मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शिक्षण

असेही आहेत शिक्षक !

माहितगार ·
लेखनप्रकार
जिल्हा परीषद प्राथमीक शाळा, लमाण तांडा, बेळंब मराठी भाषा दिवसाच्या निमीत्ताने मराठी विकिपीडियावर बरेच काही लेखन होत असते. सगळेच ज्ञानकोशीय परिघात बसणारे नसते. असाच एक अनुभव उस्मानाबाद जिल्ह्याच्या उमरगा तालुक्यातील लमाण तांडा, बेळंब येथील जिल्हा परिषद प्राथमीक शाळेच्या श्री.खोसे उमेश रघुनाथ ( सहशिक्षक ) यांनी शेअर केला आहे. खरेतर तो त्यांच्याच शब्दात वाचणे उत्तम राहीले असते, पण विकिपीडियावरील माहिती स्थानांतराबाबत झालेल्या नाराजीमुळे माझ्या स्वतःच्या शब्दात अंशतः तरी रुपांतरीत करण्या शिवाय पर्याय नाही. शिक्षक उमेश खोसे यांना 15 जून २००७ रोजी जि.पं.प्रा.शाळा लमाण तांडा बेळब ता.

तमिझ्(तमिळ)शिकण्यासाठी

उपयोजक ·
तमिझ्(तमिळ)ही जगातल्या सर्वात प्रसिध्द अशा भाषांपैकी एक! सर्वात शुध्द द्रविड भाषा! म्हणूनच अन्य भारतीय भाषांच्या तुलनेत थोडीशी अवघड! कामानिमित्य,प्रवासानिमित्य किंवा एक वेगळी भाषा म्हणून म्हणा,किंवा तमिळ चित्रपट,तमिळ संस्कृती यांची आवड,कुतुहल म्हणून म्हणा 'तमिळ' शिकावीशी वाटते. अशा तमिळ शिकणार्‍यांसाठी एक WhatsApp समुह सुरु करत आहोत. पुस्तके,टिव्ही,इंटरनेट याद्वारे तमिळ शिकणारे काहीजण इथे एकत्र येत आहेत.प्रत्येकाची याबाबत प्रगती निरनिराळी!

द मेन्स्ट्रुअल मॅन

इरसाल कार्टं ·
द मेन्सट्रुअल मॅन, वाचून थोडे दचकलात ना? पण मी आज एका अश्या माणसाची गोष्ट सांगत आहे ज्याला अख्खं जग याच नावाने ओळखायला लागलंय त्याचं खरं नाव आहे अरुणाचलम मुरुगनाथम . आणि विशेष म्हणजे हा माणूस आपल्याच भारतातला आहे. चारचौघातला, पण त्याचं काम एवढं जबरदस्त आहे कि त अनेकांसाठी प्रेरणास्थान बनलाय. आमच्या क्लासमेट्स फाउन्डेशन ची मूळ प्रेरणाच तो आणि त्याचे कार्य आहे. माझी याच्याशी ओळख झाली इंटरनेट वरील या व्हिडिओ मुळे. साधारणत: ५-६ वर्षापूर्वी मी हा व्हिडिओ बघितला आणि डोक्यात पार झिणझिण्या आल्या.

राजीव मल्होत्रा - हिंदूफोबिया

वडापाव ·
मी निरीश्वरवादी माणूस आहे. माझा देवावर विश्वास नाही. देवावर विश्वास नसण्याचं कारण काही सिनेमांत दाखवलं जातं तसं (अष्टविनायक, देऊळ बंद) देवावरच्या रागापोटी नाही, तर देव असल्याचा, मला स्वत:ला पटेल असा शास्त्रसिद्ध पुरावा उपलब्ध नाही म्हणून. देवाचं अस्तित्व असू शकतं, या थिअरीला (सिंद्धांताला) मान द्यायला माझी ना नाही. उद्या मानवजातीला काही पुरावा गवसलाच, तर मी आनंदाने (म्हणजे नाईलाजानेच, पण पद्धत आहे बोलण्याची) माझी मतं बदलेन. पण निरीश्वरवाद्यांमध्ये सुद्धा एकवाच्यता नसते, हे मला जाणवायला काही काळ गेला. आज परिस्थिती अशी उद्भवली आहे, की बहुतेक निरीश्वरवादी माझ्या डोक्यात जाऊ लागले आहेत.

झेंगट कॉपीराईटचं, शैक्षणिक झेरॉक्सींगच ! - भाग ३

माहितगार ·
लेखनविषय:
मागील लेखावरुन पुढे प्रकाशक मंडळींनी सर्व काही मेहनत त्यांच्या वकीलांमर्फत केली पण १६ सप्टेंबर २०१६ ला निकाल रामेश्वरी फोटोकॉपी सर्वीसेसच्या बाजूने देऊन एक न्यायाधीश न्यायालयाने पारडे रामेश्वरी फोटोकॉपी सर्वीसेसच्या बाजूने झुकवले होते त्या विरुद्ध प्रकाशक मंडळी अपिलात दिल्ली उच्चन्यायालयाच्या खंडपीठा समोर गेली.

झेंगट कॉपीराईटचं, शैक्षणिक झेरॉक्सींगच ! - भाग २

माहितगार ·
लेखनविषय:
मागील लेखावरुन पुढे एखादा कायदा कसा असावा हे कायदेमंडळांच्या अखत्यारीत येते, न्यायालये कायदा सध्या कसा आहे (आणि फारतर कायदा तयार करताना कायदेमंडळाला काय अभिप्रेत होते) एवढेच पहातात असे सांगून; शैक्षणिक क्षेत्रासाठी कॉपीराईट पॉलीसी कशा प्रकारची असावी या बद्दल वादी - प्रतिवादींनी मांडलेल्या बाजूंचे कवित्व रामेश्वरी फोटोकॉपी सर्व्हिस प्रताधिकार खटल्यामध्ये ९ डिसेंबरला दिलेल्या निकालात खंडपीठाने बाजूस ठेऊन दिले. एवढे कवित्व होण्याचे पडद्या मागचे कारण काय असावे ?

झेंगट कॉपीराईटचं, शैक्षणिक झेरॉक्सींगच !

माहितगार ·
लेखनप्रकार
नव्हेंबर डिसंबर २०१६ नोटबंदी निर्णयामुळे इतर छोट्या मोठ्या बातम्या पडद्या आड राहील्या त्यातील एक छोटी बातमी दिल्लीच्या रामेश्वरी फोटोकॉपी सर्वीसेसची. आजुबाजूच्या फोटोकॉपींग सेंटरवरच्या विद्यार्थ्यांकडून (आणि इतरांकडून) पुस्तकांच्या झेरॉक्सींगच्या वेळी लेखक-प्रकाशकांच्या कॉपिराईटचे काय खोबरे होते याची कुणि फारशी काळजी करत नाही. कारण सरसामान्यपणे सर्वसामान्य भारतीयांची वृत्ती कायद्यांकडे झेंगट म्हणून पहाण्याची झाली असावी.

पेन्स

आकाश खोत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
आज खूप वर्षांनी रेनॉल्ड्सचा पेन लिहायला मिळाला. हा पेन माझ्या लहानपणी फार चालायचा. माझे बाबा तेव्हा हाच पेन वापरायचे आणि सुरुवातीला हा सोडून दुसरा कुठला पेन आम्हाला माहितसुद्धा नव्हता. प्राथमिक शाळेत २-३ वर्षे आम्हाला पेन वापरायला चालत नव्हतं. पेन्सिलच वापरावी लागायची. लहान मुलं चुका खूप करतात, आणि त्यांना त्या खोडून सुधारता याव्यात म्हणुन पेन्सिल वापरावी असं सांगायचे. म्हणजे वहीत आणि परीक्षेच्या उत्तरपत्रिकेत खाडाखोड जास्त दिसणार नाही.

(कोरडी भाकर)

ज्ञानोबाचे पैजार ·
मागच्या वेळी पेर्णा दिली नव्हती तर नाखुकाकांनी माझा कान धरला होता, त्यामुळे यावेळी न विसरता - ही पेर्णा फार धावाधाव झाली, सकाळी खरोखर जेवणा तरी सुधा, नाराज नसे मी तुझ्यावर मी किती दडवून ठेवले या ढेरीला कुत्सित नजरा घाव घालती.. या..!

प्रयोगशील शाळा

मद्रकन्या ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
रविवारच्या लोकमत मंथन पुरवणी मध्ये प्रयोगशील शाळांबद्दल लेख आला होता. या शाळांच्या कार्यपद्दतीची थोडक्यात चांगली ओळख करून दिली आहे या लेखात. त्यात महाराष्ट्रातल्या काही शाळांची नावं पण आहेत. http://epaper.lokmat.com/epapernew.php?articleid=LOK_MTHN_20161204_5_1&a... याच लेखाच्या निमित्ताने नाशिक मधील आनंद निकेतन शाळे बद्दल थोडी माहिती: शाळेची वेबसाईट माझा मुलगा तन्मय आनंद निकेतन, नाशिक या शाळेत इयत्ता पहिलीत आहे. तो खेळवाडी (pre-school) पासूनच या शाळेत आहे. आणि ते तसं असेल तर मुलांसाठी फार चांगलं आहे.