Skip to main content

प्रेमकाव्य

मी बत्तासा गोल गोल

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 01/06/2011 08:01 या दिवशी प्रकाशित केले.
मी बत्तासा गोल गोल तो: नको भांडण तंटा नको त्या बारा भानगडी नको झगडा करू अन नको कोणती लफडी गुण्यागोविंदानं राहू आपण दोघे मी बत्तासा गोल गोल अन तू माझी गोड रेवडी ||धृ|| तो: लक्ष्मी आहे तू ग माझी अन नारायण मी ग तूझा शोभणारा जोडा आपला नाही संशय कसला त्याचा सारं गाव बोलेल ही फार गुणी आहे जोडी गुण्यागोविंदानं राहू आपण दोघे मी बत्तासा गोल गोल अन तू माझी गोड रेवडी ||१|| ती: राग हो कसला प्रेम हे आहे माझे तुमच्यावर तुमची मी अन माझे तुम्ही झाले लग्न झाल्यावर उगाच नका राग कसला धरू आता तुम्ही मनी गुण्यागोविंदानं राहू आपण दोघे तुम्ही बत्तासा गोल गोल अन मी तुमची गोड रेवडी ||२|| तो: वागू

नियतीचा क्रूर खेळ

लेखक स्वर भायदे यांनी मंगळवार, 24/05/2011 11:35 या दिवशी प्रकाशित केले.
धो धो बरसणाऱ्या पावसातही मन माझं भिझत नाही... तुझ्या विरहाने मनात लागलेली आग काही केल्या विझत नाही ।। तुझ्या सहवासातील प्रत्येक क्षण... मन अजून जगतय तु आता नाहीस तरी वेड्या सारखं वागतय ।। अनेक वेळा प्रश्न विचारला मी मनाला... का विसरू शकत नाही मी तुला ? मन म्हणाल वेड्या विसरत का कुणी स्वतःला ।। प्रेमा मध्ये आपली का स्वतंत्र अस्तित्व उरली नाही ... आणि तुझी साथ मला जन्मभर का पुरली नाही ।। नियतीनी रचलेल्या चितेवर संपल का आपलं नातं मग तरीही का उरलय मनात प्रेम... कधी संपणार हा नियतीचा क्रूर खेळ ।।
काव्यरस

मेरे मुर्गे को क्या हुवा चाचा?

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 23/05/2011 05:52 या दिवशी प्रकाशित केले.
मेरे मुर्गे को क्या हुवा चाचा?
मेरे मुर्गे को क्या हुवा चाचा? खाता नही पिता नही बंद पडलीय त्याची वाचा ||धृ|| अब मै क्या करू उसको? नही डाक्टर दिखानेको तेरे आंगनमे वो जाताय कुकुचकु कुकुचकु वो वरडताय मेरा दानापानी नही उसको भाता अरे मेरे मुर्गे को क्या हुवा चाचा? ||१|| देख हळुहळु तो कसा भागताय लई उदास उदास दिखताय चोच उघडी रखके तो बसतोय नही फडफड फडफड करताय अब्बी तुच हैरे बाबा उसका दाता मेरे मुर्गे को क्या हुवा चाचा?
काव्यरस

नखरा नाही इतका बरा

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 19/05/2011 20:05 या दिवशी प्रकाशित केले.
नखरा नाही इतका बरा
वेडं होईल कुणीही तुझ्या डोईचा गजरा पाहून नखरा नाही इतका बरा ठेव हातचं थोडं राखून ||धृ|| अगदी सकाळी इतकी सजली नाही कसर तू ठेवली कसली मोगर्‍याची फुले वेणीत माळली सुगंधी मन माझे कसे ठेवू मी झाकून ||१|| कुणी रंभा म्हणू की अप्सरा स्वर्गाची तूला बघताच होई तगमग जीवाची दागदागीने घालून रस्त्याने चालली मागे नको ग पाहू अशी मान वळवून ||२|| तुझ्या नजरेला माझी नजर भिडली पिवळ्या केवडी रंगानं जादू केली प्रित दोन जीवांची जुळू लागली नको झुरवू आता दुर उभी राहून
काव्यरस

संदर्भ

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी सोमवार, 09/05/2011 11:39 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेमओले तप्त ओठ आज पुन:श्च थरारले तू समोर ठाकताच फिरुनी शुष्क जाहले तव लोचनी तरळताच रंग माझिया प्रितीचे गालावरील गुलाब तुझिया बघ उमलू लागले सात्विक चेहर्‍याशी ती लाली पाहून नयन सुखावले क्षणी मनात माझिया तुळशी वृंदावन उमटून गेले नजर भिडताच कस्तुरीगंधित काया किंचित थरारली रुपसंपन्न मृगनयनी नवतारुण्य अवचित अवगुंठले प्रयास तो अनुराग लपविण्याचा किती निष्फळ नजर अन् मनातील द्वंद्व पहा लख्ख दिसू लागले
काव्यरस

काल रात्री

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी बुधवार, 27/04/2011 11:19 या दिवशी प्रकाशित केले.
थोडी प्रस्तावना: पाऊस येणार असला तर त्याला एक घटनाक्रम असतो. प्रथम दाटून येते, मग हळूहळू गारठा जाणवायला लागतो, त्यानंतर पाऊस सुरू होऊन सगळं जलमय होत जाते, वाहायला लागते आणि वाहता वाहता विरघळायला लागते. या सर्व घटनाक्रमात क्रमाक्रमाने विरहात झुरणार्‍या नायकाच्या मनाची अवस्था आणि त्याचे विचार या रचनेत मांडायचा प्रयत्न आहे. ====================================== परत एकदा स्व:तास केले स्वप्नांच्या आधीन | .......... काल रात्री || परत एकदा जीवास केले सखेच्या स्वाधीन | ..........
काव्यरस

नवा खेळ

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी गुरुवार, 21/04/2011 14:01 या दिवशी प्रकाशित केले.
आज पावसाने हा कुठला नवा खेळ मांडला अवघे आभाळ काजळून कंठ माझा दाटला पंचप्राण शोषून माझे जीव असा टांगला तुझ्या स्मरणात भिजता कसा हा जडावला वर्षाव मोहरलेल्या तुझ्या स्वप्नांचा बरसला मनास माझ्या वाहवत क्षितीजास घेऊन गेला क्षितिजी तुझ्या स्मरणांचा आता वणवा पेटला वाहत आलेल्या मनास माझ्या चटका लावून गेला प्रेमओली नीरओळ पाऊस खिडकीवर सजवून गेला तव नाजूक कंठातील मोतीसराची आठवण देऊन गेला आज पावसाने हा कुठला नवा खेळ मांडला जीवास सुखावून काळजास हुरहूर देऊन गेला |- मिसळलेला काव्यप्रेमी -| (२१/०४/२०११)
काव्यरस

पावसात भिजतांना

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी बुधवार, 20/04/2011 11:07 या दिवशी प्रकाशित केले.
बरसणार्‍या मेघधारांना वार्‍यावर पेटतांना पहायचेय तिला एकदा या पावसात भिजतांना सरीवर सर कोसळून हे कृष्ण मेघ गडगडतांना पहायचेय तप्त धरेसह माझ्या मनास निवतांना रुसलेल्या गुलाबाच्या कळीला हलकेच उमलतांना पहायचेय क्षितिजावरील इंद्रधनुष्यातील सप्तरंगांना ग्रीष्माचा दिवस सारून श्रावणसांज अवतरतांना पहायचेय जाईवेलास फिरुनी तरुण होतांना ओलेत्याने तिला माझी कविता गुणगुणतांना पहायचेय मोहरून तो कोकीळकंठ पालवतांना पहायचेय तिला एकदा या पावसात भिजतांना पहायचेय तिने मला एकदा, मी तिला चिंबून पाहतांना |- मिसळलेला काव्यप्रेमी -| (२०/०४/२०११)
काव्यरस