आज जरा उशिराच जाग आली. अरे बापरे ! ८ वाजले. मी कधीच इतक्या उशिरापर्यन्त झोपून रहात नाही. कारण मी गुणी बाळ आहे. आजकाल मी स्वतः आपल्या हातने ब्रश करतो, स्वतःचं सगळं आवरतो. आईला किती कौतुक वाटतं माझं! माझी खोली आवरणं, कपाट आवरणं, बाहेर जाताना माझ्या सगळ्या गोष्टी घेणं हे आता खरं तर स्वतःचं स्वतः करण्याइतका मोठा झालोय मी. पण आईला ते पटतच नाही. खरच मोठा झालोय मी आता. असो.
पटापट आवरुन खाली नाश्त्याला जावं; नाहीतर तो भरवायला कोणीतरी वरती माझ्या खोलीत यायचं. आमचा गोतावळा खूप मोठा. घरात माणसंच माणसं. आई, काकू, काका, मावशी, आत्या अगदी सगळेच्या सगळे. पण कोणालाच मी मोठा झालोय हे पटत नाही. आता आवरुन लौकर ऑफिसला जावं. नाहीतर बायको खालून आवाज देईल. हो मी ऑफिसला जातो आणि माझं लग्नही झालंय. म्हणलं ना मी मोठा झालोय!
आज ऑफिसमध्ये जाऊन खूप लोकांसमोर फिलॉसॉफिकल लेक्चर्स झाडायची आहेत, त्यांना कुटुम्बाचं महत्त्व पटवून द्यायचं आहे. मग ते लोक माझं कौतुक करतील. करणारच ना. मी आहेच्चे गुणी बाळ!
बाकी तसं फार काम नसतं मला ऑफिसमध्ये. माझा स्वतःचा बिजनेस असला म्हणून काय झालं ! हो..माझा बिजनेस आहे. आहे की नाही मी गुणी बाळ?
आईचा खालून आवाज आला. आता एवढी माणसं आहेत घरात ; पण सगळ्यांच्या IQ ची बेरीज केली तरी ती माझ्या बायकोच्या आईच्या IQ पेक्षा कमीच येईल. पण मी असा विचार करु शकत नाही. गुणी बाळ आहे मी! बायको वरती यायला लागली आहे. ती सुद्धा आमच्या घरात अगदी शोभेल अशी आहे. गोडगोड वागणारी, आदर्शवादी, बावळट.. पण मी नाही असं काही म्हणणार. मी अगदी गुणी बाळ आहे.
आता तर मलाही एक गुणी बाळ होणार आहे. फक्त कधी ते माहीत नाही. असो. दाराबाहेरुन आवाज आला. "श्री दार उघड. काय करतोयेस एवढा वेळ ?" "काही नाही गं..तू किती हुशार आहेस असा विचार करत होतो.." तर तिने तिचा पेटन्ट डायलॉग मारला "काहीही हां श्री"!!!
-मीनल
याद्या
5855
प्रतिक्रिया
34
मिसळपाव
:)
:-) दहा महिने उलटून गेले की.
बायकोचा उल्लेख आला म्हणून
रा गां का?
In reply to बायकोचा उल्लेख आला म्हणून by अभ्या..
हा हा हा
टोटली!
हॅ हॅ हॅ!
ह्या ह्या! गूणी बाळ.
मस्तच...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- नटसम्राट... { असा नट होणे नाही ! }काही समजले नाही....
च्छ्या
In reply to काही समजले नाही.... by मुक्त विहारि
अहो....
In reply to च्छ्या by नाखु
खालील वाक्यात बदल करून हवा आहे...
In reply to अहो.... by मुक्त विहारि
बाबा
In reply to खालील वाक्यात बदल करून हवा आहे... by मुक्त विहारि
अज्ञानात सुख असतं
In reply to काही समजले नाही.... by मुक्त विहारि
रोज [सोम ते शनी ] रात्रो आठ
In reply to काही समजले नाही.... by मुक्त विहारि
:)
सुरुवातीला काही कळलं नाही. पण
सुरूवातीला वाटलं की काही तरी
मजा आली! धन्यवाद!
छान
परिस्थितिवर अवल्म्बून आहे. :)
In reply to छान by मी-सौरभ
तुम्ही Arithmetic Mean की Geometric की Harmonic
In reply to छान by मी-सौरभ
हा हा, मस्तं!
ही ही, मस्तं!
In reply to हा हा, मस्तं! by अनुप ढेरे
सुरुवातीला एकदम गूढगंभिरतेकडे
छान
छान
काहीही हं मीनल !!!
Chhan
:D
.
लय भारी कथा. केव्हां एकदाची
पण सगळ्यांच्या IQ ची बेरीज