दुष्काळवाडा.. भाग ६
कोरडवाहू मिशनची कुंठीत गती

पर्जन्यआधारित पिक रचनेला फाटा, पाण्याची वारेमाप उधळपट्टी, जमिनीचे बिघडलेले आरोग्य यामुळे मराठवाड्यातील दुष्काळाला मानवनिर्मित कारणांची गडद किनार लाभली आहे. केवळ हवामान बदलाचा हा दुष्काळ नाही तो बNयापैकी मनुष्यनिर्मित आहे.मराठवाड्याची मूळ कोरडवाहू भूभाग ही ओळख नाकारुन नगदी पिकाची स्वप्ने पडायला लागली. या स्वप्नांना उभारी देण्यात आल्याने मराठवाडा दुष्काळी गर्तेत लोटला गेला.