ब्लॉग दुवा: http://www.apurvaoka.com/2016/04/wablewadi-school-visit-inspirational.html
ज्या शाळेतून मुलांचा पाय निघता निघत नाही, त्या शाळेला भेट दिल्यावर आमचेही पाय तिथून निघत नव्हते. वाबळेवाडीच्या शाळेबद्दल इंटरनेटवर वाचल्यापासून ती शाळा बघण्याची खूप इच्छा आणि उत्सुकता होती. एका नकोनकोशा वाटणा-या शाळेतून एका हव्याहव्याशा शाळेत झालेलं तिचं रुपांतर आम्हाला बघायचं होतं. तिथली नावीन्यपूर्ण शिक्षणपद्धती समजून घ्यायची होती. तिथल्या मुलांशी, त्यांना घडवणा-या शिक्षकांशी आम्हाला बोलायचं होतं. त्यानुसार लवकरात लवकर शाळेशी संपर्क साधला, आणि शाळेला भेट दिली.