एक वकील मित्र आहे त्याने सांगितलेला एक किस्सा
एक न्यायाधीश महाराज असतात,,खादाड असतात पण फार चतुर..
त्यांचा एक विश्वासू किराणा दुकानदार होता मारवाडी समाजांतला.
काम व्हावे म्हणून जी रक्कम ठरायची ति मारवाड्या कडे पोहोचती झाली की काम व्हायचे..
न्यायाधीश महाराज पण किराणा ध्यायच्या निमित्ताने दुकानात गेले की सांकेतिक भाषेत गप्पा चालायच्या..
नवीनं गहू आला की नाही दुकानात???
हो आला आहे ना .. ति काय २ पोती भरून ठेवली आहेत आपल्या साठी..असे म्हणून तो कोप~यात २ पोती उभी केलेली असायची त्या कडे बोट दाखवायचा..
महाराज समजायचे २ लाख जमा झाले आहेत म्हणून
मारवाडी म्हणायचा "पोती कधी पोहोचती करू??
सांगतो तुला योग्य वेळ आली की सद्ध्या भरपूर गहू घरात पाडून आहे..
मारवाडी समजून घ्यायचा..
एका संध्याकाळी न्यायाधीश महाराजांना बातमी समजते..मारवाड्याचे निधन झाले.... मारवाडी गचकला...
दुकान तर बंद होते..क्रियाकर्मे आटोपली अन जज साहेब दुकानात पोहोचले
गल्ल्यावर मुलगा होता सांत्वनाचे ४ शब्द बोलल्यावर जज म्हणाले " बाबानि काही माझ्या बद्दल सांगितले का?
फारसे नाही पण म्हणाले..पण म्हणत होते.. जज साहेब आले तर त्यांच्या घरी कोप~यात ठेवलेली गव्हाची २ पोती त्यांच्या घरी त्यांनी सांगितल्यावर पोहोचती कर... बस्स इतकेच..
जज साहेबांनी मनातल्या मनात कपाळावर हात मारून घेतला..
मग पाठवू का पोती गव्हाची? मुलगाविचारत होता..
पाठव ..इतकेच जज साहेब म्हणाले.. बोलता येईना अशी अवस्था होती..
घरी आल्यावर बायकोने मात्र झापले " हवीत कशाला २-२ पोती गव्हाची? पोरकिडे होतात..इथून पुढे असले उद्याग करण्या आधी मला विचारत चला...
जज असला म्हणून काय झाले? घरातल्या सुप्रीम कोर्टाच्या जज पुढे थोडेच न त्याचे काही चालणार होते?
प्रतिक्रिया
7 Sep 2014 - 12:00 am | मुक्त विहारि
आता
लेख वाचतो...
7 Sep 2014 - 7:53 am | खटपट्या
अकु, जरा कथा समजावून सान्गाल काय ?
7 Sep 2014 - 12:22 pm | दिपक.कुवेत
किती सोपा आहे कथेचा अर्थ.....थोडक्यात एकदम बल्क मधे गहु घेउन ठेवु नका. पोरकिडे होतात. जशी गरज पडेल तसे घेत चला :D
7 Sep 2014 - 12:28 pm | प्रभाकर पेठकर
नाहीतर दुकानदाराची 'पोरं'...... 'किडे' करतात.
7 Sep 2014 - 12:31 pm | दिपक.कुवेत
:D :D :D
(कधीच किडे न केलेला) दिपक
7 Sep 2014 - 12:35 pm | खटपट्या
असं आहे होय !! मी तीनदा वाचली !!
7 Sep 2014 - 5:42 pm | अनंत छंदी
एक अगदी खरा किस्सा सांगतो. साधारण पंचवीसेक वर्षांपूर्वी घडलेला. कोकणातील एक तालुक्याचे गांव. तिथे एक प्रसिद्ध वकील होते.अशिलांची त्यांच्याकडे नेहमी गर्दी असे. त्याच तालुक्यातल्या एका गावात दोन भाऊ रहात असत, शेती करत. त्यातील एका भावाचे वृद्धापकाळाने निधन झाले, आणि त्याचा थोरला मुलगा त्या भावाच्या बाजूचा कर्तापुरुष म्हणून वावरू लागला. त्या तरण्या पोराला काकाचे विचार पटेनासे झाले, आणि मामला मिळकतीच्या वाटणीसाठी कोर्टाच्या दारात येऊन ठेपला. पुतण्याचे तरुणरक्त, त्याने त्या प्रसिद्ध वकिलांना भेटून आपले वकीलपत्र देऊनही टाकले. दोन दिवसाने काकाही तालुक्याच्या गावी येऊन ठेपले, त्या प्रसिद्ध वकिलांकडे गेले. तेव्हा त्या वकिलांनी त्यांना सांगितले की, "अरे, मी आधीच तुझ्या पुतण्याचे वकीलपत्र घेऊन बसलो आहे. मला तुझे वकीलपत्र नाही घेता येणार!" काका बिचारे हिरमुसले. विचारात पडले. बिचारा अशिक्षित माणूस आता काय करावे म्हणून गोंधळून गेला. "मग, आता काय करू?" त्यानी त्या वकीलांनाच विचारले. त्यावर ते वकील म्हणाले. "हे बघ, आपल्या गावात आत्ता एक नवीन वकील आला आहे, पोरगाच आहे पण हुशार आहे. मी त्याला चिठ्ठी देतो. तो तुझे वकीलपत्र घेईल. बाकी मी आहेच" काकांपुढे उपाय नव्हता. त्यांनी मान डोलावली. मग वकिलांनी एक चिठ्ठी लिहून काकांना दिली आणि त्या वकिलाकडे जाण्यास सांगितले. काका निरक्षर असले तरी हुषार होते. त्यांनी त्या वकिलांकडून बाहेर पडल्यावर रस्त्यात एका सुशिक्षित माणसाला गाठले. आणि त्याला म्हटले. "साहेब, जरा एव्हढी चिठ्ठी वाचून दाखवा हो." त्या माणसाने चिठ्ठी वाचली त्यात लिहीले होते. " एक गाय मी माझ्या गोठ्यात बांधली आहे, दुसरी तुझ्याकडे पाठवत आहे. आपण दोघे मिळून भरपूर दूध काढूया!" :) काका त्याच पावली गावात परतले. संध्याकाळी मांडवात बैठक बसली. पुतण्याच्या समोर त्याच्या वकिलाची चिठ्ठी ठेवण्यात आली. आणि कोकणात अघटित घडले. एक दावा कोर्टात गेलाच नाही. ते प्रसिद्ध वकील काही वर्षांपूर्वी वारले. दुसरे अजून हयात आहेत, त्यामुळे गावाचे नांव वगैरे देत नाही. उगाच अब्रूनुकसानीच्या खटल्याला तोंड कोणी द्यायचे? :)
7 Sep 2014 - 6:44 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
जल्ला!! परशुराम लोट्याचा किस्सा आहे का? :)....तिकडे असा एक किस्सा ऐकलाय मामाकडुन वकीलाच्या नावासकट!
7 Sep 2014 - 9:02 pm | अनंत छंदी
पण तिथून जवळच आहे. :)