✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

विवाह मुहुर्त

भ
भिंगरी यांनी
Sun, 09/07/2014 - 16:45  ·  लेख
लेख
लग्न ठरले कि लग्नाचा मुहूर्त पाहीला जातो. तो मुहूर्त मुलगा आणि मुलगी यांच्या नावराशीवरून ठरवला जातो का? मला यातले काही कळत नाही म्हणून जाणून घ्यायचे आहे कि मुहूर्त का पहिला जातो? खूप वेळा ठरलेल्या मुहूर्तावर लग्न लागत नाहीत,मग त्यामुळे त्यांच्या पुढील आयुष्यात काही नुकसान किंवा विपरीत होते का? (हं आता लग्न लागायला उशीर झाला तर जाणाऱ्या पाहुण्यांची पंचाईत होते हा भाग निराळा.) साखरपुड्याचा विधी न केल्याने किंवा हळद न लावता लग्न केल्याने काही फरक पडतो का? (प्रेमविवाहात तर या गोष्टी सहसा होतंच नाहीत.) भारतिय संस्कृतीत याचे विशेष महत्व आहे का? या विषयावर शास्त्रोक्त माहिती कोणी देईल का?
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
9379 वाचन

💬 प्रतिसाद (31)

प्रतिक्रिया

.

दादा कोंडके
Sun, 09/07/2014 - 17:01 नवीन
+१००
  • Log in or register to post comments

२०० +

टवाळ कार्टा
Sun, 09/07/2014 - 18:03 नवीन
२०० +
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दादा कोंडके

हम्म मियां बिवी राजी तो क्या

जेपी
Sun, 09/07/2014 - 17:57 नवीन
हम्म मियां बिवी राजी तो क्या करेगा मुहुर्त पाजी, बाकी ठरल्यावेळेला किती लग्न पार पडतात हे मिपावरच्या आत्मालात माहित.
  • Log in or register to post comments

मला यातले काही कळत नाही ..

अविनाशकुलकर्णी
Sun, 09/07/2014 - 18:34 नवीन
मला यातले काही कळत नाही .. मला पण.. पण आमचे लग्न टिकले.. बाकि केंव्हा आहे आपले लग्न?
  • Log in or register to post comments

सुमुहूर्त सावधान!

पैसा
Sun, 09/07/2014 - 18:41 नवीन
सुमुहूर्त सावधान!
  • Log in or register to post comments

लग्न मुहूर्तावर लागलं काय किंवा नाहि लागलं काय

दिपक.कुवेत
Sun, 09/07/2014 - 18:54 नवीन
पूढिल परीस्थीती टाळता येते का ह्यावर विचार व्हायला हवा.
  • Log in or register to post comments

आँ?

पैसा
Sun, 09/07/2014 - 19:22 नवीन
नेमकं काय म्हणायचंय तुला? पुढील संकट असं म्हणायचंय का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपक.कुवेत

हि हि हि

दिपक.कुवेत
Mon, 09/08/2014 - 18:39 नवीन
तुला कळलं ना?? मग झालं तर.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

मुहूर्त टळला काय, साधला काय..

पिंगू
Sun, 09/07/2014 - 19:45 नवीन
मुहूर्त टळला काय, साधला काय.. पुढचे संकट कधी टळतयं... :D
  • Log in or register to post comments

माझी मतं, माझी उत्तरं. :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 09/07/2014 - 19:58 नवीन
>>>> मुहूर्त मुलगा आणि मुलगी यांच्या नावराशीवरून ठरवला जातो का ? राशिचक्रामधे बारा राशी असल्यामुळे प्रत्येक राशीत काही नक्षत्र असतात आणि माणसाच्या जन्मकुंडलीमधे राशीत काही ग्रह असतात तेव्हा कोणती कृत्य कोणत्या नक्षत्रांवर करावी एवढाच तो अर्थ. काही नक्षत्र ही पुण्यकारक आणि काही पापकारक असतात असे म्हणतात म्हणुन मुहुर्त पाहावे असे म्हटल्या जाते. मुहुर्त हा नावराशीवरुन ठरवल्या जातो. (थोतांड आहे, हे विसरु नये) मुहुर्त म्हणजे 'थोडा काळ, थोडे क्षण ''जी कृत्य काही विशिष्ट नक्षत्रांवर करावी असे सांगितले असेल ती कृत्ये त्या नक्षत्रांच्या ज्या देवता असतील त्याच देवता असणार्‍या मुहुर्तांवर कार्य केल्यास कार्यसिद्धी होते'' एवढाच मुहुर्ताचा अर्थ. (बरोबर का बुवा) माणसाच्या जन्मापासून ते त्याची माती होईपर्यंत मुहुर्त पाहिले जातात. अगदी चोर चोरी करण्यासाठीही मुहुर्त पाहुनच जातो असे म्हणतात. असो. >>>> मुहूर्त का पहिला जात ? कार्य सिद्धीस जाण्यासाठी. >>>>> खूप वेळा ठरलेल्या मुहूर्तावर लग्न लागत नाहीत,मग त्यामुळे त्यांच्या पुढील आयुष्यात काही नुकसान किंवा विपरीत होते का? मुहुर्तावर लग्न लागले नाही तर काहीही नुकसान होत नाही.. (लग्नामुळे अनेकांच्या आयुष्याचे नुकसान होतं, कोण बोललं रे ते) मुहुर्त चुकला तर काहीही विपरीत होत नाही. माणसांच्या स्वभावामुळे एकमेकांचं जास्त नुकसान होतं असं मला वाटतं >>> साखरपुड्याचा विधी न केल्याने किंवा हळद न लावता लग्न केल्याने काही फरक पडतो का ? साखरपुड्याचा विधी हा मुला मुलीचा विवाह ठरला आहे हे पाहुण्या रावळ्यात बातमी जावी म्हणुन केलेला विधी म्हणजे साखरपुडा. (व्वा सर वा) साखरपुड्याला हळद लावल्याचे अजून पाहिलेले नाही, पण लग्नात हळदीचे कारण मला वाटतं जुन्या काळी त्वचा टवटवीत दिसावी यासाठीचे कोणती साधनं नव्हती म्हणुन हळद वापरल्या जात असावी. हळ्दीनं कसं माणुस लै भारी दिसतो एवढाच तो अर्थ, तेव्हा हळद लावल्याने आणि न लावल्याने काही फरक पडत नाही. (हळद लावली नै तर लग्न झाल्यासारखे वाटत नाही ) >>> भारतिय संस्कृतीत याचे विशेष महत्व आहे का ? भारतीय संस्कृतीत खुप गोष्टी आहेत आता त्या प्रत्येकाला किती महत्वाच्या वाटतात त्यावर त्याचे महत्व अवलंबुन आहे. अजून काही विचारायचे असल्यास जरुर विचारा. उद्या सुट्टी आहे, भरपूर मदत करतो. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

विवाहासाठी मुहूर्ताने शष्प फरक पडत नाही

माम्लेदारचा पन्खा
Sun, 09/07/2014 - 20:38 नवीन
फक्त तुमच्या अंगभूत गुणांवर आणि तुमच्या पार्टनरच्या समजूतदार विचारांवर लग्नाचे यश अवलंबून असते. बाकी नशिबाचा भाग अलाहिदा.... फक्त मुहूर्तावर लग्न यशस्वी होत असते तर इतके घटस्फोट झाले नसते !
  • Log in or register to post comments

+११११११११११११११११११११११११११११

टवाळ कार्टा
Sun, 09/07/2014 - 21:05 नवीन
+१११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११ बाकी ते "शष्प" म्हणजे काय?? "घंटा" अस्सा मुम्बैच्या भाषेतला अर्थ माहीत आहे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माम्लेदारचा पन्खा

घंटा याच शब्दाच्या अर्थाचा मराठी प्रतिशब्द आहे

माम्लेदारचा पन्खा
Sun, 09/07/2014 - 21:11 नवीन
बऱ्याच दिवसांनी वापरात आणलाय ....बरं वाटलं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

शष्प म्हणजे गवत.

बॅटमॅन
Mon, 09/08/2014 - 12:50 नवीन
शष्प म्हणजे गवत. http://spokensanskrit.de/index.php?script=HK&beginning=0+&tinput=+shaShpa&trans=Translate&direction=AU त्यामुळे वरिजिनल अर्थ *ट असावा असा अंदाज आहे. पण येस, घंटा हा प्रतिशब्द चपखल बसतोच. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

फक्त मुहूर्तावर लग्न यशस्वी होत असते...

मुक्त विहारि
Sun, 09/07/2014 - 21:28 नवीन
तर इतके घटस्फोट झाले नसते ! + १
  • Log in or register to post comments

लेख लिहिताना

पैसा
Sun, 09/07/2014 - 22:28 नवीन
लेख लिहिताना रविवारचा मुहूर्त का धरलास? प्रतिक्रिया कमी येतात! माझी मते: १) साखरपुडा आणि हळद लावणे यात खास धार्मिक विधी नसतो. त्या दोन्ही प्रथा आहेत. हिंदू कायद्यानुसार पाणिग्रहण, सप्तपदी आणि कन्यादान हे तीन विधी झाले तर लग्न पूर्ण होते. त्यात साखरपुडा आणि हळद लावण्याचा उल्लेख नाही. २) जगात एकूण लोकसंख्येच्या १५-१६% हिंदू असतील. बाकीचे लोक मुहूर्त बघत नाहीत. त्या सगळ्यांवर काही भयानक संकटे येतात असं कधी ऐकलं नाही.
  • Log in or register to post comments

[बाकीचे लोक मुहूर्त बघत नाहीत

भिंगरी
Mon, 09/08/2014 - 00:04 नवीन
[बाकीचे लोक मुहूर्त बघत नाहीत. त्या सगळ्यांवर काही भयानक संकटे येतात असं कधी ऐकलं नाही.] मला नेमके हेच वाटते,पण आता तर असं ऐकलं आहे की सिंहस्थामुळे मधल्या वर्षभरात मुहुर्तच नाहीत पण मग जगभरात लग्नच होणारच नहीत का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

अग्गं बै ... तर हे टेन्शन हाय

जेनी...
Mon, 09/08/2014 - 00:36 नवीन
अग्गं बै ... तर हे टेन्शन हाय वै तुला ???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भिंगरी

मिपावरचा प्रसिद्ध काथ्याकूट

नानासाहेब नेफळे
Sun, 09/07/2014 - 22:48 नवीन
मिपावरचा प्रसिद्ध काथ्याकूट ,टॉपगिअर्ड फिलॉसॉफर यांचा, आपण जरुर वाचावा . http://www.misalpav.com/node/26743
  • Log in or register to post comments

भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास

चित्रगुप्त
Mon, 09/08/2014 - 04:44 नवीन
वाचा: भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास http://www.marathipustake.org/Books/bharatiya_vivaha_sansthecha_itihaas.pdf आणि यावरील २००८ चा मिपा-धागा: http://www.misalpav.com/node/3866
  • Log in or register to post comments

भिंगरी..हे वाचा

अत्रुप्त आत्मा
Mon, 09/08/2014 - 06:40 नवीन
विवाह मुहुर्ताच्या निमित्ताने..! "सावधाना'चा मुहूर्त !
  • Log in or register to post comments

लेख वाचला

भिंगरी
Mon, 09/08/2014 - 09:58 नवीन
शंका समाधान झाले. धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

विवाह लागताना भटजी आपला ओरडून

सुहास पाटील
Tue, 09/09/2014 - 11:40 नवीन
विवाह लागताना भटजी आपला ओरडून सांगत असतो "सावधान" "सावधान" पण नवरा नवरी आणि घरच्यांना ते कळत नाही.
  • Log in or register to post comments

ते आजवर फक्त एकट्याला कळालं

बॅटमॅन
Tue, 09/09/2014 - 14:46 नवीन
ते आजवर फक्त एकट्याला कळालं आणि तो उसेन बोल्टपेक्षा वेगाने लग्नमंडपातून पळाला होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास पाटील

त्याच्या वाग्दत्तवधुचे काय

नानासाहेब नेफळे
Tue, 09/09/2014 - 15:16 नवीन
त्याच्या वाग्दत्तवधुचे काय झाले हो पूढे? तो पळुन गेला ईतकेच ऐकवतात फक्त.
  • Log in or register to post comments

झालं हो लग्न तिचं. त्याच

प्यारे१
Tue, 09/09/2014 - 15:23 नवीन
झालं हो लग्न तिचं. त्याच मांडवात. होता एक राखीव खेळाडू. तेव्हाच्या प्रथेनुसार वधूनं पण स्विकारलं होतं. थोरल्या भावाला ठाऊक होतं ३८० वर्षांनी कुणीतरी विचारणार असं म्हणून. असो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे

सोडुन द्या हो

प्रसाद गोडबोले
Tue, 09/09/2014 - 17:43 नवीन
कुणाला समजावताय प्यारे ? कशाला उगाच वेळ आणि एनर्जी वाया घालवता ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

@थोरल्या भावाला ठाऊक होतं ३८०

अत्रुप्त आत्मा
Wed, 09/10/2014 - 10:03 नवीन
@थोरल्या भावाला ठाऊक होतं ३८० वर्षांनी ""कुणीतरी"" विचारणार असं म्हणून.>>> =)) .. =)) .. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

>>सिंहस्थामुळे मधल्या

सूड
Tue, 09/09/2014 - 17:39 नवीन
>>सिंहस्थामुळे मधल्या वर्षभरात मुहुर्तच नाहीत हे एक चांगलं झालं. *mosking*
  • Log in or register to post comments

भिंगरी आपल्याला या वर काही

प्रकाश घाटपांडे
Mon, 09/22/2014 - 16:09 नवीन
भिंगरी आपल्याला या वर काही माहिती खालील लिंकवर मिळेल यंदा कर्तव्य आहे? भाग ६
  • Log in or register to post comments

साखरपुडा हे लग्नाच्या बंधनात

फुंटी
Mon, 09/22/2014 - 20:34 नवीन
साखरपुडा हे लग्नाच्या बंधनात अडकण्याआधीच एक पाउल आहे..खर तर सध्या साखरपुडा मोठा थाटात म्हणजे जवळपास लग्नाच्या तोडीस तोड केला जातो.उपवर मुलगा मुलगी भेटून लग्न ठरेपर्यंतचा काल हा तसा धोकादायक असतो...लग्न तुटण्याचे प्रकार या काळात जास्त होऊ शकतात...यामुळे लग्नानंतरच्या तडजोडीची तयारी म्हणून सर्व लोकांसमोर साखरपुडा केला जातो.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा