आठवणी
लेखनप्रकार
असाच एका संध्याकाळी आपल्या गच्चीवर बसलो होतो. सूर्याचं बहुतेक उत्तरायण सुरु होतं. मी इथे दीड वर्ष होतो. दिवस कसे झपकन निघून गेले समजलंच नाही अगदी त्या बुलेट ट्रेनसारखे. कितीतरी आठवणी आहेत ज्या मनावर कायमच्या कोरल्यात.
७.११.११ सकाळी माझा interview होता. जरासा उशीरच झाला. भरपूर कसरत करून हिंजवडीला पोहचलो. सरांना भेटायचं होतं. समोरच कंपनी दिसत होती. एक कामगार भलं मोठं पोट पुढे काढून त्या भल्या मोठ्या दरवाजात उभा होता. पहिला राउंड सरांनी घेतला, नंतर कंपनी मालकांनी बोलावलं आणि म्हणाले " आमच्याकडे दोन काम आहेत एक म्हणजे project आणि दुसरं म्हणजे panel manufacturing. प्रोजेक्ट मध्ये जाशील तर तुला कुठचीही location भेटेल, जंगलातून 20-25 km दिवसाला चालावं लागेल. जर manufacturing निवडशील तर तू इथेच थांबशील तुला गेस्ट हाउस मध्ये राहायची व्यवस्था करतो. बोल तुला कुठलं फिल्ड पाहिजे?”. मी मनातल्या मनात बोललो जाऊ दे कुठे जंगलात फिरतोस, आणि मी panel manufacturing लाईन मध्ये आलो. जॉईनिंग डेट घेतली ११.११.११ कसली भारी डेट होती ती. गर्लफ्रेंड सोबत केलेली डेट पण फिकी पडेल तिच्यासमोर ( आता मला गर्लफ्रेंड नाही ही गोष्ट वेगळी).
माझ्या दिवसाची सुरवात उशीराच व्हायची. ९ वाजता ऑफिस असलं की मी ८.३० ला उठायचो. गरम पाण्याची तर अपेक्षा नसायचीच. नवनाथ ने मला मस्त उपाय दिला होता, बाजूच्या रूम मधली खिडकी खोलून गिझर मधून पाणी आणायचं. मी खिडकी खोलण्यात expert झालो होतो. पण म्हणतात ना कुठल्याही चांगल्या गोष्टीचा अतिरेक वाईट असतो. एक दिवशी ही बातमी श्री सरांना समजली आणि त्यांनी सगळी गेस्ट हाउस ची बिल्डींग आमच्याकडून साफ करून घेतली. असो.
नंतर यायचो शॉप फ्लोअरला. इथला अनुभव खतरनाक होता. चढलात तर हिमालयाच्या शिखरावर नाहीतर समुद्राच्या तळाला केव्हा गेलात याचा पत्ता सुधा तुम्हाला लागणार नाही. त्यात भर म्हणजे आमचे सर. गाडीच्या हॉर्नचा आवाज ऐकला की जो तो सैरा-वैरा पळत सुटायचा. पण सगळी माणसं जीवाला जीव देणारी भेटली. भरपूर वेळा सर कॉस्टिंग काढयला द्यायचे, माझ्या चुका कुठे होताहेत ते समजून सांगायचे, कधी कधी मला stock घ्यायला सांगायचे मला सगळ्या material ची माहिती व्हावी हा हेतू त्यामागे असायचा. मला आठवतंय एकदा ऑटो कॅड वर मी G.A. काढत होतो पण मला व्यवस्थित जमत नव्हतं, सर आले माझ्या बाजूला उभे राहिले आणि ते जवळ जवळ अर्धा तास मला ऑटो कॅड command समजून सांगत होते. हा प्रसंग अगदी शेवट पर्यंत माझ्या लक्षात राहील. तिथे काम करणाऱ्या माणसांकडून भरपूर काही शिकायला भेटलं. काही विचारलं तर हातातलं काम बाजूला ठेऊन पहिले माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यायचे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तिथे काम करणाऱ्या माणसांशी माझी कधीच भांडणं झाली नाहीत. त्याच्यासोबत साईट वर असू दे नाहीतर शॉपला. रात्री बाहेर जेवणाची खूप तारांबळ उडायची. पण रविवार असला की सोन्या आणि मया मला आवर्जून चिकन खायला बोलावणार. खास माझ्यासाठी बिर्याणीचा बेत आखणार. दीड वर्षातली माझी खरी कमाई हीच होती.
रविवारचा सुट्टीचा दिवस भेटला की संध्याकाळी सगळे गच्चीवर जमायचो. उन्हाळ्याच्या दिवसात आम्ही झोपायला पण इथेच यायचो, हा आमचा कट्टा होता. मनातल्या सगळ्या गोष्टी इथे बाहेर पडायच्या. मग धमाल आणि मजा मस्ती. प्रत्येकजण ज्याच्या त्याच्या करामती सांगयचा live busbar ला हात कसा लावायचा मग त्याचे साहेब काय बोलायचे, मधूनच भूतांचा विषय निघायचा मग भूतानी त्या कोपऱ्यातली कंपनी बंद कशी पाडली हे तिखट मीठ लाऊन सांगितलं जायचं, मधूनच नवनाथ आणि संदीपची शाब्दिक चकमक घडणार. माझा वाढदिवस रात्री १२ वाजता याच गच्चीवर साजरा केला, परत आम्ही केलेली कोजागिरी पोर्णिमा ती ही अविस्मरणीय. आजही ते दिवस आठवले की नकळत मन पुन्हा या गच्चीवर जाऊन बसतं.
वाचने
7131
वाचनखूण
प्रतिक्रिया
37
पहिलाच प्रयत्न
घेतलंय सांभाळुन
पहिलटकरीण असून
चांगलंय
चांगलं लिहिलं आहे. पुलेशु.
मिपावर स्वागत
लिहा बिंधास...
तपशिलाचा अभाव.
In reply to तपशिलाचा अभाव. by प्रभाकर पेठकर
भेटला
In reply to भेटला by काळा पहाड
मी रायगडचा आहे.
In reply to मी रायगडचा आहे. by कल्पतरू
@मी रायगडचा आहे.>>>
In reply to @मी रायगडचा आहे.>>> by अत्रुप्त आत्मा
बुवांनु,
In reply to बुवांनु, by सूड
मी आपला माणगाव महाड
११/११/११ ला जॉइनींग म्हणजे
उत्तम
In reply to उत्तम by विटेकर
+१११११११११११११११११११११
मस्त ! लिहीत रहा.
मदनबाण.....
आत्ताची स्वाक्षरी :- दिल ये जिद्दी है... :) Mary Komछान लिहिलय!
तुमच्या सगळ्यांचे आभार.
चांगले लिखाण
छान प्रयत्न...
In reply to छान प्रयत्न... by मितभाषी
बसबारचे व्होल्टेज
In reply to बसबारचे व्होल्टेज by कल्पतरू
एक शंका
In reply to एक शंका by बॅटमॅन
+१
In reply to +१ by सस्नेह
@स्नेहांकिता ४००० मी कमीच
In reply to एक शंका by बॅटमॅन
@बॅटमॅन तुमची शंका अगदी बरोबर
In reply to एक शंका by बॅटमॅन
(No subject)
In reply to बसबारचे व्होल्टेज by कल्पतरू
४४० च्या लाइव्ह बसबार ला ट्च.
In reply to ४४० च्या लाइव्ह बसबार ला ट्च. by मितभाषी
ते आता बसबार वर स्लीव
मी मनातल्या मनात बोललो जाऊ दे
लेखन छान आहे
घाबरु नक्का
बादवे
In reply to बादवे by इरसाल
थोडक्यात, तुम्हाला कोरियन्स
In reply to थोडक्यात, तुम्हाला कोरियन्स by काळा पहाड
आहे हो माहित
In reply to आहे हो माहित by इरसाल
हो तो नाही पाहिला खरा
एक कामगार भलं मोठं पोट पुढे