डिसेम्बर २०२१ मध्ये बहिणीसोबत मध्य प्रदेशचा दौरा झाला. इंदोर, ओंकारेश्वर, महेश्वर, मांडू या ठिकाणांना भेट दिली. त्याचा वृत्तांत लिहायचा आहे. तत्पूर्वी हा एक छोटा लेख.
नर्मदेच्या उत्तर तीरावर वसलेले एक छोटे शहर म्हणजे महेश्वर. तिथे विणल्या जाणाऱ्या साड्यांसाठी ते प्रसिद्ध आहे. तसेच नर्मदेवर अतिशय सुंदर घाट तिथे आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी इंदोर संस्थानची राजधानी १७७२ मध्ये महेश्वर येथे हलवली. त्यांच्याच कारकिर्दीत महेश्वर येथे राजवाडा, मंदिरे, नदीवर प्रशस्त घाट बांधले. मराठी इतिहासातील या कर्तृत्ववान राज्यकर्तीने आपला देह ठेवला तोही याच ठिकाणी.
क्या बात है क्या बात है =))))
भारी
अफलातून