लहानपणी आम्ही ऐकलेले, गायलेले हे खेळगीत. आता त्यातील पूर्ण शब्द आठवत नाहीत. त्या जागा मी रिकाम्या ठेवल्या आहेत. कुणास आठवल्यास पूर्ण करण्यास मदत करावी.
(नवीन काही असल्यासही चालेल. :) )
दुपारचा वाजला एक
आईने केला केक
केक खाण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला
दुपारचे वाजले दोन
बाबांचा आला फोन
फोनवर बोलण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला
दुपारचे वाजले तीन
ताईची हरवली पिन
पिन शोधण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला
दुपारचे वाजले चार
_ _ _ _ _ _
_ _ _ _ एक तास गेला
मी नाही अभ्यास केला
संध्याकाळचे वाजले पाच
दादाने फोडली काच
काच वेचण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला
संध्याकाळचे वाजले सहा
आईने केला चहा
चहा पिण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला
संध्याकाळचे वाजले सात
आईने केला भात
भात खाण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला
रात्रीचे वाजले आठ
ताईने फोडला माठ
पाणी पुसण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला
रात्रीचे वाजले नऊ
बाबांनी आणला खाऊ
खाऊ खाण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला
रात्रीचे वाजले दहा
_ _ _ _ _ _
_ _ _ _ एक तास गेला
मी नाही अभ्यास केला
रात्रीचे वाजले अकरा
_ _ _ _ _ _
_ _ _ _ एक तास गेला
मी नाही अभ्यास केला
लेखक/कवी: अनामिक
(हेच लिखाण माझ्या अनुदिनीवरही वाचता येईल)
Taxonomy upgrade extras
वाचने
6395
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
:)
धन्यवाद
>रात्रीचे
हो! :)
In reply to >रात्रीचे by ठणठणपाळ
>खूप
In reply to हो! :) by विसोबा खेचर
ईश्वरेच्छा...
In reply to हो! :) by विसोबा खेचर
असे असावे!
बारा
हे
In reply to बारा by yogeshpatil
मस्त एकदम
In reply to हे by ३_१४ विक्षिप्त अदिती
खंत
छान कडवी