Skip to main content

वावर

खरडवह्या.. एक अनमोल ठेवा.

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी गुरुवार, 13/09/2012 19:52 या दिवशी प्रकाशित केले.
हे सर्व लिखाण खरेतर काथ्याकुटात टाकावे, का जनात-मनात तेच कळत नाही. म्हणाले तर ह्यावरती चर्चा होऊ देखील शकेल. पण मंडळाने निर्णय घेतलाच असेल तर त्यावर चर्चा नको म्हणून सरळ जनात-मनात लिहून फक्त भावना मोकळ्या करत आहे.
दिनांक १५/०९/२०१२ रोजी मिसळपाव वरील सर्व सदस्यांच्या खरडवह्या आणि मिपाचा खरडफळा मोकळा केला जाईल. त्यापूर्वी आपल्या खरडवहीत काही महत्त्वाचे असेल तर कृपया त्याची प्रत साठवून ठेवावी.

ट्रफिकची भेळ

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी बुधवार, 05/09/2012 21:54 या दिवशी प्रकाशित केले.
आतुन बाहेर पाहू म्हणता काचेवर धुक्याचा खेळ बाहेर कशी मजबुत झालिये वहानांची पुरति भेळ पावसाचं पाणी भेळेवरती वाढवू पाहातय तिचा भाव त्यातच मधे बाइकवाला जणू फिरे पातेल्यात डाव पुढे एक छोटी गाडी गाडिवरती रांगडी घोडी ट्रॅफिक जॅम असुन सुद्धा वाट देती तिला थोडी इतक्यात तिथे एक काकु घरी पहाती फोन टाकु मागून काका म्हणती त्यांना तू चालव मी देतो टेकू मी कडेला गाडीमध्ये पार्किंग करुन बसलोय मस्त बाहेर छान भेळ जमतीये मजेमजेनी करतोय फस्त रोज त्याच तिकिटावरती चालु होतो तोच खेळ उद्या या तुंम्ही सुद्धा दोघे मिळुन खाउ भेळ ...
काव्यरस

दै. लोकमत आणि 'मिसळपाव'

लेखक पैसा यांनी रविवार, 02/09/2012 12:05 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळी घरातले काम करताना पेपर वाचला नव्हता. पण सुहास.. ने फोन केला आणि सांगितलं. आजचा दै. लोकमत वाच. त्यातल्या मंथन पुरवणी मध्ये 'मायबोली, मिसळपाव ते साहित्यसंस्कृती' हा लेख आला आहे. मंथन पुरवणीच्या दुसर्‍या पानावरचा लेख वाचला. लेखकाने मराठी संस्थळांचा चांगला परामर्ष घेतला आहे. त्यात आपल्या 'मिसळ्पाव' चा छान उल्लेख आहे (लोगो सकट). शिवाय संस्थळाची लिंकही दिलेली आहे. दै.

Samsung विरुद्ध Apple

लेखक गुरुनाथ्काळे यांनी बुधवार, 29/08/2012 23:23 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपा करहो. बरेच वर्ष मी मिपा वर वाचनीय होतो. पण आज न राहावून.. निमित्त काढून लिहिता झालो.

नागांव …. माझं सर्वात आवडते ठिकाण

लेखक आनंद भातखंडे यांनी मंगळवार, 21/08/2012 14:26 या दिवशी प्रकाशित केले.
(जानेवारी २०१२ मध्ये माझ्या नागावातील घराबद्दल लिहिलेला लेख मिपाकरांसाठी देत आहे) नागांव …. माझं सर्वात आवडते ठिकाण. मुंबई ला जवळ, शनिवार/रविवार प्रचंड गर्दी असलेला one day picnic spot. पण या कारणासाठी नागावची ओढ नाही. तर ओढ आहे ती या मातीची, निसर्गाची … तिथल्या सगळ्याचीच. नागांव चे वास्तव्य म्हणजे मला लागलेलं एक व्यसनच आहे म्हणा हवे तर. दोन महिने तिथे गेलो नाही तर जीव घुटमळत होता. शेवटी १३ जानेवारीच्या रात्री जायचा योग आला …. तसा तो ओढून ताणूनच आणला. बऱ्याच कामांना टांग दिली आणि गाडी रेमटवत रात्री १२:३० ला बंगल्याच्या आवारात पोचलो.

अनोखे रक्षाबंधन

लेखक आनंद भातखंडे यांनी सोमवार, 06/08/2012 17:41 या दिवशी प्रकाशित केले.
अनोखे रक्षाबंधन दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी माझ्या मुलीच्या विद्यानिकेतन शाळेत पालक सभेच्या निमिताने जाण्याचा योग येतो. एका चांगल्या आणि नावाजलेल्या शाळेत माझ्या मुलीला प्रवेश मिळाला आणि तिची शैक्षणिक प्रगती सुरु झाली. या शाळेच्या प्रवेश प्रक्रियेचे सगळे सोपस्कार पूर्ण करून ज्यांना प्रवेश मिळतो त्यांचे पालक कृतकृत्य होतात आणि ज्यांना मिळत नाही ते नेहेमी प्रमाणे त्यांच्या कार्यप्रणालीला नावे ठेवतात. विद्यानिकेतन शाळा तशी डोंबिवलीच्या गजबजाटापासून लांबच.