Skip to main content

2016 पासून मिपावर प्रतिक्रिया देण्यास बंदी येणार? खरं का रे भाऊ?

प्रकाशित मुखपृष्ठ
("नाहीतरी "बंदी" हा शब्द आम्हा बहुतांश भारतीयाना लय आवडतो. "संध्याकाळी सात पर्यंत मुलीने घरी आलं पाहिजे."--आईबाबांची बंदी ते दारूबंदी पर्यंत." सरकारी बंदी) "२०१६ पासून मिपावर प्रतिक्रिया देण्यास बंदी येणार आहे.असं मी ऐक्लं.खरं का रे भाऊ?" "नाही रे,ही काही तरी अफवा असावी.अरे,प्रतिक्रिया नसतील तर मिपावर कोण येणार आहे? लेख एक असतो आणि प्रतिक्रिया अनेक असतात.तुझ्या लक्षात आलंच असेल." "ठरावीक वाचकच प्रतिक्रिया देतात.आणि त्यांच्या प्रतिक्रियेवर आणखी ठरावीक वाचक त्यांची प्रतिक्रिया देतात.मुळ लेख बाजुलाच रहातो असं बरेच वेळा होतं.आणि प्रतिक्रिया मिळण्यालायकच लेख असावा लागतो.असं मी ऐकलंय. माझं काही चुकलं का रे भाऊ?’ "तुझं अगदीच चुकलं असं काही मी म्हणणार नाही.पण एक लक्षात घे,अगदी नसेल पण बर्‍याच सुरवातीपासून मी मिपावर येतोय.(नऊ एक वर्षं झाली) आणि मी पाहिलंय की,असे अनेक प्रतिक्रिया देणारे वाचक,आणि त्यांच्या प्रतिक्रियेवर प्रतिक्रिया देणारे आणखी वाचक येऊन गेले.ते आता दिसायचे बंद झाले.आता नवीन आले.असेल एक्का-दुक्का पण तो एक्का दुक्काच.हे प्रतिक्रिया देऊन कंटाळतात का? आणि म्हणून बंद होतात का? हे नकळे. मी पण अधुनमधून प्रतिक्रिया देत असतो." "पण समजा, बंदी आलीच तर मिपाचं काय होईल रे भाऊ?" "अरे,तू इतका इंटीलीजंट प्रश्न करशील अशी अपेक्षा नव्हती.पण तुला सांगू का मिपाचं काहीही होणार नाही.उलट लेखनाला उत येईल." "उत येईल,म्हणजे काय रे भाऊ?" "अरे,म्हणजे,प्रतिक्रिया देण्याचं बंद झाल्याने,काही नुसतीच प्रतिक्रिया देणारेही लेख लिहतील.त्यामुळे लेखनाला उत येईल असं मला म्हणायचं आहे." "म्हणजे प्रतिक्रिया देणारे काही नुसतीच प्रतिक्रिया देतात लेखन करीत नाहीत असं तुला का रे,म्हणयचं आहे.?" "तसं नाही रे,पण प्रतिक्रिया द्यायला पण, "बोचक,सुचक,रोचक,खोचक,वाचक" असावं लागतं.ते येर्‍या-गबाळ्याचं काम नसतं रे.आणि असं होत असताना संपादक मंडीळीना "वेचक" असण्यासाठी सतर्क असावं लागतं असं माझं आपलं प्रामाणीक मत आहे.कदाचीत मी चुकतही असेन." "तुझ्या ह्या लेखनावर अनेक प्रतिक्रिया येतील असं तुला वाटतं का रे,भाऊ?" "मुळीच नाही रे,कदाचीत ह्या लेखनावर शून्य प्रतिक्रिया येतील किंवा अनेक येतील."इट डिपेंट्न्स रे" प्रतिक्रिया देणार्‍यांचं शास्त्र जाणणं बरंच कठीण असतं रे. ते हवामाना सारखं असतं असं मला वाटतं" "म्हणजे एकंदरीत तू प्रतिक्रियांच्या "फॉर" नाहीस असं मी म्हटलं तर माझी चूक आहे असं तू मला म्हणशील का रे भाऊ?" “अरे मी नक्कीच फॉर आहे.त्याचे खूप फायदे असतात.समाधानीपासून समाधीपर्यंत. मला कवीवर्य मंगेश पाडगांवकरांचं ते बोलगाणं आठवलं आणि त्यात काहीसा फरक करून माझं उत्तर तुला मी देतो.अर्थात,श्री.पाडगांवकरांची क्षमा मागून.(एक वेंगुर्लेकर दुसर्‍या वेंगुर्लेकराक क्षमा दिल्याशिवाय र्‍हवचो नाय) जशी गाय जवळ आली की वासरूं लुचूं लागतं तसं आपण विचार करूं लागलो की, आपल्याला लेख सुचूं लागतो. लेख आपण साईटवर लिहूं शकतो लेख आपण आपल्या ब्लॉगवर लिहूं शकतो. साईटवर लिहिलं म्हणून लेख मोठा नसतो ब्लॉगवर लिहिलं म्हणून लेख छोटा नसतो एक गोष्ट नक्की असते तिन्हीकाळ पक्की असते आपला लेख आपल्याला पटला पाहिजे आणि त्यावर प्रेम करीत आपण तो रेखाटला पाहिजे. लेख असा असला पाहिजे, म्हणून आपल्यावर कुणाचं बंधन नसतं लेख तसा असला पाहिजे, म्हणूनही आपल्यावर कुणाचं बंधन नसतं कुठलाही विचार आपल्याला सुचूं शकतो त्यावर आपण लेख लिहू शकतो एकटं एकटं चालताना विचार करता येतो कागद पेन्सिल घेऊन विचार करता येतो. जेव्हा आपला मुड लागतो लेख आपणच सुचूं लागतो एक गोष्ट नक्की असते तिन्हीकाळ पक्की असते आपला लेख आपल्याला पटला पाहिजे आणि त्यावर प्रेम करीत आपण तो रेखाटला पाहिजे तुमचं आणि आमचं मन जुळतं तेव्हा दोघानाही लेख कळतो माझा लेख मग तुम्ही वाचूं लागता आणि माझ्याच आनंदात तुम्ही वाटेकरी होता. कधी लेख दिठीचा कधी तो मिठीचा कधी लेख एकाचा कधी तो एकमेकाचा लेख हा लेखाचं मोल असतं लेखा पुढे बाकी सगळं फोल असतं फुटपट्टी घेऊन लेख मापता येत नाही द्वेष करून लेखाला शापता येत नाही एक गोष्ट नक्की असते तिन्हीकाळ पक्की असते आपला लेख आपल्याला पटला पाहिजे आणि त्यावर प्रेम करीत आपण तो रेखाटला पाहिजे शेवटी काय? प्रति्क्रिया देणार्‍यांनी प्रतिक्रिया देत रहावं अन लेख लिहिण्यार्‍यांनी त्यात आनंद घेत रहावं असंच तुला म्हणायचं आहे ना रे,भाऊ? होय,अगदी तस्संच! श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)

याद्या 2540
प्रतिक्रिया 9

लेखनप्रकार
कित्येक लेख/लेखमाला खरच सुंदर असतात, आवडतात किंवा पटतात काही मनाला घरे पाडतात, पन प्रत्येक लेखावर प्रतिक्रीया देने कधीच शक्य होत नाही, त्यालाही बरीच कारणे असु शकतात, उदा. वेळ नसने, कंटाळा...... त्यामुळे प्रतिक्रीयांसोबतच अशी एखादी पर्यायी व्यवस्था गरजेची आहे जी लेख आवडला आहे याचे सुचक असेल.

आपला लेख आपल्याला पटला पाहिजे आणि त्यावर प्रेम करीत आपण तो रेखाटला पाहिजे आवडली. डोक्यातली खाज मिटवली पाहिजे, काहीतरी रोज लिहिले पाहिजे, वेळ मिळेल तर लेख लिहा, नाही तर किमान प्रतिक्रिया द्या.

एक गोष्ट नक्की असते तिन्हीकाळ पक्की असते आपला लेख आपल्याला पटला पाहिजे आणि त्यावर प्रेम करीत आपण तो रेखाटला पाहिजे
वा सामंत साहेब, क्या बात है।