(रमी)
यासाठी वापरलेला कच्चा माल
पत्तेजुडग्याच्या मंथनातून १३ रत्ने बाहेर आली. एक्का, तिर्री, दश्शी, गुलाम राजा वगैरे वगैरे. पण कुशल खेळाडूला रमी ही जमवावी लागते. ती रमी प्रकट झाल्यावर पत्ते उघड करण्याआधीच्या काही क्षणांवर ही लहान कविता आहे.
त्रयोदश गुणी एक्का; नव्व्या, राजा ही लाभला
असीमकौशल्ये प्रकटे रमी
एकवर्णा, एकवंशा, क्वचित विदूषकस्पर्शा
पाठराखीण जिची लक्ष्मी
अवघड होणे ही जरा, तरी मालक मी अनुरूप तिजला
लक्ष्मी ही जिची पाठराखीण आहे अशी ही स्वतः अतिशय चंचल रमी शेवटी तिच्या कर्त्याच्या चरणी लीन झाली.
:)
मिसळपाव