मोरारजी देसाई ; स.का. पाटील आणि फ्लोरा फाऊंटेनचे कारंजे

माहितगार's picture
माहितगार in जनातलं, मनातलं
28 Feb 2014 - 8:43 am

कॅलेंडर तयार करणारे चूकतात ? का जन्म घेणारे ? माहीत नाही; पण ज्यांचा वाढ दिवस नेमका २९ फेब्रुवारी त्यांचा वाढदिवस केव्हा साजरा करावा खासकरून व्यक्ती महाराष्ट्राची माजी मुख्यमंत्री आणि भारताची माजी पंतप्रधान असेल तर. आता काही जण म्हणतील माहितगारांना काय झाले एकदम मोरारजींचा वाढदिवस साजरा करावयास निघाले; म्हणोत बिचारे त्यांना बदलता काळ थोडाच समजतो तेलंगाणाच वेगळ राज्य होऊ लागल की चिरंजिवी म्हणतात निजाम हिरो होते; विदर्भाची मागणी जशी पुढे जाईल तसे हुतात्माचौकाचे नामकरण फ्लोरा फाऊंटेनचे कारंजे करावे आणि मोरारजींना हिरो मानावे; ज्याचा त्याच देव निराळा :)

या मोरारजी देसाईंची इंग्रजी विकिपीडियावरील सध्याची ओळख येणे प्रमाणे :

Morarji Desai (29 Feb 1896 – 10 April 1995), was a notable Indian independence activist and the fourth Prime Minister of India from 1977 - 1979. He was also the first Prime Minister to head India's first non-Congress Government. At foreign fronts, Desai holds international fame for his peace activism and made notable efforts to initiate peace between two-rival South Asian states, Pakistan and India. After India's first nuclear explosion in 1974, Smiling Buddha, Desai helped restore friendly relations with China and Pakistan, and vowed to avoid armed conflict such as Indo-Pakistani war of 1971. Desai has the credible distinction of being the only Indian national to be conferred with Pakistan's highest civilian award, Nishan-e-Pakistan, which was conferred on him by President Ghulam Ishaq Khan in 1990 in a colorful ceremony. Domestically, he played crucial role in Indian nuclear program after it was targeted by major nuclear powers after conducting a surprise test in 1974. Later, his policies promoted social, health and administrative reforms in the country.

संदर्भ :Morarji Desai. (2014, February 21). In Wikipedia, The Free Encyclopedia. Retrieved 02:47, February 28, 2014, from http://en.wikipedia.org/w/index.php?title=Morarji_Desai&oldid=596526550

ज्यांना मोरारजींचा वाढदिवस साजरा करावयाचा आहे त्यांना स.का. भाऊंची वेगळी ओळख सांगण्याची आवश्यकता नाही ते आठवण करतीलच परंतु ज्यांना नाही त्यांच्या करता त्यांची मराठी विकिपीडियावरील ओळख खालील प्रमाणे आमचा मुख्य उद्देश आम्हाला विकिपीडिया करिता सदाशिव कानोजी पाटील, यांच्या पुण्यतिथीची तारीख म्हणजे मृत्युदिनांक हवा आहे.

सदाशिव कानोजी पाटील, तथा स.का. पाटील, (१४ ऑगस्ट, इ.स. १९०१ - मृत्युदिनांक अज्ञात १९८३ ? ) हे मराठी, भारतीय राजकारणी होते. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सदस्य होते. इ.स. १९५७ ते इ.स. १९६७ या कालखंडात ते भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्री होते.

सदाशिव पाटील मुळचे सिंधुदूर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील होते.[१] पाटलांचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला. सुरुवातीस पत्रकार म्हणून काम केल्यानंतर त्यांनी काँग्रेसमधून राजकारणात प्रवेश केला. त्यांनी मालवणला राष्ट्रीय शाळा सुरू केली व त्यात शिक्षक म्हणून काम केले. [२]बॉम्बे मिल मजदूर युनियन ची स्थापना केली पण नंतर हि युनियन राष्ट्रीय मिल मजदूर संघ मध्ये विलीन केली.[३]

मुंबईत रात्रशाळेत शिकवण्यासाठी वेळ दिला [४]

मुंबईचे माजी महापौर, जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधींच्या (१९५७ ते १९६७ ) काळात ते भारतीय संघराज्याचे मंत्री होते.

स.का.पाटलांनी संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीस विरोध केला आणि खास करून मुंबई हे बहुसांस्कृतिक शहर असल्याने महाराष्ट्रात सामील करू नये अशी वादग्रस्त भूमिका घेतली. [१४]या विश्वात जोपर्यंत सूर्य चंद्र आहेत तोपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळू देणार नाही, अशा स.का. पाटलांची वल्गना होती. पण जनतेच्या जोरदार चळवळीमुळे जवाहरलाल नेहरूंना मुंबईसकटच्या महाराष्ट्राच्या निर्मितीला मान्यता द्यावी लागली. [१५][१६] स.का. पाटलांच्या या कृत्यामुळे त्यांना पुढील लोकसभेच्या निवडणुकीत मुंबईतच हार पत्करावी लागली.

संदर्भ : सदाशिव कानोजी पाटील. (२०१३, नोव्हेंबर २४). विकिपीडिया, एक मुक्त ज्ञानकोश. Retrieved ०२:५३, फेब्रुवारी २८, २०१४ from http://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%BE%E0....

सोबतच मराठी आणि इंग्रजी विकिपीडियाकरता या निमीत्ताने जमल तर:
*हुतात्मा चौक, मुंबई

१) फ्लोरा फाऊंटेन कारंजे नेमके केव्हा बांधण्यात आले १८६४ कि १८६९ ?

२) ऐतिहासिक दृष्ट्या तसा आलिकडील कालावधी ब्रिटीशांची नोंदी व्यवस्थीत ठेवण्याची सवय तरी सुद्धा फ्लोरा फाऊंटन कारंज्याच्या नेमका का कुणी आणि केव्हा बांधला या बाबत इंटरनेटवरील संदर्भात क्रेडीट घेऊ इच्छित एका पेक्षा अधिक दावेदार मिळताहेत.ब्रिटीश , ज्यू आणि पारसी . फ्लोरा फाऊंटन कारंजे विभागाच्या मांडणीपुढचा हा यक्ष प्रश्न आहे. संदर्भा सहित खात्री लायक माहिती हवी आहे.

३) कुणाला वेळ काढता आलच तर Talk:Flora Fountain येथील चर्चाही अभ्यासावी.

भाषाराजकारणसमीक्षा

प्रतिक्रिया

भारतरत्न आहेत मोरारजी देसाई.. मराठी माणसांचा पक्का द्वेष्टा एवढी एक ओळख पुरे आहे त्यांची, संयुक्त महाराष्ट्राच्या रणसंग्रामात अत्र्यांनी त्याना कायम 'मर्डरजी' म्हटल्याचं आठवतय!

सुनील's picture

28 Feb 2014 - 10:08 am | सुनील

मराठी माणसांचा पक्का द्वेष्टा एवढी एक ओळख पुरे आहे

हे कशावरून ठरवले?

जो की घरातल्या वडिलधार्यांकडून पोहोचला, अत्रेंचे काही जुने लेख त्यांची जुनी भाषणे ह्यातून मोरारजी मुंबई महाराष्ट्राला द्यायच्या विरुद्ध होता, मुंबईत मराठी माणसाची नाहीच असा खुलेआम दावा करत नेहरु आणि काँग्रेसवर दबाव आणत होता. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात जेव्हा पोलिसांनी बंदुकीच्या बळाचा वापर केला तेव्हा किती गोळ्या झाडल्या आणि किती जण मेले ह्याचा हिशोब मागणाराही हाच (अर्थात ही सगळी माहिती ऐकीव आहे!)

अत्रुप्त आत्मा's picture

28 Feb 2014 - 7:11 pm | अत्रुप्त आत्मा

@(अर्थात ही सगळी माहिती ऐकीव आहे!) >>> पण ती पूर्णपणे खरी आहे! या मुरारीला अत्र्यांनी नरराक्षस अशी पदवी बहाल केलेली होती.

नितिन थत्ते's picture

28 Feb 2014 - 7:16 pm | नितिन थत्ते

नंतर दुसर्‍या स्वातंत्र्याच्या काळात मोरारजी आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे अध्वर्यु मांडीला मांडी लावून बसत असत.

अत्रुप्त आत्मा's picture

28 Feb 2014 - 8:00 pm | अत्रुप्त आत्मा

कोण ते अध्व-र्यू???

निश्चितच सामान्यजनांपैकी नसणार!

विकास's picture

28 Feb 2014 - 10:02 pm | विकास

यात नवीन काय आहे? भारतात फक्त काँग्रेस आणि भाजपा अशी एक युती झाली नाही हा अपवाद सोडल्यास सगळी समीकरणे झाली आहेत. त्या व्यतिरीक्त जेंव्हा स्वातंत्र्यावरच घाला घातला होता तेंव्हा असा घाला घालणार्‍यां दगडांसमोर वीटांची बाजू घेतली म्हणून देखील काही गैर नाही ते वेगळेच!

बाकी मोरारजींच्या मराठीव्देष्टेपणाबद्दल

अत्रे संयुक्त महाराष्ट्रासाठीचा लढा लढत होते आणि लढताना जे काही करायचे असते ते त्यांनी केले. माझ्यासमोर आत्ता काही पुरावा नाही, पण मला असे वाटते की (एक तो लढा सोडल्यास) त्यांचे मोरारजींपेक्षा (त्यांच्या भाषेत) सदोबा पाटलाशी जास्त वैर होते. अर्थात राजकीय वैर... ते मराठीद्वेष्टे होते का तर असतीलही कदाचीत. त्यावरून पुरावे देखील देता येतील पण ते सगळे इतके ब्लॅक अँड व्हाईट असू शकत नाही असे वाटते.

अनेक वर्षांपुर्वी इतिहासतज्ञ अर्नॉल्ड टॉयन्बीचा एक संदर्भ पुस्तकात वाचला होता (जालावर आत्ता मिळाला नाही.) तो संयुक्त महाराष्ट्र लढा चालू असतानाच्या म्हणजे ५०च्या दशकात टॉयन्बी भारतात आला होता आणि त्यावेळेस केंद्रीय मंत्री झालेल्या मोरारजींना तो भेटला होता. मोरारजींनी त्यावेळेस मराठी लोकांना अर्थात संयुक्त महाराष्ट्र लढ्यावरून नावे ठेवली होती. ते टॉयन्बीस तितकेसे पटले नव्हते. त्याने फक्त या संदर्भात एकच remark केला की जो पर्यंत मराठी माणसे शिवाजी आणि टिळक यांना विसरत नाहीत तो पर्यंत त्यांचे (मोरारजींसारख्यांमुळे) काही बिघडत नाही...

मोरारजी हे शिस्तप्रिय आणि कडक गृहस्थ होते. ते सगळ्यांशीच तसे होते आणि त्यातूनच त्यांच्या हातून हुतात्मा चौकाजवळ झालेल्या गोळीबाराचा आततायीपणा घडला. ह्याच मोरारजींनी गांधी हत्येनंतर जेंव्हा पश्चिम महाराष्ट्र पेटला तेंव्हा सातार्‍यासकट काँग्रेसच्याच अथवा काँग्रेसी पुढार्‍यांना नियंत्रणात आणण्यासाठी सैन्य कवायत करून शांतता प्रस्थापित करण्यास मागेपुढे पाहीले नाही...

त्यांच्या स्पष्टवक्तेपणाचे पंजाब प्रकरण आणि त्यातून भिंद्रनवाले नावाचा राक्षस तयार केल्याने त्यातच इंदीरा गांधींना प्राण गमवावे लागले हा झाला इतिहास... पण इंदिराहत्येनंतर त्यांना प्रतिक्रीया विचारल्यावर म्हणाले: बुरे काम का बुरा नतीजा...

अर्थात हेच मोरारजी ५०च्या दशकात केंद्रीय अर्थमंत्री असताना त्यांच्या मुलाने कांती देसाई ने आर्थिक अफरातफरी केल्यामुळे वादात आले होते तेंव्हा गप्प होते. त्यांची सून म्हणजे किर्लोस्करांची (मला वाटते शंतनुरावांची) मुलगी, थोडक्यात मराठी. (मला वाटते तीने नंतर आत्महत्या केली).

त्यांचे मुंबईतले ओशिआना इमारतीतले रहाते भाड्याचे घर कोर्टात केस हरल्याने सोडावे लागले. तेंव्हा त्यांना तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी (हपापाचा माल म्हणून) महाराष्ट्र सरकारकडून एक घर मुंबईत दिले होते जेथे ते नंतरच्या काळात राहीले.

मोरारजींची सगळ्यात माझ्या आणि अनेकांच्या दृष्टीने आक्षेपार्ह गोष्ट म्हणजे त्यांनी स्विकारलेला निशान-ए-पाकीस्तान. पण तो त्यांचा चॉईस झाला. असो.

माहितगार's picture

1 Mar 2014 - 9:08 am | माहितगार

विकास छान माहिती दिलीत. मोरारजी राजाकरणात तसे उशीरा आले तरी वयाने (९९वर्षे जगले) आणि राजकीय नशीबाने साथ दिल्याने बर्‍याच घडामोडींच्या काळात त्यांची उपस्थिती होती. या संबंधाने आपण आतापर्यंत आम्हाला (मला) नसलेली माहिती दिलीत अधिक देता आल्यास पहावे.

{कामगार आणि उद्योजकात भारतीय उद्योजकांची बाजू टिळकांनीही उचलून धरली पण त्यात उद्देश आयात मालापेक्षा स्वदेशी वस्तुची किंमत कमी राहिली पाहिजे भारतीय उद्योजक टिकला पाहीजे अशी भूमीका त्यांची असावी. स.का. पाटिल कामगारांचे नेते होते (?) पण मोराराजींच्या हातातहात घालून उघड भांडवलशाही बाजू मांडत होते. यात विशेष उल्लेखनीय उदाहरण भारतास १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले तेव्हा काँग्रेस पक्षाला दिल्लीत कार्यालय नव्हते (त्या पुर्वीची स्थिती काय माहित नाही) कार्यालय उभाकरण्या करता पैसा स.का.ंनी बहुधा मोरारजींच्या साहाय्याने (?) मुंबईतल्या उद्योजकांकड्न जमा केला आणि दिल्लीचे काँग्रेस कार्यालय बनले.

(पेशवे काळापर्यंत शेती सारा घेण्यावरच राज्यकर्यांचे चाले व्यापारी आयात निर्यात कर देत असे दिसते पण इनकम टॅक्सची कल्पना नव्हती ब्रिटीशांनी भारतीय व्यापार्‍यांवर इनकम टॅक्स लावला आणि भारतीय व्यापार्‍यांना ते कधीही आवडले नाही आणि ती मंडळीही त्याही कारणाने काँग्रेस गटात गेली स्वातंत्र्य आधी काँग्रेस आणि लीग ने जो काही अल्प संसार सोबत केला त्यात या काँग्रेसच्या व्यापार्‍यांप्रती मवाळ इनकम टॅक्स प्रकरणाने आपापसात वाजले होते. असो )

एनीवे एकदा व्यापारी वर्गांकडे हात पसरल्या नंतर सकां मोरारजी प्रभृतींनी कामगार आंदोलनात व्यापार्‍यांची कड घेतली कामगार वर्ग मराठी होता आणि तोच एकत्रित महाराष्ट्रचळवळीत अग्रेसरही होता अर्थात आंदोलनात त्यांचे सका मोरारजींचे चित्रण मराठी विरोधी होणे अश्चर्याचे नसावे.

विकास's picture

1 Mar 2014 - 6:27 pm | विकास

एनीवे एकदा व्यापारी वर्गांकडे हात पसरल्या नंतर सकां मोरारजी प्रभृतींनी कामगार आंदोलनात व्यापार्‍यांची कड घेतली कामगार वर्ग मराठी होता आणि तोच एकत्रित महाराष्ट्रचळवळीत अग्रेसरही होता

रोचक माहिती. मला वाटते एक अत्रे आणि शंकरराव देव प्रभृती सोडल्यास संयुक्त महाराष्ट्र समितीचे नेतृत्व हे डावे-समाजवादी विचारांचे होते. "सबसे बडा रुपय्या" तत्व सातत्याने सर्वत्र दिसते.

अवांतरः पुर्वीच्या काळात हिंदी सिनेमात मराठी माणूस म्हणजे नोकर्/मोलकरीण इतकाच दाखवला जायचा. पण आता मराठी माणूस हा वरील वर्गात/हुद्द्यात्/पैशाने (खाजगी क्षेत्रात देखील) दिसू लागल्यावर बॉलीवूड मधील कॅरेक्टर्सची नावे आता अनेकदा मराठी दिसतात...

नितिन थत्ते's picture

2 Mar 2014 - 8:52 pm | नितिन थत्ते

मला वाटते अत्रे सुद्धा तोवर कम्युनिस्ट पक्षात (किंवा कम्युनिस्ट पक्षाचे सहानुभूतिदार) होते.
इथे दिसते त्याप्रमाणे चीनच्या आक्रमणानंतर मुंबईत मोर्चा निघाला होता.
On Oct 29 (Diwali), processions were taken out all over Mumbai and over 100,000 people converged at the historic Girgaum Chowpatty. A public meeting was addressed by the chief minister and leaders of all political parties, barring the communists, the report said.

The popular feeling against the communists was so strong that when P.K. Atre, an editor of a local Marathi paper, was seen by the crowds they became restless and demonstrated against him.

The protest died down only after the chief minister "made a personal appeal to their sense of discipline and assured them that Mr. Atre would not speak at the meeting.

चीनी आक्रमणानंतर ज्या लेखक कवींनी देशभक्तीपर लेखन केले त्याची अत्र्यांनी खिल्ली उडवली होती.

प्रदीप's picture

3 Mar 2014 - 6:17 pm | प्रदीप

ह्यांची, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत व नंतर डाव्या विचारसरणीच्या पक्षांशी जवळीक होती. ते दोन्हीपैकी कुठल्याही कम्युनिस्ट पार्टींचे मेंबर नव्हते.

विकास's picture

3 Mar 2014 - 8:02 pm | विकास

वर प्रदीप यांनी लिहीले त्यात अधिक भर...

अत्रे कम्युनिस्ट पक्षात नव्हते आणि असे वाटते की मर्यादीत अर्थाने कम्युनिस्ट पक्षाचे सहानभूतीदार असावेत. संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि स्थापनेच्या मागेपुढे त्यांचे जे काही १ मे अथवा जनतेच्या अवस्थेवरून लेख आले आहेत त्यावरून असे वाटते. मला वाटते १५ ऑगस्ट १९६२ च्या "जय महाराष्ट्र-जय समाजवाद!" या लेखात अत्र्यांनी म्हणले होते की स्वातंत्र्यापूर्वी सर्वात गरीब आणि सर्वात श्रीमंत यातील फरक (एकक लक्षात नाही) साधारण ११० रू होता, तो ६२ सालापर्यंत ३००+ रू झाला. मुंबईतील गिरण्या बंद करण्याचे त्यावेळेस देखील घाटत असावे असे हा लेख वाचताना वाटले. एकूणच त्यांच्या दृष्टीने मुंबईबद्दलचा लढा हा मुठभर भांडवलदार आणि गरीब जनतेतला होता. वास्तवीक समाजवाद हा शब्द आणि विचारसरणी काँग्रेसने आणली पण त्याचा गैरवापर झाल्याने त्यांचा दहा वर्षातच काँग्रेसवरील विश्वास उडाला होता. त्यावरून (आर्थिक कारणे आणि भ्रष्टाचार, भांडवलदारांशी नको इतकी जवळीक यामुळे) भरपूर टिका ते करत होते. त्यातच भर म्हणून लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या केरळ मधील पहील्या वहील्या कम्युनिस्ट सरकारला प्रजासमाजवादी आणि मुस्लीम लीगला जवळ करून काँग्रेसने सत्ताभ्रष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. दुसरीकडे महाराष्ट्रापुरते बोलायचे झाले तर कॉ. डांगे हे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळतीले एक अर्ध्वयु होते. त्यांच्या आणि महाराष्ट्रातील तत्कालीन इतर अनेक कम्युनिस्टांच्या देशाबद्दलच्या निष्ठेबद्दल शंका येण्यासारखी अवस्था नव्हती. (डांग्यांना तर त्यांच्या चीन विरोधी भुमिकेमुळे कम्युनिस्टांकडूनच त्रास होत होता). त्यामुळे अत्रे हे त्या अर्थाने देखील महाराष्ट्रातील कम्युनिस्टांचे सहानभूतीदार होते असे वाटले तरी आश्चर्य नाही.

अत्र्यांचे प्रबोधनकार ठाकरे यांच्याशी चांगले संबंध होते. मला वाटते त्यांच्या मुलाने अर्थात बाळासाहेबांनी अत्र्यांना कम्युनिस्ट म्हणले आणि अत्रे चिडले आणि ठाकरे विरोधात अत्रेस्टाईल मधे बोलू-लिहू लागले. ६६ सालानंतर शिवसेना देखील अस्तित्वात आली होती. (पुढील:) ऐकीव माहितीप्रमाणे, अत्र्यांचे ठाण्याच्या आर्य क्रिडा मंडळात भाषण होते. तेथे शिवसैनिकांनी मारहाण केली. मला वाटते अत्र्यांना देखील त्यात लागले. त्यांची इंपाला गाडी ही कशीबशी बाजूच्या बेडेकर हॉस्पिटलच्या आवारात वाचली का असेच काहीसे... ती, परत ऐकीव माहिती प्रमाणे, अत्र्यांची शेवटची जाहीर सभा ठरली. कुठेतरी त्याचा त्यांना कायम स्वरूपी धक्का बसला. असो.

प्रदीप's picture

3 Mar 2014 - 8:44 pm | प्रदीप

ह्या संज्ञेस कम्युनिस्ट पक्षांच्या संदर्भात विशीष्ट अर्थ आहे, असे मला वाटते. जे पक्षाचे कार्ड- होल्डर्स नाहीत, तरीही जे पक्षास देणग्या देतात, त्यांना सहानुभूतिदार असे संबोधले जाते. ह्या अर्थाने अत्रे कम्युनिस्ट पक्षांचे सहानुभूतिदार नसावेत.

विकास's picture

3 Mar 2014 - 9:05 pm | विकास

ह्या संज्ञेस कम्युनिस्ट पक्षांच्या संदर्भात विशीष्ट अर्थ आहे,..

हे ध्यानात आले नाही.

ह्या अर्थाने अत्रे कम्युनिस्ट पक्षांचे सहानुभूतिदार नसावेत.

सहमत.

जे पक्षाचे कार्ड- होल्डर्स नाहीत, तरीही जे पक्षास देणग्या देतात, त्यांना सहानुभूतिदार असे संबोधले जाते.

त्यांना "साथी" (फेलो ट्रॅव्हलर) असे संबोधले जाते.

त्याला एक वेगळा दर्पदेखील आहे. एखाद्याला साथी म्हणणे म्हणजे "तू पार्टीच्या आतल्या वर्तुळातला नाहीस. आमचा शत्रूदेखील नाहीस - पण कुंपणावरचा, कामगार-क्रांतीचं लोणी फुकट खाणारा आहेस" असं आडून सुचवणं असतं.

"साथी" हे एखाद्या पक्षालाही संबोधतात. उदा. कम्युनिस्ट पक्ष समाजवाद्यांना साथी म्हणत असे.

माहितगार's picture

3 Mar 2014 - 9:04 pm | माहितगार

अवघा रंग नावाचा पत्रकार श्रीरंग गायकवाड यांचा ब्लॉग आहे. त्यांच्या लेखावरून वाटते त्यांनी पिएचडी करता अत्र्यांचाही अभ्यास केला असावा

विनोदातच महाराष्ट्राचं दुर्दैव सामावलं आहे. दुर्दैव आहे, ख-या अत्र्यांना झाकून ठेवल्याचं. सर्वसामान्य, गोरगरीब, उपेक्षित बहुजन जनतेला जागे करणा-या अत्रेय विचारांकडं दुर्लक्ष केल्याचं. आता पन्नाशीतल्या महाराष्ट्रानं हा अत्रेय विनोदाचा पापुद्रा दूर केला पाहिजे.

संदर्भ-१ बंडखोर अत्रे- श्रीरंग गायकवाड
संदर्भ २ गर्दीची नशा, हशा-टाळ्यांची झिंग!- श्रीरंग गायकवाड

अत्र्यांची आस्था सहानुभूती निर्विवादपणे कष्टकरी समाजा सोबत होती; कष्टकरी समाजाबद्दल बोलताना हा विनोदाचा बादशहा बोलता बोलता श्रोत्याच्या वाचकाच्या डोळ्याच्या कडा ओल्या केल्या शिवाय रहात नसे. व्यक्तीगत स्वरूपाची टिका त्यांची मर्यादा असावी आणि त्यात स.का. पाटील सापडले आणि स.का. पाटीलांना टिका जिव्हारी लागली असावी त्यांनी त्यावरून अत्र्यांविरूद्ध कोर्ट कचेर्‍याही केल्या. त्यांनी आणि कदाचित त्यांनी अत्र्यांना कम्युनीस्ट ठरवण्याचा प्रयास केला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कॅम्प एजुकेशन सोसायटीची उभारणी करताना अत्र्यांच्या अनुभवांनी विचारांनी ते कम्युनीस्ट झाले असते आश्चर्यही वाटले नसते तरीही ते आदरणीयच राहीले असते पण हा वाद निघालाच आहे तर संदर्भा सहीत या बद्दल माहिती पुढे आल्यास इतिहासातील ह्या बाबीबर स्पष्ट प्रकाश पडलेला बरा असे वाटते.

चीनी आक्रमणानंतर ज्या लेखक कवींनी देशभक्तीपर लेखन केले त्याची अत्र्यांनी खिल्ली उडवली होती.

...तर त्यांना विरोध झाला असल्यास नवल नाही पण अत्र्यांसारख्या व्यक्तींनी असे का केले असावे ?

विकास's picture

3 Mar 2014 - 10:40 pm | विकास

मला वाटते नक्की कुणाची खिल्ली उडवली आणि त्यांनी नक्की काय लिहीले होते हे वाचावे लागेल. मग त्यावरून निष्कर्ष काढणे सोपे जाईल. अन्यथा, अत्र्यांनी खिल्ली उडवली हे म्हणणे फारच जेनेरीक झाले असे वाटते.

माहितगार's picture

4 Mar 2014 - 9:11 am | माहितगार

संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळातील वृत्तपत्रीय बातम्या आणि अग्रलेख आंतरजालावर उपलब्ध होण्याची गरज आहे. प्र.के. अत्रेंच्या कर्‍हेचे पाणी आत्मचरित्राचे खंड ४ आणि ५ तत्कालीन कालावधी कव्हर करतात असे दिसते. आंतरजालावर त्याची केवळ प्रस्तावना आणि अनुक्रमणिका उपलब्ध आहे असे दिसते. प्रस्तावनेत मी कोण या प्रश्नाचे उत्तर देत अत्रे स्वतः बद्दल म्हणतात मी कुठे एका ठिकाणी फार काळ थांबू शकत नाही; अर्थात हे त्यांना त्यांच्या कारकिर्दीबद्दल म्हणावयाचे असावे.

आंतरजालावर अधिक बारकाईने खोदकाम केल्यावर काही मुद्दे लक्षात आले. गोपाळ कृष्ण गोखल्यांनी सर्वंट्स ऑफ इंडीया नावाची मवाळ गटातील राष्ट्रप्रेमी संस्था उभारली होती त्यात मुंबई-ठाणे परिसरात कार्यरत गोदावरी आणि श्या/शामराव परूळेकर अस एक स्वातंत्र्य सैनिक जोडप होत कामगार आणि (वारली) आदीवासी चळवळीत काम करताना हे जोडप कम्यूनीस्ट विचारसरणीकडे सावकाशीने जाऊन सरतेशेवटी माओ धार्जीण्या कम्यूनिस्ट मार्क्झीस्ट पक्षाला सामील झाल.

मुंबईत कम्यूनीस्टांना चेक करण्यासाठी काँग्रेस आणि काँग्रेसला चेकदेण्या साठी इतर काँग्रेसेतर ना बढावा देण्याचे आधीच चालू होते [पुर्ण डिटेल्स माहित नाहीत पण कम्युनीस्ट आणि काँग्रेसी सोडून इतर (अत्यंत) परस्पर विरोधी विचारधारांची राजकीय मंडळी एकाच व्यासपीठावर आणण्याचा प्रयोग चक्क पंचतारांकीत ताजमहालात केला गेला असे आठवते] . जेव्हा मंत्री मंडळात काँग्रेस निवडून आली तेव्हा आपसूक मोरारजींना गृहमंत्रीपद मिळाल्याचे दिसते. आणि पोलीसी वचक (गोळीबारांनी ) संयूक्त महाराष्ट्रचळवळ दडपण्याच काम मोरारजींच पहील काम नव्हे पहील काम त्यांनी या परूळेकर जोडप्याने जागृती आणलेल्या वारली आदीवासींच्या वेठबिगारी विरूद्ध आंदोलनाला दडपण्यासाठी बळाचा वापर केला होता. हे वारली आंदोलन १९४७च्या आसपासच होत होत तेव्हा अत्रेंनी नवयूग मासिकात वारली समाज आणि आंदोलना बाबत काँग्रेसी कार्यकर्त्यांच्या साहाय्याने पुरवणी काढली. म्हणजे आस्था बाजू वारलींचीच मांडली पण काँग्रेस मुख्यंमत्री आणि काँग्रेसला विश्वासात घेऊन. संयूक्त महाराष्ट्र चळवळीत कम्यूनीस्ट कामगार होतेच पण सोबतीला आदीवासीही होते कारण त्यांनाही व्यापारी आणि जमीदारी पासून सूटका हवी होती. हि कम्यूनीस्ट चळवळ काँग्रेसने एनकेन प्रकारेन दडपली त्यात बहुतांश काळ जवळपास शामराव परूळेकरांचा जेल मध्ये मृत्यू ( १९६५ हार्ट अ‍ॅटेक) होई पर्यंत हे जोडप भूमीगत अथवा जेल मध्येच असे.

या चीनयुद्धाच्या काळात परुळेकर दाम्पत्याच्या किंवा अशाच देशप्रेमी कम्यूनिस्टाच्या देशप्रेमावर शंका घेतली गेली आणि अत्र्यांनी त्यांची बाजू घेत प्रत्यूत्तरात खिल्ली उडवण्याचा प्रकार केला का हे ही जरा तपासून घ्यावयास हवे. कारण अत्र्यांचा विनोद कितीही घसरला तरी त्यांनी कष्टकरी किंवा दलितांची चुकूनही थट्टा केल्याचे आढ्ळत नाही उलटपक्षी त्यांच्या करता हा माणूस मैदानात उतरून काम करत राहीला. संपादनाचे काम सुद्धा ते गांभीर्याने करतात असे दिसते असा संवेदनशील माणूस देशप्रेमाच्या बाबतीत थट्टाकरत तडजोड करेल या बाबत साशंकता वाटते. अर्थात अस काही झालच असेल तर त्याची व्यवस्थीत शहानिशा व्हावयास हवी

सुनील's picture

1 Mar 2014 - 7:17 am | सुनील

यारून ते मराठी माणसाचे द्वेष्टे होते, हा निष्कर्ष निघत नाही.

त्यांना मुंबई ही स्वतंत्र रहावी असे वाटत होते. त्यामागे राजकारण (आणि अर्थातच अर्थकारण) होते. आणि असे मत असणे हा काही द्वेष्टेपणाचा निकष नव्हे.

(मलादेखिल मुंबई वेगळी असती तर बरे झाले असते, असे बरेचदा वाटते. म्हणजे मी मराठी-द्वेष्टा आहे???)

हुप्प्या's picture

1 Mar 2014 - 10:30 am | हुप्प्या

मराठी द्वेष करणार्‍यांना मुंबई वेगळी व्हावी असे वाटत होते. पण म्हणून मुंबई वेगळी व्हावी असे वाटणारे मराठी द्वेष्टे ठरत नाहीत. तसेच मराठी द्वेष्टे कुणी ह्या आंदोलनात संयुक्त महाराष्ट्रविरोधी भूमिकेत नव्हते असेही म्हणता येत नाही.

विकास's picture

28 Feb 2014 - 11:56 pm | विकास

...हुतात्माचौकाचे नामकरण फ्लोरा फाऊंटेनचे कारंजे करावे...

१९६० पासून हुतात्मा चौक तर फ्लोरा फाउंटन हे स्थळ १८६४ सालापासून अस्तित्वात आले. फ्लोरा फाउंटन हे रोमन देवता फ्लोरा असलेले शिल्प आणि कारंजे आहे, तर हुतात्मा चौक हे त्याच्या सभोवतालच्या जागेस /चौकास दिले गेलेले नाव आहे. कारण तेथे मोरारजींनी नि:शस्त्र जमावावर गोळीबार करण्याची आज्ञा दिली होती आणि ती पाळली गेली होती.

बेस्टबसेच्या स्टॉप्स ना फ्लोरा फाउंटन स्टॉपच्या ऐवजी हुतात्म चौक म्हणावे असा अनेक वर्षांचा हट्ट होता जो पाली़का पाळत नव्हती. १९८५ मधे भुजबळ महापौर झाल्यावर पालीका व्यवहारात मुंबई वापरण्याचे धोरण केले गेले तसेच बेस्टच्या बसेसवर त्या स्टॉपचे नाव "हुतात्मा चौक" असे केले गेले. नामकरण असले तर ते तेव्हढ्याच पुरते मर्यादीत आहे.

पिवळा डांबिस's picture

1 Mar 2014 - 12:10 am | पिवळा डांबिस

त्याच सुमारास तिथून जवळच असलेल्या आमच्या सेंट झेवियर कॉलेजात विद्यार्थी परीक्षेत नापास होण्याचे 'उसका हुतात्मा चौक हो गया' असे नामकरण झाल्याचे आठवते!!!
:)
मला वाटतं की फाउंटनला (हो, मुंबयकरां त्याला नुसतं फाउंटनच म्हणतात, आणि व्हीटी ला बोरीबंदर!!) जेंव्हा हुतात्मा स्मारक उभारण्यात आलं तेंव्हा त्याचं हुतात्मा चौक असं नामकरण झालं. चूभूद्या घ्या...

विकास's picture

1 Mar 2014 - 12:31 am | विकास

'उसका हुतात्मा चौक हो गया'
एकदम पुलंच्या अण्णू गोगट्याची आठवण झाली!

जेंव्हा हुतात्मा स्मारक उभारण्यात आलं तेंव्हा त्याचं हुतात्मा चौक असं नामकरण झालं.
जालावरील माहितीप्रमाणे ते १९६० सालीच झाले. अर्थात ते नामकरण (तुमच्या भाषेतील) फाउंटनचे झाले नाही. फाउंटन चौक अस्तित्वात देखील नव्हता. तर त्याच्या बाजूला केलेल्या स्मारकाचे झाले. पण त्या नावाचा अधिकृत वापर हा बिगर काँग्रेसी बहुमत असलेले पालीका सरकार आल्यावर चालू झाला. सुरवातीस (१९६० सालानंतर) बांधलेले स्मारक फार उत्तम नसावे. पण १९८५ च्या काळात भुजबळांच्या हट्टाने मोठे आणि चांगले स्मारक त्यावर १०५ हुतात्म्यांची कोरलेली नावे वगैरे केले गेले.

पिवळा डांबिस's picture

1 Mar 2014 - 12:44 am | पिवळा डांबिस

असू शकेल...

अर्थात ते नामकरण (तुमच्या भाषेतील) फाउंटनचे झाले नाही.

आमची भाषा? अहो मुंबयबाहेरच्या लोकांनी मुंबयची मराठी भाषा बिघडवली, चहा घेतला, म्हणायला लागले!!! :)

विकास's picture

1 Mar 2014 - 12:55 am | विकास

खरे आहे! आम्ही चहा पिली/पिला असेच म्हणतो! ;)

माहितगार's picture

1 Mar 2014 - 11:31 am | माहितगार

चहा पिली/पिला >>चहा घेतला

एखाद्या भाषेत एखादा शब्द व इतर बदल स्विकारले आहेत असे केव्हा ठरवता येते; मापदंड काय ? मराठी भाषेच्या प्राध्यापकांचे माझ्या इमेलला उत्तर कधी आले नाही. जोपर्यंत समोरची व्यक्ती सर्वनाम व क्रियापद एका भाषेचे आहे तो पर्यंत तो संवाद त्या भाषेचा समजला जावयास हवा असे माझे मत. असे.

मला एक कळत नाही मुंबईतील बहुसंख्य कामगार वर्ग व पेठेतला वर्ग कोकण भाषिक पण हेच लोक स्वतःच्या बोलीसोबत इतरांच्या बोलीभाषेससही कमी ठरवू लागले भाषिक अस्पृष्यता पाळू लागले एकी कडे मराठी मराठी म्हणावे दुसरीकडे भाषिक लवचिकता गुंडाळून ठेवावी असे का झाले असावे ?

सुनील's picture

1 Mar 2014 - 7:11 am | सुनील

होय.

आणि नंतर जेव्हा "रिडल्स प्रकरणी" मोर्चा निघाला. त्यानंतर, त्या स्मारकाचा "विटाळ" झाला म्हणून त्याचे गंगाजलाने "शुद्धीकरण"देखिल ह्याच भुजबळांनी केले होते!

तेव्हा ते बिगर कोंग्रेसी बहुमत असलेल्या पालिका सरकारातच होते!!

विकास's picture

1 Mar 2014 - 7:58 pm | विकास

तेच भुजबळ नंतर म्हणाले होते की गांधीजींचे पुतळे काढून नथुरामचे पुतळे उभारले पाहीजेत... त्यानंतर त्यांचे सोनियाजींच्या काँग्रेस पक्षात स्वागत झाले आणि त्यावेळेस नक्की कुणाचे शुध्दीकरण झाले कोणास ठाऊक! पण काँग्रेसचे नेते त्यांच्याबरोबर मांडीला मांडी लावून बसू लागले इतके नक्की!

असो: तुम्ही प्रतिसाद देताना नक्की तुम्हाला माझ्या प्रतिसादावरून काय वाटले ते माहीत नाही. पण कुठल्याही राजकीय नेत्यास मी आदर्श म्हणत नाही. वर इतिहास सांगत होतो की नक्की कसे झाले ते. भुजबळांच्या ऐवजी राहूल गांधींनी पण स्मारक बांधले असते तर तसे सांगितले असते.

त्याच काय हाय. कॉन्ग्रेसच्या दुख्न्याकड कुनी नुस्त येकमैलावरुन्बी बगतया आसा सौंशय् बी आला तरी सुनीलभौना कळ लागतिया बर्का ;) मंग खरंखोटं ग्येलं तेल लावीत, सुनील्भौ लगोलग तल्वार घ्येवून भायेर पडत्यात बर्का.

सुनील's picture

2 Mar 2014 - 8:42 am | सुनील

एग्झ्याक्ट्ली!!

म्हणूनच तर मी माझ्या प्रतिसादाच्या शीर्षकाला "वाहत्या निष्ठा" असे नाव दिले.

हे अर्थातच बर्‍याच राजकारणींना लागू पडते.

सुबोध खरे's picture

4 Mar 2014 - 11:53 pm | सुबोध खरे

हुतात्मा चौक हे नाव माझ्या आठवणीत १९७५ किंवा अगोदरपासून आहे. ४ मर्यादित आणि ८४ मर्यादित या दोन्ही बसेस हुतात्मा चौक अंधेरी अशा तेंव्हा पासून असल्याचे मला स्पष्ट पाने आठवते आहे तसेच हुतात्मा चौक देवनार अगर हि ट्रेलर बस मी त्याच्याही अगोदर शास्त्री हाल (नाना चौकतून जाताना लहानपणापासून पहात असल्याचे स्पष्टपणे आठवत आहे. आम्ही त्यामुळे हुतात्मा चौक असेच म्हणत आलो आहोत फ्लोरा फौंटन हा शब्द अमराठी लोक जास्त वापरत असत. भूज्बलाना त्याचे क्रेडीट देण्याची गरज नाही

विकास's picture

5 Mar 2014 - 12:39 am | विकास

भूज्बलाना त्याचे क्रेडीट देण्याची गरज नाही

तो उद्देश नव्हता/नाही. :)

हुतात्मा चौक हे नाव माझ्या आठवणीत १९७५ किंवा अगोदरपासून आहे. ४ मर्यादित आणि ८४ मर्यादित या दोन्ही बसेस हुतात्मा चौक अंधेरी अशा तेंव्हा पासून असल्याचे मला स्पष्ट पाने आठवते आहे.

वरच्या प्रतिसादात म्हणल्याप्रमाणे हुतात्मा चौक हे नाव १९६० सालापासूनच अस्तित्वात आहे. पण ते अधिकृत नव्हते. कदाचीत तुम्ही म्हणता तसे १९७५ साली (त्या सुमारास) मनोहर जोशी का सुधीर जोशी महापौर झाले होते तेंव्हा बेस्टबसेसचे थांबे हुतात्माचौक म्हणू लागले असतील. भुजबळांनी फक्त स्मारक (अथवा जिर्णोद्धार) हट्टाने केले असावे. - हे सगळे होण्यासाठी किंचीत त्यावेळचे भावनात्मक राजकारण देखील लक्षात घेतले पाहीजे असे वाटते. मुंबई प्रदेश काँग्रेसने पालीका निवडणुकीसाठी अतिशय कमी मराठी उमेदवार उभे केले होते. त्यावर टिका झाली तेंव्हा मुरली देवरा हे (शब्द आठवत नाही) पण मग्रुरीने अथवा तुच्छतेने बोलले. त्याचा फायदा घेत शिवसेना प्रथमच स्वबळावर पूर्ण बहुमताने नाही पण सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून पालीकेत निवडून आली होती. तसे येताना मराठी आणि मराठी स्मारकांवरून बरेच बोलले गेले होते. म्हणून हुतात्मा स्मारकावर आणि बाँबेचे मुंबई किमान पालीका प्रशासनात करण्यावरून निर्णय घेण्यात आले होते. कदाचीत अवांतर असेलः पण मला वाटते या निवडणुकांच्या आधी वसंतदादा पाटलांनी पण राजीव गांधींच्या विरोधात ते मराठी माणसाविरुद्ध आहेत असे म्हणत राजीनामा दिला होता.

ही सगळी चर्चा वाचुन, खालचा पोवाडा आठवला ! अगदी ऐकण्या सारखा आहे.

एक चूक झाली आहे...वरचा पोवडा नसुन ती शाहीर अण्णाभाउ साठे यांनी लिहलेली लावणी आहे.

राही's picture

1 Mar 2014 - 9:39 pm | राही

आ. अत्रे - स.का.पाटील - मोरारजीभाई हा त्रिकोण समभुज नव्हता. यातले मित्रत्व आणि शत्रुत्व याचे धागेदोरे दूर कुठेतरी गुंतलेले होते. मोरारजीभाई कर्मठ उजवे होते म्हणण्यापेक्षा ते टास्क-मास्टर होते आणि आपापल्या कामात हयगय केलेली किंवा कामचुकार केलेला त्यांना आवडत नसे. आपल्याच सरकारविरुद्ध संप, मोर्चे, हरताळ हे त्यांच्या आकलनापलीकडचे होते. त्यांचे स्वतःचे आचरण आणि दिनचर्या अगदी शिस्तीची होती. आ. अत्रे यांचे व्यक्तिमत्व बहुढंगी होते. ते स्वतः उत्तम साहित्यिक, अमोघ वक्ते, साधनशुचितेची फारशी तमा न बाळगणारे, दिलदार आणि ढंगदार असले तरी त्यांच्यात तत्त्वनिष्ठा कधीच नव्हती. स. का. पाटील बुद्धिमान होते, धडपडे होते. इंग्लंडहून त्या काळी पत्रकारितेची पदविका घेऊन आले होते. संस्कृतवरही बर्‍यापैकी प्रभुत्व होते. जिद्द आणि चिकाटी या बळावर त्यांनी मुंबईच्या उच्चभ्रू माध्यमजगतात स्थान मिळवले आणि उच्चभ्रू वर्तुळातही. मुळातच चळवळे असल्याने आणि मुंबई हे स्वातंत्र्यचळवळीचे तत्कालीन केंद्र असल्याने ते आपोआप (आणि बातमीदारीच्या निमित्तानेही) या चळवळीकडे ओढले गेले. मुं.प्र.काँ.क.च्या आतल्या गोटात त्यांचा समावेश होऊ लागला. बातमीदारी केव्हाच संपली. काँग्रेस ही अशी एक चळवळ होती की तिला समाजाच्या सर्व थरांतून पाठिंबा होता. त्यात गिरणीकामगार होते तसेच गिरणीमालक आणि इतर भांडवलदारही होते. त्यापैकी मुंबईच्या उद्योगजगतात पाटीलांचा दबदबा वाढला. आणखी एक नाट्य घडत होते. बेचाळीसच्या चळवळीमध्ये भूमिगत होणे, वेषांतर करून रहाणे, प्रत्यक्ष कृती वगैरेमुळे एस.एम.जोशी, जयप्रकाश नारायण आणि त्यांच्या समाजवादी अनुयायांभोवती वलय निर्माण झाले होते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर काही काळातच समाजवादी लोक वैचारिक मतभेदांमुळे काँग्रेसमधून बाहेर पडले तेव्हा तर ते वलय काही गटांत अधिकच वाढले. तो पर्यंत आ.अत्रे काँग्रेसच्या बाजूने होते.( हे विधान अंदाजे.)
संस्थानांच्या विलीनीकरणानंतर राज्यपुनर्निर्मिती करताना द्वैभाषिक (मराठी आणि गुजरातीभाषकांचे) राज्य स्थापन झाले खरे पण मुंबईवर गुजराती उद्योगपतींचेच वर्चस्व रहाणार हे जसजसे दिसून येऊ लागले तसतसा मुंबईतल्या मराठीभाषकांमध्ये, जे मुख्यतः कामगार, कारकून असे मध्यमवर्गी होते, असंतोष वाढत गेला. त्याची दखल प्रजासमाजवाद्यांनी घेतली आणि समाजवादी विचारसरणीनुसार भांडवलदारांना विरोध करीत सामान्य माणसाची बाजू घेतली. त्यांच्याभोवतीचे वलय अधिकच गडद होऊन एक चळवळ निर्माण झाली. द्वैभाषिकाचे मुख्यमंत्री मोरारजी होते तेव्हा त्यांच्याकडे या क्षोभाला दडपण्याचे अप्रिय काम आले. तो पर्यंत लोकांचा कल लक्षात घेऊन कम्यूनिस्टही चळवळीत शिरले. किंबहुना त्यांनी चळवळीचा ताबा घ्यायला सुरुवात केली.सं.म.समितीच्या सभा गाजू लागल्या. संप, मोर्चे, हरताळांचे सत्र सुरू झाले. मोरारजी खलनायक बनले. मराठी भाषेच्या प्रेमामुळे असेल कदाचित, आ.अत्रे चळवळीत सामील झाले. अत्र्यांसारखा अमोघ वक्ता मिळाल्यावर सभा गर्दीखेचू होऊ लागल्या. टिंगलटवाळीला ऊत आला. अनेकांचे वस्त्रहरण झाले. मराठा वृत्तपत्र तुफान चालू लागले. अत्र्यांचा आणि कम्यूनिस्टांचा घनिष्ठ संबंध, नेक्सस म्हणता येईल असा, निर्माण झाला. सोविएत संघराज्याला मुंबईत भूमी(ग्राउंड) हवी होतीच. भांडवलदारांविरुद्धच्या लढ्यात ती आयती मिळाली. मराठाचे विनायक भावे कम्यूनिस्ट पक्षाचे पत्रधारक (कार्ड-होल्डर) होते. इतरही अनेक लोक होते.
स्वातंत्र्यानंतरची चारपाच वर्षे अमेरिकाही भारतात पाय रोवायच्या प्रयत्नात होती.
(क्रमशः)

राही माहिती रोचक आहे; क्रमशःची वाट पाहतोच. पण विषयच असा आहे रहावत नाही म्हणून काही शंका

आ. अत्रे - स.का.पाटील - मोरारजीभाई हा त्रिकोण समभुज नव्हता. यातले मित्रत्व आणि शत्रुत्व याचे धागेदोरे दूर कुठेतरी गुंतलेले होते. >> धागेदोरे दूर कुठेतरी गुंतलेले होते. म्हणजे नेमक काय बद्दल अधिक जाणून घेण आवडेल.

मोरारजीभाई कर्मठ उजवे होते म्हणण्यापेक्षा ते टास्क-मास्टर होते आणि आपापल्या कामात हयगय केलेली किंवा कामचुकार केलेला त्यांना आवडत नसे. आपल्याच सरकारविरुद्ध संप, मोर्चे, हरताळ हे त्यांच्या आकलनापलीकडचे होते. त्यांचे स्वतःचे आचरण आणि दिनचर्या अगदी शिस्तीची होती.

मोरारजीभाई हे गांधीअन आणि गुजराथी पद्धतीन hype केल गेलेल व्यक्तीमत्व होत का ? व्यक्तीकडे सकारात्मक पद्धतीन पहा बोला या गांधीअन आणि गुजराथी मार्गामुळे मोरारजीभाईंच्या व्यक्तीमत्वातले दोष झालले गेले का ? सामाजिक संघर्ष हाताळता न आल्यान आपला जॉब गमावलेले (का सोडलेले?) मोरारजीभाई गृहमंत्री मग मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचलेच कसे ? ज्या व्यक्तीत जे कौशल्यच नव्हत ती व्यक्ती परिस्थिती हाताबाहेर जात आहे दिसता सुद्धा त्यांची खुर्ची जपली जावी हा काँग्रेस पक्षातील हटवादी प्रकारास कोण लोक जबाबदार होते ?
आपल्याच सरकारविरुद्ध संप, मोर्चे, हरताळ हे त्यांच्या आकलनापलीकडचे होते. याच मोरारजीभाईंची इंदिरा गांधी विरूद्ध आपल्याच सरकारविरुद्ध संप, मोर्चे, हरताळ हे सारच केल इंदिरा गांधी विरूद्ध काम करे पर्यंत मोरारजीभाईचे स्वतःचेच विचार बदलले होते का आपल्याच सरकारविरुद्ध संप, मोर्चे, हरताळ हे त्यांच्या आकलनापलीकडचे होते. हि मिथ त्यांच्या भोवती तयार केली गेली होती ?

>>मोरारजीभाई कर्मठ उजवे होते >>डावीकडे झुकलेल्या इंदिरा गांधींचा आर्थिक बाबी बद्दल सर्वाधिक विरोध मोरारजीभाईंचा होता हे कसे विसरले जाते विरोधी पक्षात गेले मते बदलली हि मिथ त्यांच्या भोवती तयार केली गेली होती का मिथक स्वतः तयार केले?

आ. अत्रे यांचे व्यक्तिमत्व बहुढंगी होते. ते स्वतः उत्तम साहित्यिक, अमोघ वक्ते, साधनशुचितेची फारशी तमा न बाळगणारे, दिलदार आणि ढंगदार असले तरी त्यांच्यात तत्त्वनिष्ठा कधीच नव्हती....अत्र्यांसारखा अमोघ वक्ता मिळाल्यावर सभा गर्दीखेचू होऊ लागल्या. टिंगलटवाळीला ऊत आला.

संयुक्त महाराष्ट्रचळवळीत अंत्रेंचे केवळ टिंगलटवाळी अधिक हायलाईट का केली गेली अंत्रेची संवेदनशिलता पुरेशी अधोरेखीत झाली का ?

आतिवास's picture

2 Mar 2014 - 8:39 am | आतिवास

राही, स्वतंत्र लेख लिहावा अशी विनंती.

एक चौथा कोन बॅरीस्टर रजनी पटेल यांचा असावा का ?

माहितगार's picture

4 Mar 2014 - 11:05 am | माहितगार

या इंदिरागांधीकाळात खजीनदार होत्या; मंत्रालया (मुंबई) जवळच्या एखाद्या रस्त्याला यांचे नाव; सिने कलाकार अमिषा पटेल यांच्या आज्जी (संदर्भ मटा ऑनलाईन अहमदाबाद Mar 22, 2009, 09.28AM IST) या शिवाय इतर माहिती यांच्या बद्दल आंतरजालावर मिळाली नाही. कुणी अधिक माहिती सांगू शकेल का ? कोण होत्या या बॅरीस्टर रजनी पटेल आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीशी किंवा महाराष्ट्राच्या राजकारणाशी केव्हा पासून आणि कशा संबंधीत होत्या ?

माहितगार's picture

4 Mar 2014 - 11:10 am | माहितगार

रजनी हे पुरुषांमध्येही नाव असल्याचे कळते आणि आंतरजालावर श्री का श्रीमती असा उल्लेख नाही म्हणून आज्जी असणार असा कयास चूक असल्यास क्षमस्व; चुकभूल देणे घेणे

तेच लिहायला आले होते. आज्जी नाही, आजोबा.

बाकी सारखं 'विकी' वाचत राहिलं की हे असं होतं बघा! ;-)

माहितगार's picture

4 Mar 2014 - 11:21 am | माहितगार

बाकी सारखं 'विकी' वाचत राहिलं की हे असं होतं बघा!>>

विकिवर तुमच्या सारखी मंडळी येऊन दुरूस्त्या करून गेली की असं होणार नाही म्हणुन तर विकिचे निमंत्रण घेऊन येत असतो :)

माहितगार's picture

4 Mar 2014 - 11:17 am | माहितगार

हे श्रीयूत बॅरीस्टर रजनी पटेल होते तर (केवढी कमी माहिती असते आपल्याला; म्हणजेच मला) यांच्या पत्नीचे नाव सुशीला पटेल होते सुशीला पटेल इ.स. २०१० मध्ये वयाच्या ९०व्या वर्षी निर्वतल्या. (संदर्भ मटा ऑनलाईन Aug 21, 2010, 08.07PM IST)

आतिवास's picture

4 Mar 2014 - 11:22 am | आतिवास
राही's picture

4 Mar 2014 - 1:28 pm | राही

बकुल पटेल या रजनीभाईंच्या दुसर्‍या पत्नी. प्रथम पत्नी म्हणजे पुण्याच्या सुशीला गोखले. या अत्यंत हुशार आणि सुंदरही होत्या. त्यांचे एक पोर्ट्रेट फर्गसन मध्ये कित्येक वर्षे होते.(एन्टिटी किंवा आय्डेन्टिटी असे काही स्वतंत्र प्रेरणादर्शक नावाचे शीर्षक होते त्याचे. इन्स्पिरेशनही असू शकेल.) रजनीभाई आणि सुशीलाताई दोघेही डाव्या चळवळीत होते, खंदे कार्यकर्ते होते. रजनीभाई बॅरिस्टर (किंवा तत्सम पदवीधारक) होते. गरीबांची, गिरणी कामगारांची कायदेविषयक किंवा हक्कविषयक कामे ते करून देत. मला वाटते सुशीलाताईही कायद्याच्या पदवीधर होत्या. नक्की खात्री नाही. नंतर रजनीभाई डाव्या काँग्रेसकडे (फुटीनंतरच्या) ओढले गेले. तळमळीच्या आणि प्रामाणिक कार्यामुळे चटकन बढती मिळून मु.प्र.काँ.क. च्या गाभागटात त्यांना स्थान मिळाले. Power corrupts, absolute powar corrupts absolutely, या घिशापिट्या उक्तीनुसार पुढे व्हायचे तेच झाले. त्यांच्याभोवती उद्योगपतींची वर्दळ वाढली. कायद्याच्या ज्ञानामुळे ते उद्योगपतींचेही सल्लागार बनले आणि मुं.प्र.काँ.क. मधले सर्वेसर्वा. पुढे दिल्लीच्या कोअर गटातही त्यांचा सहज शिरकाव झाला. आणिबाणीत त्यांचा दरारा प्रचंड वाढला होता. हे सर्व सुशीलाताईंना पसंत नव्हते. पण एव्हाना मोठ्या झालेल्या मुलांनादेखील त्यांचा गरीबीचा म्हणजे साध्या रहाणीचा आग्रह पसंत पडला नाही. घरात कुरबुरी वाढल्या. अशात रजनीभाईंच्या आयुष्यात चंचलताई आल्या. मग तर कलह टोकाला जाऊन सुशीलाताई वेगळ्या झाल्या आणि आणीबाणीविरोधी जनतापार्टीमध्ये सामील झाल्या. मृणाल गोरे, अहल्या रांगणेकर यांच्या बरोबर त्यांनी काम केले. त्यांच्याकडे आतल्या गोटातली बरीच माहिती होती. त्याचा सुरुवातीसुरुवातीला जनतापक्षाला पुष्कळ उपयोग झाला. उदा. साठेबाजांच्या गोदामांवर बायकांनी धाडी टाकणे वगैरे. आणीबाणीनंतरच्या पर्वात त्या प्रकाशझोतात होत्या. पुढे सगळेच बारगळले. तेव्हा त्या पुण्यास येऊन स्थायिक झाल्या. मृगजळातील नौका ही त्यांची आत्मचरित्रात्मक कादंबरी वाचनीय आहे. अमिशा पटेल ही त्यांची आणि रजनीभाईंची नात. त्यांच्या स्वभावाचे काही कदाचित अनावश्यक तीक्ष्ण कंगोरेही पुस्तक वाचताना लक्षात येतात.

राही's picture

4 Mar 2014 - 1:58 pm | राही

'रजनीभाईंच्या आयुष्यात चंचलताई आल्या' या ऐवजी 'रजनीभाईंच्या आयुष्यात बकुलताई आल्या' असे वाचावे.

आतिवास's picture

4 Mar 2014 - 2:07 pm | आतिवास

धन्यवाद. शोधात होतेच या माहितीच्या, तुमच्यामुळे ती सहज मिळाली.

माहितगार's picture

4 Mar 2014 - 3:10 pm | माहितगार

आत्ताच कुणाशी रजनीभाई आणि बकुल पटेलांबाबत बोलणे झाले. रजनीभाई वय ६० वर्षे-दवाखान्यात अ‍ॅडमीट असताना बकुल पटेल परिचारीका होत्या या परिचयाच विवाहात रुपांतर झाल.(ऐकीव) एनी वे रजनीभाई राजकारणात नेमके केव्हा आले (सकांचे अगदीच समकालीन का ?) या धाग्याकरता म्हणजे यांची संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सकारात्मक अथवा नकारात्मक अथ्वा न्युट्रल अशी काही भूमीका होती का ?

राही's picture

4 Mar 2014 - 4:26 pm | राही

स.का. हे स्वातंत्र्यपूर्वकाळापासून समाजकारण आणि राजकारण यात सक्रिय होते. १९३७ च्या प्रादेशिक इलाख्यातील निवडणुकांत मुंबई इलाख्यात ते सक्रिय होते. ते जरी १९८१ (२४-०६ ?)मध्ये मृत्यु पावले तरी त्यांचा कार्यकाल आणि बहराचा काळ हा १९६९ पर्यंतच होता. त्यांनी देशाच्या कठिण काळात केंद्रीय अन्नमंत्री आणि रेल वे मंत्री म्हणून महत्त्वाची भूमिका पार पाडली. उलट बॅ. रजनी पटेल यांचे कर्तृत्व आणीबाणीच्या आगेमागे बहरले आणि नंतर आणीबाणीविरुद्धच्या प्रक्षोभात लगेच कोमेजूनही गेले. त्यांना आयुष्यही फार लाभले नाही. १९५४-१९५९ या काळातल्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांचे काहीच योगदान नव्हते.

सुनील's picture

5 Mar 2014 - 8:44 am | सुनील

त्यांनी देशाच्या कठिण काळात केंद्रीय अन्नमंत्री आणि रेल वे मंत्री म्हणून महत्त्वाची भूमिका पार पाडली

रेल्वेचे ठाऊक नाही परंतु अन्नमंत्री असतना अमेरिकेतून आयात धान्य (PL 480) बद्दल म्हणताय ना?

अत्र्यांनी (त्यांच्या शैलीनुसार) अनेक पुढार्‍यांना काळ्या अथवा गोर्‍या रंगात रंगवले. आणि तत्कालीन मध्यमवर्गीय मराठी माणसांनी त्या व्यक्तींची तीच प्रतिमा कायम जपली. सका काय किंवा मोरारजी काय यांची मराठी-द्वेष्टे ही प्रतिमा बनण्याचे कारण हेच.

आतापर्यंतचे इथले सर्व अभिप्राय विकीवर अवलंबून आहेत असे वाटले. मूळ ग्रंथवाचन फारसे दिसले नाही. त्याची कारणे कोणतीही असोत पण त्यामुळे लिखाणात वरवरचेपणा (उथळ नव्हे, सुपर्फिशिअल) येतो. मुद्दा शाबीत करता येतो कारण आपल्याला हवे तसे दुवे सापडू शकतात. पण साकल्याने आणि समग्र माहिती मिळत नाही. लिखाण आपल्या नकळत एकांगी बनते.
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचे व्यवस्थित आकलन होण्यासाठी लालजी पेंडसे, य.दि.फडके, गोविंद तळवलकर, आचार्य अत्रे, एस एम जोशी (आत्मचरित्र) ना.ग.गोरे, श्री. डांगे यांचे वाचन आवश्यक आहे. इतरही अनेक आहेत. हे ग्रंथ प्रचंड मोठे आहेत हे खरे पण मराठी विकीपीडियासारख्या माहितीचा स्रोत असणार्‍या ठिकाणी सकल, त्यातल्यात्यात संक्षिप्त आणि अचूक माहिती हवी. नाही तर उगमापासूनच गंगा मैली होऊ लागेल.
म्हणूनच प्रतिसादाचा पुढील भाग इतक्यात लिहीत नाही आहे. लिहिण्यासाठी मला पुनर्वाचन आवश्यक वाटले.

माहितगार's picture

4 Mar 2014 - 2:58 pm | माहितगार

या सर्वच चर्चात मूळवाचन सहसा कमी असते. विकि काही प्रमाणात स्मरणातील आणि थोडेफार गूगलने जे काही उपलब्ध केले त्यातून इन्फर्मेशन गॅप तसेच माहिती तफावत त्रुटी येतात. चर्चांचा व्यवस्थीत उपयोग वाचन करून लिहिलेले इतरांनी पडताळण्यात होतो. जसे रजनीभाई पटेल हे नाव मी कधी ऐकलेच नव्हते. ते या चर्चेत पुढे आले या चर्चेच्या निमीत्ताने गोदावरी परूळेकरांच्या वारली आदीवासी कार्याबद्दल गूगल वरून माहिती मिळाली असे अनुषंगिक फायदे होतात.

आपल्या सवडीने लेखन करा घाई नाही. मराठी विकिपीडियाकरता प्रताधिकारमुक्त धागा असे स्वरूप असले तरी खात्री पडताळणी केल्या शिवाय तिकडे लेखन घेतले जाण्याची खूपशी शक्यता नाही.

अर्थात स.कां पाटीलांची मृत्यूची तारीख; फ्लोराफाऊंटेनच्या इतिहास लेखनात येणार्‍या तफावती इत्यादी छोटी छोटी माहिती आलीतरी कणाकणाने कामही पुढे गेले तर चालते.

अवांतरः
ऑनलाईन पुस्तकविक्रीकरणार्‍र्या प्रकाशकांनी मराठी आंतरजालावरील मोजक्या लेखकांना अधिक मजकूर उपलब्ध करून देण्याचे काही मार्ग उपलब्ध केल्यास या गोष्टीस गती येऊ शकेल. मागे लोकप्रभाच्या संपादकांनी मराठी विकिला समोरूअ प्रस्ताव दिला पण आमच्या कडेच माणूसबळ कमी पडते जास्तीचे काम कसे घेणार असेही होते.

विकास's picture

4 Mar 2014 - 5:56 pm | विकास

लालजी पेंडसे, य.दि.फडके, गोविंद तळवलकर

माधव गडकरींनी संयुक्त महाराष्ट्रावरून सामान्य वाचकांसाठी लिहीलेले माहीत आहे, वाचलेले देखील आहे. लालजी पेंडसे, य.दि.फडके, यांच्या संदर्भात माहीत नाही, पण तळवळकरांनी कधी संयुक्त महाराष्ट्रावरून काही लिहील्याचे आठवत तरी नाही. किंबहूना (बरोबर-चूक संदर्भात म्हणत नाही) ते सीमा लढ्याचे कायम स्वरूपी टिकाकार देखील राहीलेले आहेत.

पैसा's picture

4 Mar 2014 - 5:03 pm | पैसा

खूपच माहितीपूर्ण आणि उत्तम चर्चा.

महाराष्ट्र टाईम्सचा एक लेखक म्हणतो हे ब्रिटीश वसाहतवादाच प्रतीक आहे, तो लेख वाचताना तेही खरच वाटल होत. हा प्रहार मधील लेखArthur Wellesley, 1st Duke of Wellington (इंग्लिश विकिपीडिया दुवा)

या विषया बद्दल तुम्हाला काय वाटत ?

पिवळा डांबिस's picture

4 Mar 2014 - 11:10 pm | पिवळा डांबिस

वेल, तो बघणार्‍याचा दृष्टीकोन असू शकतो.
भारतावर ब्रिटिशांनी १५० वर्षे राज्य केले ही वस्तुस्थीती आहे. त्यामुळे या काळात त्यांनी बांधलेल्या सर्वच इमारती या केवळ त्यांनी बांधल्या म्हणून जर ब्रिटिश वसाहतवादाचं प्रतीक ठरवायच्या असतील तर गोष्टच वेगळी. अन्यथा फाऊंटनने फार काही विशेष घोडं मारलंय असं वाटत नाही.
तसं जर वसाहतवादाचं प्रतीकच शोधायचं झालं तर माझ्या मते गेटवेची इमारत ही वसाहतवादाचं प्रतीक ठरू शकते. कारण तिची उभारणीच मुळात ब्रिटिश सम्राटाच्या मावळत्या प्रतिनिधीला निरोप देण्यासाठी आणि उगवत्या प्रतिनिधीचं स्वागत करण्याचा हेतू मनाशी ठेवून करण्यात आलेली होती....

विकास's picture

4 Mar 2014 - 11:22 pm | विकास

सहमत.

माझ्या दृष्टीने ब्रिटीश वसाहतवादाचे प्रतिक म्हणजे एका अर्थाने भारतीय प्रशासकीय सेवा आणि राज्यपाल पद्धती आहे. पण तो वेगळ्या चर्चेचा विषय होईल. तेंव्हा तुर्तास असो. :)

राही's picture

4 Mar 2014 - 11:36 pm | राही

अगदी अगदी. तसे तर छत्रपती शिवाजी टर्मिनस, महापालिका इमारत, संपूर्ण रेल वे व्यवस्था, पोस्टल सिस्टिम, अशा अनेक बाबी वसाहतवादाचे प्रतीक मानाव्या लागतील.
आणि मुख्य म्हणजे ज्या कारंज्याविषयी चर्चा सुरू झाली होती ते फ्लोरा फाउन्टन. वेलिन्ग्टन फाउन्टन हे अगदी वेगळे कारंजे आहे. त्याचा फ्लोरा फाउन्टनशी काही संबंध नाही.

पिवळा डांबिस's picture

4 Mar 2014 - 11:44 pm | पिवळा डांबिस

अरे काय आहे काय?
राहीचे १००+ आणि विकासचा १+ (ते विकास अंमळ कंजूसच आहे म्येलं!!!)?
आजचा दिवस लकी दिसतोय, लॉटरीचं तिकीट काढून बघतो आज!!!!!
:)

राही's picture

5 Mar 2014 - 9:20 am | राही

अहो पिडां, ते १०० म्हणजे माझे शंभर पैसे आहेत आणि विकासभाऊंचा १ म्हणजे खणखणीत रुपया -किंवा डॉलर म्हणा हवं तर- आहे!

पिवळा डांबिस's picture

6 Mar 2014 - 12:14 am | पिवळा डांबिस

माझ्या मते गेटवेची इमारत ही वसाहतवादाचं प्रतीक ठरू शकते. कारण तिची उभारणीच मुळात ब्रिटिश सम्राटाच्या मावळत्या प्रतिनिधीला निरोप देण्यासाठी आणि उगवत्या प्रतिनिधीचं स्वागत करण्याचा हेतू मनाशी ठेवून करण्यात आलेली होती....

थत्तेकाकांनी नजरेस आणून दिल्याप्रमाणे जरी गेटवे नंतर व्हॉईसरॉयांच्या जाण्या-येण्यासाठी वापरात येत असलं तरी गेटवेची निर्मिती ही पंचम जॉर्ज राजाच्या स्वागतासाठी झाली होती. थत्तेकाका, धन्यवाद आणि तपशीलातल्या चुकीबद्दल माझी दिलगिरी.
पण माझ्या मूळ गेटवे वसाहतवादाचं प्रतीक असण्याच्या मुद्द्याला त्यामुळे काही बाधा येत नाहीये असं मला वाटतं...

नितिन थत्ते's picture

6 Mar 2014 - 12:04 pm | नितिन थत्ते

>>पण माझ्या मूळ गेटवे वसाहतवादाचं प्रतीक असण्याच्या मुद्द्याला त्यामुळे काही बाधा येत नाहीये असं मला वाटतं...

अर्थातच...... वसाहतवादाचं प्रतीक तर आहेच.

विकास's picture

6 Mar 2014 - 3:45 pm | विकास

राष्ट्रपतीभवन देखील आहे नाही का? ;)

सुनील's picture

6 Mar 2014 - 4:02 pm | सुनील

पण तुम्ही फक्त मूर्त वास्तूंचाच का विचार करीत आहात?

इंग्रजी भाषा हे वसाहतवादाचे प्रतीक नाही काय? ;)

लैच जब्री चर्चा. थोडेथोडे समजून घ्यायचा प्रेत्न करतो आहे.

प्यारे१'s picture

6 Mar 2014 - 4:02 pm | प्यारे१

वाचतोय.

बाकी स.का.पाटील अतिशय गरीबीतून वर आले होते असं ऐकीवात आहे.
हॉटेलात वेटरचं काम वगैरे केलं होतं त्यांनी असं कुठेसं वाचलेलं आहे.

माहितगार's picture

6 Mar 2014 - 4:35 pm | माहितगार

चर्चा वसाहत वादाच्या प्रतीकांकडे वळली आहे; विचारपूर्ण प्रतिसाद येत आहेत आणि सध्या मीही वाचनमात्र मोड मध्ये गेलो आहे. स.का.पाटीलांबद्दल संयुक्त महाराष्ट्र चळवळी संबंधाने सोडलीतर व्यक्तीगत आणि इतर माहितीचा आंतरजालीय स्रोतात बर्‍यापैकी अभाव आहे. (एक संदर्भ चक्क न्युयॉर्क टाइम्सच्या अर्काईव्ह मध्ये शोधावा लागला) मराठी विकिपीडियावर सध्या उपलब्ध माहितीत कुणी संदर्भासहीत भर टाकू शकले तर हवे आहेच.

माहितीपूर्ण प्रतिसाद आणि चर्चा सहभागा बद्दल सर्वांचाच आभारी आहे