Skip to main content

प्रेमकाव्य

शेतकरी गीत: शेतात आंतरपीक आपण करू

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 19/04/2011 02:31 या दिवशी प्रकाशित केले.
शेतकरी गीत: शेतात आंतरपीक आपण करू


अगं ए पारू; होवूया आपण आता सुरू
हाती येईल आपल्या पैका
चल शेतात आंतरपीक आपण करू ||धृ||

पावरबाज मंतार आंतरपिकाचा
अनुभव आहे मोठ्या लोकांचा
तोंडं बोलती त्यांची वाचा
काय सांगू, कसं सांगू
मी आता कसा ग धिर धरू
चल शेतात आंतरपीक आपण करू ||१||

काव्यरस

काय वाटल असेल माझ्या जीवाला...........

लेखक शिल्पा कांबळे यांनी सोमवार, 18/04/2011 19:37 या दिवशी प्रकाशित केले.

चाललो होतो एकटाच एका वाटेवरुन
तु भेटलीस आणि सुरुवात झाली नव्या आयुष्याला
आनंद वाटु लागला माझ्या जीवाला
पुन्हा रोज येऊ लागलो कॉलेजला
एक दिवस धाडस करुन विचारल मी तुला
तु नाही म्हंटल नाही,
पण टाईमच नाही उरला अभ्यासाला

काव्यरस

कार्ट्यांस...

लेखक नगरीनिरंजन यांनी शनिवार, 16/04/2011 12:05 या दिवशी प्रकाशित केले.

मिपावरच्या सर्व कार्ट्यांस समर्पित.

(चालः चल री सजनी अब क्या सोचे)

लिही रे भावा तू अपुल्या मनचे
डोहाळे कशाला प्रतिक्रियांचे
लिही रे...

टाकून खरडी भिक्षा मागणे
जमवून कंपू गोंधळ घालणे
असं काही ऽऽ करू नकोऽऽ, करू नकोऽ रे
लिही रे...

असेलही तुझी लेखणी धमाल
करिती इथले सगळेचि लाल
स्वतःचीऽऽ, स्वतःचीऽऽ, स्वतःचीऽच रे
लिही रे...

लिहीले जरी तू ओतुनि तनमन
गेले जरी पुढच्या पानी ते पटकन
दबलेलाऽ कोळसाऽ तो होईल हिरा रे
लिही रे...

पुन्हा नव्याने...

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी बुधवार, 13/04/2011 11:19 या दिवशी प्रकाशित केले.

प्रेरणा : हा प्रतिसाद

पुन्हा नवा खेळ मांडूया
पुन्हा अनोळखी होऊया
पुन्हा नव्याने भेटूया
चल पुन्हा नव्याने जगूया

ओंगळ दु:खांना स्वछ पुसून
गोजीर्‍या सुखांना गिरवूया
जन्मांतरीचे आपले रेशमी नाते
नवरंगाच्या धाग्यांनी सजवूया

चल सखे.................

सुंदर प्रेमाचे साजिरे रूप
नव्याने एकवार लेवूया
हुकलेल्या सार्‍या स्वप्नांना
मनाच्या गाभार्‍यात रुजवूया

चल सखे...................

काव्यरस

रस्त्यानं रेतीवाला तो आला

लेखक पाषाणभेद यांनी शुक्रवार, 08/04/2011 04:43 या दिवशी प्रकाशित केले.
रस्त्यानं रेतीवाला तो आला


रस्त्यावर उभी मी उन्हातान्हाची
टमटम येत नाही कधीची
येईल का कोनी गाडीवाला
नेईल का मला कोनी घरला
प्रश्न मला पडला, पडला, पडला
तो बघा, तो बघा,
रस्त्यानं रेतीवाला तो आला ||धृ||

मी गोरी पोरी कोल्याची
हाय देखणी लई सुंदर
रंगानं काळी मी पडल
उन्हात उभी राहील्यावर
वेळेवर मदतीला धावला
तो बघा, तो बघा,
रस्त्यानं रेतीवाला तो आला ||१||

व्हायब्रेटर रिंगटोन पाठवाना

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 05/04/2011 23:55 या दिवशी प्रकाशित केले.
व्हायब्रेटर रिंगटोन पाठवाना


मामा अहो मामा,
तुमच्या पोरीला काय समजवाना
फोन केला तर म्हनती,
व्हायब्रेटर रिंगटोन पाठवाना ||धृ||

कालच आणला मोबाईल नवा
मार्केटमधी लई त्याची हवा
वाटतंय तिनं एकदा तो पहावा
पण तिची भेटच होत नाहीना!
फोन केला तर म्हनती
व्हायब्रेटर रिंगटोन पाठवाना ||१||

काव्यरस

रास

लेखक नगरीनिरंजन यांनी रविवार, 27/03/2011 06:44 या दिवशी प्रकाशित केले.

चांद रात मंद वात
गंध श्वास टाकतो
धुंद साथ उष्ण हात
कंप हृदयी जागतो

नील जल प्रतिबिंब
चंद्र त्यात पाहतो
लुब्ध मुग्ध शुभ्र पुष्प
पारिजात ढाळतो

रक्त ओष्ठ रक्त नेत्र
भ्रमरही मोहतो
मत्त वक्ष पुष्ट गात्र
समीर हाताळतो

एक भास एक ध्यास
प्रेम वह्नी जाळतो
व्यस्त केश भ्रष्ट वेश
मुकुंद रास खेळतो

धूम्र वर्ण पीत वस्त्र
अधर तो चावतो
मीलनातुर झाली राधा
कृष्ण वेड लावतो.

- (पूर्वप्रकाशित)

काव्यरस