Skip to main content

मांडणी

३८-बँकॉक-स्ट्रीट-घोडबंदर रोड ठाणे कट्टा----वृत्तांत.......

लेखक मुक्त विहारि यांनी बुधवार, 16/09/2015 15:17 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्क्लेमर : मला फोटो काढता येत नसल्याने मी फोटो काढत नाही. परवा ठरल्याप्रमाणे, कालचा "३८-बँकॉक-स्ट्रीट-घोडबंदर रोड ठाणे कट्टा" सुरळित पार पडला. मी आणि सौ.मुवि, कळव्याला, मि.ट्का, ह्याच्या कडे गेलो. टका आणि मोदक, मुंबईच्या वाहतूकीमुळे थोडे उशीराच आले. मग टकाच्या गाडीतून कट्ट्याच्या ठिकाणी रवाना झालो. कळवा ते घोडबंदर हा प्रवास मजल-दरमजल करत गाठला.सुदैवाने टकाच्या मातोश्रींनी वाटेत खायला म्हणून काजू दिले होते.आनच्या सौ.ने आणि मि.मोदक ह्यांनी काजू खात-खातच प्रवास पुर्ण केला. मी आणि टका मात्र गप्पा-गोष्टी करण्यात दंग होतो. मोदक नुकतेच पुण्याहून आले असल्याने, उगाच पुणे विरुद

अनुशेषाचा मुक्तीसंग्राम

लेखक pradnya deshpande यांनी बुधवार, 16/09/2015 14:07 या दिवशी प्रकाशित केले.
अनुशेषाचा मुक्तीसंग्राम मुक्तीसाग्राम काही कामानिमित्ताने भोपाळ येथे एका परिषदेसाठी गेले असता आप मराठवाडासे आए हो ना? जहा शेतकरी आत्महत्या करते है असा प्रश्न एकाने विचारला तेव्हा रझाकारांशी झुंजणारा मराठवाडा या ओळखीपेक्षा शेतकरी आत्महत्या करणारा अशी नकोशी ओळख देशपातळीवर मराठवाड्याची झाली असल्याची जाणीव झाली. निजामाच्या जोखडातून १७ सप्टेंबर १९४७ रोजी मराठवाडा मुक्त झाला.

अन्नदाता सुखी भव भाग ३ - Waste not, want not !

लेखक शेखरमोघे यांनी मंगळवार, 15/09/2015 06:31 या दिवशी प्रकाशित केले.
या आधीचे संबंधित लेखन मी जर म्हटलं "मला काल पडलेल्या स्वप्नांत एक कोणी महापुरुष "मेरे प्यारे भाईयो और बहेनो" असे म्हणत म्हणत त्याच्या आजूबाजूला असलेल्या प्रत्येक भारतीयाच्या खिशात रु. ५०० सारतो आहे" तर ऐकणारे जे काय बोलतील त्यांत "भांग, धत्तुरा/धोत्रा, ठाण्याहून पळालेला दिसतो आहे, मते मिळवायला कै पण करतात" असे (वेचक) शब्द पेरलेले असतील!

उद्या कट्टा आहे....बाकीची माहिती खाली देत आहे....

लेखक मुक्त विहारि यांनी सोमवार, 14/09/2015 18:25 या दिवशी प्रकाशित केले.
नुकत्याच समजलेल्या बातमीनुसार, मिपाकर मोदक (हे लायन सो-सो, श्री-अमुक-तमुक. अशा चालीवर वाचले तरी चालेल.), सध्या मुंबई परीसरात असून ते कट्टा करायला तयार आहेत असे समजले. जास्त पाल्हाळ न लावता, कट्ट्या संर्दभात माहिती देत आहे. तारीख - १५-०९-२०१५ वेळ - रात्रीचे ८ ठिकाण - ३८, बँकॉक स्ट्रीट, ठाणे.

दुष्काळवाडा..... अंतिम भाग मिशन म्हणून लढण्याची गरज

लेखक pradnya deshpande यांनी सोमवार, 14/09/2015 16:42 या दिवशी प्रकाशित केले.
दुष्काळवाडा..... अंतिम भाग मिशन म्हणून लढण्याची गरज शेतकरी सततच्या दुष्काळाने सैरभैर झालेली जनता. सुरु असलेले पैसेवारीच्या आकडेवारीचे खेळ, दुष्काळाचे राजकारण करत एकमेकांवर कुरघोडी करण्यात मग्न असलेले राजकारणी या पाश्र्वभूमीवर तिशी पस्तीशीत मरण कवटाळणारे तरुण शेतकरी. मराठवाडा कडेलोटावर येऊन ठेपला आहे. मकरंद अनासपुरे, नाना पाटेकर सारखे सह्रदय अभिनेते दुष्काळाच्या खाईत उतरुन आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत देत आहेत.

विसराळू नाना

लेखक सत्य धर्म यांनी गुरुवार, 10/09/2015 11:18 या दिवशी प्रकाशित केले.
विसराळू .. वा काय शब्द आहे ना, याचे किस्से पण खूप आहेत बर तर असेच काही किस्से इथे सांगतो.......... आमच्या गावचे नाना म्हणजे एक नंबर विसराळू माणूस. बाजारात गेला तर मोकळी पिशवी घरी आणि बायको बाजारात एवढा विसराळू. बरं असं पण नाही की हा काम करत नाही. चांगला साखर कारखान्यात कामाला आहे, पण कसल हो! कामावर जाताना डबा घेऊन बस थांब्यावर आला तर जेवणाचा डबा हलवून लक्षात ठेवतो, कामावरून आलो आहे की जायचं आहे ते; आणि हो, कारखान्याकडे जाणा-या आणि येणाऱ्या दोन्ही गाड्यांना हात करतात.

भव्य दिव्य व्यक्तींच्या भेटीसाठी पुणश्च सस्णेह आवताण !!!

लेखक दिव्यश्री यांनी बुधवार, 09/09/2015 14:20 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.misalpav.com/node/32522 तर आता पर्यंत समस्त मिपाकरांणा समजलेच असेल की पुण्यणगरीत भव्य आणी दिव्य कट्टा आयोजित करणेत आला आहे. मिपाच्या दैदिप्यमाण परंपरेचीपाइक होत हा दुसरा धागा काढला आहे. सगळ्यांणी आवर्जुण सहकुटुंब येणेचे करावे ही कळकळीची / आग्रहाची विणंती. कट्ट्याला उपस्थित राहुण कट्ट्याची शोभा वाढवावी आणी मिपाधर्म पाळावा/ वाढवावा. :) स्थळ - पुण्यणगरीमधील पाताळेश्वर लेणी तारिख.

दुष्काळवाडा भाग ९ मरण येथले संपत नाही

लेखक pradnya deshpande यांनी बुधवार, 09/09/2015 13:32 या दिवशी प्रकाशित केले.
मरण येथले संपत नाही आत्महत्या दोनच महिन्यांपूर्वी मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त जिल्ह्यामध्ये झालेल्या सर्वेक्षणात प्रत्यक्ष सहभाग घेण्याची संधी मिळाली. आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांच्या कुटुंबियांशी संवाद साधताना मन सुन्न झाले. केवळ नापिकी हे एकमेव कारण शेतकर्‍यांच्या आत्महत्यांमागे नाही हेही प्रकर्षाने जाणवले.

या पाच गोष्टी कायम कराव्यात

लेखक श्रीगुरुजी यांनी मंगळवार, 08/09/2015 14:12 या दिवशी प्रकाशित केले.
1. आपले वाहन नेहमी रस्त्याच्या डाव्या बाजूने चालवावे. उजव्या बाजूने चालविल्यास डाव्या-उजव्यातला फरक आपल्याला कळत नाही अशी लोकांची समजूत होऊन आपले हसे होईल. 2. चौकात आल्यावर लाल रंगाचा वाहतूक दिशादर्शक दिवा दिसल्यास तो विझेपर्यंत आणि हिरवा दिवा लागेपर्यंत थांबावे. न थांबता पुढे गेल्यास आपल्याला लाल-हिरव्या रंगातला फरक कळत नाही अशी लोकांची समजूत होऊन लोक आपली टर उडवतील. 3. नियमांचा उल्लंघन करून वाहन चालविण्यामुळे पोलिसमामाने दंड केल्यास आपली फजिती कोणाला सांगू नये कारण सगळे आपली चेष्टा करून आपल्यावर हसतील. 4.

...घे जगून !

लेखक सस्नेह यांनी मंगळवार, 08/09/2015 12:18 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या वर्षीचा फेब्रुवारी महिना. लेकाची दहावीची परीक्षा पंधरा दिवसांनी सुरु व्हायची होती. एका रविवारच्या सु-प्रभाती मी आणि मुलगा पुस्तकं आणि इतर शालेय साहित्य आवरत होतो. आठ दिवसापूर्वी शाळेतून मुलाचं परीक्षेचं हॉल तिकीट मिळालं होतं ते मी बंदोबस्तात कपाटात ठेवलं होतं. त्याला लॅमिनेशन करायचे होते म्हणून लॉकरचा कप्पा उघडला. सगळे कागद बाहेर काढले. हॉल तिकीट त्यात सापडेना. कपाट पालथं घातलं, सगळ्या वस्तू, कपडे बाहेर काढून शोधलं, लॉफ्टवरच्या सगळ्या जिनसा खाली आल्या, कागद अन कागद विंचरून काढला. पण हॉल तिकीट मिळालं नाही. हॉल तिकीट म्हणजे परीक्षेचा प्रवेश परवाना. महत्वाचा कागद ! ...