राजकारण

आता माझी सटकली रे.........!

आयुर्हित's picture
आयुर्हित in काथ्याकूट
18 Mar 2014 - 9:40 pm

नंदन निलकेणी

एक सुशिक्षीत मान्यवर,

चांगल्या खाजगी संस्थेत प्रत्यक्ष कामाचा भरपूर अनुभव,

Managing Director, President, CEO या पदावरचा अनुभव,

देशासाठी चांगले काहीतरी करून दाखवायची तयारी,

Imagining India: The Idea of a Renewed Nation या पुस्तकाचे लेखक,

एक कॉंग्रेस नेता,

पद्मभूषण पुरस्कार विजेते,

आधारपत्र अध्यक्ष

कदाचित भावी पंतप्रधान(जर कॉंग्रेस बहुमतात आली तर),

कॅलिडोस्कोप २

kurlekaar's picture
kurlekaar in जनातलं, मनातलं
14 Mar 2014 - 11:46 am

रसिकता
बेगम अख्तर समोर बसून आळवत्येय.
मला आठवतंय ते हिंदी चित्रपटांतलं मैफलीचं दृश्य –एक दोन श्रोते मनगटावरच्या गजरयाचा आस्वाद घेत उगाचंच माना डोलावताहेत, शेजारी किंवा हातांत ‘एकच प्याला.’ रसिकतेचा इतका कुरूप चेहरा इतर कुठं बघायला मिळत नाहीं.

राजकारणचित्रपट

त्यांच्या चष्म्यातून भाग ५ : हमीदचे मुसलमान .

राजघराणं's picture
राजघराणं in जनातलं, मनातलं
12 Mar 2014 - 4:39 pm

त्यांच्या चष्म्यातून भाग ५ : हमीदचे मुसलमान .

हमीद दलवाई आणि माझा स्वधर्माकडे पहाण्याचा चष्मा एकच आहे. ज्या दृष्टीकोनातून हमीद इस्लामकडे आणि मुस्लिम समाजाकडे पाही , नेमक्या त्याच दृष्टीकोनातून मी हिंदूचे यच्चयावत धर्म आणि समग्र हिंदू समाज यांकडे पाहतो. हमिदचा दलवाई्चां चष्मा माझ्या नेहमीच्या वापरातला असल्याने , प्रस्तुत लेख प्रथमपुरुषी एकवचनात लिहिला आहे . पण लेखातले प्रत्येक वाक्य आणि विचार प्रवाह मात्र हमिदचाच . सर्व लेखन समग्र संदर्भ देऊन केले आहे.

राजकारणविचार

ब्लॅक अँड व्हाईट-एक फसव द्विभाजन आणि (अर्धे) भरलेले ग्लास

माहितगार's picture
माहितगार in जनातलं, मनातलं
9 Mar 2014 - 1:15 pm

व्यक्ती, कुटूंब, व्यवसाय, ते असंख्य सामाजिक, जातीय, धार्मीक, राजकीय, केवळ माझच (आमचंच खर) म्हणणार्‍या टोकाच्या भूमीका; व्यक्तीगत आणि समुहांच्या हिताची गणित अनेक संघर्षांना टोकाला नेत असतात.

संस्कृतीधर्मसमाजतंत्रराजकारणशिक्षणविचारमाहितीवादप्रतिभा

२०१४ इलेक्शन स्पेशल - चार ओळी

अमोल केळकर's picture
अमोल केळकर in जे न देखे रवी...
7 Mar 2014 - 3:35 pm

लोकसभेच्या निवडणूकीच्या
जाहीर झाल्या तारखा
काही दिवस तरी कमी होईल
नेत्यांची खा.खा..... :)
----------------------------------------
आधी बोलवत होतो तेंव्हा
केलीत तुम्ही ना ना
तिकडे तिकीट न मिळता
इकडे लगेच आलात ना.... :)
----------------------------------------
विकासाची मोजदाद करायला
सोळा प्रश्णांची प्रश्णावली.
येणारी निवडणूकच सांगेल
कुणी कुणाची वाट लावली.

राजकारण

गुजरात विकासाचे मृगजळ..

बंडा मामा's picture
बंडा मामा in काथ्याकूट
6 Mar 2014 - 12:15 am

अरविंद केजरीवाल ह्यांना आज पोलिसांनी ताब्यात घेतले आणि सगळीकडे त्याची बातमी दिसू लागली. गुजरातच्या विकासाचा आढावा घेण्यासाठी हा दौरा आहे असे स्पष्ट केले असुनही, राजकीय रॅलीला परवानगी घेतली नाही असे लंगडे कारण दाखवुन पोलिसांनी ही कारवाई केली. अर्थातच कुठेतरी पाणी मुरते आहे हे स्पष्ट आहे.

संघपरीवाराचा जोर असणारा राम मंदिराचा मुद्दा आता मते मि़ळवुन देत नाही म्हणून 'विकास पुरुष' ही प्रतिमा निर्माण करुन त्यावर जोर देण्याची निती अवलंबली आहे. आणि त्यासाठी गुजुरातच्या विकासाचा उदो उदो सिस्ट्मॅटीकली भाजपा कडुन केला जातो आहे.

निवडणूका जवळ आल्या सारखे वाटतंय

निलरंजन's picture
निलरंजन in जे न देखे रवी...
2 Mar 2014 - 5:16 pm

निवडणूका जवळ आल्यासारखे वाटतंय
गरीबांची कणव करणारे गल्लोगल्लीत जमलेयं
कैवारी जो तो जनतेचा बनू पाहतोय
पोटात एक ओठात एक अन मनात काही वेगळच साचलयं

पोस्टर फलक बोर्ड नाक्यानाक्यावर लागलेत
इच्छुक आणि समर्थक आता आपले घोडे दामटू लागलेत
निवडून येण्याची स्वप्न आता घडोघडी पडू लागल्यात
जिकण्यासाठीचा हिशेब जे ते ठेवू लागलेत

उमेदवारीच्या खेळात आता वजन आपले लावू लागलेत
हा आपला हा परका डाव पुन्हा नव्याने मांडू लागलेत
आपआपला सवतासुभा मतदार आपले राखू लागलेत
मिटींगा मेऴावे भाषण सभा चौकाचौकात घडू लागलेत

वीररससमाजराजकारण

भुजबळचा भयानक भ्रष्टाचार!

हुप्प्या's picture
हुप्प्या in काथ्याकूट
1 Mar 2014 - 10:05 am

भुजबळांच्या छगनने आपल्या कुटुंबियांसमवेत महाराष्ट्राला मनसोक्त लुटले आहे. करदात्यांचा प्रचंड पैसा आपल्या घशात घालून आपले उखळ पांढरे केले आहे. भ्रष्टाचाराच्या क्षेत्रातील अग्रणी तटकर्याशी अटीतटीची स्पर्धा सुरु आहे की काय अशी शंका यावी.
http://www.loksatta.com/mumbai-news/pwd-miniter-chhagan-bhujbal-in-troub...

मोरारजी देसाई ; स.का. पाटील आणि फ्लोरा फाऊंटेनचे कारंजे

माहितगार's picture
माहितगार in जनातलं, मनातलं
28 Feb 2014 - 8:43 am

कॅलेंडर तयार करणारे चूकतात ? का जन्म घेणारे ? माहीत नाही; पण ज्यांचा वाढ दिवस नेमका २९ फेब्रुवारी त्यांचा वाढदिवस केव्हा साजरा करावा खासकरून व्यक्ती महाराष्ट्राची माजी मुख्यमंत्री आणि भारताची माजी पंतप्रधान असेल तर. आता काही जण म्हणतील माहितगारांना काय झाले एकदम मोरारजींचा वाढदिवस साजरा करावयास निघाले; म्हणोत बिचारे त्यांना बदलता काळ थोडाच समजतो तेलंगाणाच वेगळ राज्य होऊ लागल की चिरंजिवी म्हणतात निजाम हिरो होते; विदर्भाची मागणी जशी पुढे जाईल तसे हुतात्माचौकाचे नामकरण फ्लोरा फाऊंटेनचे कारंजे करावे आणि मोरारजींना हिरो मानावे; ज्याचा त्याच देव निराळा :)

भाषाराजकारणसमीक्षा

हिन्दुत्ववादी ते हिन्दुत्वविरोधक मतांतराचा प्रवास

वैनतेय's picture
वैनतेय in काथ्याकूट
26 Feb 2014 - 12:30 pm

समस्त मिपाकार मंडळी,

राम राम!

बरेच लेख / प्रतिक्रिया वाचताना मला एक गोष्ट ठळकपणे जाणवली, ती म्हणजे आपल्यापैकी अनेकजण "पुर्वी हिन्दुत्ववादी होते". याचाच अर्थ आपले मतांतर झाले आहे. ते का झाले हे समजावुन घेण्याचा हा प्रयत्न...

१. आपण कशामुळे हिन्दुत्ववादी विचारांकडे झुकलात?
२. असे काय घडले ज्यामुळे आपण हिन्दुत्वविरोधक झालात?

वरील दोन्ही प्रश्नांची ऊत्तरे परिस्थिती, घटना, व्यक्ती, वाचन, संघ शाखा, शिवसेना अथवा भा.ज.पा. किंवा तत्सम संघटना या अनुषंगाने अपेक्षित आहेत.

मिपा सर्वे म्हणुयात का याला?