मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

दिवस जुने ते स्मरायचे

केशवसुमार · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
वेलणकरशेठनी केलेले सुंदर विडंबन झोप आल्यावाचून लोळायचे वाचून आमची झोप उडाली (वेलणकरशेठ, तुम्ही सुद्धा !!) मग जालावरून मंगेश पाडगावकर यांची अप्रतिम रचना दिवस तुझे हे फुलायचे शोधणे आले आणि मग पुढचं सगळे नेहमीचेच..गाढवापुढे वाचली गीता आणि कालचा गोंधळ बरा होता..
दिवस जुने ते स्मरायचे
आठवणी काढून हसायचे

रस्त्यात हिंडत जाणे
वाटेत शोध बे दाणे
चकण्यास दाणे ते असायचे

गाठावी मित्राची खोली
जमावी पारटी ओली
ग्लासात वारुणी भरायचे

भरारे ग्लास हे  पार
वाटावा सुरे चा भार
घोटात रिकामे करायचे

माझ्या तू घरच्यापाशी 
थांबव गाडी जराशी
पायर्‍या चुकून पडायचे


वाचने 3955 वाचनखूण प्रतिक्रिया 7

विसोबा खेचर Wed, 03/26/2008 - 01:11
माझ्या तू घरच्यापाशी थांबव गाडी जराशी पायर्‍या चुकून पडायचे हम्म! केश्या, लेका तू काही सुधारायचा नाहीस! :) अरे मेल्या, आज मराठी आंतरजालावर 'विडंबन कसे असावे' या विषयावर अगदी तोंडफाटेस्तोवर, न दमता मंडळी पान पान भर चर्चा करताहेत हे पाहून देखील तिला सुधारायचं नाहीये ,म्हणजे कमाल आहे बॉ तुझी! :) असो, चालू द्या. पुढील विडंबनाची वाट पाहतो आहे! :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

इनोबा म्हणे Wed, 03/26/2008 - 01:38
अरे मेल्या, आज मराठी आंतरजालावर 'विडंबन कसे असावे' या विषयावर अगदी तोंडफाटेस्तोवर, न दमता मंडळी पान पान भर चर्चा करताहेत हे पाहून देखील तिला सुधारायचं नाहीये ,म्हणजे कमाल आहे बॉ तुझी! :) बाकी इडंबन फर्मास... "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

बेसनलाडू Wed, 03/26/2008 - 01:32
वाटेत शोध बेदाणे भरारे ग्लास हे पार वाटावा सुरे चा भार घोटात रिकामे करायचे यातील सहजपणा विशेष भावला. बाकीचे तेच. (वाचक)बेसनलाडू

प्राजु Wed, 03/26/2008 - 03:09
फर्मास विडंबन... रस्त्यात हिंडत जाणे वाटेत शोध बे दाणे चकण्यास दाणे ते असायचे हे एकदम भारी... - (सर्वव्यापी)प्राजु

उदय सप्रे Wed, 03/26/2008 - 09:17
प्रिय केशवराव, तुमच्या सगळ्याच विडंबन कविता एकदम झकास आणि सहज असतात, तुमची भाषा सम्पत्ती खूपच प्रगल्भ आहे ! घरी आला असतात आणि निवांतपणे भेट झाली असती तर आणखीनच बरे वाटले असते, असो, पुढल्या वेळी नक्की ! तुमच्या "नसतेस घरी" विडंबन वरून स्फूर्ती घेवून मी पण एक विडंबन केले आहे, बघा वाचून..... उदय सप्रे

केशवसुमार Wed, 03/26/2008 - 17:19
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!! (आभारी)केशवसुमार