Skip to main content

राजीव पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली

लेखक एच्टूओ यांनी सोमवार, 30/09/2013 या दिवशी प्रकाशित केले.
राष्ट्रीय पुरस्कार विजेते सिनेदिग्दर्शक राजीव पाटील यांचे आज, सोमवारी मुंबईत हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन !!! अतिशय धक्कादायक बातमी!! एका वेगळ्या वाटेवरच्या कलाकाराच्या जाण्यामुळे होणारे नुकसान भरुन निघण्यासारखे नाही. असा कलाकार पुन्हा होणे नाही. भावपूर्ण श्रद्धांजली!!

वाचने 5743
प्रतिक्रिया 15

प्रतिक्रिया

सावरखेड १ गाव, जोगवा सारखे मराठी चित्रपट देणारे प्रयोगशील दिग्दर्शक अशी अचानक एक्झिट घेऊन गेले, वाईट झाले. :(

फार लौकर गेले !! अजून बरेच काही अपेक्षित होते त्यांच्याकडून .. मराठी चित्रपटसृष्टीसाठी खुप मोठा धक्का आणि हानी आहे !

चित्रपट आणि राजकारणातील लोकांचे आयुष्यात काम आणि याची विश्रांती याचा समतोल साधायला हवा. बर्‍याच वेळेस मनातील भव्यदिव्य कल्पना, अशरीरी ताणतणाव यातून बर्‍याच कलावंताचा अकाली मृत्यु होत असतो.

In reply to by कलंत्री

कलाक्षेत्रातल्या हरहुन्नरी माणसांनी विश्रांती घ्यावीच, पण राजकारणी? किती राजकारण्यांचे कामाच्या दबावामुळे नैसर्गिकरित्या अकाली मृत्यू झालेत? गेंड्याच्या कातडीला छर्याच्या गोळीने काहीही फरक पडत नाही...

पांगिरा, जोगवा, बहात्तर मैल अशा चित्रपटातून त्यांनी सामन्यांच्या व्यथा मांडल्या. वंशवेल हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला.

In reply to by कुसुमावती

Rajeev'ji... Very Early Exit.... Just Speechless..... --------------------------------------------------- आत्ता कुठे मराठी इन्डस्ट्री एका वेगळ्या पाऊलवाटेवर स्थिरावत होती..... तिला एकटं टाकून निघुन गेलात !!... Its really very shocking.......... Rest In Peace......... *~*~*~*

अतिशय दुखद घटना... राजिव दादाची भेट पहिल्यांदा "प्रयोग परिवार" मध्ये झालेली... बहुतेक २००३ मध्ये.. अतिशय साधा सरळ माणुस... आम्ही अगदी छोटी एकांकिका करत होतो त्या निमित्ताने भेट झालेली.. त्यानंतर सावरखेड एक गाव चा वेळेस जवळुन संबंध आले.. आजहि विश्वास बसत नाहिये .. राजिव दा आपल्यात नाहि... :( खूप वाईट वाटले :(

बर्‍याच कलाकारांबद्दल आजकाल असेच प्रकार ऐकू येतात. सतत धावत रहाण्यामागे अनेक कारणं असतील. कलावंताची कारकीर्द अगदी बेभरवशाची. प्रचंड ताणतणाव आणि सतत लोकांसमोर रअहाण्याचे कंपल्शन. कुठे थांबावं हे ज्याचं त्याने ठरवायचं. काही जणांना स्वतःच्या आरोग्याचीही फिकीर नसते. झाली ती घटना वाईटच त्यामुळे अनेकांचं अनेक प्रकारचं नुकसान झालं आहे. मृतात्म्यास विनम्र श्रद्धांजलि.

सूरकरांनंतर पाटलांचीही अकाली एक्झिट?? अरे काय चाल्लंय हे?