गव्हाची पोती
एक वकील मित्र आहे त्याने सांगितलेला एक किस्सा
एक न्यायाधीश महाराज असतात,,खादाड असतात पण फार चतुर..
त्यांचा एक विश्वासू किराणा दुकानदार होता मारवाडी समाजांतला.
काम व्हावे म्हणून जी रक्कम ठरायची ति मारवाड्या कडे पोहोचती झाली की काम व्हायचे..
न्यायाधीश महाराज पण किराणा ध्यायच्या निमित्ताने दुकानात गेले की सांकेतिक भाषेत गप्पा चालायच्या..
नवीनं गहू आला की नाही दुकानात???
हो आला आहे ना .. ति काय २ पोती भरून ठेवली आहेत आपल्या साठी..असे म्हणून तो कोप~यात २ पोती उभी केलेली असायची त्या कडे बोट दाखवायचा..
महाराज समजायचे २ लाख जमा झाले आहेत म्हणून
मारवाडी म्हणायचा "पोती कधी पोहोचती करू??
सांगतो तुला योग्य वेळ आली की सद्ध्या भरपूर गहू घरात पाडून आहे..
मारवाडी समजून घ्यायचा..
एका संध्याकाळी न्यायाधीश महाराजांना बातमी समजते..मारवाड्याचे निधन झाले.... मारवाडी गचकला...
दुकान तर बंद होते..क्रियाकर्मे आटोपली अन जज साहेब दुकानात पोहोचले
गल्ल्यावर मुलगा होता सांत्वनाचे ४ शब्द बोलल्यावर जज म्हणाले " बाबानि काही माझ्या बद्दल सांगितले का?
फारसे नाही पण म्हणाले..पण म्हणत होते.. जज साहेब आले तर त्यांच्या घरी कोप~यात ठेवलेली गव्हाची २ पोती त्यांच्या घरी त्यांनी सांगितल्यावर पोहोचती कर... बस्स इतकेच..
जज साहेबांनी मनातल्या मनात कपाळावर हात मारून घेतला..
मग पाठवू का पोती गव्हाची? मुलगाविचारत होता..
पाठव ..इतकेच जज साहेब म्हणाले.. बोलता येईना अशी अवस्था होती..
घरी आल्यावर बायकोने मात्र झापले " हवीत कशाला २-२ पोती गव्हाची? पोरकिडे होतात..इथून पुढे असले उद्याग करण्या आधी मला विचारत चला...
जज असला म्हणून काय झाले? घरातल्या सुप्रीम कोर्टाच्या जज पुढे थोडेच न त्याचे काही चालणार होते?
वाचने
3099
वाचनखूण
प्रतिक्रिया
9
मी पहिला
अकु, जरा कथा समजावून सान्गाल
In reply to अकु, जरा कथा समजावून सान्गाल by खटपट्या
काय हे खटपट्या...
In reply to काय हे खटपट्या... by दिपक.कुवेत
पोरकिडे...
In reply to पोरकिडे... by प्रभाकर पेठकर
खी खी खी
In reply to काय हे खटपट्या... by दिपक.कुवेत
असं आहे होय !! मी तीनदा वाचली
खरा किस्सा
In reply to खरा किस्सा by अनंत छंदी
जल्ला!! परशुराम लोट्याचा
नाही.......