मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

!! मिपा पुणे कट्टा साद्यंत व्रुतान्तःबखर क्र १!! चौक ४

विजुभाऊ · · काथ्याकूट
!! मिपा पुणे कट्टा साद्यंत व्रुतान्तःबखर क्र १!! चौक ४ सार्‍यांस बहुत आस्चर्य जाहले...त्यावरी त्याणी खुलासा जे केला की मूळ यावनी ईर्षाद हा शब्द सूद्ध भारतीय आहे...ईर्षाद मूळ उचार 'नाईलाज" ऐसा आहे...त्याचा मतलब ही तोच आहे.... ये समयी मि पा सदस्यानी ईर्षाद हा शब्द नाईलाज ये अर्थाने भविस्यात वापरणेचा आहे ऐसा ठराव करणेत आला. त्यास येक्मुखाने सर्वानी दुजोरा दीला..... ईतरही काही म्हत्वाचे ठराव ये समयी सदनात पेष केले गेले ईतर ठराव ऐसे १) पि पा वरील उत्तमोत्तम साहित्य कठीण स्वरूपात ( हार्ड कॉपी) आणणे. व ..त्याची जिम्मेदारी घेणेबाबत व साहेबी असोन राहाणे बाबत २) मि पा सदस्य उत्तमोत्तम कळा जाणुन आहेत उदा: साहेब श्री दंताड वैदु सरदार दाढे सरकार यांच्या नरड्यात मझा आहे..सरदार सो! गाणे सोबत बजावणे ही उत्तम करतात सदाशीव्/शनिवार गोटाचे सर्मुखत्यार हसबनवीस सरदार साहेब श्री श्री श्री धमाल नाटके करतात विजुभाऊ येकपात्री करतात कविवर्य मेहेर्बान उले उलेमान केशवसुमार यांच्या विडंबनांची खुमारी सांगणे न लगे दश हजारी मनसाबदार सरदार चित्तर ह्यांचेही णरडे फक्कड गाते......... शायर ए मिपा गझल नवाझ अक्षरनवीस ॐकारखान हे गझला ऐशा नझाकतीने पेष करतात की तबियत खुष होते ऐसे नग आणि नरपुंगव मिपा च्या दरबारात हझेरी देत असतात्.... या सर्वांस येकत्र आणुन मिपा चा येक खाषा जाहीर गोंधळ करणे बाबत्......रात्र रंगत गेल्यामुळे या येका विषयावर खलबतास फार्फार मजकूर आणि फार्फार वेळ उपलब्ध झाला नाही सर्वांचा खाना आटोपला ( व ईतर ही.ते सांगणे न लगे) पाउस ही तांडव करुकरुन थकला होता. रात्रीचा पहीला प्रहर उलटुन दुसरा येतच होता. ११:३० वाजले सगळे सरदार आपपली घोडी काढु लागले ( कोण रे तो म्हणाला सगळेच सरदार .१२ वाजायची रिस्क कशाला म्हणुन्.आणा त्याला धरुन इकडे)आणि आपापल्या निवासी परतों लागले. ईतरत्र प्रुछा झाल्याप्रमाणे ये ठीकाणी मिसळीचा कट नव्हता...कार होती पण स्थान तिथेच सोडुन आल्यामुळे कोणतेही कट कार स्थान जाहले नाही. सरदार धमाल पुणे कट्टा पुन्हा जमविण्याचा घाट घालत आहेत त्याबद्दल चर्चा झाली .परंतु ते सारे काडी बहादुर सरदार छोटा डॉन ( जे फकस्त काडी पेटवोन नीघोन जातात आणि आगोटी फुंकुन पेटती ठेवायची जबाबदारी धुम्रशलाकाबहदुर सरदार धमाल्यावर टाकतात) यांछ्या येण्यावर अवलंबुनआहे ईती लेखन सीमा येणे वाग्यज्ञे तोषावे...तोषौनी मज द्यावे मिसळ्पाव हे... सिका आणि मोर्तब.... शके आठवत नाय वैषाख शुद्ध द्वितीया व्रुतान्त मी सांगणार्..तुम्ही ऐकणार ..रन्ग तो चढणार रं जी जी जी धन्य धन्य झाला तो सरदार जी जी जी जी जी जी र जी जी जी आर रं दाजी जी जी रं दाजी जी जी र जी जी जी र जी जी जी ....मूळ बखरनवीस्..खरडनवीस...विजुभाऊ कलमदाने....

वाचन 8086 प्रतिक्रिया 0