Skip to main content

प्रेमकाव्य

आमची बी एक

मुक्तसुनीत यांनी या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा : ही भयभीषण कविता कुंथताति अक्षरे गे आदिती तू बास कर विसर षंढ-गंध आता , जाळुनीया राख कर वेड होते त्या मिपाला, मांडिशी तू भोंडला वेड 'तात्या'ला तुझे जो, कायमीचा झोपला यायचे ते ना पुन्हा, तू वाट बघणे बास कर.. कुंथताति अक्षरे गे आदिती तू बास कर टांगण्या वेशीवरी तव लक्तरे सारे पुढे चिंधड्या तव "कव्वितेच्या" फ़ाडती शेंबडी मुले ना कुणी तुज तारीफेला , तू अपेक्षा लाख कर!! कुंथताति अक्षरे गे आदिती तू बास कर कोण झोपे, काय झाले, ना इथे पडले कुणा "भीक नाही , काव्य आवर" बाकी कुणी काही म्हणा "जळ्ळीं मेली लक्षणे ती, हे रसीका तूच मर!"

किती सजवू मी माझं मला

पाषाणभेद यांनी या दिवशी प्रकाशित केले.
काव्यरस
किती सजवू मी माझं मला
किती सजवू मी माझं मला मन रिंगण घाली तूला ||धृ|| आरसा समोर उभी राहून वेणी घातली गजरा माळून फुले सुगंधी डोई शोभती भुलली मी त्या गंधाला ||१|| नयनांची दोन दले हालती हाती कांकणे किणकिणती कर्णभुषणे शोभती कानी रत्नमाळा हलती गळा ||२|| सुवर्णकांचन सुगंधदर्वळ आनंदाचे फुलले परिमळ उंची वस्त्रे रेशीम स्पर्शी पांघरले शुभ्र शरीरा ||३|| शृंगारूनी शरीरा मन प्रसन्न झाले मजसमीप हर्षाचे वारे वाहीले लवकरी येवूनी मिठीत घेवून साजरे कर धुंद क्षणांना ||४|| - पाषाणभेद (दगडफोड्या)