Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by मनो on गुरुवार, 01/13/2022 - 01:21
लेखनविषय (Tags)
संस्कृती
कला
इतिहास
लेखनप्रकार (Writing Type)
माहिती
तिसरे पानिपत युध्द स्मृतीदिन ऑनलाईन व्याख्यान निमंत्रण रविवार, १६ जानेवारी २०२२ सायंकाळी ६ वाजता Please click on the link of BISM YouTube channel for this programme. https://www.youtube.com/channel/UC32NxNt3qpCe6x6HNLkUvUg image

  • Log in or register to post comments
  • 18323 views

प्रतिक्रिया

Submitted by श्रीरंग_जोशी on गुरुवार, 01/13/2022 - 01:30

Permalink

धन्यवाद

या (ऑनलाइन) व्याख्यानाच्या निमंत्रणासाठी मनःपूर्वक धन्यवाद. रविवारी भाप्रवेनुसार संध्याकाळी ६ वाजता युट्युबच्या माध्यमातून श्रोता म्हणून नक्की सहभागी होतो.
  • Log in or register to post comments

Submitted by उगा काहितरीच on गुरुवार, 01/13/2022 - 05:45

In reply to धन्यवाद by श्रीरंग_जोशी

Permalink

+१

+१
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on गुरुवार, 01/13/2022 - 06:08

Permalink

नक्कीच हजेरी लावणार.

नक्कीच हजेरी लावणार.
  • Log in or register to post comments

Submitted by अनन्त अवधुत on गुरुवार, 01/13/2022 - 06:25

Permalink

उत्तम कार्यक्रम

शक्य झाल्यास हजेरी लावीन. त्यावेळी आमच्याकडे सकाळचे ४:३० होतात, त्यामुळे वेळ गाठणे अवघड आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by तुषार काळभोर on गुरुवार, 01/13/2022 - 08:09

In reply to उत्तम कार्यक्रम by अनन्त अवधुत

Permalink

सकाळी ४.३०

वक्ते सुद्धा त्यांच्या सकाळी ४.३० वाजता व्याख्यान देणार आहेत..
  • Log in or register to post comments

Submitted by अनन्त अवधुत on गुरुवार, 01/13/2022 - 14:17

In reply to सकाळी ४.३० by तुषार काळभोर

Permalink

मला वाटले

त्यांचे घड्याळ पुढे असेल. आता जोरदार प्रयत्न करावे लागतील ०४:३० ला हजर होण्याचे.
  • Log in or register to post comments

Submitted by मनो on Fri, 01/14/2022 - 03:11

In reply to मला वाटले by अनन्त अवधुत

Permalink

एक खुलासा करणे आवश्यक आहे -

एक खुलासा करणे आवश्यक आहे - व्याख्यान जरी भारतीय वेळेनुसार जास्तीत जास्त लोकांना सोयीस्कर अश्या ६ वाजता संध्याकाळी असलं तरी मला स्वतःला पहाटे ४.३० वाजता उत्स्फूर्त बोलणं आणि त्यासोबतच व्याख्यानाचा प्राण असलेली चित्रं, कविता इत्यादी सोबत जोडून दाखवणं तंत्रिकदृष्टया शक्य नाही, त्यामुळं फक्त प्रक्षेपण लाईव्ह असेल, बोलणं नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीरंग_जोशी on गुरुवार, 01/13/2022 - 09:04

In reply to उत्तम कार्यक्रम by अनन्त अवधुत

Permalink

सकाळचे ४:३० :-)

२४ तासाच्या घड्याळातली ०४:३० ही वेळ पहाटेची समजली जाते ;-) . छिद्रान्वेषीपणाबद्दल क्षमस्व.
  • Log in or register to post comments

Submitted by अनन्त अवधुत on गुरुवार, 01/13/2022 - 14:22

In reply to सकाळचे ४:३० :-) by श्रीरंग_जोशी

Permalink

मालूम हाय ना बाप्पा!

म्हनुनच सकायचे ४:३० लिवले होते, ०४:३० नाई. मजा करा बाप्पु, तुमच्याकडे निवांत चहा पिऊन बसायची वेळ असेल.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीरंग_जोशी on गुरुवार, 01/13/2022 - 23:24

In reply to मालूम हाय ना बाप्पा! by अनन्त अवधुत

Permalink

:-)

आमच्याकडे रविवारी सकाळचे ६:३० ही वेळ आहे. या रविवारी नेहमीपेक्षा लौकर उठून चहा पिऊ :-).
  • Log in or register to post comments

Submitted by कर्नलतपस्वी on गुरुवार, 01/13/2022 - 07:37

Permalink

नक्कीच

नक्कीच हजेरी लावणार
  • Log in or register to post comments

Submitted by तुषार काळभोर on गुरुवार, 01/13/2022 - 08:07

Permalink

रोचक विषय

Looking forward to it..
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on गुरुवार, 01/13/2022 - 08:18

Permalink

रेकॉर्डिंग

पाहीन.
  • Log in or register to post comments

Submitted by Bhakti on गुरुवार, 01/13/2022 - 09:19

Permalink

वाह! शुभेच्छा.

वाह! शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

Submitted by नि३सोलपुरकर on गुरुवार, 01/13/2022 - 09:40

Permalink

शुभेच्छा

वक्ते सुद्धा पहाटे ४.३० वाजता व्याख्यान देणार आहेत . __/\__. नक्कीच हजेरी लावणार
  • Log in or register to post comments

Submitted by चंद्रसूर्यकुमार on गुरुवार, 01/13/2022 - 09:47

Permalink

शुभेच्छा

अरे वा. शुभेच्छा. भाषणाला नक्कीच येणार.
  • Log in or register to post comments

Submitted by चौथा कोनाडा on गुरुवार, 01/13/2022 - 13:15

Permalink

उत्कंठा आहे. उपस्थित

उत्कंठा आहे. उपस्थित राहण्याचा पुरेपुर प्रयत्न करणार !
  • Log in or register to post comments

Submitted by चौकस२१२ on गुरुवार, 01/13/2022 - 14:01

Permalink

याचे चित्रीकरण नंतर उपलब्ध

याचे चित्रीकरण नंतर उपलब्ध असणार आहे का ?
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगणेशा on गुरुवार, 01/13/2022 - 14:43

Permalink

धन्यवाद मनो सर.

धन्यवाद मनो सर. प्रत्यक्ष तुमच्याकडून ऐकायची उत्सुकता आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by मनो on गुरुवार, 01/13/2022 - 21:44

Permalink

याचे चित्रण youtube वर असेल,

याचे चित्रण youtube वर असेल, त्यामुळं नंतरही पाहता येईल.
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Sun, 01/16/2022 - 17:55

Permalink

वाट पाहतोय.

चानेल उघडला आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीरंग_जोशी on Sun, 01/16/2022 - 18:22

Permalink

प्रक्षेपण बघतोय

या ऑनलाइन व्याख्यानाचे थेट प्रक्षेपण बघतोय.
  • Log in or register to post comments

Submitted by कर्नलतपस्वी on Sun, 01/16/2022 - 19:01

Permalink

प्रक्षेपण बघतोय

दुर्मिळ चित्रे बघावयास मिळत आहेत. रियासतकार आणी कादंबराकार यातला फरक समजला.
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Sun, 01/16/2022 - 19:16

Permalink

उद्बोधक!!

फार छान.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगणेशा on Sun, 01/16/2022 - 19:22

Permalink

चित्रांच्या माध्यमातून, गोष्ट

चित्रांच्या माध्यमातून, गोष्ट स्वरूपात पण तरीही वास्तवाचा शोध घेणारं वर्णन! _/\_ Panipat Smrutidin - The battle of Panipat revisited through pictures. By Manoj Dani
  • Log in or register to post comments

Submitted by चौथा कोनाडा on Sun, 01/16/2022 - 19:44

Permalink

भरपूर माहिती मिळत आहे !

फारच छान.
  • Log in or register to post comments

Submitted by मनो on Sun, 01/16/2022 - 20:10

Permalink

सर्वांचे धन्यवाद, रेकॉर्डिंग

सर्वांचे धन्यवाद, रेकॉर्डिंग इथे आहे, नंतर कधीही पाहता येईल https://youtu.be/f_MswWcW_Pk
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीरंग_जोशी on Sun, 01/16/2022 - 20:14

Permalink

उत्तम विवेचन

मर्यादीत वेळेत एका फार मोठ्या व गुंतागुंतीच्या ऐतिहासिक घडामोडींवर उत्तम विवेचन. या विवेचनाला ऐतिहासिक चित्रांद्वारे उत्तम जोडी दिलीत. एक सुचवणी - असे व्याख्यान देताना पुढच्या वेळी नकाशाच्या माध्यमातून सुरुवातीला कोणत्या बाजूचे कुठे वर्चस्व होते अन कोण कुठे आक्रमण करत होते हे समजावून सांगावे.
  • Log in or register to post comments

Submitted by मनो on Sun, 01/16/2022 - 21:03

In reply to उत्तम विवेचन by श्रीरंग_जोशी

Permalink

हो जरूर

हो जरूर
  • Log in or register to post comments

Submitted by Trump on Sun, 01/16/2022 - 20:25

Permalink

मराठी भाषेत आले की मला सांगा.

मराठी भाषेत आले की मला सांगा. मी पण उत्सुक आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Sun, 01/16/2022 - 20:28

Permalink

चित्रांचे महत्त्व फार आहे व्याख्यानात.

तरीही त्याचे mp3 (12mb)करून ठेवले आहे ऐकायला.
  • Log in or register to post comments

Submitted by बबन ताम्बे on Sun, 01/16/2022 - 21:18

Permalink

कधी न पाहिलेली चित्रे पहायला मिळाली.

सुंदर आणि माहितीपूर्ण व्याख्यान. खूप माहिती मिळाली आणि मुख्य म्हणजे दुर्मिळ आणि कधी न पाहिलेली चित्रे आपण पहाण्याची संधी मिळवून दिलीत. खूप खूप धन्यवाद. पानिपत कादंबरीत वर्णन केल्याप्रमाणे गोल मोडल्यामुळे मराठ्यांचा तोफखाना बंद झाला आणि नन्तर त्यामुळे पराभव ओढवून घेतला यात कितपत तथ्य आहे?
  • Log in or register to post comments

Submitted by मनो on Mon, 01/17/2022 - 09:38

In reply to कधी न पाहिलेली चित्रे पहायला मिळाली. by बबन ताम्बे

Permalink

या 'गोल' कथेचा उगम कसा झाला

या 'गोल' कथेचा उगम कसा झाला ते मी शोधत होतो. मूळ फारसी साधने अथवा मराठी साधनांमध्ये मला कुठेही भाऊंनी एक वर्तुळाकार सैन्य-गोल बनवला होता असा उल्लेख आढळला नाही. श्री. निनाद बेडेकर यांच्या व्याख्यानांमध्ये मी प्रथम हे सर्व ऐकले. त्याआधीही कदाचित मराठे निजामसारखा पोकळ गोल बांधून लढले असा उल्लेख क्वचित कुणी इतिहासकाराने केलेला असावा. मग हा समज आला कुठून? तर माझा अंदाज असा की काशीराजाच्या बखरीत आणि इतरत्र 'घोल' غول असा शब्द आला आहे. या शब्दाचा अर्थ सैन्याची तुकडी. तर हा शब्द गोल या अर्थाने वाचला गेला का? त्यामुळे अर्थाचा विपर्यास होऊन मराठे गोलात लढले असा समज झाला असावा का? https://meaning.urdu.co/troop/ तुम्ही हे चित्र पाहिलेत तर नुसते मराठेच नव्हे तर अब्दालीसुद्धा चौकोनी रचना करून सैन्यांच्या रांगांसह लढत होता. http://www.bl.uk/onlinegallery/onlineex/apac/other/largeimage55447.html याला infantry squares असं म्हणतात. कदाचित आपल्याकडील सैन्यातील लोक याचा अर्थ चांगला सांगतील. https://en.wikipedia.org/wiki/Infantry_square जर मुळात गोलच अस्तित्वात नसेल तर त्यामुळे पराभव झाला यालाही काही अर्थ उरत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by बबन ताम्बे on Mon, 01/17/2022 - 15:28

In reply to या 'गोल' कथेचा उगम कसा झाला by मनो

Permalink

धन्यवाद मनो.

दक्षिणायन मुळे पराभवाला कितपत हातभार लागला ? मराठी फौज थंडी, उपासमारीने शारिरीक दृष्ट्या दुर्बल झाल्यामुळे तगड्या अफगाणांसमोर टिकू शकली नसेल.
  • Log in or register to post comments

Submitted by मनो on Mon, 01/17/2022 - 22:36

In reply to धन्यवाद मनो. by बबन ताम्बे

Permalink

दक्षिणायन आणि पराभवाचा काही

दक्षिणायन आणि पराभवाचा काही संबंध नाही. दुसऱ्या एका बाबतीत त्याचे महत्व आहे. काशिराज ही लढाई पूर्व पश्चिम झाली म्हणतो, पण ती वस्तुतः उत्तर दक्षिण हवी होती. मी त्या दिवशी सूर्याची आकाशातील जागा आणि मार्ग गणिताने काढला. त्यातून असे दिसते, की नकाशातील पूर्व आणि त्या दिवशी सूर्योदयाची प्रत्यक्ष जागा यात साधारण ४५ अंशाचा कोन आहे, त्यामुळे लढाई त्या दिवसाच्या आभासी पूर्व पश्चिम, परंतु नकाशावरून आग्नेय वायव्य अशी आहे, जी सुसंगत वाटते. उपासमारीबद्दल एक महत्वाचा मुद्दा असा की आता पुढे उपासमार होणार म्हणून मराठ्यांनी हल्ला केला, ती उपासमार २-३ दिवसांच्या पूर्वी सुरू झाली होती. ती शिंदे होळकर या सर्वांनाच सारखीच बाधत होती असेही नाही. शहावलीखान आणि दुंदेखान यांचा सकाळी पराभव करताना मराठ्यांना ह्या अडचणी आल्या नाहीत. त्यावरून थोडा प्रभाव असला तरी हे काही पराभवाचे मूळ कारण नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by अनन्त अवधुत on Mon, 01/17/2022 - 15:28

In reply to या 'गोल' कथेचा उगम कसा झाला by मनो

Permalink

मराठा हिस्ट्री ह्यांच्या

मराठा हिस्ट्री ह्यांच्या पानिपतावरील ह्या भागात गोलचा उल्लेख आलाय. त्यात ते म्हणतात उद्गीरच्या लढाईत निजामाने गोल वापरला. त्याच व्हिडीओ नुसार गोल ही फ्रेंचाकडुन आलेली व्युह रचना आहे. फ्रान्समध्ये गौल लोक राहतात, फ्रान्स त्यांनीच वसवला. पूर्वी फ्रान्सला गौल म्हणत, त्याचा इथे काही संबंध असावा का? फ्रान्सला गौल म्हणण्याबद्दल.
  • Log in or register to post comments

Submitted by मनो on Mon, 01/17/2022 - 21:37

In reply to मराठा हिस्ट्री ह्यांच्या by अनन्त अवधुत

Permalink

गॉल हे विशेष नाम आहे, म्हणजे

गॉल हे विशेष नाम आहे, म्हणजे फ्रान्स. लॅटिनमधून हा शब्द रोमन लोकांनी फ्रान्स देशासाठी वापरला आहे. जुन्या मराठीत फ्रान्सिस असे फ्रेंचांचे नाव येते, उदा. फ्रान्सिस रयतेने आपला राजा मारला. काशीराज 'घोल ए शाहवलीखान' म्हणतो, तर याप्रमाणे शहावलीखानाचा फ्रान्स असा अर्थ जुळणार नाही. यामुळं गॉल आणि गोल आणि घोल यांचा काही संबंध नसावा असेच मला वाटते. मराठा हिस्ट्री चॅनलचे श्री प्रणव महाजन यांच्याशी मी याबद्दल चर्चा केली आहे. त्यांनी ही रचना श्री निनाद बेडेकर यांच्या संदर्भाने घेतली आहे. बेडेकरांनी ती कुठून घेतली ते त्यांना माहीत नाही. माझ्या मते संपूर्ण सैन्य आणि बुणगे यांचा असा गोल करणे हे संपूर्ण अव्यवहार्य (impractical) आहे. त्यासाठी लागणाऱ्या तोफांची संख्याच प्रचंड होईल, कारण वर्तुळाचा घेरा २*पाय*त्रिज्या याप्रमाणे प्रचंड होणार आहे. तसेच प्रत्येक माणसाला, तोफेला हलवून त्याच्या जागेवर नेण्यासाठी प्रचंड वेळ लागेल. या गोलाला हलण्यासाठी प्रचंड नैसर्गिक अडथळे (तलाव, गावे, जंगल) मध्ये येणार आहेत, त्यातून गोल कायम ठेऊन मार्ग कसा काढणार? या वेळी नाना फडणीस बुनग्यात होते, त्यांनी अशी कोणतीही रचना वर्णन केलेली नाही. प्रत्येक साधन दोन्ही बाजूंची सैन्यरचना सांगताना एका ओळीत, डावी, मध्य, उजवी अशीच सांगतो, त्यामुळं गोल या कल्पनेला काही पुरावा नाही. आपण उगाच काहीतरी तर्काने निर्माण केलेली ती कल्पना आहे असे माझे मत उपलब्ध पुराव्यावरून झालेले आहे. निजामाने उदगीर येथे कदाचित हजार पाचशे गारदी लोकांचा छोटा चौकोन केलेला असू शकतो, त्याला गोल म्हणजे सैन्याची तुकडी म्हणजेच गोल असे मानलेले असणे सहज शक्य आहे. उदगीरचा अभ्यास मी केला नसल्याने निश्चित सांगू शकत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Sun, 01/16/2022 - 21:57

Permalink

थोड्या वेळ ऐकलं. नंतर निवांत

थोड्या वेळ ऐकलं. नंतर निवांत ऐकेन.
  • Log in or register to post comments

Submitted by अनन्त अवधुत on Mon, 01/17/2022 - 07:42

Permalink

आत्ताच पाहिले

दुर्मिळ चित्रे पहायला मिळाली. नविन माहिती मिळाली. “बचेंगे तो ओर भी लडेंगे” ही कोणा मराठी माणसाने उद्गारलेले सगळ्यात महत्वाचे शब्द वाटतात. तसे कोणी म्हटले नाही हे कळून मन थोडे खट्टु झाले. पण असो. ईतिहास जसा आहे तसा आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by तुषार काळभोर on Mon, 01/17/2022 - 09:34

Permalink

छान व्याख्यान

काल संध्याकाळी सात पर्यंत पाहिलं. राहिलेलं रात्री उशीरा पाहिलं. तुमच्या लेखांतून तुमचा अभ्यास दिसतोच, तोच कालच्या व्याख्यानात दिसला. आम्ही एखादं चित्रं पाहतो आणि 'वा! छान चित्र!' असं म्हणून दुसरं पाहतो. पण त्या चित्रातील बारकावे 'पाहणं' आणि इतिहासाच्या दृष्टिकोनातून त्यांचा अर्थ लावणं हे अनुभव अन अभ्यासाशिवाय शक्य नाही. उदा. लखुजी जाधवांच्या चित्रातील चुनारदान. दुसरी गोष्ट नावांची. अनेक तत्कालीन फारसी तसेच युरोपियन साधनांत आपल्याकडचे उल्लेख वेगळे असतात. ते आमच्या लक्षातही येत नाहीत. उदा. सेवाजी हेसुद्धा ओळखायला अनुभव अन् अभ्यास सखोलच हवा. तुमच्याकडून असेच प्रसंगोचित आणखी लेख्/व्याख्यान वाचायला/पाहायला आवडतील. मनःपूर्वक धन्यवाद!
  • Log in or register to post comments

Submitted by मनो on Mon, 01/17/2022 - 22:41

In reply to छान व्याख्यान by तुषार काळभोर

Permalink

धन्यवाद. दिग्गज चित्रकार

धन्यवाद. दिग्गज चित्रकार ब्रशच्या दोनचार फटक्यांतून बरेच काही सांगून जातात. चित्रगुप्तकाका माझ्यापेक्षा छान सांगतील. ते थोडेफार एखाद्या कवितेप्रमाणे किंवा ज्ञानेश्वरमाऊली-तुकोबांच्या अभंगप्रमाणे असते. अर्थ कळतो पण अनुभूती होत नाही, योग्य वेळी अचानक न सांगता ती होते.
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Mon, 01/17/2022 - 10:32

Permalink

गोल म्हणजे तोफ ठेवायचा उंचवटा?

रायगडावरील हल्ल्यासाठी दमदमे बसवले पोटल्याच्या डोंगरावर तसे हे उंचवटे असतील. यापैकी एखादा अगदी पुढे असावा आणि तोच मोडला असेल.
  • Log in or register to post comments

Submitted by मनो on Mon, 01/17/2022 - 22:46

In reply to गोल म्हणजे तोफ ठेवायचा उंचवटा? by कंजूस

Permalink

पानिपतची रणभूमी अगदीच सपाट

पानिपतची रणभूमी अगदीच सपाट मैदानात आहे. एकच उंचवटा थोडा आहे, तिथे पानिपत शहरात किल्ला बांधला आहे. तर्क खूप करता येतील, पण मूळ साधनांत कुणीतरी त्याला दुजोरा दिल्याशिवाय तसं निश्चित नाही सांगत येत. म्हणून जुनी हस्तलिखिते धुंडाळून त्यात काय आहे ते पाहावे लागते, आणि अर्थातच खूप सावधपणे प्रत्येक शब्द तपासावा लागतो.
  • Log in or register to post comments

Submitted by सौंदाळा on Mon, 01/17/2022 - 12:34

Permalink

खूप माहितीपूर्ण आणि बोलण्याची

खूप माहितीपूर्ण आणि बोलण्याची शैलीसुद्धा सुंदर. भाऊंच्या वीरमरणाची नविन माहिती समजली. नविन पुस्तकासाठी शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

Submitted by मनो on Mon, 01/17/2022 - 23:25

Permalink

आमचे मित्र मिपाकर बॅटमॅन

आमचे मित्र मिपाकर बॅटमॅन यांचे भारताबाहेरील भारतीय हे काही दिवस आधीचे व्याख्यानदेखील सर्वाना आवडेल, ते इथे आहे https://www.facebook.com/watch/live/?extid=CL-UNK-UNK-UNK-AN_GK0T-GK1C&ref=watch_permalink&v=4528801770574859
  • Log in or register to post comments

Submitted by Trump on Tue, 01/18/2022 - 17:35

In reply to आमचे मित्र मिपाकर बॅटमॅन by मनो

Permalink

ठिक

थोडे बघण्याचा प्रयत्न केला. भारतीयांचे कमी आणि मुस्लिमांचे जास्त उल्लेख आहे. प्रयत्न चांगला, पण मजकूर सामान्य आणि निरुपयोगी. असो.
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Tue, 01/18/2022 - 19:22

In reply to ठिक by Trump

Permalink

इतिहास सांगायचा तर

तो अप्रियही असतो. कादंबरी विरंगुळा असतो, भाटगिरी असते, वाचकांची अस्मिता वाढवणारी असते. तसं केलं नाही तर पुस्तक खपत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by Trump on Tue, 01/18/2022 - 20:48

In reply to इतिहास सांगायचा तर by कंजूस

Permalink

मुस्लिमांचा उल्लेख

भारताचा इतिहास मुसलमान येण्याआधी सुरु झाला आहे. मुस्लिमांचा उल्लेख टाळावा असे कोणी म्हणत नाही, पण तो प्रमाणात असावा.
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Wed, 01/19/2022 - 05:45

In reply to मुस्लिमांचा उल्लेख by Trump

Permalink

सुरू झाला? हो.

पण इतिहासकार हे लिखित इतिहास आणि आता त्याचे कोणते पुरावे आहेत हे शोधून स्थापित करतात. त्या संदर्भात 'The loss of Hindustan, The Invention of India's. या पुस्तकात वाचलं. सारनाथ येथील खोदकामानंतर अशोकापर्यंतचा इतिहास स्थापित झाला.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Tue, 01/18/2022 - 12:58

Permalink

व्याख्यान अतिशय आवडले,

व्याख्यान अतिशय आवडले, माहितीपूर्ण.
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com