डिसेम्बर २०२१ मध्ये बहिणीसोबत मध्य प्रदेशचा दौरा झाला. इंदोर, ओंकारेश्वर, महेश्वर, मांडू या ठिकाणांना भेट दिली. त्याचा वृत्तांत लिहायचा आहे. तत्पूर्वी हा एक छोटा लेख.
नर्मदेच्या उत्तर तीरावर वसलेले एक छोटे शहर म्हणजे महेश्वर. तिथे विणल्या जाणाऱ्या साड्यांसाठी ते प्रसिद्ध आहे. तसेच नर्मदेवर अतिशय सुंदर घाट तिथे आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी इंदोर संस्थानची राजधानी १७७२ मध्ये महेश्वर येथे हलवली. त्यांच्याच कारकिर्दीत महेश्वर येथे राजवाडा, मंदिरे, नदीवर प्रशस्त घाट बांधले. मराठी इतिहासातील या कर्तृत्ववान राज्यकर्तीने आपला देह ठेवला तोही याच ठिकाणी. अहिल्या फोर्ट या नावाने परिचित असलेल्या किल्ल्यातील अहिल्येश्वर मंदिर आणि त्या समोरील होळकर घराण्यातील छत्री यांच्यावरील कलाकुसर सुंदर आहे. अहिल्येश्वर मंदिराच्या कळसावर दिसणारे स्वयं-साधर्म्य (self-similarity) हा या लेखाचा विषय आहे.
महेश्वर येथे एका सकाळी चहा पीत असताना आम्हाला हा सुंदर प्रकार दिसला.
चित्र १ मध्ये अहिल्येश्वर मंदिर आणि त्याचा कळस यांचे छायाचित्र दिसते आहे. चित्र दिसत नसतील तर अगदी शेवटी Google Docs ची लिंक आहे त्यावर जाऊन पाहावे.
https://lh3.googleusercontent.com/pw/AM-JKLXkFXTAF_vw9EJ3ma4ANBAkcryqfl…
चित्र २ मध्ये वर्तुळ करून दाखवलेले मानवी चेहरे (अगदी वर) आणि कुणी चतुष्पाद प्राणी आणि त्याच्या खाली असणारी खिडकी हे पाहावेत. कळसाच्या चारही बाजूना असे मानवी चेहरे आणि प्राणी आहेत हे चित्रावरून लक्षात येईल. त्यानंतर चित्र २ मध्ये तुटक वर्तुळाने दाखवलेले छोटे कळस पाहावेत. मध्यभागी असलेल्या मोठ्या कळसाच्या चारही कोपऱ्यांवर प्रत्येकी एक असे चार छोटे कळस आहेत. या छोट्या कळसांचे वैशिष्ट्य हे की ते मोठ्या मध्यभागी असलेल्या कळसाचीच प्रतिकृती आहेत.
https://lh3.googleusercontent.com/pw/AM-JKLWQeE0ltjkvWFetmo4PiGQxTLfScp…
चित्र ३ मध्ये छोट्या कळसांवरील मानवी चेहरे, प्राणी आणि खिडक्या हे तुटक वर्तुळांनी दाखवले आहेत. तसेच मोठ्या कळसाचा भाग असलेला प्राणी आणि त्याच्या खाली असलेली खिडकी हे ही मध्ये वर्तुळ करून दाखवले आहेत. अशा प्रकारे मुख्य कळसाभोवती त्याच्याच प्रतिकृती उभारून स्वयं-साधर्म्य साधले आहे.
https://lh3.googleusercontent.com/n_FN7R9xijUjRmIX4BenbDfsDk46WQeuf78EB…
https://docs.google.com/document/d/11GWgZX_jkAh5Wledlem2o6sRObDWYK4Kweq…
वाचने
4821
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
चित्र दिसत नाहीत
Google Docs ची लिंक पाहावी.
संगणकावर उघडून पाहावे
In reply to Google Docs ची लिंक पाहावी. by टर्मीनेटर
आता पहिले दोन फोटो लेखात दिसायला लागले आहेत
धन्यवाद
In reply to आता पहिले दोन फोटो लेखात दिसायला लागले आहेत by ज्ञानोबाचे पैजार
अरे वा!
खुपच सुंदर ! ❤
❤
छान.
महेश्वर माहेश्वर
In reply to छान. by कंजूस
छान
छान लिहिलंय.
वर वर जाणारे कळस
लेख मालेच्या प्रतीक्षेत.