'क्वीन' : कंगनाच्या सहज-सुंदर अभिनयातून साकारलेली स्त्री-मुक्तीची अनोखी कथा
'क्वीन' हा कंगना रनावतचा नवीन सिनेमा. याचे कथानक काय आहे,त्याला किती स्टार मिळालेत, अन्य अभिनेते कोण कोण आहेत, संगीत कुणाचे, वगैरे काहीही माहिती नसताना निव्वळ त्यात 'कंगना आहे' म्हणून हा सिनेमा बघितला, आणि अगदी कृतकृत्य झालो.
अगदी सुरुवातीलाच खास पंजाबी लग्नसोहळ्याची तयारी, नृत्य वगैरे बघून पुढे हे असलेच 'हम आपके' बघावे लागणार की काय, असे वाटून जरा धास्तावलो,पण तेवढ्यात 'रानी' (कंगना) शी ठरलेले लग्न विजय मोडतो, आणि रानी स्वतःला खोलीत कोंडून घेते, आणि त्या विवाह-सोहळ्यातून आपली सुटका होते.
दुसर्या दिवशी रानी खोलीतून बाहेर निघते, आणि सुरवंटाने स्वतःभोवती विणलेल्या कोशातून बाहेर पडलेल्या फुलपाखराची फडफड, त्याचे आकाशात विहरण्याचे स्वप्न आणि त्यासाठी केलेली धडपड, असे वेगळेच वळण ही कथा घेते.
विजय आणि रानी लग्नानंतर हनिमूनसाठी पॅरिसला जाणार असतात. लग्न मोडले, तरी रानी एकटीच पॅरिसला जाते. आयफेल टॉवर बघण्याचे तिचे स्वप्न, पण प्रत्यक्षात मात्र तोच आयफेल टॉवर तिच्या उरात धडकी भरवतो.
पॅरिसमधे 'विजयलक्ष्मी' शी झालेली तिची मैत्री, तिच्याबरोबर केलेली भटकंती आणि नृत्याची धमाल, पर्स-चोराशी झटापट, अश्या प्रसंगातून रानी चे एक वेगळेच रूप साकार होऊ लागते.
.
पुढे ती अॅमस्टरडॅमला जाते, तेंव्हा तिथे तिला नाईलाजाने एक आफ्रिकन, दुसरा रशियन आणि तिसरा जपानी, अश्या तरुणांबरोबर एकाच खोलीत रहावे लागते. त्यांच्याशी दोस्ती झाल्यावर अॅमस्टरडॅममधील गंमती, आणि भटकंती.
पुढे विजयलक्ष्मीने दिलेले सामान पोचवायला म्हणून त्यांचे रेड लाईट एरियात जाणे, तिथला पोल डान्स, निरागस गंमतीदार खरेदी, तिला भारतीय खाद्यपदार्थ करून दाखवण्याचे मिळालेले आव्हान, अश्या अनेक मजेदार प्रसंगातून सिनेमाची कथा वेगाने पुढे सरकत जाते. अधून मधून फ्लॅशबॅक तंत्रातून चपखलपणे दाखवलेल्या प्रसंगांतून एकीकडे 'विजय' ची खास पुरुष-वर्चस्वाची मानसिकता, तर इकडल्या विजयलक्ष्मी आणि रेड लाईट एरियात काम करणार्या उन्मुक्त, तरीपण कुटुंबासाठी झटणार्या तरुणींचे विश्व तिच्यासमोर स्पष्ट होत जाते.
तिच्या शोधात अॅमस्टरडॅमला आलेल्या विजयशी तिची भेट होते, त्यातून पुढे काय होते हे, आणि विशेषतः कंगनाचा सहज-सुंदर, सशक्त-सक्षम अभिनय, वेगळीच पटकथा, चपखल संवाद, पॅरिस आणि अॅमस्टरडॅममधील उत्फुल्ल जीवन दर्शवणारे नानाविध प्रसंग, तसेच कथेच्या ओघात पूर्ण सिनेभाभर अधून मधून येणारे छोटे-छोटे खुमासदार प्रसंग, या सर्वांसाठी हा सिनेमा एकदातरी अवश्य बघावा.
वाचने
14198
वाचनखूण
प्रतिक्रिया
33
मला त आत्तापर्यंत कंगना बद्दल
In reply to मला त आत्तापर्यंत कंगना बद्दल by प्रमोद देर्देकर
अतिशय सहमत.
राणी ?
उत्सुक आहे
बर्याच जणांकडून स्तुती ऐकली
In reply to बर्याच जणांकडून स्तुती ऐकली by ऋषिकेश
असेच
नक्की बघणार.... खूप चांगले
In reply to नक्की बघणार.... खूप चांगले by सुहास झेले
काल बघितला... निव्वळ अप्रतिम.
एकदा तरी बघावा असा नक्कीच आहे
In reply to एकदा तरी बघावा असा नक्कीच आहे by सूड
कारण नाऊ इट डज नॉट मॅटर!!
In reply to कारण नाऊ इट डज नॉट मॅटर!! by स्पंदना
>>राग येतो तो अपेक्षा असली तर
बघायला हवा
हा हिंदी सिनेमा आहे का?
In reply to हा हिंदी सिनेमा आहे का? by मुक्त विहारि
पैसे देवून बघण्यासारखा आहे
In reply to पैसे देवून बघण्यासारखा आहे by चित्रगुप्त
जाउ द्या हो. तुमाला नाय समजणार...
मुव्ही जालावर आला की बघीन.
याच परिक्षणाची वाट पहात होते.
एकूण इंग्लिश विंग्लिश धाटणीचा
In reply to एकूण इंग्लिश विंग्लिश धाटणीचा by कानडाऊ योगेशु
नाही. मेलोड्रामा वगैरे काहीही
In reply to नाही. मेलोड्रामा वगैरे काहीही by स्पंदना
वरील गोष्टी इंग्लिश विंग्लिश
In reply to वरील गोष्टी इंग्लिश विंग्लिश by बॅटमॅन
शीरीदेवी म्हणजेच ओव्हरअ
In reply to शीरीदेवी म्हणजेच ओव्हरअ by स्पंदना
असेल, तसंही असेल. इंग्लिश
In reply to वरील गोष्टी इंग्लिश विंग्लिश by बॅटमॅन
इंग्लिश विंग्लिश मध्ये आहेत
बहुतेक उद्याच बघेन!
बघण्याचा विचार करतो आहे.
लोकसत्तातील दोन लेख
एका साध्या प्रोटेक्टीव्ह
आता नक्कीच ..
In reply to आता नक्कीच .. by तुमचा अभिषेक
छान परिक्षण
आवडला... उत्तम सिनेमा आहे..
In reply to आवडला... उत्तम सिनेमा आहे.. by भडकमकर मास्तर
ओक्के, मग थेट्रात जाऊन बघते.
In reply to ओक्के, मग थेट्रात जाऊन बघते. by रेवती
हंसी तो फंसी च टायटल फसलंय.
'क्वीन' आवडला. त्याबद्दल बरेच