२. स्वप्नमेघातील चांदणं
१. पहिल्या भेटीचा सुगंध : http://www.misalpav.com/node/18628
आकाशमिठीत गर्द
रात्र ओली शृंगारलेली
नभवेलीवर शुभ्रांकित
निशिगंधीत चांदणं
निशब्द ओठांवरती
पारिजात धुंद
स्वप्नमेघ पालवत
निशिगंधीत चांदणं
ओझरत्या दवबिंदूंमध्ये
कातरलेला चंद्र
शहारलेल्या अंगणी
निशिगंधीत चांदणं
नभी चंदेरी आरास
नीर दर्पण शोभीवंत
झावळीतून शिंपलेले
निशिगंधीत चांदणं
चंद्रसावलीचा प्रदेश
शब्दांध वार्याचा झोत
क्षितिजापल्याड झेपावलेले
निशिगंधीत चांदणं
--- शब्दमेघ (१९ ऑगस्ट २०११, प्रितगंध... एक दरवळणारी साथ)
लेखनविषय:
याद्या
2541
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
जबरा!! << ओझरत्या
जबरा
गणेशा -छान सूर लागलेत निशब्द
कोरिव कविता
...