Skip to main content

वावर

नीलकांतला लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा………!

रुमानी यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनविषय:
लेखनप्रकार
नमस्कार. मिपा पाहा आज कसं सजलंय. :) आज मिपा उघडलं आणि मिसळपावच्या मुख्य पानावर नीलकांत यांच्या लग्नाचं निमंत्रण दिसलं. मिसळपावाचं चित्र जाऊन आज तोरण, सनई चौघडे , प्रसन्न आणि मंगलमय वातावरण असे चित्र निमंत्रण वाचताना डोळ्यासमोर उभे राहिले आणि लक्षात आलं मिपा मालकाच्या लग्नाची तयारी जोरदार झालेली आहे.आता पै पाहुणे यायला लागतील. पण, असा मिपा परिवार ज्यांनी उभा केला. व तो अतिशय आपुलकी व प्रेमाने जोपासला कधी अतिशय कडक पण तरीही मृदु शब्दात चोप देऊन . मिपाला आणि मिपाकरांना एक आत्मीयतेची शिस्त लावून कुटुंबाप्रमाणे जपलं. मिपासाठी वेळ दिला .असा आपला सर्वाचा लाडका नीलकांत . सनई चौघडयाच्या.

एका गारुड्याची गोष्ट ४: साप पकडणे !

जॅक डनियल्स यांनी या दिवशी प्रकाशित केले.
एका गारुड्याची गोष्ट १ : पुण्याचे पत्ते - माझा छंद ! एका गारुड्याची गोष्ट २ : विद्यार्थी बनतो सापवाला ! एका गारुड्याची गोष्ट ३ : सर्पोद्यान चे कॉल म्हणजे काय रे भाऊ...फक्त राजाभाऊ ! ....मला घरी फोन यायचा "अहो ते साप वाले आहेत का ? आमच्या घरी/बागेत/रस्त्यावर/गच्चीवर/स्वयंपाकघरात इ.भला मोठा साप आहे...तुम्ही ताबडतोब या":- ही अशी वाक्य ते एका दमात बोलायचे. मी तर जे हातात असेल ते सोडून पूर्ण जीव फोन मध्ये लावायचो.

(जंगलातला) आजोबा !!

जॅक डनियल्स यांनी या दिवशी प्रकाशित केले.
'सुजय डहाके' हा एक मराठी चित्रपटसृष्टीतला प्रयोगशील दिर्दर्शक ! सुरवातीचा चा पिच्चर 'शाळा' काढून त्याने सगळ्यांना 'इचीभना' म्हणायला लावला. त्याचा नवीन येणारा चित्रपट म्हणजे 'आजोबा'! आजोबा नावाच्या एका बिबट्याची गोष्ट त्याने सुंदर चित्रबद्धीत केली आहे. आजोबाला बघा आणि अनुभवा ! 'आजोबा' हे कसले बिबट्याचे नाव..पण हाच बिबट्या वाघ महाराष्ट्राच्या जंगलचा राजा होता. जसा राजा आपल्या प्रजेपासून अंतर ठेवून राहतो तसा तो ऐटीत जंगलात राज्य करायचा पण नंतर हीच प्रजा मारुतीच्या शेपटी सारखी वाढत गेली आणि राजाचे राज्य कमी होऊ लागले.

एका गारुड्याची गोष्ट ३ : सर्पोद्यान चे कॉल म्हणजे काय रे भाऊ...फक्त राजाभाऊ !

जॅक डनियल्स यांनी या दिवशी प्रकाशित केले.
एका गारुड्याची गोष्ट १ : पुण्याचे पत्ते - माझा छंद ! एका गारुड्याची गोष्ट २ : विद्यार्थी बनतो सापवाला ! आधीच्या भागात लिहिल्या प्रमाणे मी सापांचे कॉल (कॉल: साप, घोरपड, घर, गरुड, घुबड ,उदमांजर , रानमांजर इ. पकडण्यासाठी साठी आलेला फोन) करायला सुरवात केली. पण कुठून यायचे हे कॉल ? कोण करायचे ? नंतर त्या सापांचे काय व्हायचे ?

मारा डंख मारा डंख मारा बिछुवा, मिपाप्रवेशाकांक्षिण्यांची गोची आणि आमची काशीयात्रा

चित्रगुप्त यांनी या दिवशी प्रकाशित केले.
"ओ मारा डंख मारा डंख मारा बिछुवा… तोहरे प्यारके जहर चढे मितवा…" 'अपनीही मस्तीमे झूमते हुए' का काय म्हणतात तसा, आपल्याच धुंदीत, द्रुतगतीनं पायडिलं हाणत, गाणं म्हणत मी घराकडे सायकलत होतो.पोटात भूक खवळली होती आणि केंव्हा घरी पोचून वेगवेगळ्या मस्त रेसिप्या हाणतो, असं झालं होतं. आजची संध्याकाळ माझ्यासाठी 'ये शाम मस्तानी मदहोश किये जा… ' अशी ठरली होती.… दुपारी मला जेंव्हा बायकोनं सांगितलं की "अहो, आज संध्याकाळी पाच ते साडेआठ तुम्ही कुठेतरी एकटेच फिरायला जाउन या" तेंव्हा मी आश्चर्यानं विचारलं, "का गं, आज अचानक एवढी मेहेरबान कशी झालीस माझ्यावर?

लहानपण देगा देवा....

किसन शिंदे यांनी या दिवशी प्रकाशित केले.
बालपणीचा काळ सुखाचा असं म्हणतात ते अगदीच काही खोटं नाही. आणि या काळात सर्वात जास्त सुख मिळतं ते मे महिन्यातल्या किंवा दिवाळीतल्या सुट्टीत गावी गेल्यावर! त्यातल्या त्यात दिवाळीपेक्षा मे महिन्यात मिळणारी लांबलचक सुट्टी मिळाली म्हणजे आनंदाला उधान यायचं फार!! याचं कारण म्हणजे बहुतेक सगळी नातेवाईक मंडळी त्यांच्या कच्च्याबच्च्यांसह या काळात गावी आवर्जून यायची. वार्षिक परीक्षा संपलेली असायची आणि डोक्यावरचं एक मोठ्ठं ओझं आणि मनावचं एक अनामिक दडपण शतपटीने उतरलेलं असायचं.

काही मानवी अनुभव

तिमा यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनप्रकार
आम्ही दोघी सख्ख्या बहिणी. ती थोडी उजळ.मी सावळीच आहे.. एका उंच इमारतीत रहातो आम्ही. आई आमच्या लहानपणीच गेली. म्हणजे एक दिवशी रात्री ती जी बाहेर गेली ती परत आलीच नाही. मग आम्ही दोघीच उरलो एकमेकींना. एका घरी जास्त काळ नाही रहायचो. पण जेंव्हा भेटायचो तेंव्हा आमच्या चु(क्)चु(क) वाणीत भरपूर गप्पा मारायचो. मी जात्याच खोडकर होते. तरी बहीण नेहमी मला म्हणायची," तू बाई फार धोका पत्करतेस. एकदिवशी जीवावर बेतेल तेंव्हा समजेल." पण मला आवडायच्या खोड्या काढायला! आता, त्या दिवशीचीच गंमत सांगते. दिवाळीचा पहिलाच दिवस होता तो. एका किड्याचा पाठलाग करता करता मी लिफ्टमधे गेले.

नायक क्रमांक एक

ज्ञानोबाचे पैजार यांनी या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या आगामी " नायक क्रमांक एक" या चित्रपटातले शिर्षक गीत खास आमच्या चाहत्यांसाठी. या चित्रपटाची पटकथा, संवाद आणि गीते आम्ही स्वतः लिहिली आहेत याची वाचकांनी कॄपया नोंद घ्यावी. (कंसातल्या सुचना दिग्दर्शकासाठी असुन, नायक नायिकेने कंसाबाहेरच्या शब्दांचे गायन करत नॄत्य करायचे आहे. चित्रीकरण सुरु करण्या आधी कॅमेरामॅनच्या कॅमेर्‍याची बॅटरी चार्ज आहे कि नाही ते तपासावे) (ज्याच्या कडे बर्‍यापैकी कपडे असतील त्यालाच नायक म्हणुन घेण्यात यावे. नायिका आम्ही आधिच निवडली आहे.

अवलिया

मंदार कात्रे यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनविषय:
लेखनप्रकार
अवलिया नमस्ते ,मी चंदू खानविलकर अबुधाबी साठी जेट एअरवेज ची फ्लाइट पकडण्यासाठी एअरपोर्ट वर उभा असताना एक चाळीशीचा चष्मेधारी मराठी माणूस जवळ येवून उभा होता. त्याने माझ्या पासपोर्ट वरील नाव पाहून लगेच हस्तांदोलना साठी हात पुढे करून स्वत:ची ओळख करून दिली. तुम्ही Costain साठी जाताय का? तो म्हणाला होय,पण तुम्हाला पूर्वी कुठेतरी पाहिल्यासारखे वाटतेय –मी हो, आपण कतार ला भेटलोय आधी , तुमच्या कॅम्पमध्ये तो अन्वर होता ना, त्याच्या रूमवर आलो होतो मी एकदा . तो म्हणाला अच्छा. मग आत्ता कुठे चाललात ? आत्ता मीही Costain लाच चाललोय , आयलंडला.

आणखी एक टायटॅनिक-३

लॉरी टांगटूंगकर यांनी या दिवशी प्रकाशित केले.
भाग पहिला भाग दुसरा सत्तर ते ऐंशी अंशात कललेलं जहाज आता किनाऱ्याजवळ एका ठिकाणी येऊन स्थिर झालेलं. काही लोकं अजूनही जहाजावर होते.मेयर मेरीको पेल्लेग्रीनी आणि कोस्टाचा डॉक्टर दोघे मिळून सर्व लोकांना बाहेर पडण्यास मदत करत होते. मेरीकोला मदत करण्यात काही क्रू मेम्बर्स होते. थॉमस मेंडोसा या सफाई विभाग प्रमुखाने बऱ्याच लाईफ बोटी सोडण्यात मदत केली. पाण्यात पडून हायपोथर्मियाने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.