मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

नृत्य

*** Light डान्स ***

मदनबाण ·
डान्सचा हा प्रकार मी या आधी पाहिला होता, पण मला वाटतं... त्यात फ्लुरोसंट कलर्सचा वापर केला जायचा, पण आता पूर्णपणे डिजीटल कंट्रोल्ड एलइडी लाईट्स्चा वापर करुन एक नवा प्रकारच पहायला,अनुभवायला मिळतो... तो म्हणजे लाईट डान्स. तुम्हाला अमिताभ बच्चन चे सारा जमाना हसीनो का दिवाना... हे गाणे ठावुक असेलच, त्यात सुद्धा असाच पण जरासा वेगळा प्रकार करण्यात आला होता. आता मी पाहिलेले काही निवडक डान्स पर्फोर्मन्स इथे देतो,यात निवडलेला साउंड ट्रॅक,थीम,डान्स आणि लाईट यांचे परफेक्ट सींक,आणि अर्थातच टायमिंग या सर्वांचा सुरेख ताळमेळ पाहता येइल. एन्जॉय...

काय..? कुठे..? कधी..? (मुंबई व उपनगरे)

मोदक ·
अनेकदा आपल्या शहरात आयोजीत झालेले विविध कार्यक्रम, प्रदर्शने, ऑटो एक्पो, इंडस्ट्रीयल एक्पो, फूड फेस्टीवल्स, म्युझीकल फेस्टीवल्स; आपल्याला "अरे तो कार्यक्रम काल / परवा / मागच्या आठवड्यात झाला!!" अशा स्वरूपात कळतात. (आणि सांगणारेही "खूप भारी कार्यक्रम झाला!" असा पावशेर ठेवून "इनोविच्छाप्रदर्शक" जळजळ घडवतात) तर.. मुंबई व उपनगरांमध्ये होणार्‍या अशा कार्यक्रमांची माहिती या धाग्यावर एकत्र होवूद्या.

काय..? कुठे..? कधी..? (पुणे)

मोदक ·
काय..? कुठे..? कधी..? (पुणे) अनेकदा आपल्या शहरात आयोजीत झालेले विविध कार्यक्रम, प्रदर्शने, ऑटो एक्पो, इंडस्ट्रीयल एक्पो, फूड फेस्टीवल्स, म्युझीकल फेस्टीवल्स; आपल्याला "अरे तो कार्यक्रम काल / परवा / मागच्या आठवड्यात झाला!!" अशा स्वरूपात कळतात. (आणि सांगणारेही "खूप भारी कार्यक्रम झाला!" असा पावशेर ठेवून "इनोविच्छाप्रदर्शक" जळजळ घडवतात) तर..

राजीव पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली

एच्टूओ ·
राष्ट्रीय पुरस्कार विजेते सिनेदिग्दर्शक राजीव पाटील यांचे आज, सोमवारी मुंबईत हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन !!! अतिशय धक्कादायक बातमी!! एका वेगळ्या वाटेवरच्या कलाकाराच्या जाण्यामुळे होणारे नुकसान भरुन निघण्यासारखे नाही. असा कलाकार पुन्हा होणे नाही. भावपूर्ण श्रद्धांजली!!

गोविंदा २०१३

मदनबाण ·
या वर्षी दहीहांडीचा उत्सव पाहता येईल की नाही अशी जरा शंका होती...पण तस काही झालं नाही.ऑफिसातुन घरी आल्यावर बॅग ठेवली आणि लगेच दहीहांडी पाहण्यासाठी आणि तीचे फोटो तुमच्यासाठी काढण्यासाठी खाली पळालो.

एका गाजलेल्या पुस्तकाचे परिक्षण

दशानन ·
आज प्रदर्शनात दुपारी थोडावेळ मिळाला म्हणून एक पुस्तक वाचण्यासाठी हाती घेतले. प्रथमदर्शनी पुस्तकाचे निर्माण कसे करु नये? याचे उत्तम उदाहरण म्हणून हे पुस्तक नक्कीच खपून जाईल, त्यामुळेच तर याला उत्कृष्ट वाडमयीन त्यावर्षी मिळाला होता. कव्हर ३०० जीएसम च्या जागी ३०५ आणि आतील पाने ५८ जीएसम च्या जागी ६० वापरली असती तर अजून हे पुस्तक चांगले घडू शकले असते, मॅथलीतो च्या जागी नॅचरल असता तर जगात भारी पुस्तक निर्माण झाले असते. पुस्तकाचे वजन अंमळ जास्त आहे, थोडी काही शे पाने कमी केली असती तर वजन नक्कीच कमी झाले असते.

ओले काजु आणि मॅन्गो मार्गारीटा

स्पा ·
एकदा सहजच पराण्णांना भेटायला सौंदर्य फुफाट्यात गेलो होतो. बाहेरच्या खोलीत पराण्णा निवांतपणे बसले होते. पुढ्यात नेहमीप्रमाणे कि बोर्ड दाबत मिपावर कुणाची तरी खेचत होते .. "काय कसं काय, मुंबई काय म्हणते, केव्हा आला ठाकुर्लीहून.." असे जुजबी प्रश्न पराण्णा विचारत होते. जरा वेळाने तेथे सोत्री आले. सोकाजीराव त्रिलोकेकर. पूर्वीचे मुंबईकर . पुण्यातल्या मिपा कट्ट्या मध्ये पराण्णा आणि त्यांची ओळख झाली स्वतः सोत्री मद्याचे भोक्ते.

नायक क्रमांक एक

ज्ञानोबाचे पैजार ·
आमच्या आगामी " नायक क्रमांक एक" या चित्रपटातले शिर्षक गीत खास आमच्या चाहत्यांसाठी. या चित्रपटाची पटकथा, संवाद आणि गीते आम्ही स्वतः लिहिली आहेत याची वाचकांनी कॄपया नोंद घ्यावी. (कंसातल्या सुचना दिग्दर्शकासाठी असुन, नायक नायिकेने कंसाबाहेरच्या शब्दांचे गायन करत नॄत्य करायचे आहे. चित्रीकरण सुरु करण्या आधी कॅमेरामॅनच्या कॅमेर्‍याची बॅटरी चार्ज आहे कि नाही ते तपासावे) (ज्याच्या कडे बर्‍यापैकी कपडे असतील त्यालाच नायक म्हणुन घेण्यात यावे. नायिका आम्ही आधिच निवडली आहे.