पैठणी दिवस भाग-१

झाली! सगळी तयारी झाली. दंतमंजन, पांघरूण, कपडे, साबण, इ. बारीकसारीक सामान भरून झाले. " प्रवासाला जाताना जितके कमी सामान न्याल तेवढे हाल कमी होतात." या जगमान्य सल्ल्याला अनुसरूनच बॅग भरणे सुरू होते. पण एक महिन्याच्या थांबा असल्यामुळे नाही म्हणता म्हणता 2 बॅग्स गच्च भरल्या होत्या. अरे हो! पण तुम्हाला सांगायचेच राहिले आम्ही कुठे निघालो ते. त्याच अस आहे की , माझे शिक्षण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय औरंगाबाद येथे सुरू होते. त्या वेळी मी आंतरवासिता (इंटर्नशिप) करत होतो. एका वर्षांच्या प्रशिक्षणात एका महिन्यासाठी ग्रामीण रुग्णालयात सेवा देणे अनिवार्य असते.

ईयत्ता नववीचा नवा पुरोक्रम

लेखनविषय:
लेखनप्रकार
नेमेची येतो पावसाळा तसे पावसाळ्या सोबत शाळाही सुरु होतात, काही ईयत्तांना नवे अभ्यासक्रम बदलून मिळतात. तसे या वर्षीचा नववीचा बदललेला अभ्यासक्रमाची पुस्तके नजरे खालून घातली. इंग्रजी गणितासारख्या काही विषयांचे अभ्यासक्रमातील बदल नक्कीच चांगले आहेत.

(why is there nothing rather than something ???????)

लेखनविषय:
डिस्क्लेमर : सध्या आम्हाला फावला वेळ भरपूर असल्याने आणि ...... आणि....... आणि......... आणि........हा लेख टाकला आहे.आमच्या लेखात कुठलेही वैचारिक धन नसल्याने, विचारवंतांनी ह्या धाग्याकडे दुर्लक्ष करावे, टवाळांनी, टवाळांसाठी काढलेला हा टवाळ धागा आहे.

शाळेचा पहिला दिवस

लेखनविषय:
लेखनप्रकार
आज १४ जून . . प्रदीर्घ सुट्टीनंतर पहिल्यांदा शाळेत जायचा दिवस . . .नवीन गणवेश . . नवीन वह्यापुस्तकं . . . नवीन वर्ग . . . . नवीन सवंगडी . . . आपलं नाव कुठल्या वर्गात येतंय त्याची उत्सुकता . . . आपला हजेरी क्रमांक काय असेल , मग तो लकी आहे की नाही याचा अंदाज घेणे . . . नवीन शिक्षक कोण आले आहेत ते बघणे . . . . बाहेरच्या कुंद पावसाळी वातावरणात ते वाहनांचे आवाज आणि पादचारी लोकांची लगबग . . . शेजारच्या मशिदीतली ती भोंगावाली अजान . . . आपला वर्ग आणि खोली पहायला प्रवेशद्वारी उसळलेली गर्दी . . .आपलं नवंकोरं दप्तर,ते भिजू नये म्हणून आपला चाललेला आटापिटा.... त्यातले ओळखीचे आणि अनोळखी चेहरे . . .

अभियांत्रिकीच्या पद्व्युत्तर शिक्षणासाठी जर्मनीत कसे जायचे?

लेखनविषय:
लेखनप्रकार
प्रिय मिपाकरांनो, ह्या वर्षी आमचे मोठे चिरंजीव बी.ई. इंस्ट्रुमेंटेशन होतील. त्याला पुढील शिक्षण जर्मनीत घ्यायचे आहे. आपल्या मिपा कुटुंबातील सदस्यांना ह्या विषयी काही माहिती असल्यास विचारावे म्हणून हा धागा प्रपंच. आपलाच, मुवि.

मेंदू, भावना व वर्तणूक (१)

लेखनविषय:
लेखनप्रकार
सेतू – A Conscious Parents’ Forum ह्या पालकांच्या सपोर्ट ग्रुप च्या वतीने नागपुरात दर महिन्यात पालकांसाठी एका चर्चा सत्राचे आयोजन केले जाते. मुलांच्या वाढीच्या वयात शाळा- अभ्यास तर महत्त्वाचे असतातच पण मुलांचा नुसताच बौद्धिक विकास झाला तर तो विकास एकांगी होईल. मुलांसंदर्भात पालक म्हणून आपल्याला इतरही अनेक गोष्टींची माहिती असणे आवश्यक असते. मुलांची शारीरिक - मानसिक - बौद्धिक वाढ, क्तिमत्त्वातील वेगवेगळ्या पैलूंचा विकास, विविध शास्त्रे, समाजजीवन, मूल्य – नैतिकता, कला – संस्कृती, सौदर्यदृष्टी ह्या सगळ्याच गोष्टी महत्त्वाच्या आहेत.

स्मृती संचय (मेमरी)

लेखनविषय:
लेखनप्रकार
सेतू - अ कॉन्शस पॅरेंट फोरम तर्फे मैत्रेयीने(समुपदेशक) 'मेमरी' वर एक चर्चात्मक कार्यक्रम घेतला. मैत्रेयीने टाटा इंस्टीट्युट ऑफ सोशल वर्कमधून एमएसडब्ल्यू केले आहे. पौगंडावस्थेतील मुला व मुलींच, विवाहपूर्व व विवाहत्तोर जोडप्यांचं ती समुपदेशन करते. विचार करणे, शिकणे व स्मृती संचय ह्या तीन एकत्रित गोष्टीने मुलांची बुद्धिमत्ता ठरते. ‘घोका व ओका’ उत्तमतर्हेनने करतो, म्हणजेच ज्याचं पाठांतर चांगलं आहे पूर्वी त्याला हुशार म्हटलं जायचं! पण आज हा समज खोटा आहे.

गती

अन्न, वस्त्र, निवारा किंवा “आहार निद्रा भय मैथुनंच” इतक्याच काय त्या जीवनाच्या मूलभूत गरजा असतात, असा आपला समज असतो. तसा तो सततच करून दिला जात असतो. मात्र हे खरे नाही. जीवनाला आवश्यकता असते ती गतीची. ह्याची आपल्याला जाणीवही क्वचितच करून दिली जात असते. काळाची गती अपरंपार असते. काळासारखी गतीमान वस्तू तर जगात दुसरी कुठलीही नसेल. मनुष्य कालवश होतो. मग आपण सांत्वना करत असतो, की ईश्वर मृतात्म्यास सद्-गती देवो. म्हणजेच गतीला आपण हवीशी मानत असतो. मनुष्याच्या पूर्वसुकृतांनुरूप चांगली वा वाईट गती त्यास प्राप्त होतच असते. मात्र गतीविरहित जीवनाची कल्पनाच करता येत नाही. सर्व चराचर सृष्टी सततच बदलत असते.

शिकण्याच्या पद्धती (Learning methods)

लेखनविषय:
लेखनप्रकार
सेतू - अ कॉन्शस पॅरेंट फोरम तर्फे मैत्रेयीचा(समुपदेशक) शिकण्याच्या पध्दतीवर एक चर्चात्मक कार्यक्रम घेतला. मैत्रेयीने टाटा इंस्टीट्युट ऑफ सोशल वर्कमधून एमएसडब्ल्यू केले आहे. पौगंडावस्थेतील मुला व मुलींच, विवाहपूर्व व विवाहत्तोर जोडप्यांच समुपदेशन करते. आज शिकण्याच्या पद्धती सांगितल्या, उद्या तुम्ही त्या अमलात आणल्या व लगेच मुलाचे मार्क्स वाढले असं खात्रीलायक होईलच, असं नाही पण ह्या पालकांना मार्गदर्शक नक्कीच ठरतील. शिकण्याच्या पद्धतीत तीन महत्त्वाच्या बाबी आहेत. १) इन्फर्मेशन /माहिती २) नॉलेज/ज्ञान 3)प्रयत्न.

वायूमंडल

लेखनप्रकार
ज्या पृथ्वीवर आपण राहतो, त्या पृथ्वीवरच्या भूपृष्ठाचा एक तृतियांश भाग पाण्याने अनावृत्त असला तरी दोन तृतियांश भागावर पाण्याचे विशाल साठे विपुलतेने विखुरलेले आहेत. महासागर आहेत ते. अनावृत्त भागही वस्तुतः वायूंच्या सुमारे दहा किलोमीटर उंचीच्या थराने आवृत्तच आहे. ह्या वायूंचे वजन, म्हणजेच वातावरणीय हवेचा दाब.
Subscribe to शिक्षण