लेखकTrumpयांनी गुरुवार, 22/09/2022 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावरील (खफवरील) पुरंदर चर्चेवरुन गाडी कधी आ आंटेवर पोचली आणि मन अगदी जुन्या आठवणीत निघुन गेले. महाराष्ट्रात अगदी न समजार्या गाण्यांनी धुमाकुळ माजवला होता, आणि अजुनही आहे.
लेखकटर्मीनेटरयांनी मंगळवार, 30/08/2022 या दिवशी प्रकाशित केले.
.container1 {
position: relative;
width: 100%;
overflow: hidden;
padding-top: 56.25%; /* 16:9 Aspect Ratio */
}
.responsive-iframe {
position: absolute;
top: 0;
left: 0;
bottom: 0;
right: 0;
width: 100%;
height: 100%;
border: none;
}
'देसी स्पायडरमॅन' - एक अलौकिक चित्रपट.
परवा म्हणजे रविवारी संध्याकाळी आम्ही MX Player वर 'Day Of The Mummy (Hindi Dubbed)' हा हॉरर चित्रपट लावला होता.
लेखकचौथा कोनाडायांनी सोमवार, 29/08/2022 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या आजूबाजूस बरेच सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात. त्याची माहिती, समाजमाध्यमे वृत्तपत्रे याद्वारे आपणापर्यंत येत असते. काही कारणांमुळे कधी कधी ही माहिती आपणा पर्यंत पोहोचत नाही, किंवा काही उशिरा पोहोचते, नंतर हळहळ वाटते की आधी कळले असते तर उपस्थित राहून याचा आस्वाद घेऊ शकलो असतो की !
अशीच चर्चा कांजूस सरांच्या या धाग्यावर झाली होती. म्हणून अशा कार्यक्रमांची माहिती मिपा वर पोस्ट करून देण्याचे या धाग्याचे प्रयोजन आहे.
सुरुवात चित्रकला प्रदर्शनाच्या माहितीने करत आहे.
लेखकसोत्रियांनी रविवार, 14/08/2022 या दिवशी प्रकाशित केले.
बहिष्काराच्या गदारोळात अडकलेला आणि त्यामुळे गाजावाजा झालेला लाल सिंग चढ्ढा सिनेमा पाहायचा की नाही ह्या वादात न पडता एक सिने कलाकृती म्हणून जमलेच तर हा सिनेमा बघायचे ठरवले होते. पण ह्या बहिष्काराच्या गदारोळाने माझाही किंचितसा बेंबट्या झाला होता बरं का, उगाच खोटं का बोला. अमिरमुळे नाही, पण करीनाच्या, "नका बघू मग आमचे सिनेमे" ह्या नेपोटिजम वरच्या मुक्ताफळामुळे! तर ते एक असो.
काल हा सिनेमा बघितला. ज्या मूळ सिनेमाचे, फॉरेस्ट गंपचे, रीतसर हक्क विकत घेऊन हिंदीत पुनर्निर्मिती केली, तो सिनेमा बघून बराच काळ लोटल्याने तो सिनेमा विस्मृतीत जाऊन तपशील आठवत नव्हते.
लेखकशेर भाईयांनी मंगळवार, 19/07/2022 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या लहानपणी, म्हणजे तसा मी लहानच आहे अजून आणि तस ही मी २५ वर्षांनंतर वय मोजणं सोडून दिल, कारण देव साहेब म्हणून गेले आहेत कि “ Age is just a number.” तर माझ्या लहानपणी जेव्हा आपल्याकडे उपग्रह वाहिन्याचं नुकताच आगमन झाल होत तेव्हा स्टार वाहिनीच स्टार मुव्हीज चानल नवीनच बाजारात आल तेव्हाची ही गोष्ट. स्टार मुव्हीज त्या काळातली माझ्या माहिती प्रमाणे भारतातील पहिली स-शुल्क वाहिनी होती. त्या वेळी तिथल्या सिनेमांना हिंदी सबटायटल्स असायची. तसेच त्या काळातले रात्री उशिरा लागणारे १८+ हा एक रम्य विषय आहे.
याच स्टार मुव्हीज वर मला पहिल्यांदा ते दोघ भेटले.
लेखकसाहनायांनी रविवार, 01/05/2022 या दिवशी प्रकाशित केले.
रांगो - एक विलक्षण ऍनिमेटेड कथा
काहींना पर्वत आवडतात, तर काहींना नदीकिनारा, काहींना फेसाळणार्या अथांग सागराचे प्रेम असते तर विलक्षण भव्य मानवनिर्मित गोष्टींचे. मला मात्र लहानपणापासून वाळवंट खूपच आवडत आले आहे. आणि ते सुद्धा सौदी अरेबियन किंवा आपल्या राजस्थानी पद्धतीचे वाळूचे नाही तर कोलोरॅडो किंवा मोहावे वाळवंटाचे प्रेम. डोंगर, नदी, समुद्र ह्यांत सजीवता असते, एक गतिशीलता असते. इथे जीव आहे, इथे काळ ह्या प्रकाराला महत्व आहे. समुद्राची प्रत्येक लाट आपल्यासोबत काळ कसा निघून जात आहे ह्याची जाणीव घेऊन येते. पण वाळवंटाचे तसे नाही. इथे काळ जणू थांबलेला असतो. ह्यांत एक गूढ आहे.
लेखकजे.पी.मॉर्गनयांनी गुरुवार, 14/04/2022 या दिवशी प्रकाशित केले.
शहर - आपलं नेहेमीचंच
स्थळ - guess करायला एकदम सोपं
दिवस - मावळलेला workday
वेळ - रात्री उशिराची
"मी वसंतराव" बघायचा योग आलेला. अगदी ऐन वेळी कशीबशी पहिल्या रांगेतली तिकिटं मिळाली. मराठी चित्रपट mid week हाऊसफुल्ल?? चित्रपट चांगला आहे हे ऐकलं होतंच पण म्हटलं कदाचित उद्या बँक हॉलिडे आहे म्हणून गर्दी असेल. अर्थात गर्दी म्हणजे तरी काय असणार? हाताच्या बोटांवर मोजण्याइतके millennials. Gen Z चा तर संबंधच नाही. अश्या गर्दीतले जवळपास निम्मे चेहरे ओळखीचेच वाटतात (कारण मी ही त्याच गर्दीचा भाग असतो).
पहिला धक्का बसतो तो पार्किंगमध्येच. मोजक्याच गाड्या.
लेखकसुजित जाधवयांनी शनिवार, 26/03/2022 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या मी यूट्यूब वरती गावाकडच्या गोष्टी नावाची वेबमालिका पाहतोय. मला माहित नाहीये की तुमच्यापैकी किती लोकांनी ही वेबमालिका पाहिली आहे किंवा ह्या वेबमालिकेबद्दल बद्दल ऐकलं/वाचलं आहे...ज्यांना या वेबमालिकेबद्दल माहिती नाही त्यांच्यापर्यंत हि मालिका पोहचवण्याचा या लेखाच्या माध्यमातून केलेला प्रयत्न…
वेबमालिकेचे नाव: गावाकडच्या गोष्टी
लेखक व दिग्दर्शक : नितीन पवार
निर्माते: कोरी पाटी प्रोडक्शन
एकूण पर्व (Total Season): ३
एकूण भाग: १००
कुठे पाहू शकाल: यूट्यूब वर फुकटात उपलब्ध
खरं तर मला वेबमालिका हा प्रकार थोडासा कंटाळवाणा वाटतो कारण ती पाहण्यासाठी खूप वेळ खर्ची घालावा लागतो.
लेखकसागरसाथीयांनी मंगळवार, 01/03/2022 या दिवशी प्रकाशित केले.
मने,माणसाचे मन मोठे विचित्र आहे. माणूस एकटा दिसला तरी त्याचे मन कधीही एकटे नसते. त्याचा मी पणा,अहंकार, गर्व,पुर्वग्रह कायम त्याच्या सोबत असतात. माणूस एकटा असो वा समूहात या गोष्टी कधीही त्याची साथ सोडत नाहीत.
जॉर्ज शेल्लर यांनी म्हटले आहे, "माणसाला आपला अहंकार,मी पणा कधीही सोडून टाकता येत नाही, तो समोरच्याला लक्षात येईल एवढा स्पष्ट दिसत असतो".
लेखकनीळायांनी बुधवार, 09/02/2022 या दिवशी प्रकाशित केले.
शर्यत अजून संपली नाही
मी अजून जींकलो नाही
घाम गाळत रक्त ओकत
धावताना अजुन संपलो नाही
हिरव्या दरीच्या धुक्या कडेशी
नीळ्या तळ्याच्या काठाशी
कधी अजुन दंगलो नाही
स्वप्ने तुटताना कचाकड्याची
ऊलटताना रात्री बीनस्वप्नांच्या
आतुन अजुन भंगलो नाही
त्या सुरांच्या स्तब्ध मैफली
ईद्रंधनुच्या शब्द चौकटी
मी अजुन रंगलोच नाही