देशातल्या प्रत्येक व्यवस्थेवर पूर्ण विश्वास असेल, त्यामुळे त्या व्यवस्थाना धरून काम करताना मला वाईट वाटणार नाही... माझा देश जर नियमबद्ध असावा असं वाटत असेल, तर मी वाहतुकीचा नियमही तोडायचा प्रयत्न करणार नाही. शिक्षण पद्धती उत्तम हवी असेल, तर मी शिक्षणामधली कोणतीही खोटी नाटी पद्धत वापरणार नाही. मी अतिशय सच्चाईने अभ्यास करेन. आणि योग्य ती दिशा शोधत माझ्या आयुष्याचा मार्ग सचोटीच्या रस्त्यावरच आखेन. देश जर उद्योगरत हवा असं वाटत असेल तर मलाही सतत कार्यरत राहायला हवं ना!... मी जर म्हणत राहिलो की प्रत्येक गोष्ट देशाने मला द्यावी, मी मात्र काहीच करणार नाही हे कसं चालेल? असे अनेक मुद्दे समोर आले, डोक्यात फिरत राहिले. सततच मी चा विचार डोक्यात राहिला तर समोर उभी भोगवादी संस्कृती आपणच निर्माण केली नाही का? यूके यूएस सगळ्यांनाच छान वाटेल, पण ते माझं नाही ना! मग जे माझं आहे ते जिवापाड सांभाळायला हवं ना!.... माझा धर्म, माझे गड किल्ले, माझे प्रदेश, माझी जंगलं, सगळं खूप सुंदर आहे. शिवाय किती विविधता आहे.... इथे वाळवंट आहे, बर्फाच्छादित हिमालय आहे, राकट सह्याद्री अरवली निलगिरी आहे, हिरवीगार वनश्री आहे, लांबच्या लांब समुद्रकिनारे आहेत, उत्तम ऐतिहासिक वास्तू आहेत! काय नाही या देशात.... सगळं काही आहे... आपण डोळे उघडून त्याला आपलं म्हणत नाही... तुम्ही फक्त या गोष्टीवर प्रेम करण्याची आवश्यकता आहे. देशाबद्दलचा अभिमान विकत मिळत नाही, तो रक्तातल्या प्रत्येक थेंबात रुजवावा लागतो. माझ्याआधी देश उभा राहायला हवा...मी त्यानेच घडेल. मी घडवणं म्हणजे पैसा गाड्या दागदागिने कपडे परदेशी दौरे करणं नाही, तर माझ्या पलीकडे पाहत काही समाजाप्रित्यर्थ करणं.... आपला देश न पाहता, त्याच्या भल्याकरिता काहीही न करता मनुष्यजन्म घालवण यासारखं महापातक नाही. देशाबद्दल, देशाच्या सेनेबद्दल, देशाच्या न्याय व्यवस्थेबद्दल अभिमान हे प्रत्येकाचंच आद्य कर्तव्य आहे. त्यासाठी प्रत्येकाची तयारी असणे हेच भारतीय असल्याचं लक्षण आहे. मी भारतीय आहे याचा जर अभिमान असेल, तर माणूस देशात चुकीचं वागणार नाही आणि परदेशात गेल्यावरही देशाची प्रतिमा उन्नत राहावी म्हणून पराकोटीचे प्रयत्न करेल. मी काही चुकीचे वागलो, तर माझ्या देशाचं नाव खराब होईल या जाणिवेने तो जागरूकच राहिल.... मला संघप्रमुखांचं वाक्य खूपच अंतर्मुख करून गेलं... देशाबद्दल वाईट बोलणं, देशद्रोह करणं खूप सोपं आहे; पण इतकी आक्रमणे झाल्यावर वेगाने प्रगतीपथावर नेण्यासाठी देशाची बांधणी करणं खूपच अवघड काम आहे ना!... आपल्याला काही करता येत नसेल तर मोडता तर घालू नये ना! बघा पटतंय का????.... उर्मी निवर्गी, कोथरूड, पुणे लेख नावासहित पुढे पाठवण्यास हरकत नाही.

In reply to by नावातकायआहे

मजेशीर आहे पत्र. केंद्र सरकारमधील नेत्यांनी त्यांनी सांगितलेल्या विचारांचे पालन केले तरी देश बर्यापैकी पुढे जाईल असे आमचे मत.

युयुत्सु 05/10/2025 - 10:16
नमस्ते सदा संघगीताच्या पुनर्निर्माणामध्ये आयात केलेल्या श्वेतकाय संगीतकारांचा थवा अवतरलेला बघून भारत देशात संगीतकारांचा दुष्काळ पडला की "आत्मनिर्भरतेला चुना" लावला असा प्रश्न पडला. आणि अंमळ मोउज वाटली. https://youtu.be/gjx8Uqy7dZo?si=l8V4nv-h6Ys-GTT3

गामा पैलवान 05/10/2025 - 22:47
काही प्राण्यांना विष्ठाच शोधायची असते. त्यांना अगदी पंचेंद्रियांद्वारे पुरेपूर आस्वाद घ्यायचा असतो. त्यांनी जरूर घ्यावा. काही हरकत नाही. फक्त एक गंमत सांगतो. अनेक प्राणी ठिकठिकाणी तिला शोधतात. पण मिळण्याची हमी नसते. विष्ठा हमखास मिळण्याचं ठिकाण अन्न आहे. तिथे नक्की लाभते. फक्त वांधा असाय की मानवप्राणी अन्नाला पूर्णब्रह्म समजतात. त्यामुळे पूर्णब्रह्मात विष्ठा शोधावी का, असा प्रश्न आहे. प्रत्येकाने आपापल्या आवडीनुसार स्वत:लाच उत्तर द्यायचं आहे. शोधली तर मिळणार हे नक्की. -गामा पैलवान

गामा पैलवान 06/10/2025 - 18:56
स्वधर्म,
गामा पैलवान यांचा प्रतिसाद हे 'संघ व द्वेष' कसे अविभक्त आहेत याचे याचे उत्तम उदाहरण आहे.
पहिल्याप्रथम धन्यवाद. माझ्या प्रतिसादातील मुद्द्याची पुष्टी केल्याबद्दल तुम्हांस कुठे ठेऊ आणि कुठे नको असे झाले आहे. असाच लोभ राहू द्या. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

स्वधर्म 06/10/2025 - 20:09
तुमच्या सारखा प्रतिसाद केवळ चरम पातळीच्या द्वेषातूनच येऊ शकतो. तुमच्या पातळीला उतरुन दुसर्‍यांचा इतका द्वेष करणे, त्यांना हीन लेखणे जमणार नाही. त्यामुळे तुंम्ही जिंकलात! मजा करा.

In reply to by स्वधर्म

गामा पैलवान 06/10/2025 - 22:44
असहमती म्हणजे द्वेष अशी तुमची व्याख्या दिसते आहे. आणि मला आनंदी ठेवल्याबद्दल मी ही व्याख्या मनापासून स्वीकारंत आहे. -गामा पैलवान

In reply to by कपिलमुनी

कपिलमुनी 07/10/2025 - 11:43
१.संघाबद्दल काहीच वाईट नाही. २. संघाचे सगळे वाईट आहे. अशी मते व्यक्त केली जात आहेत , पण याच्या उलट परीस्थिति आहे. इतर सर्व संघटनांप्रमाणे संघात सगळेच वाईट नाही आणि सगळे चांगले नाही. कित्येक वर्षे संघात काम केले , शिक्षक , संघटक राहून प्रचारकांसोबत खुप काम केले आहे , नंतर वनवासी कल्याण आश्रम संस्थेच्या मार्फत काम केले.. तिथे बरेच इतर विचारांचे लोक भेटले .. हळूहळू संघाच्या मर्यादा कळत गेल्या.. संघ सगळाच वाईट नाही , पण त्यांनी मध्ययुगातल्या खुळचट कल्पना काढून टाकायला हव्यात..गांधी द्वेष, मुस्लीम द्वेष थांबवायला हवे.. एक प्रसंग आठवतो , एका सांयशाखेत भगत सिंग ची फाशी थांबवायला गांधीनी काहीच केले नाहि अशी चर्चा चालू होति.. ११-२० वर्षे सगळयांचे गांधी हरामखोर यावर एकमत झाले.. मी तेव्हा विचारले , १९३१ साली संघ होताच ..मग त्यांनी आंदोलन का नाही केले फाशी थांबवायला ?? मग थातूर मातूर उत्तरे ! हे असे बर्याच वेळा घडल्यावर कळले ,.. टीका करणे सोपे असते इतिहासावर टीका करणे तर फारच सोपे.. पण ग्राउंड वर्क करणे अवघड ! आणि मी संघापासून हळूहळू लांब होत गेलो .. द्वेष नसवा .. हिंंदूंची संघटना असावी, हिंदू साठी काम करावे . पण आंबेडकरांच्या वेळि संघ त्यांच्या बाजूने उभा राहीला नाही. हिंदू मधील जातीभेद मिटवायचा सखोल प्रतय्न संघाने केल नाहि . अशा ऐतिहासिक चुका संघाकडे पण आहेत.. असो , १०० वर्षे झाल्यावर संघ सर्व समावेशक होइल आणि लहान मुलांचे गांधी विरोधी, मुस्लीम विरोधी ब्रेन वॉश बंद करेल ही आशा आणि शुभेच्छा !

In reply to by कपिलमुनी

संघामुळे मी प्रचंड गांधीद्वेष्टा झालो होतो, पण जसजसा संघा पासून दूर होत नी सत्याच्या जवळ जात गेलो तसे गांधी कळत गेले, आज आपण विविध जातींचे हिंदू एकत्र आहोत , विविध प्रांतातले बहुभाषिक लोक एका देशाच्या धाग्याने जोडलो गेलो आहोत. विविध धर्माचे लोक एकत्र नांदत आहोत हे सगळ घडवून आणणारा एकमेव व्यक्ती म्हणजे महात्मा गांधी हे जेव्हा कळले तेव्हा विस्मयचकित व्हायला झाले, त्याचबरोबर संघ किती द्वेष भरतो हे देखील लक्षात आले. अनेक संघात जाणारे लोक ओळखीचे आहेत, वयक्तिक ते प्रचंड चांगले आहेत. बऱ्याच लोकांचा संघात जायला म्हणजे फक्त दसऱ्याच्या मिरवणुकीत जायला नाईलाज असतो हे लक्षात आले, एरवी संघाच्या प्रात नि सांय शाखेत कुत्रही फिरकत नाही. लहान मुलाना खेळ खेळन्याचे आमिष दाखवून संघ शाखेत आणले जाते! जातीचा प्रेशर, संस्थेचा प्रेशर, आजूबाजूच्या लोकांनी ओढून ताणून नेणे अश्या विविध प्रकारे लोक जाऊन हजेरी लावतात.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

स्वधर्म 07/10/2025 - 16:13
हेच मलाही जाणवले आहे. अगदी या चर्चेतही आपल्याशी मतभेद असणार्‍यांशी बोलताना कमालीचा द्वेष जाणवला.

In reply to by कपिलमुनी

सोत्रि 07/10/2025 - 13:54
मग थातूर मातूर उत्तरे !
मी एका शिबिरात, घरवापसी करणाऱ्या पूर्वाश्रमीच्या हिंदूना कोणत्या जातीत परत घ्यायचे ह्यावर संघाचे काय मत आहे? असा प्रश्न विचारला. त्यावेळी, जेव्हा कोणी घरवापसी करतो, तेव्हा तो फक्त हिंदू समाजात परत येतो, एखाद्या विशिष्ट जातीत नाही असं उत्तर मिळालं होत. त्यावर त्यांचा रोटी-बेटी व्यवहार कसा होणार ह्या पुढच्या प्रश्नानंतर माझी रवानगी 'प्रहरी' म्हणून शिबिराच्या सीमेवर केली गेली. :-) - (प्रहरी) सोकाजी

In reply to by सोत्रि

रोटी-बेटी व्यवहार कसा होणार ह्या पुढच्या प्रश्नानंतर माझी रवानगी 'प्रहरी' म्हणून शिबिराच्या सीमेवर केली गेली. खिक्क! :)

In reply to by कपिलमुनी

गणेशा 07/10/2025 - 23:20
मस्त.. मला संघ आवडत नव्हता.. पण का काय माहीत कोठे काय ऐकलेले लहानपणी त्यामुळे महात्मा गांधी हि आवडत नव्हते.. तसेच भगतसिंग, आंबेडकर, नेताजी या बरोबरचे मुद्दे विनाकारण डोक्यात भरल्या गेले होते.. नंतर तुमच्या कडे ज्ञान आले.. आणि मग कळाले आधीचे गांधी बद्दल चूक होते.. पसरवलेले मनात होते.. नंतर गांधी एक विचार मिपा वर असताना धागा मांडला होता. तेंव्हा मिपा वर नविन होतो.. मिपाचे रंग जास्त माहीत नव्हते.. Link देतो सापडल्यास

युयुत्सु 07/10/2025 - 12:39
२०१४ पर्यंतचा संघ सुसह्य होता आता तो असह्य झाला आहे. संभ्रम निर्माण करणार्‍या कल्पनांचा आधार घेऊन लोकांवर नियंत्रण निर्माण करायचे. मूळ प्रश्न न सोडवता जुनाट टाकाऊ संकल्पना परत रूजवायच्या इतकाच सध्या त्यांचा कार्यक्रम आहे.

या वर्षी विजयादशमीच्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) स्थापनेला १०० वर्षे पूर्ण होतील. अजून पर्यन्त मिसळपाव वर देशातील सर्वात मोठ्या संस्कृतिक आणि सामाजिक संघटणे बाबत एक ही लेख आला नाही. माझा संघाशी प्रत्यक्ष संबंध फारसा आलेला नाही तरीही मी विचार केला अंतराजलावर फिरून आपणच माहिती घ्यावी आणि मिसळपावकरांसाठी सादर करावी. आज RSS च्या ५ लाखांहून अधिक शाखा देशभर कार्यरत आहेत. या शाखा सांस्कृतिक राष्ट्रवाद, व्यक्तिमत्त्व विकास, आणि नैतिक शिक्षण यावर भर देतात.

खपली

देवू ·

काही जखमा असतात जिवनभर भरत नाही,भळभळत रहातात. लहान मुले लवकर विसरतात. वेळेचे एम सिल लागते पण आत जखम ताजी असते. छान मांडणी.आवडली.

अभ्या.. 22/09/2025 - 15:33
दुसर्‍या परिच्छेदात कथनकार मी आणि कथापात्र शिरिष ह्यात गल्लत झाली आहे थोडीशी. तेवढी वगळता सुरेख.

सिद्धार्थने लवंगी फटाका पेटवून अंधाऱ्या बोळात फेकला. फट्ट! असा आवाज बोळात घुमला, क्षणभर उजेड पसरला , आणि सिद्धार्थ पुटपुटला, " कोणीतरी बसलंय मागच्या कंपाउंडवर. " त्याने एक कागद मशालीसारखा पेटवून हातात धरला, कागदाच्या थरथरणाऱ्या ज्वाळेच्या प्रकाशात तो आणि मित्रांची गॅंग कंपाउंडकडे निघाली. " अरे ! शिरीष एवढ्या अंधारात काय करतोयस इथे ? " सिद्धार्थने विचारले. प्रकाशात त्याला शिरीषच्या डोळ्यात अश्रू दिसले. त्याने शिरीषला भिंतीवरून खाली उतरवले. ताईच्या सासर्‍यांची तब्येत बरी नसल्याने, ती मागील दोन वर्ष माहेरी आली नव्हती.

डोक्याला खुराक देणारा रंगतदार ‘ठोकळा’

हेमंतकुमार ·

युयुत्सु 15/09/2025 - 11:20
मला रुबिक क्युब १९८३ साली भेट म्हणुन मिळाला होता. मी तेव्हा पूर्ण क्युब २ मि १३ से० मध्ये सोडवत असे. त्यानंतर मला एका मित्राने रुबिक क्लॉक भेट दिले होते. ते पण मी पूर्णपणे स्वतःचे स्वतः सोडवत असे. नंतर १९९० साली रुबिक पिरॅमिड हाताळायला मिळाला. तो पण स्वतंत्र पणे सोडवू शकलो होतो. कारण तोपर्यंत अशी कोडी सोडवायचा जनरल अल्गो शोधण्यात यशस्वी झालो होतो. पुढे २००४-५ मध्ये ४ बाय ४ बाय ४ असा क्युब मिळाला. तो मात्र एकदा दोनदा सोडविल्यावर त्यातले नावीन्य संपले. मात्र अलिकडे चिनी/कोरीयन मुलं काही सेकंदात क्युब सोडवतात त्याचे मात्र मला अजुनही भयानक अप्रूप/वैषम्य आहे.

माझा मुलगा ७वी ८वीत असताना या रुबिक्स क्युबच्या प्रेमात पडला होता. तूनळीवरुन काय काय अल्गोरिदम शोधुन त्याने त्यात बरेच प्रावीण्य मिळवले होते. अर्थात मी कधी वेळ वगैरे मोजली नाही. मग ३ बाय३ चा कंटाळा आल्यावर ४ बाय ४, २ बाय २, पिरॅमिड, ट्विस्टर्,मिरर्,हेक्झागॉन असे क्युब आमच्याकडे जमा होऊ लागले. आलेल्या पाहुण्यांना भरभर क्युब सोडवुन चकीत करणे हा एक कार्यक्रमच झाला. मात्र पुढे वयानुसार तो छंद मागे पडला आणि आता ते क्युब कपाटात गेलेत. रच्याकने-मला हा खेळ काही झेपला नाही. किवा खेळावासा वाटला नाही. का कुणास ठाउक.

अभ्या.. 15/09/2025 - 16:02
लहानपणी त्यावर कलर्सचे स्टीकर्स असायचे ते काढून परत रंगानुसार बसवायचे इतकेच प्राविण्य माझे. ;) नंतर फिक्स कलर्स असलेले क्युब्ज आले मग माझा इंटरेस्ट संपला. . तसेही चेस, पत्ते, सुडोकू, आकडे, समीकरणे आणि कोडी हे माझे जन्मजात शत्रु आहेत.

गवि 15/09/2025 - 19:50
फार पूर्वी एकदा लॉजिक शिकून हे सोडवायचा प्रयास केला होता. एकूण आयुष्यात एकदाच ते जमले. पण त्यातील क्लिष्टता आणि लक्षात घेण्याच्या बाबींची संख्या पाहता परत ते कधी झेपले नाही. त्याचा मुख्य उपयोग म्हणजे इतरांना गिफ्ट म्हणून देणे आणि त्यांना तुम्ही कसे बुद्धीच्या दृष्टीने अगदी ह्या sss आहात असे वाटवणे इतकाच.

मारवा 16/09/2025 - 11:39
अशा अधिकाधिक पर्यायी मोबाईल scroll killers ची सध्या समाजाला नितांत आवश्यकता आहे.

बदाम सात,भिकार सावकार ,सापशिडी खेळतो. बहुतेक वेळ मैदानावर घालवतो. पहिल्यांदा ॲक्टिव्ह भाग घ्यायचो आता दर्शक दिर्घा उबवतो. क्युब बरोबर दोस्ती दुपारी व संध्याकाळी फक्त ऑन दी राॅक्स वर,आता ती ही कमी होत चाललीय. बाकी लेख मस्तच आहे.

In reply to by कर्नलतपस्वी

हेमंतकुमार 16/09/2025 - 12:32
बदाम सात,भिकार सावकार ,सापशिडी
अगदी ! याला जोरदार अनुमोदन. आम्ही उभयता देखील दररोज दुपारच्या जेवणानंतर वीस मिनिटे नेहमीचे पत्ते आणि रात्रीच्या जेवणानंतर वीस मिनिटे UNO-पत्ते रोज गेली दहा वर्षे खेळत आहोत. ते खेळताना एकमेकांशी संवाद होतो हा पण एक फायदा. बाकी दोघांनीही बुद्धिबळाला शालेय जीवनातच टाटा केल्याने आता नाईलाज आहे; आयुष्याच्या या टप्प्यावर तो खुराक लावून घेण्याची दोघांचीही इच्छा नाही !

In reply to by हेमंतकुमार

गवि 16/09/2025 - 15:43
इथे मिपावर कोणीतरी पत्त्यांचे नवे खेळ (पूर्ण नवे किंवा जगाच्या अन्य भागातले, आपल्याकडे प्रचलित नसलेले) या विषयी लेख लिहायला सुरुवात केली होती. त्यात त्यांनी गोल्फ नावाचा एक गेम लिहीला होता. खऱ्या गोल्फ खेळाशी काही संबंध नाही. वेगवेगळ्या देशांत तो वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो. तो बेहद्द आवडला होता. आम्ही एरवी कधी पत्ते न खेळणारे कुटुंबीय या खेळाची आवड लागून जवळपास रोज रात्री खेळत असू. तो धागा अवश्य शोधून वर काढावा असा आहे.

हेमंतकुमार 16/09/2025 - 12:02
या लेखामुळे आपल्यातील काहींना पुन्हा एकदा क्यूब हातात घ्यावासा वाटतो आहे तसेच कोणाला मोठ्या आकाराचा नवीन घ्यावासा वाटतो आहे हे कौतुकास्पद आहे.
पर्यायी मोबाईल scroll killers
अगदी अगदी ! म्हणून मी सुद्धा रोज घरी लावलेले एक छापील वृत्तपत्र अजून चालू ठेवलंय आणि त्यातील शब्दकोडे पेनाने सोडवत राहतो, जेणेकरून हस्तलेखनाची सवय राहते आणि इ-स्क्रीन पासून काही काळ सक्तीने सुटका होते. तसेच पाठकोऱ्या कागदांवर खरडकाम करण्याची सवय पण यासाठी उपयुक्त ठरते आहे. 😀

मोबाईल येण्याअगोदर पुस्तकवाचन आणि रूबिक क्यूब काही व्यक्तींच्या हाताला चिकटलेले असत. परंतु या दोन्ही वस्तू तशा आक्षेपार्ह कधी वाटल्या नाहीत. पुस्तक हा कायम आदराचाच विषय राहिलेला आहे. रूक्यूब हा माझ्यासारख्या कांहीना आदराचा वाटत राहिलेला आहे. रूक्यू मध्ये पिरॅमिडपासून ४बाय ४, ५ बाय ५ वगैरे पर्याय आहेत हे ठाऊकच नव्हते. सुरेख लेखाबद्दल ध्न्यवाद.

चित्रगुप्त 17/09/2025 - 03:59
यूट्यूबीवर आत्ताच (योगायोगाने ? ) खालील लघुविडियो दिसला. अगदी सोपी युक्ती सांगितलेली आहे रुबिक क्यूब जुळवण्याची. करून बघा आणि कळवा (माझ्याकडे तो नसल्याने करून बघता आलेले नाही) https://youtube.com/shorts/gOb8PzN9GJY?si=PWc8zNyQh9FCFuWA

हेमंतकुमार 17/09/2025 - 08:04
क्यूब वेगाने खेळण्यासंबंधीची काही रोचक माहिती : १. त्याच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त जेव्हा प्रथम TOKUFASTbot हा यंत्रमानव बनवला गेला तेव्हा त्याच्या अतिशय वेगवान हालचालींमुळे क्यूब मोडत होते कारण त्यांना तेवढा वेग झेपत नव्हता. त्यानंतर मग तो वेग झेपणारे क्यूब बनवण्यात आले २. क्यूबबद्दल एक वेगळा दृष्टिकोन मांडणारे स्फुट :
क्यूब अति वेगात सोडवण्यामुळे शांतपणे बसून विचार करण्याची क्षमता माणूस गमावतो. फक्त अंतिम उत्तर येणे हेच याचे एकमेव ध्येय नसावे . .

युयुत्सु 17/09/2025 - 11:28
क्यूब अति वेगात सोडवण्यामुळे शांतपणे बसून विचार करण्याची क्षमता माणूस गमावतो. हा हा हा हा ... अमेरीकेतील एम० आय० टी० च्या रडगाण्याला कुरवाळणारा लेख आहे. चीन या वेगामुळेच जगावर आक्रमण करत आहे. १. https://youtube.com/shorts/POAbEbullMU?si=e6-n71HP2vZXt9So २. https://www.youtube.com/shorts/cX0-6e_ef3A या लोकांचे मायटॉकॉण्ड्रीयाचे दुसर्‍या व्यक्तीमध्ये आरोपण करता येईल का?

In reply to by युयुत्सु

हेमंतकुमार 17/09/2025 - 12:15
या लोकांचे मायटॉकॉण्ड्रीयाचे दुसर्‍या व्यक्तीमध्ये आरोपण
सध्या मायटॉकॉण्ड्रीयाचे प्रत्यारोपण ही नव्याने विकसित होणारी शाखा असून तूर्त त्याचा उपयोग आजारांच्या उपचारांसाठी केला जातो. या प्रक्रियेच्या दीर्घकालीन सुरक्षिततेचा अभ्यासही अभ्यास अपूर्ण आहे. निरोगी व्यक्तींमध्ये बलवर्धन किंवा 'चांगल्या गुणांची' जोपासना यासाठी त्यांचा वापर करणे अत्यंत वादग्रस्त आहे. त्यातून inflammatory or autoimmune response, अनपेक्षित जनुकीय बिघाड अशा काही समस्या उद्भवू शकतात. संदर्भ १ संदर्भ २

In reply to by हेमंतकुमार

युयुत्सु 17/09/2025 - 15:18
अरेच्चा! नवलच आहे!! खरं तर मायटॉकॉण्ड्रीयाचे प्रत्यारोपण हा मी केवळ हवेत मारलेला एक बाण होता. पण या दिशेने प्रयत्न होत आहेत, हे तुमच्यामुळे कळले (आणि गुदगुल्या झाल्या). पण हे लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद. इथे काही लोक मला "सर्वज्ञ" संबोधतात. ते अगदीच चुकीचे नाही... हा हा हा!

युयुत्सु 17/09/2025 - 15:32
श्री० कुमार१ तुमच्या लिखाणावरून तुम्ही जीव/वैद्यकशास्त्राशी संबंधित असावेत असा माझा अंदाज आहे. त्याशिवाय तुमच्या वैचारिक आणि भाषिक प्रगल्भतेवरून मी असा अंदाज बांधत आहे की तुम्ही सायकोपॅथ पण नसणार किंवा मी शोधलेल्या पॉलिमॅथिक अ‍ॅव्हर्जन सिण्ड्रोमने ग्रस्त नसणार. (टीप - हा टोमणा नाही.) तेव्हा तुम्हाला एक नि;शंकपणे एक प्रश्न विचारतो- चीनी वंश एक श्रेष्ठ वंश म्हणून पुढे आला आहे, असे माझे मत बनले आहे. तुम्ही याकडे कसे बघता?

In reply to by युयुत्सु

हेमंतकुमार 17/09/2025 - 16:10
होय, मी आधुनिक वैद्यकाचा पदव्युत्तर डॉक्टर आहे.
चीनी वंश एक श्रेष्ठ वंश म्हणून पुढे आला आहे . . .
हा प्रश्न जरी रोचक असला तरी त्याची चर्चा या धाग्यावर करणे हे फारच अवांतर होईल आणि ते मी नेहमीच टाळत आलेलो आहे. दुसरे म्हणजे, यावर सखोल वाचन आणि विचार करूनच चर्चा केली पाहिजे. तर ते सवडीने पाहू आणि ती यासारख्या धाग्यावर केल्यास उत्तम ! लो. अ. धन्यवाद !

In reply to by युयुत्सु

चित्रगुप्त 17/09/2025 - 17:43
चीनी वंश एक श्रेष्ठ वंश म्हणून पुढे आला आहे
याचा अर्थ "जगातले काही वंश 'श्रेष्ठ' तर काही वंश 'कनिष्ठ' असून चिनी वंश त्या श्रेष्ठ वंशांपैकी एक असून तो हल्ली प्रामुख्याने दिसून येत आहे" असा घ्यायचा, की सांप्रतकाळी चिनी वंश हा 'सर्वश्रेष्ठ' वंश असल्याचे सिद्ध होत आहे असा घ्यायचा ? -- जगात एकंदरित किती 'वंश' आहेत ? त्यांची विभागणी कोणकोणत्या वैशिष्ट्यांच्या आधारे, कोणी आणि केंव्हा केली होती ? ती विभागणी अजूनही स्वीकारार्ह आहे का ? असल्यास त्यापैकी 'श्रेष्ठ' आणि 'कनिष्ठ' वंश कोणकोणते, आणि ते तसे कशावरून ठरवता येतात ? वंशाच्या श्रेष्ठत्वाची आणि कनिष्ठत्वाची लक्षणे कोणकोणती, आणि तीच खरी, हे कशावरून जाणायचे ? जमल्यास यावर एक स्वतंत्र लेख लिहावा, वा इथेच प्रतिसाद द्यावा ही विनंती.

गामा पैलवान 21/09/2025 - 01:23
ठोकळा उलगडायचा माझा टाईम पंधरा मिनिटं आहे. फक्त सोबर मळसूत्रधार ( स्क्रू ड्रायव्हर ) पाहिजे. ;-) माझ्या एका काकाने प्रचंड संयमाने खेळून हा ठोकळा पुनरपि उलगडला होता. सुमारे एक वर्ष लागलं होतं. तेव्हा ( बहुधा ) ऐंशीच्या दशकाचा पूर्वार्ध चालू होता. -गा.पै.

हेमंतकुमार 21/09/2025 - 07:18
मळसूत्रधार ( स्क्रू ड्रायव्हर ) पाहिजे. ;-)
भारी! ' उकल ' करण्याचा हा पण एक प्रकार आहे म्हणजे :))

असंका 22/09/2025 - 09:24
लेख फारच सुरेख!! धन्यवाद!! हा क्युब सोडवायचा अनेक वर्ष प्रयत्न करत होतो. जमलं नाही. आता क्युबॅस्टिक नावाच्या एका युट्युब चॅनेल वर बघून शिकलोय. दोन महिन्यापूर्वी. सगळ्यात कमी वेळ आत्तापर्यंत ४.१ मिनिटे.... वर म्हणल्याप्रमाणे, टाइमपास म्हणून प्रवासात घेउन गेलेलो. पण एकदा ट्रीक जमल्यावर परत परत किती वेळा करणार. दोन तीनदा केलं मग ठेवून दिलं. :D

ही घटना सन 1974 ची . . . हंगेरीतील वास्तुरचनाशास्त्राचे प्राध्यापक एरनो रुबिक आपल्या विद्यार्थ्यांना त्रिमितीय रचना समजावून सांगायचे तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, यासाठी निव्वळ तोंडी शिकवण्याबरोबर एखादे पूरक शैक्षणिक साधन निर्माण केल्यास विद्यार्थ्यांना ही संकल्पना समजायला सोपी जाईल. मग विचारांती त्यांनी विशिष्ट प्लास्टिकच्या घटकांचा वापर करून 3 X 3 X 3 रचनेत एक क्यूब तयार केला. त्यामध्ये त्याच्या सहा पृष्ठभागांवर सहा वेगळ्या प्रकारचे रंग दिसणार अशी ती रचना होती.

चंद्रग्रहण अनुभूती: हा खेळ सावल्यांचा!

मार्गी ·

चंद्र गहणात कसा दिसतो हे बघायचे असेल म्हणून विसर्जन होऊ देत नव्हता. शेवटी राजाने चंद्रग्रहण बघीतलेच. चंद्राने त्याच्या सर्व "कला" दाखवल्या! अगदी,अगदी. दररोज दहा वाजता झोपणारा मी काल एक वाजता झोपलो. डि एस एल आर ने चांगले फोटो आलेत. मस्त अनुभव होता. लेख आवडला.

मार्गी 18/09/2025 - 11:02
सर्वांना नमस्कार आणि धन्यवाद! @ श्वेता व्यास जी, ढग असूनही नुसत्या डोळ्यांनीही हे चंद्रग्रहण छान दिसलं.

नमस्कार! काल रात्रीच्या चंद्रग्रहणाचा अनुभव अविस्मरणीय होता. सुरूवातीला ढग आणि पाऊस! त्यामुळे "संपेल ना कधी हा खेळ (ढगांच्या) सावल्यांचा" असं वाटत होतं. चंद्राला आधी ढगांचं ग्रहण लागलं होतं. दोन टेलिस्कोप व बायनॅक्युलरसह आम्ही मित्र तयार होतो. पण ढग होते. ढगात असतानाच चंद्र पृथ्वीच्या उपछायेत जाऊन ग्रहणाची सुरूवात झाली. पण सूर्य इतका तेजस्वी आहे की, तो अंशत: झाकला गेला तरी चंद्राच्या तेजात लक्षात येईल असा फरक पडत नाही. नंतर जेव्हा चंद्राने पृथ्वीच्या मुख्य सावलीत प्रवेश केला (सूर्य पूर्णपणे पृथ्वीच्या आड गेला) तेव्हा मात्र चंद्राची कडा काळी झालेली दिसली. पण सतत ढग होते.

सोबत. . . अखेरच्या क्षणांची

हेमंतकुमार ·

लेख अतिशय महत्वाचा जाणाऱ्या साठी व मागे रहाणार्‍या साठीही. वैद्यकीय क्षेत्र अतिशय जवळून बघितल्याने बरेच अनुभव आले आहेत. काही दिवसापूर्वीच एक नात्मयातील महिला अत्यवस्थ होत्या त्याना त्यांचे मरण कळले होते जणू,त्यांनी सांगीतले मी फार तर दोन किंवा तीन दिवस तुमच्रयाबरोबर रहाणार आहे. माझी स्वताची आई जेंव्हा गेली त्याच्या एक दिवस आगोदर मला डायपर व व्हिल चेअर आणावी लागली. त्याच रात्री तीने माझ्या हाताने दुध पिवून झोपेतच प्राण सोडला. आयुष्य भर स्वताच्या पायावर खंबीर उभी असलेली माझी आई, आता अवलंबून रहावे लागणार या धसक्याने गेली असावी. कारण अशक्तपणा सोडल्यास सारे वैद्यकीय पॅरामिटर सामान्य होते. तेंव्हा आपण मांडलेले मुद्दे खरोखरच मार्गदर्शक आहेत. "फिलिंग ऑफ इम्पेंडिग डुम", अशी रुग्णाची अवस्था ओळखण्यास,समजून घेण्यास मदतच करतील.

जवळच्या दोन वृद्ध वक्तींबाबत वरील बरीचशी लक्षणे जाणवली होती. आपल्या जिवलग अथवा कुटुंबीयांच्या मृत्यूची चाहूल लागणे हा कुतुहलमिश्रित दुःखद विषय असतो. अगदी खरंय ! नकळत पणे सारखं जाऊन श्वास चालू आहे का पाहणं म्हणजे आपण असं गृहीतच धरलंय की ही व्यक्ती जाणार याचा फार त्रास व्हायचा.

हेमंतकुमार 08/09/2025 - 15:31
अभिप्राय, प्रोत्साहन आणि आपल्या जवळच्या व्यक्तीसंबंधीचे अनुभव मोकळेपणाने मांडल्याबद्दल सर्वांना धन्यवाद !
डाॅक्टरानू
हा शब्दप्रयोग भलताच आवडला आहे. कोकणी ना ?

अनवट विषय हे अगदी खरे. हल्लीच कायप्पावर ढकलपत्रातून एक विचार आला होता. बालपण, किशोरावस्था, तारुण्य, गृहस्थ मध्यमवय, वृद्धावस्था हे जसे मानवी जीवनातील क्रमाने येणारे टप्पे आहेत तसाच मृत्यू हाही एक अपरिहार्य टप्पा मानून त्याला शक्य तेवढ्या धीराने सामोरे जावे. अर्थात हे आचरणात आणणे तेवढे सोपे नसावे. मी तर प्रायोपवेशन करणार. आपण लक्षणे दिली ते फार छान केलेत. त्यामुळे ते केव्हा सुरू करावे याचा थोडाफार अंदाज येईल. बहुधा हाताला गजरे बांधेन आणि स्वर्गात गेल्यावर रंभामेनकांवर उधळायला एक नोटांचे बंडल देखील ठेवणार असे म्हणतोय. रंभामेनकांच्या मागे गेलो तर तुम्हाला राग तर नाही येणार ना?

In reply to by सुधीर कांदळकर

हेमंतकुमार 08/09/2025 - 20:15
रंभामेनकांच्या मागे गेलो तर तुम्हाला राग तर नाही येणार ना?
राग कसला? उलट बरेच वाटेल. माणसाने इथे असले काय किंवा तिकडे असले काय, आनंदातच राहावे. तुमच्या मागोमाग काही वर्षांनी मी पण तिकडे येईन तेव्हा तुमचाच वशिला लावेन म्हणतो !

श्वेता२४ 08/09/2025 - 19:41
मी माझ्या घरातील अनेक वृद्धांची घरात/ हॉस्पिटलमध्ये बऱ्याचदा सेवा केलेली आहे. परंतू आतापर्यंत कोणाचाही मृत्यू प्रत्यक्ष जवळून पाहिलेला नाही. खरंतर तशी इच्छाही नाही. परंतु ही माहिती सर्वांनाच असणे खूप आवश्यक आहे. कारण प्रत्येक जण कधी ना कधी अशा प्रकारच्या अनुभवांना सामोरे जाणारा असतो. त्यामुळे तुमच्यासारख्या तज्ञ डॉक्टरांच्या कडून ही लक्षणे माहीत असणे व त्याबाबत एक सामान्य माणसाने काय करावे याबाबत तुम्ही दिलेल्या सल्ला अतिशय उपयुक्त आहे.

तिता 08/09/2025 - 20:03
Living Will बद्दल काही माहिती मिळेल का? नैसर्गिक मृत्यू शांतपणे आला तर चांगलेच पण जर असे नसेल तर इतरांना फार त्रास होतो. आणि आजारी माणसाला काही जाणीवच नसते. Living Will मुळे सर्वांचीच सुटका होईल.

In reply to by तिता

हेमंतकुमार 08/09/2025 - 20:17
Living Will बद्दल काही माहिती
भारतातील यासंबंधीच्या कायद्यांची माहिती देण्यासाठी मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात मार्गदर्शक केंद्र अलीकडेच सुरू झालेले आहे. त्यांच्या संस्थळावर सर्व माहिती मिळेल.

स्वधर्म 08/09/2025 - 20:18
पण पटकन वाचण्याची छाती झाली नाही. आधी प्रतिसादच वाचले. असो. वडीलांच्या मृत्यूची आठवण आली. रात्रभर ते बरळत होते व मी त्यांच्याच दवाखान्यातील खोलीत कधी जागा कधी झोपलेलो होतो. सकाळी जेंव्हा डॉ आले, तेंव्हा वडील बरेचसे शांत झाले होते. डॉक्टरांनी मला बाहेर थांबायला सांगितले व काही वेळा नंतर वडील गेले. रात्री ते नाकातील नळी काढ म्हणत होते पण मी तसे केले नाही कारण नंतर अन्न देता येणार नाही म्हणून सांगितले होते. मला कधी कधी वाटते की काढायला हवी होती नळी, म्हणजे त्यांना जाताना जरा आणखी बरे वाटले असते. राहून गेले मनात पण.

In reply to by अनामिक सदस्य

हेमंतकुमार 10/09/2025 - 12:45
या विषयावरील पूर्वीची चर्चा या स्वतंत्र लेखात वाचता येईल. सध्या जगभरातील 196 पैकी जेमतेम डझनभर देशांमध्ये ऍक्टिव्ह इच्छामरणाचा कायदा झालेला आहे. त्याचा अद्यतन सारांश असा आहे : 1. नेदरलँडस : जगात सर्वप्रथम कायदा मंजूर (एप्रिल 2002). आतापर्यंत एक लाखाहून अधिक लोकांनी त्याचा वापर करून जीवन संपवले. 2. Ecuador : फेब्रुवारी 2024 मध्ये कायदा लागू 3. इटली : इथे डॉक्टरांना मृत्यूचे इंजेक्शन द्यायला परवानगी नाही; ते फक्त रुग्णाला मदत करू शकतात (assisted dying) 4. पेरू : फक्त एका व्यक्तीला न्यायालयीन आदेशाने परवानगी दिली गेली. 5. पोर्तुगाल : कायदा संसदेत मंजूर झाला आहे परंतु अजून काही तांत्रिक प्रक्रिया बाकी आहे. 6. इंग्लंड : विधेयक इंग्लंडच्या संसदेत 314वि. 291 मतांनी संमत करण्यात आले. आता यथावकाश त्याचे कायद्यात रूपांतर होईल. . . भारतात अजूनही आपण पॅसिव्ह प्रकारासंबंधीच कायदा करण्याच्या टप्प्यावर आहोत. अनेक याचिका सर्वोच्च न्यायालयाकडे येत असतात परंतु संसदेच्या पटलावर ऍक्टिव्हचा विषय यायला (?) किती वर्षे लागतील ते माहित नाही.

दीर्घकालीन दुर्धर आजार अनेकांच्या वाट्याला येतात. संबंधित आजाराचे सर्व उपचार करून डॉक्टर्स थकले की शेवटी रुग्णाच्या नातेवाईकांना अंतिम सल्ला दिला जातो तो म्हणजे, “आता मृत्यूची वाट पाहण्याखेरीज आपल्या हातात काही नाही”. खरंय, अशा केसेसमध्ये मृत्यू हा अंतिम आणि नैसर्गिक ‘उपाय’ ठरतो. अशा तऱ्हेने त्या रुग्णाचे आयुष्यातील अखेरचे पर्व चालू होते आणि ते किती काळ चालेल हे अनिश्चित असते. आपल्या जिवलग अथवा कुटुंबीयांच्या मृत्यूची चाहूल लागणे हा कुतुहलमिश्रित दुःखद विषय असतो. प्रत्यक्ष मृत्यू होईपर्यंत कुटुंबीय अथवा सेवक अशा कोणाला ना कोणाला तरी रुग्णाची सोबत करावी लागते.

४३ दिवस हिमालयात अडकलेला माणूस!

मार्गी ·

आलो आलो 11/09/2025 - 00:06
पुस्तक वाचण्याची अनिवार इच्छा निर्माण करण्याचे कसब आहे आपणास . बाकी जेम्स भाऊचे करावे तेवढे कौतुक थोडेच. बहीणाबायच प्रेम अलौकिक. उत्तम पुस्तक सुचविल्याबद्दल आभार.

मरण पावल्याची बातमी एकामागोमाग एक मिळाली. दोन आपले निहीत अयुष्य जगून निजधामास गेले तर एक अर्ध्यावरच भातुकली चा डाव मोडून गेला. दिवस वाईट गेला .रात्रभर झोपमोड होत होती. तरीही पाच वाजता जाग आलीच. कारण शिस्त. सवय. उठल्यावर रात्रभर आलेले कायप्पावरील संदेश बघणे व पाठवणे झाले व मिपावर आपला लेख वाचला.खालील वाक्य नवीन उभारी देऊन गेलं. जिद्द, साहस, शिस्त आणि कठोर दृढनिश्चय असेल आणि सोबत जीवाभावाचे प्रिय जन असतील तर माणूस किती हिमालयात नोकरी केल्याने असे अनुभव पण एव्हढे भयंकर नाही व आठवणी आहेत. एक कर्नाटक मधला सैनिक क्रेव्हास मधे अडकला होता. अथक प्रयत्नांनंतर भारतीय सैनिकांनी त्याला बाहेर काढला . पुढे काही दिसत तो दिल्लीच्या हाॅस्पिटल मधे होता. शेवटी जंग हारला. Crevasse-They are often partially or fully concealed by a snow bridge, making them difficult to spot on the surface. Hypothermia was the most difficult condition in such situations चांगले परिक्षण. नक्कीच वाचेन.

मार्गी 18/09/2025 - 11:03
सर्वांना धन्यवाद! @ कर्नलतपस्वी जी! ओह ह. आता आपण ठीक असाल अशी आशा करतो. प्रणाम.

राघव 23/09/2025 - 01:33
पुस्तक यादीत जोडले गेले आहे. नक्की वाचेन. खूप धन्यवाद!

- वैद्यकीय शिक्षण घेत असलेला ऑस्ट्रेलियन जेम्स स्कॉट - "तिथे" ३ दिवसांहून जास्त काळ कोणीही तग धरू शकणार नाही - बहीण जोआनचं प्रेम व तिने केलेली प्रयत्नांची पराकाष्ठा - कराटेतून मिळालेलं शरीर, प्रसंगावधान, शिस्त आणि धैर्याची कसोटी - सोबतीला जीवाभावाच्या माणसांच्या आठवणी, प्रेम आणि फक्त बर्फ! - छोट्या गोष्टींमधून साध्य केलेलं आत्मबळ - ध्यानाद्वारे अचूक जागा सांगणारे रिनपोचे थरंगू लामा - ऑस्ट्रेलियन लोकांची हिंमत, आत्मविश्वास आणि हट्ट - "तू देव आहेस, कारण कोणीच माणूस इथे असा राहू शकत नाही!" - सुटकेनंतरचा अनपेक्षित घटनाक्रम नमस्कार!