Skip to main content

वावर

मुक्काम व पोष्ट वाडे- २

लेखक kurlekaar यांनी गुरुवार, 20/03/2014 22:30 या दिवशी प्रकाशित केले.
- मु. पो. वाडे ४ –लायब्ररी तेंव्हा कोंकणात कांही मोजक्याच गांवांत हायस्कुल असायचं. हायस्कुल असलेलं गांव प्रगत समजलं जायचं. वाड्याला तेंव्हा हायस्कुल होतं एवढंच आठवतंय. मी स्वतः तेंव्हा मराठी शाळेत म्हणजे नगरपालिकेच्या शाळेत बहुधा असणार आणि तेंव्हा हायस्कुल कडे पाहणं म्हणजे हायस्कुलवाल्यांनी कॉलेज कडे पाहण्यासारखं होतं. गेल्या वर्षी पाहिली ती हायस्कुल ची इमारत मात्र गोरी गोमटी-मध्यमवर्गीय वाटली—almost माझ्या लहानपणी पार्ले किंवा गिरगावातली एखादी शाळा असावी तशी. वाडयात शिक्षणाचं वारं बहुधा स्थानिक ब्राह्मण वर्गाकडून आलं व ते बरीच वर्षे त्याच वर्गाने टिकवुन धरलं.

माझं कोकणातलं गांव :- भाग-४ (परतीचा प्रवास)

लेखक प्रमोद देर्देकर यांनी बुधवार, 19/03/2014 14:27 या दिवशी प्रकाशित केले.
माझं कोकणातलं गांव :- भाग - ३ मागील भागात>> घरी येता येईतो चांगलाच अंधार पडलेला असायचा. दिवे लागणी झाली कि मग पर्वचं वगैरे होवुन गाण्याच्या भेंड्या, पत्ते खेळणं असा सगळा वेळ जायचा. तिथुन पुढे >> कधी दुपारी मी आणि काका घराजवळच्या हौदात पन्हाळीला पिण्याचे पाणी येत नाही म्हणुन जिथुन पाणी येतं तिथपर्यंत पर्‍यात पाट साफ करत जायचो. हा पर्‍या गणपतीच्या देवळाकडे जाताना जो पर्‍या लागतो तोच पण त्याच्या थोडं वरती जावं लागतं. तिकडे जायला वेगळी एकेरी पाऊलवाट आहे. वाटेत भरपुर दगड धोंडे आहेत.

युरोप मधील पहिला वाहिला धमाल मिपा.कट्टा म्युनिक मधला

लेखक दिव्यश्री यांनी बुधवार, 19/03/2014 14:01 या दिवशी प्रकाशित केले.
तारीख १३ आणि १४ मार्च २०१४ हे दिवस अविस्मरणीय राहतील माझ्या आयुष्यात कारण साधुसंत येती घरा...चा अनुभव मला परदेशात घेता आला . श्री.निनाद , श्री.पेठकर काका , सौ . पेठकर काकू आणि आम्ही दोघे असा कट्टा झाला . खरं तर कट्टे झाले २ दिवस सलग . निनाद यांनी मला आधी सांगितले होते कि काका आणि काकू म्युनिक दौर्यावर येत आहेत . मी तयार होतेच , कट्ट्याला हजेरी लावायला . :D १३ तारखेला सक्काळ सक्काळीच फोणाफोणी करुण आम्ही मरियन प्लात्झ (म्युनिक मधील प्रसिद्ध ठिकाण ) ला भेटायचं ठरवलं . त्यानुसार आम्ही भेटलो .

मुक्काम व पोष्ट वाडे

लेखक kurlekaar यांनी शनिवार, 15/03/2014 12:23 या दिवशी प्रकाशित केले.
मु. पो. वाडे गेल्या शतकाच्या सुरुवातीसच आमच्या तीर्थरुपांचे आई-वडिल कोंकणातून मुंबईत आले व माझ्या जन्मापूर्वीच त्यांचं निधन झालेलं होतं. तेंव्हा कोंकणातून मुंबई कडे पसरणाऱ्या अनुबंधाची एक तार आधीच तुटलेली; आता उरलं ते फक्त आजोळ—वाडे. (जिल्हा सिंधुदुर्ग). मला वाटतं माझी आजी (आईची आई) जिवंत असेपर्यंत आमच्या आईची माहेरची ओढ तसूभर कमी झाली नाहीं; पर्यायाने बऱ्याच उन्हाळाच्या सुट्ट्या आम्ही भावंडानी वाड्याला घालविल्या होत्या, त्यात कांहीशा माझ्या वाट्याला आल्या पण ज्या आल्या त्या मात्र नंतरच्या अनेक वर्षांसाठी आठवणींच मोहोळ निर्माण करून गेल्या. माझी आजी म्हणजे एक विलक्षणीय व्यक्तिमत्व होतं.

स्पेशल "26" ... (घारापुरी कट्टा!)

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी सोमवार, 03/03/2014 15:04 या दिवशी प्रकाशित केले.
तो मेरे मि.पा.करों... अब हम देखने जा रहे है... मि.पा. के जाने आउर माने सदश्यों का एक ऐसा रंगीन कट्टा.. एक ऐसा रंगीन नजारा ..जिसमे, "ड्रामा है..ट्रॅssssजिड्डी है... कॉमेडी है" https://lh4.googleusercontent.com/evonK-xthiHvDPFJh6vh8je0XcYWeTcdaO6eWYaJO00=w140-h54-p (ढिश्श..क्लेमरः- धागा आध्यात्मिक असल्यामुळे स्मायल्या भरपूर असणार आहेत! त्यामुळे ऐहिकां'न्नी फिल्टर-लाऊण धागा पहावा..म्हणजे मणा'स त्रास होणार णाही!!! =)) ...

अरे तुझ वय काय?

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी सोमवार, 17/02/2014 12:32 या दिवशी प्रकाशित केले.
अरे तुझ वय काय? एम आय डी सी भोसरी ला असताना सकाळी १०-१०.३०च्या सुमारास आम्हि ७-८ मित्र चहा साठी एका जवळच्या उपहार जमायचो.. चहा पाणी..व्यवसाय चर्चा व गाव गप्पा असे मिटिंग चे स्वरुप असायचे.. अनेक विषय चघळायला असायचे.. त्यात आमचा एक क्ष नावाचा मित्र होता..त्याला जर एखादा विषय वा विधान पटले नाहि कि त्याची एक ठराविक म्हण होति ति तो वापरायचा.. अरे तुझ वय काय? शिक्षण काय.?.पगार काय?उंची काय ?

"नवरा - बायको म्हणले की हे असे होणारच"

लेखक वैभवकुमारन यांनी बुधवार, 12/02/2014 17:35 या दिवशी प्रकाशित केले.
"नवरा - बायको म्हणले की हे असे होणारच" (व्याकरणामध्ये चुका झाल्या असतील तर समजून घ्यावे) भांड्याला भांडे लागणारच शब्दाने शब्द वाढणारच ती त्याचे म्हणणे खोडनारच तो एक शीवी हासडून बोलणारच नवरा - बायको म्हणले की हे असे होणारच ||1|| वातावरण शांत होते न होते तेवढ्यात …… … तीचे ओठात पुटपुटने होणारच परत ह्याचा पारा चढणारच मग काचेचा ग्लास कोणी फोडणारच भरल्या घरात हे असे घडणारच नवरा - बायको म्हणले की हे असे होणारच ||2|| मग ती थोडी पडती बाजू घेते न घेते तेवढ्यात ...... तो मागचे उकरून काढणारच नुसता जीव तोडून भांडणारच आगदी स्वतःच्याच लग्नाची जुनी पत्रीका फाडणाराच नवऱ्याचा अहंभाव पुढे मांडनारच नवरा - बाय

मराठी लोकांचे हिंदी बोलणे

लेखक दिव्यश्री यांनी बुधवार, 12/02/2014 14:16 या दिवशी प्रकाशित केले.
सर्वसामान्य पणे मराठी लोक हिंदी भाषा व्यवस्थित बोलू शकत नाहीत अस निरिक्षण आहे,आणि त्याला फारच कमी अपवाद असतील. मी देखील फार सुंदर हिंदी बोलते असे नाही.मराठी लोक जर कधी हिंदी भाषेत बोलले तर फार गमतीदार प्रसंग घडतात.आणि जो बोलतो त्यालाही ते नंतरच समजते.असाच एक किस्सा आमच्या बाबतीत घडला. तो इथे मांडते आहे. :) आम्ही डिसेंबर मध्ये इटली मधील Milano नावाच्या शहरात फिरायला गेलो होतो.पोहोचे पर्यंत बराच उशीर झाला रात्रीचे १२.३० वाजले होते .प्रचंड थंडी आणि त्यामध्ये हॉटेल शोधायचे होते.बरेचसे लोक अर्धवट झोपेतच होते.