Skip to main content

श्रीगणेश लेखमाला २०१४

आमचे गणपती-(बसतात..!)

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी सोमवार, 08/09/2014 08:10 या दिवशी प्रकाशित केले.
भली पहाट, या शब्दाचा अर्थ मला माझ्या या पौरोहित्याच्या कामात अनेक अंगानी उमगलेला आहे.पण त्याची खरी किंमत कळली, ती या गणपतिच्या प्राणाला-प्रतिष्ठा देणार्‍या त्याच्या उत्सवाच्या,या पहिल्या दिवशीच!.. वेदपाठशाळेतून-सुटून,कामाला लागलेल्या गुरुजिपणाच्या पहिल्या ३ वर्षात (हाय..हाय..!) ही खरी चव चाखायला मिळते. तर...आदले दिवशी संध्याकाळी..आमचा बाप,हा वाड्यात आपले कार्टे जिथे दिसेल तिथून हकलत असतो.

क्रांतिकारी जगपालट घडवून आणणार्‍या व्यापारी कंपन्या

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी रविवार, 07/09/2014 09:49 या दिवशी प्रकाशित केले.

क्रांतिकारी जगपालट घडवून आणणाऱ्या व्यापारी कंपन्या

माणूस भटकी जीवनावस्था सोडून एका जागी राहू लागला, शेती करू लागला. शेतीतून मिळवलेल्या अन्नाची साठवण केल्याने रोजची पोटासाठीची वणवण थांबली. मोकळा वेळ आणि साठवलेल्या अन्नामुळे सौदा करण्यासाठी आलेली ताकद कशी वापरावी याबाबत मानवाच्या सुपीक मेंदूने विचार सुरू केला नसेल तरच नवल. किंवा तसा विचार अगोदर केला म्हणून अन्नाची शेती आणि साठवण करण्याची गरज त्याला पडली असेल. कारण प्राचीन मानवांत प्रथम शेती आणि त्यामुळे एका जागेवर वस्ती असाच क्रम दर ठिकाणी होता असे दिसत नाही.

पुरुष :- एक नामशेष होऊ घातलेली जमात

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी शनिवार, 06/09/2014 08:47 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतीच वर्तमान पत्रात बातमी वाचली की "आता प्रजनन करण्या साठी पुरुषांची गरज लागणार नाही. क्लोनिंगच्या सहाय्याने आता पुनरुत्पादन करणे शक्य आहे." आणि माझ्या पोटात एक मोठा गोळा आला. कारण पुरुषजातीचे अंध:कारमय भविष्य मला स्पष्ट पणे दिसू लागले. इतके दिवस माझ्या मनात जो संशय होता त्याला या बातमीमुळे बळकटीच मिळाली होती. स्त्रीजातीचे अनेक वर्षांपासून सुरु असलेले कारस्थान यशस्वी होण्याची वेळ अगदी जवळ आली आहे या बद्द्ल माझ्या मनात कोणताही संशय उरला नाही. आता पुरुषजात नष्ट होण्यास आता फारसा अवधी उरला नाही. पुरुषांचे दिवस आता संपले आहेत.

दयेव...

लेखक धन्या यांनी शुक्रवार, 05/09/2014 01:10 या दिवशी प्रकाशित केले.
"तुमी कदी घरी जानार हाव?" मी बाबांना विचारलं. घरी म्हणजे गावी, कोकणात. आठवडाभराने गणपती येणार होते. दोन काका, तीन आत्या सारेच मुंबईला. आम्ही पुण्याला. तयारी करण्यासाठी कुणीतरी लवकर गावी जाणं आवश्यक होतं. "येग्दिवस तरी आदी जाया लागंल. आरास कराय पायजे ना." बाबांचं उत्तर. आरास म्हणजे गणपतीच्या बैठकीची सजावट. मी कॉलेजला जायच्या वयाचा होईपर्यंत आमच्या गणपतीची आरास म्हणजे एक दिव्य प्रकार होता. गणपती एव्हढया उंचीवर बसवला जायचा की आम्हा लहान मुलांचा हात गणपतीच्या पायापर्यंतही पोहचत नसे. साधारण १९६० च्या आसपास माझे आजोबा आणि त्यांचे दोन भाऊ यांनी फक्त साडे पाचशे रुपयांत घर बांधले.

दूरस्थ

लेखक मीराताई यांनी गुरुवार, 04/09/2014 08:23 या दिवशी प्रकाशित केले.
प्रवासाला निघायचं म्हटलं की मन कसं हलकं-फुलकं होतं. तसं तर नेहमीच्या त्या रामरगाडयातून बाहेर पडायला मन सदैव उत्सुकच असतं. मनाच्या या उत्सुकतेचं निरीक्षण करताना जाणीव होते ती आदिमानवाची! आपल्या त्या पूर्वजाची! त्याच्यामधली ती भटकी प्रवृत्ती अजूनही आपल्यात जागी आहे अन् संधी मिळताच ती डोकं वर काढते याची जाणीव तीव्रतेने होते. ही संधी मग धंदा-व्यवसायासाठी करण्याच्या प्रवासाची असो की घरगुती भेटीगाठी किंवा कौटुंबिक सोहळे यांच्यासाठी असो! क्वचित प्रसंगी त्या विशिष्ट ठिकाणी पोचल्यावर या चार भिंतीतून त्या चार भिंतींमध्ये येऊन पडल्याची भावनाही निर्माण होईल. ते पुढचं पुढे!

नाही देखिले पंचानना

लेखक सुबोध खरे यांनी बुधवार, 03/09/2014 00:06 या दिवशी प्रकाशित केले.
हि गोष्ट मी गोव्यात असतानाची आहे. गोव्याच्या वास्को येथील नौदलाच्या रुग्णालयात काम करीत होतो. मी तेथील अधिकाऱ्यांच्या वसाहतीत राहत असे. दाबोळी विमानतळाच्या अगदी जवळ असलेली हि वसाहत अतिशय सुंदर आहे. दोन मजली इमारतीत चार घरे. खालच्या घरांना पुढे आणि मागे अंगण आहे. बाजूला मोटारीसाठी गैरेज आणि वरच्या मजल्यावर राहणार्यांना गैरेजच्यावर एक गच्ची. घरे सुद्धा सुटी सुटी आहेत. वसाहतीत रहदारी अशी नाहीच. त्यामुळे मुले फार सुखात आपल्या छोट्या सायकलींवर फिरत असत. त्यांची शाळा पण त्याच वसाहतीत आहे. त्यामुळे मुले दोन मिनिटात शाळेत पोहोचत.

कृष्णमयी

लेखक सस्नेह यांनी मंगळवार, 02/09/2014 00:04 या दिवशी प्रकाशित केले.
4 कातरवेळ झाली अन सकाळपासून तिच्या मनी दाटलेल्या हुरहुरीने आणखीनच उग्र रूप धारण केले. आज दिवसभर त्याचे दर्शन नाही. नित्यकर्मे करताना मनाची तहान वाढतच गेली. अन आता संध्याकाळी त्या व्याकुळतेने पुरते पिसे लावले. अंधार दाटला, तसे राधेला काही सुचेना. शामसुंदर, श्रीहरी, कृष्ण काळा, कान्हा, मुरारी, मुकुंद, गोविंद, माधव, मिलिंद सगळी नावे आलटून पालटून घेऊन झाली. त्याची लोभस रूपे मन:चक्षुंनी हजार वेळा न्याहाळली.

भक्तीमार्गातील अडथळे.

लेखक प्रभाकर पेठकर यांनी सोमवार, 01/09/2014 00:33 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवसांपूर्वी जन्माष्टमी झाली. जन्माष्टमीच्या आधी झी-२४ तास वर अत्यंत उद्बोधक चर्चा (रोखठोक) ऐकायला मिळाली. गेल्या जन्माष्टमीला मानवी मनोरा कोसळून, खालच्याच थरावर असलेला, एकजण जबर जखमी झाला होता. मानेला दुखापत झाल्याने कमरेखाली लुळा पडला होता. ६ महिन्यांच्या उपचारांनंतर कुबड्याघेऊन चालण्याइतपत परिस्थिती सुधारली तरीपण कोणाच्या आधाराविना जगू शकत नाही. २० वर्षाचा मुलगा त्याच्या पुढे डोंगराएव्हढे आयुष्य आहे. चर्चेत तो आणि त्याची आई आले होते. त्याच्या आईला एकंदर प्रकाराबद्दल मत विचारले असता ती म्हणाली, 'ह्याच्या आयुष्याची वाट लागली आहे.

बाप्पाचा नैवैद्य - चुरमा लाडू आणि पंचखाद्याचे मोदक

लेखक सानिकास्वप्निल यांनी रविवार, 31/08/2014 00:03 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी. गणपती बाप्प्च्या नैवेद्यासाठी चूरम्याचे लाडू आणि पंचखाद्याचे मोदक देत आहे.

"आजच्या" गणेश मंडळाची सभा....

लेखक सुहास झेले यांनी शनिवार, 30/08/2014 00:19 या दिवशी प्रकाशित केले.
(स्थळ - हर्क्युलस सार्वजनिक गणेश मंडळाचे कार्यालय) "अरे रघ्या.....ए रघ्या.. समोश्याचा अजून एक राउंड होऊन जाऊ दे..." "सब खतम हो गया साब..." "खतम? जा त्या मारवाड्याला सांग... सेक्रेटरी साहेबांनी १५-२० प्लेट मागवलेत अजून. मंडळाची महत्वाची मिटिंग सुरु आहे." (रघ्या समोसे आणायला पळतो) "चला तोवर आपण सभेला सुरुवात करूया. अरे तो एसी कोणी तरी वाढवा रे...किती उकडतंय इथे.." (एसीची घरघर वाढते आणि मंडळाच्या सभेला सुरुवात होते) "तर मंडळी सालाबादप्रमाणे यंदाही आपण आपल्या मंडळाच्या सार्वजनिक गणेश उत्सवाच्या निम्मित ही सभा आयोजित केलेली आहे.