Skip to main content

पुणेरी पाट्या

लेखक ठणठणपाळ यांनी मंगळवार, 25/03/2008 22:32 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो! वेळात वेळ काढून खालील वेब्साईट पहा. http://www.busybeescorp.com/puneripatya/thumbnails.asp पुणेरी पाट्यांचे अनेक नमुने बघायला मिळतील.
लेखनविषय:

वाचने 12584
प्रतिक्रिया 17

प्रतिक्रिया

इथे कोणतेही साहित्य प्रकाशित करताना ते आधी मिपा वर प्रकाशित केले आहे की नाही याची खात्री करावी. पुणेरी पाट्या या विषयावर इथे चर्चा-चर्वण आणि बरेच काही झाले आहे या आधी. आपण आधीचे लेखन पाहून मगच इथे प्रकाशित करावे अथवा दुवा द्यावा ही विनंती. सरपंच, जरा लक्ष घालावे.. ही विनंती.. - (सर्वव्यापी)प्राजु

In reply to by प्राजु

अहो पुण्याच्या पाट्या हा जागतिक जिव्हाळ्याचा विषय आहे... त्यामुळे चालायचच तो विषय परत परत येणे.. पुण्याचे पेशवे

मला ई-पत्रा द्वारे आलेली एक भन्नाट पाटी:-- Zakas Pati (पाटी-पुस्तक वाचणारा) मदनबाण

In reply to by मदनबाण

आणि हा 'उघड्यावर शौचालयास बसणे' काय प्रकार आहे? फक्त 'शौचास बसणे' पुरेसे आहे, 'लयास' कशाला जायला हवे?:)!!! आणि सकाळी सकाळी लोक काय शोधत हिंडणार कोण कुठे बसला आहे का ते बघत?!! चतुरंग

In reply to by विसोबा खेचर

(हागरा!) तात्या. तात्या प्लीज असले विनोद जास्त येउ देउ नका नाहीतर तो बाळासाहेब चौगुले सारखा प्रकार पुन्हा व्हायचा.

In reply to by सुशील

फोकलिच्या, तूच तर तो बाळासाहेब चौगुले नव्हतास ना ;) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

तात्या काय हे? मी तुम्हाला मानतो राव प्लिज माझी असली चेष्टा करु नका

जर बसणार्‍यां पेक्षा दाखवणार्‍यास = २०१रु दिले जातील असे जाहीर झाले तर मात्र बसणार्‍यांची संख्या मात्र कमी होईल याची मला खत्री वाटते !!!!! (संत गाडगेबाबा प्रेमी) मदनबाण

In reply to by मदनबाण

जर बसणार्‍यां पेक्षा दाखवणार्‍यास = २०१रु दिले जातील असे जाहीर झाले 'बसणार्‍यांना' २०१ रु. दिले जाणार नाहिएत. त्यांना दंड होणार आहे. नाहीतर सगळेच जणं नोकरी-धंदा सोडून तिथेच 'बसायला' धावतील.

In reply to by प्रभाकर पेठकर

पेठकर साहेब गल्ल्त नको, बसणार्‍यास= २०१ दंड दाखवुन देणार्‍यास = ५१ बक्षिस नविन निविदा :-- दाखवुन देणार्‍यास =२०१ बक्षिस

In reply to by मदनबाण

गल्लत माझी नाही आपली झाल्यासारखी वाटते आहे. जर बसणार्‍यां पेक्षा दाखवणार्‍यास ह्याचा अर्थ बसणार्‍यास २०१ रु. देण्यापेक्षा दाखविणार्‍यास २०१ रु. द्यावेत. इथे असे म्हणायला हवे होते की बसणार्‍यास २०१ रु. दंड करण्यापेक्षा दाखविणार्‍यास २०१ रु. बक्षिस द्यावयास हवे.

In reply to by प्रभाकर पेठकर

बसणार्‍यास २०१ रु. दंड करण्यापेक्षा दाखविणार्‍यास २०१ रु. बक्षिस द्यावयास हवे. मलाही हेच म्हणायचे होते,पण ते माला योग्य शब्दात मांडता आले नाही.

कोण म्हणते की सरकार बेरोज्गारांसाठी काहीच करत नाही .बघा सरकारने रोजगार निर्मिती केली की नाही. रोजगार निर्मीती करणार्‍या सरकारला मनापसुन धन्यवाद.

मुंबैतील रेलवे ट्रॅकमध्ये लावायला पाहिजेत. व कारवाई करायला पाहिजे. अर्धवटराव आचरटाचार्य, सुधीर कांदळकर.