Skip to main content

प्रेमकाव्य

(पाव्हनं चला, झाडावरती बसू !)

केसुरंगा यांनी या दिवशी प्रकाशित केले.
काव्यरस
वेताळणीनं वेताळाला सांगितली गोष्ट अन मग आमीबी म्हनलं जरा गुलुगुल बोलूयात पावन्यासंगं..... ;) वाद असे बहरात वाचका, तुम्ही नका ना रुसू पाव्हनं चला, झाडावरती बसू ! बघा थेरडा मेला 'घोडा' शिव्या हासडून मारा जोडा लाज संस्कृती सारी सोडा उगा वाटतं खूप लिहावं नकाच काही पुसू पाव्हनं चला, झाडावरती बसू ! काढिल खोडी नव्या दमाच्या पुचाट गप्पा स्वातंत्र्याच्या स्टोरी सांगिल वेताळाची जरा मोकळ्या ह्या जालावर खविस नागरी हसू पाव्हनं चला, झाडावरती बसू ! तीन गटांची थेरी मांडा जुन्या दुव्यांची घेउन खांदा हलक्या हाताने काड्या घाला अता खातरी ही शतकाची पब्लिक लागं फसू पाव्हनं चला, झाडावरती बसू ! -केसुरंगा

पाऊस

मिसळलेला काव्यप्रेमी यांनी या दिवशी प्रकाशित केले.
काव्यरस
काळ्याभोर मेघांची नभात दाटी असावी तुझ्या डोळ्यात मी भिजावे अन् तू माझ्या नसानसात भिनावी गडगडते ढग तुटून एकच सर अशी बरसावी त्यांनी माझ्या मनाची दशकांची तहान शांतवावी माझ्या देहाच्या वृक्षावरील अवघी पाने चिंब होऊन ओघळावी त्याच वृक्षाला लिपटलेल्या लाजाळूप्रमाणे तू मोहरून मिटावी कृष्णरंगी मेघांमागून सूर्याने सप्तरंगी किरणांची जाळी पसरवावी सांजेमागून येणारी अवनीही त्यावर लुब्ध होऊन थबकावी आता जरा पाऊस रिमझिम व्हावा अन् कडाडती विजही थकावी तुझे हात माझ्या हातात असावे अन् नजरेत नजर गुंतावी रिमझिम झालेल्या पावसात चिंब होऊन तू गोडगोड व्हावी माझ्या उबदार मिठीत येताच हलके हलके विरघळाव

सण पाऊस साजरा ---

विदेश यांनी या दिवशी प्रकाशित केले.
काव्यरस
निळ्या निळ्या नभातून - कोसळती शुभ्र धारा ; काळ्या काळ्या मातीतून - ओल्या गंधाचा फवारा ; हिरव्या हिरव्या कोंबातून - दिमाखात ये फुलोरा ; पिवळ्या पिवळ्या फुलांतून - झुले तो सोनपिसारा ; अज्ञातशा कुंचल्यातून खेळ रंगतो हा न्यारा ! सप्तरंगी अफलातून इंद्रधनूचा नजारा - फुलतो रोमांचातून मनमोराचा पिसारा - होई चिंब मिठीतून ... सण पाऊस साजरा !

आल्या पावसाच्या सरी -

विदेश यांनी या दिवशी प्रकाशित केले.
आल्या पावसाच्या सरी - भिजू एकवार तरी ; ओल्या माती गंधासंग ... आणू प्रेमाला ग रंग ! नको साक्षी आणाभाका , पुरावा कशाला तो फुका - साक्ष ओल्या अंगांगांची पावसाच्या या सरींची ! प्रेम माझे तुझ्यावर तुझे किती माझ्यावर - सरींत मोजणी कशाला जीव कधीचा हरवला !