Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by केदार भिडे on Mon, 01/10/2022 - 14:29
लेखनविषय (Tags)
कला
लेखनप्रकार (Writing Type)
लेख
डिसेम्बर २०२१ मध्ये बहिणीसोबत मध्य प्रदेशचा दौरा झाला. इंदोर, ओंकारेश्वर, महेश्वर, मांडू या ठिकाणांना भेट दिली. त्याचा वृत्तांत लिहायचा आहे. तत्पूर्वी हा एक छोटा लेख. नर्मदेच्या उत्तर तीरावर वसलेले एक छोटे शहर म्हणजे महेश्वर. तिथे विणल्या जाणाऱ्या साड्यांसाठी ते प्रसिद्ध आहे. तसेच नर्मदेवर अतिशय सुंदर घाट तिथे आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी इंदोर संस्थानची राजधानी १७७२ मध्ये महेश्वर येथे हलवली. त्यांच्याच कारकिर्दीत महेश्वर येथे राजवाडा, मंदिरे, नदीवर प्रशस्त घाट बांधले. मराठी इतिहासातील या कर्तृत्ववान राज्यकर्तीने आपला देह ठेवला तोही याच ठिकाणी. अहिल्या फोर्ट या नावाने परिचित असलेल्या किल्ल्यातील अहिल्येश्वर मंदिर आणि त्या समोरील होळकर घराण्यातील छत्री यांच्यावरील कलाकुसर सुंदर आहे. अहिल्येश्वर मंदिराच्या कळसावर दिसणारे स्वयं-साधर्म्य (self-similarity) हा या लेखाचा विषय आहे. महेश्वर येथे एका सकाळी चहा पीत असताना आम्हाला हा सुंदर प्रकार दिसला. चित्र १ मध्ये अहिल्येश्वर मंदिर आणि त्याचा कळस यांचे छायाचित्र दिसते आहे. चित्र दिसत नसतील तर अगदी शेवटी Google Docs ची लिंक आहे त्यावर जाऊन पाहावे. a https://lh3.googleusercontent.com/pw/AM-JKLXkFXTAF_vw9EJ3ma4ANBAkcryqfl2wEPneZB5rgJKtvFa-RjfktIeTaTOt6O16mRyveaOOsAMI0wpa78lip3arCD03s_q1q2ZRbCnkkORU7wvxdHU87cT0zik0tx0DmDBpyFm_xqEdxTW8eZjBwmOI=w1025-h657-no?authuser=0 चित्र २ मध्ये वर्तुळ करून दाखवलेले मानवी चेहरे (अगदी वर) आणि कुणी चतुष्पाद प्राणी आणि त्याच्या खाली असणारी खिडकी हे पाहावेत. कळसाच्या चारही बाजूना असे मानवी चेहरे आणि प्राणी आहेत हे चित्रावरून लक्षात येईल. त्यानंतर चित्र २ मध्ये तुटक वर्तुळाने दाखवलेले छोटे कळस पाहावेत. मध्यभागी असलेल्या मोठ्या कळसाच्या चारही कोपऱ्यांवर प्रत्येकी एक असे चार छोटे कळस आहेत. या छोट्या कळसांचे वैशिष्ट्य हे की ते मोठ्या मध्यभागी असलेल्या कळसाचीच प्रतिकृती आहेत. b https://lh3.googleusercontent.com/pw/AM-JKLWQeE0ltjkvWFetmo4PiGQxTLfScp7COxzYzxZVutNXyhZ6cgT5l44Zx2UQXTybU7LuqgFLB0Je03EawTM8Gjk3P1a0C9NJe7CsyRZCc1stD3HNnjcqd0HAm_0I_w31q-5XUbO6jP0QZ0GoOHkfVMyv=w905-h657-no?authuser=0 चित्र ३ मध्ये छोट्या कळसांवरील मानवी चेहरे, प्राणी आणि खिडक्या हे तुटक वर्तुळांनी दाखवले आहेत. तसेच मोठ्या कळसाचा भाग असलेला प्राणी आणि त्याच्या खाली असलेली खिडकी हे ही मध्ये वर्तुळ करून दाखवले आहेत. अशा प्रकारे मुख्य कळसाभोवती त्याच्याच प्रतिकृती उभारून स्वयं-साधर्म्य साधले आहे. 3 https://lh3.googleusercontent.com/n_FN7R9xijUjRmIX4BenbDfsDk46WQeuf78EBpFYaUr-NJ8gwG_0oZj5t_sg7a9MNjTyp6G7mCWNnmnvyMQTK2qgEO6Lk17G8-0c6E2K5MmFOtqDMKxNBC9rv3wjaLAX6SPNirYMK5idpJqdUY4gzxcZOlWX1cyCvWTKxJy0GkzhuwXpYHa6T1Xv5KKKfVM43ysJBlB2nBE2U4uBv0JLG8_NndlucwUiEKUgFBam0fUw_mT2HMTAV8QTlp36B3DTFY0RLPx186A5l3IEjxbMCpaIjaFQPgqOkXBSG46wvDYxX2MDw1ufuOFTjriSR0oNLQLsR5ciG_BzPmIML1-YvvpNIH2kbDlXL5t1uRCJh-MNPxsidAOS3gx7Yw_Qkk48ds3smr67mFg4nXpv95wBpeX-v9eT0GhN-9nRTbNneHIEfzWxRLv7KyYJqQcnfaMq-gtkv0nCQRJ3cYdIkFKoAi0-0mkBhNlSv0rXXsiu4p04fKoIdVZeH-nc4G487OqOirXn5tO3rLYRsg2K10xhoTqvM79GmFT9EPMtFHkLAlvGHZnZZahUg-zNbo2Kv0QD8t0gN2oE01dbOBl6LZALpVGMx0noGtz55N8FCokWFDk_a3fCvNeOah-lNPicZg8AncyZxkNrUY81noH1R5sCdcbbr1SDyh_Gmj68pY9c-VjiElrWu2SC1iIY0AuwC7Nu0A43MrVxlajDoN1IitJ8UXc=w698-h657-no?authuser=0 https://docs.google.com/document/d/11GWgZX_jkAh5Wledlem2o6sRObDWYK4KweqLl8qOa70/edit?usp=sharing
  • Log in or register to post comments
  • 4754 views

प्रतिक्रिया

Submitted by केदार भिडे on Mon, 01/10/2022 - 14:37

Permalink

चित्र दिसत नाहीत

यावेळी Google photos चा वापर करूनही चित्र दिसत नाहीत. पुन्हा काहीतरी चुकले. लेखाच्या शेवटी असलेली Google Docs ची लिंक पाहावी.
  • Log in or register to post comments

Submitted by टर्मीनेटर on Mon, 01/10/2022 - 14:46

Permalink

Google Docs ची लिंक पाहावी.

Google Docs ची लिंक पाहावी.
ती पाहिली. मंदिराचा फोटो छान दिसतोय त्यात, पण वर्तुळातल्या गोष्टी स्पष्ट दिसत नसल्याने त्यातले सौन्दर्य अनुभवता आले नाही! ते फोटो झूम करून काढायला हवे होते असे वाटले.
  • Log in or register to post comments

Submitted by केदार भिडे on Mon, 01/10/2022 - 18:23

In reply to Google Docs ची लिंक पाहावी. by टर्मीनेटर

Permalink

संगणकावर उघडून पाहावे

आमच्या कॅमेराची मर्यादा कारण आमच्याकडे केवळ फोन होता. तरीही एकदा संगणकावर Google docs उघडून पहा. फोनवर दिसत नाहीये नीट.
  • Log in or register to post comments

Submitted by ज्ञानोबाचे पैजार on Mon, 01/10/2022 - 16:47

Permalink

आता पहिले दोन फोटो लेखात दिसायला लागले आहेत

तिसर्‍या फोटोला पब्लिक अ‍ॅक्सेस दिला नाही का? दिला की सांगा किंवा परत लिंक द्या मिपावर फोटो चिकटवण्याची पाकृ बघण्या करता इथे क्लिक करा पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

Submitted by केदार भिडे on Mon, 01/10/2022 - 18:27

In reply to आता पहिले दोन फोटो लेखात दिसायला लागले आहेत by ज्ञानोबाचे पैजार

Permalink

धन्यवाद

मी insert image न करता केवळ लिंक जिथे पाहिले तिथे टाकली, ही चूक झाली असणार. तसेच सर्व अल्बम शेअर्ड आहे. तसेच फोटो लिंकवर क्लिक केल्यावर उघडतायत. केवळ पेजवर लोड होत नाहीत. तरीपण ही तिसऱ्या फोटोची लिंक परत देतोय. https://lh3.googleusercontent.com/pw/AM-JKLWbuL_p8lcmTy1TeL5NS6I3aMasZeFslMBlYR_2rVDsY6ZUlwBwojJZFrTdW9qKG_-1q0eva0tmMd4S37CBAAEGnZwwR2BW3c1n2xO1X8v5uTgR7JrU8wnKL7S8SU8UIxmW8Y6StltbpDUSHDah2L76=w698-h657-no?authuser=0
  • Log in or register to post comments

Submitted by चांदणे संदीप on Mon, 01/10/2022 - 18:34

Permalink

अरे वा!

मी पण नोव्हेंबर २०२१ मध्ये महेश्वरला भेट देऊन आलो. अप्रतिम असे ठिकाण आहे. तुम्ही कॅमेर्‍यात टिपलेले स्वयं-साधर्म्य मी आणि माझ्या मित्रांनी जवळून निरखून पाहिले. मजा आली. सं - दी - प
  • Log in or register to post comments

Submitted by चौथा कोनाडा on Tue, 01/11/2022 - 17:20

Permalink

खुपच सुंदर ! ❤

खुपच सुंदर !

❤

  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Tue, 01/11/2022 - 17:46

Permalink

छान.

अशी शांतपणे निरीक्षण करत भ्रमंती करायला हवी. जागेचे नाव माहेश्वर आहे. महेश्वर म्हणजे महा इश्वर.
  • Log in or register to post comments

Submitted by केदार भिडे on Wed, 01/12/2022 - 11:46

In reply to छान. by कंजूस

Permalink

महेश्वर माहेश्वर

मराठी विश्वकोश किंवा https://vishwakosh.marathi.gov.in/20241/ खरगोन जिल्ह्याची हिंदीतली वेबसाईट https://khargone.nic.in/ या दोन्ही ठिकाणी 'महेश्वर' (काना विरहीत) असेच लिहिले आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Wed, 01/12/2022 - 13:53

Permalink

छान

सर्व फोटो दिसत आहेत. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या मंदिर रचना जवळ जवळ सारख्याच वाटतात. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Wed, 01/12/2022 - 14:18

Permalink

छान लिहिलंय.

छान लिहिलंय. ही नागर शैलीतली मंदिरं आहेत. कळसावरील प्राण्यांची शैली ही गॉथिक शैलीतल्या गॉरगोयल्सवरुन प्रेरित आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Wed, 01/12/2022 - 16:16

Permalink

वर वर जाणारे कळस

हे कैलाश पर्वताचे शिखरांचे प्रतिक आहेत. तसेच ते इतर देवालयांनाही वापरले आहेत.
  • Log in or register to post comments
Profile picture for user कॅलक्यूलेटर

Submitted by कॅलक्यूलेटर on Wed, 01/12/2022 - 18:04

Permalink

लेख मालेच्या प्रतीक्षेत.

लेख मालेच्या प्रतीक्षेत.
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com