Skip to main content

कला

(मातीचे पाय - मोकलाया वर्जन)

लेखक गड्डा झब्बू यांनी शनिवार, 08/07/2023 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेर्ना - मातीचे पाय पयन स्प्र्शुन अले ते हत मलले होते लक्क उमग्ले तेवहा ते पय मतिचे होते मि केवल पहत होतो पयन्च्य खल्चि धुल ति ललतस लववि हे एकच मथि खुल मि इथ्वर पहुन अलो पौल्खुना विर्नर्या अधि कुन्वत, मगुन कप्ति विकत हस्नर्या अत पुन्ह चलवे पुधे, कि परत फिर्वे? सोस न-लयक पयन्चे पुसुन अव्घे तकवे? प्रेमल श्ब्दन्चि ओल मनत र्झिपत नहि व्हवे नत्मस्त्क पयहि दिसत नहि ते सरेच निगुन गेले जे पय दरवे सुच्ले मतिचे पत मत्कट मगे मज्यसह उर्ले टंकनीक चमनगोटा दाढिमिशि श्निवार ०८/०७/२०२३
काव्यरस

मातीचे पाय

लेखक चांदणे संदीप यांनी मंगळवार, 27/06/2023 या दिवशी प्रकाशित केले.
पायांना स्पर्शून आले ते हात मळाले होते लख्ख उमगले तेव्हा ते पाय मातीचे होते मी केवळ पाहत होतो पायांच्या खालची धूळ ती ललाटास लावावी हे एकच माथी खूळ मी इथवर पाहून आलो पाऊलखुणा विरणाऱ्या आधी खुणावत, मागून कपटी विकट हसणाऱ्या आता, पुन्हा चालावे पुढे, की परत फिरावे? सोस ना-लायक पायांचे पुसून अवघे टाकावे? प्रेमळ शब्दांची ओल मनात झिरपत नाही व्हावे नतमस्तक ऐसे पायही दिसत नाही ते सारेच निघून गेले जे पाय धरावे सुचले मातीचे पाय मातकट मागे माझ्यासह उरले - संदीप भानुदास चांदणे ( रविवार, २५/०६/२०२३)

मेघदूत..... (ऐसी अक्षरे ..मेळवीन -१०)

लेखक Bhakti यांनी सोमवार, 19/06/2023 या दिवशी प्रकाशित केले.
आषाढस्य प्रथमदिवसे-महाकवी कालिदास जन्मदिवस कसं होत आठवीत गेल्यावर अ तुकडीला संस्कृत विषय मिळायचा.मधाळ वाणी,स्पष्ट उच्चार असणाऱ्या विद्यार्थिनांना अग राणी अस लाडिक बोलावणाऱ्या कर्वे बाईंच्या तासाला मी मंत्रमुग्ध होऊन जायचे.त्यामुळे संस्कृतची गोडी,आदर निर्माण झाली पण पाठांतर आणि माझा ३६ चा आकडा असल्याने मार्कात उजेड पडला नाही.पण कालिदास या संस्कृत भाषेतला एक महान कवी आहे हे बाईकडून समजले.तो इतका महान होता की त्याने चक्क ढगाला दूत करून दूर निरोप धाडले,वाह काय भारी वाटायचं.त्यामुळे सातवी की आठवीला चित्रकलेत ‘गणपती उत्सवातीईल आरास’ यासाठी ‘कालिदासाचे मेघदूत गायन ‘ असा देखावा असणारे

“ही चोळी कोणाची?”: सुखद दृश्यानुभव

लेखक हेमंतकुमार यांनी गुरुवार, 18/05/2023 या दिवशी प्रकाशित केले.
चित्रपट पाहताना सतत मध्येमध्ये येणारे कर्कश्य संगीत नकोसे झालेय ? घिस्यापिट्या आणि ‘फ’कारयुक्त संवादांचा कंटाळा आलाय ? तोच तोच मसाला पण नकोसा वाटतोय? आणि शांतपणे एखादी निव्वळ दृश्यमालिका बघावीशी वाटते आहे काय? वरील सर्व प्रश्नांना तुमचे उत्तर ‘होय’ असेल.. तर मग खास तुमच्यासाठीच आहे हा चित्रपट: The Bra. ok विदेशी चित्रपट असल्याने त्याची भाषा कोणती हा महत्त्वाचा मुद्दा.

"The Kerala Story" - एक उत्तम कलाकृती!

लेखक टर्मीनेटर यांनी मंगळवार, 09/05/2023 या दिवशी प्रकाशित केले.
मी सहसा बायोपिक्स, सत्यघटना/प्रसंगांवर आधारित असल्याचा दावा करणारे डॉक्युमेंटरी टाईप सिनेमे चित्रपटगृहातच काय OTT किंवा युट्युब वर देखील पहात नाही, ती माझी आवडच नाही. बायकोची इच्छा होती म्हणून OTT वर बघायला घेतलेला 'The Tashkent Files' हा अत्यंत रटाळ सिनेमा तिलाही एक चतुर्थांश देखील बघवला नव्हता, आणि तो अनुभव गाठीशी असल्याने त्याच दिग्दर्शकाचा 'The Kashmir Files' हा सिनेमा देखील आम्ही अद्याप बघितलेला नाही.

यू -ट्युबवरील मराठी नाटके: दृष्टीक्षेप

लेखक हेमंतकुमार यांनी गुरुवार, 04/05/2023 या दिवशी प्रकाशित केले.
नाटक ही जिवंत कला आहे आणि ती प्रत्यक्ष अनुभवण्यातच खरी मजा असते हे अगदी मान्य. परंतु गेल्या दहा पंधरा वर्षात महाराष्ट्रातील विविध रंगमंदिरांमध्ये होणाऱ्या नाट्यप्रयोगांवर एक नजर टाकल्यास बरेच असमाधान जाणवते. अनेक शहरांमधल्या रंगमंदिरांच्या दुरवस्थेबद्दल वारंवार माहिती प्रसारित होत आहे. नाट्य कलाकारांपासून ते प्रेक्षकांपर्यंत सर्वच घटक या दुरवस्थेमुळे मनातून नाराज आहेत. मध्यंतरी पुण्यातील तीन महत्त्वाच्या रंगमंदिरांच्या दुरवस्थेबाबत विस्तृत अहवाल ‘सकाळ’मध्ये वाचण्यात आला.

बेलग्रेडचा जुना राजप्रासाद

लेखक पराग१२२६३ यांनी सोमवार, 03/04/2023 या दिवशी प्रकाशित केले.
माझे आजोबा नोकरीच्या निमित्ताने 60 वर्षांपूर्वी तत्कालीन युगोस्लाव्हियाची राजधानी असलेल्या बेलग्रेडमध्ये काही वर्ष राहत होते. त्यामुळं माझ्या आजी-आजोबांकडून आणि माझ्या आईकडून युगोस्लाव्हियाविषयी मी बरंच ऐकत आलो आहे. बेलग्रेड शहर आणि युगोस्लाव्ह जनतेबद्दल ते कायमच भरभरून सांगत आले आहेत. त्या काळात भारत आणि युगोस्लाव्हियाचे संबंध अतिशय घनिष्ठ होते. त्यामुळं सामान्य युगोस्लाव्ह जनतेमध्ये भारत-भारतीयांविषयी अतिशय उत्सुकता आणि आदर असल्याचं त्यांना त्यांच्या वास्तव्यात जाणवत होतं.

पुस्तक परिचय: बनगरवाडी - लेखक: व्यंकटेश माडगुळकर

लेखक सुजित जाधव यांनी गुरुवार, 30/03/2023 या दिवशी प्रकाशित केले.
मला कल्पना आहे बहुतांश मिपाकरांनी हे पुस्तक आधीच वाचलं असेल. ज्यांनी ते वाचलेलं आहे त्यांच्या आठवणींना उजाळा व ज्यांनी वाचलं नाहीये त्यांना या पुस्तकाबद्दल माहिती मिळावी यासाठी हा परिचय लिहीत आहे. काही दिवसांपूर्वी मी ही कादंबरी वाचली..लेखक व्यंकटेश माडगुळकर यांची मी वाचलेली ही पहिलीच कादंबरी होती. आणि पहिलीच कादंबरी वाचून मी लेखकाच्या प्रेमात पडलो.. मी आत्तापर्यंत वाचलेल्या कादंबऱ्यांपेक्षा ही एक वेगळ्या धाटणीची कादंबरी आहे असं मला जाणवलं.. या सगळ्यामुळे या कादंबरीबद्दल लिहायचा मोह मला आवरता आला नाही. व्यंकटेश माडगुळकर यांनी १९५५ साली लिहलेली ही कादंबरी आहे.

चर्चबेल –लेखक ग्रेस (ऐसी अक्षरे... मेळवीन ९)

लेखक Bhakti यांनी रविवार, 26/03/2023 या दिवशी प्रकाशित केले.
चर्चबेल –लेखक ग्रेस (लघुलेखसंग्रह) a शब्दयात्री असल्याने शब्द कधी अलगद कुशीत येतात तर कधी दूर दूर वाळवांटामध्ये तप्त होत असतात.अलगद कुशीत येण्याचे दोर म्हणजे ग्रेस यांच्या कविता रसग्रहण! सांजवेळा,थरथरती कातर संध्याकाळ,सूर्याच्या सांज रंगवेली,पापणीचा ओलसर वाळवंट,ह्रुदयाचा आर्त कावळा,मधेच ज्ञानेश्वर यांचा लख्ख प्रकाश ,पाउसाच्या थेंबओळी,गर्द झाडी- सूर्याचे किरणांचे खेळ,झाडांच्या पानांच्या –पक्ष्यांच्या गळाभेटी,माणसाच्या आत्म्याच्या संवेदना, अनुभूतीची हाक आणि आणखिन व्यापक सर्व लाभत राहते ग्रेस

माझी आवडती पुस्तके भाग: २

लेखक सुजित जाधव यांनी सोमवार, 13/03/2023 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या सर्वात आवडत्या पाच पुस्तकांबद्दलचा हा माझा दुसरा लेख आहे.. पहिल्या भागात मी दोन पुस्तकांबद्दल लिहिलंय, या भागात उरलेल्या तीन पुस्तकांबद्दल लीहतोय. पहिल्या भागाचा दुवा: माझी आवडती पुस्तके भाग: १ ३. एक होता कार्व्हर: हे पुस्तक व जॉर्ज वाशिंग्टन कार्व्हर यांची करुण व हृदयाला भिडणारी कहाणी अनेकांना वाईट काळात प्रेरणा देते.