मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कला

सकरपंच : रिव्यू

साहना ·
एक काळ असा होता जेंव्हा स्त्रियांची भूमिका चित्रपटांत फक्त रडकी माँ नाहीतर अबला स्त्री हीच होती. चुकून कधी चांगली स्त्रीभूमिका यायची. माझ्या मते हॉलिवूड मध्ये स्त्रीभूमिका जास्त मूर्खपणाच्या असायच्या. मग काळ बदलला आणि स्त्री ला मध्यभागी ठेवून चित्रपट बनू लागले. पण माझ्या मते ह्या चित्रपटांत सुद्धा एक महत्वाचा दोष होता. ह्या चित्रपटांत सुद्धा स्त्री तोटके कपडे घालून त्याच गोष्टी करायची ज्या एक पुरुष साधे कपडे घालून करायचा. म्हणजे वॉरियर प्रिन्सेस झीना प्रमाणे युद्ध, उड्या मारणे गोळ्या झाडणे आणि ते सुद्धा स्टिलेटो घालून इत्यादी.

मनोज दाणींच्या पुस्तकातील मागच्या कव्हरवरील चित्रातील तपशील

शशिकांत ओक ·
aa श्री.मनोज दाणी यांनी सादर केलेल्या पानिपत पुस्तकातील चित्रांचा परिचय करून घेऊन मला त्यातील काही चित्रे तपशीलात जाऊन भावली. असेच हे चित्र मागील कव्हर स्टोरीचे आहे. पान ३४ - ३५वर या चित्रातील तपशिलाचे वर्णन आहे. त्याशिवाय काही नोंदी सादर. बेगम सामरू (Joanna Nobilis Sombre (ca 1753– 27 January 1836) किंवा सुमरु या साडे चार फुटी टिल्लू बाईंचे बडे प्रस्थ असले पाहिजे.

पतंग....!!

Jayagandha Bhatkhande ·
पतंग...!! नऊ वाजले तसं भिकूशेठनं दुकान उघडलं. त्या छोट्याशा जागेत, एकदम प्रकाश पसरला. अरेच्च्या, सकाळ झाली वाटतं.. पण आळोखेपिळोखे द्यायची इथे सोयच नाही. खालच्या वरच्यांच्या हातापायांचे धक्के खात नुसतं दाटीवाटीनं महिनोन् महिने बसून रहायचं.... काय हे आपलं जीवन...!! तेवढ्यात कोणातरी गि-हाइकाची चाहूल लागली. "शेठ पतंग आहे का हो तुमच्याकडे...?" माझे कान टवकारले. मनात गुदगुल्या झाल्या. चला जागा तरी बदलेल आज माझी... भिकूशेठ रॅकपाशी आले आणि पतंगाचा गठ्ठा टेबलावर गेला. थोडं पाहून झाल्यावर मुलाचे बाबा म्हणाले, "गोलू, तुला कोणता पतंग आवडला..?" अं..अं.. बाबा, मला लाल पतंग हवाय.. "लाल"....??

कलापंढरी फ्लॉरेन्स

Rahul Hande ·
७ फेब्रुवारी १४९७ चा दिवस इटलीतील एका शहरात एक अनोखी होळी रचण्यात आली. सॅव्हानारोला नावच्या धर्मगुरूने या शहरावर आपली धार्मिक दहशत कायम केली होती. त्याच्या आदेशानुसार त्याचे धार्मिक शिपाई 'ख्रिस्त अमर रहे','मेरी अमर रहे' च्या जयघोषात शहरातील प्राचीन पुस्तकं,हस्तलिखितं,शेकडो चित्रं,रेखाटनं,ऑईल पेंटिंग्ज,शिल्प,हस्तिदंती कोरीव काम केलेल्या वस्तू या होळीत टाकत होते. एका कलासंपन्न शहराचे वैभंव धगधगत्या अग्नीज्वाळांमध्ये बेचिराख होत होतं. शहरवासीयांची अलोट गर्दी या होळीच्या दर्शनासाठी जमलेली होती.या गर्दीत एक सतरा-अठरा वर्षाचा तरुण ही होता.

"रानपिंगळा - अज्ञातवास व पुनर्शोध" - पुस्तक परिचय

MipaPremiYogesh ·
साल १९९८, पेपर मध्ये सगळी कडे बातमी आली होती कि "रानपिंगळा" हा पक्षी ११३ वर्षांनी सापडला आणि त्याहून आनंदाची गोष्ट म्हणजे साधारण माझ्या मूळ गावाच्या प्रदेशात म्हणजेच खान्देशात सापडला होता. ह्याचा पुनर्शोध अमेरिकन स्त्री पक्षी संशोधक पामेला रासमुसेन ह्यानी लावला होता. कट २ - अचानक काही दिवसापूर्वी "रानपिंगळा - अज्ञातवास व पुनर्शोध" ह्या डॉ. जयंत वडतकर लिखित पुस्तकाबद्दल वाचण्यात आलं. बरेच दिवस झालेले नवीन पुस्तक घेऊन, म्हणून पटकन हे पुस्तक मागवलं . ३ दिवसात पुस्तक घरपोच आलं आणि एका बैठकीमध्ये वाचून काढलं .

पुन्हा पानिपत - प्रकाशन समारंभ

मनो ·
सर्व मिसळपावकरांना आग्रहाचे निमंत्रण. प्रकाशनस्थळी फक्त ५० लोकांची क्षमता आहे व सामाजिक विलगीकरणाचे नियम लक्षात घेऊन Facebook व YouTube यांच्यावर कार्यक्रम लाईव्ह पाहण्याची सोय इथे केली आहे. नंतर व्हिडिओ चित्रीकरण YouTube वरही पाहता येईल. YouTube: https://panipat-signup.web.app/live Facebook: https://www.facebook.com/BORIPUNE Twitter: https://twitter.com/BhandarkarI उपस्थित मान्यवर --------------- शिवचरित्रकार श्री. गजानन भास्कर मेहेंदळे यांच्या हस्ते प्रकाशन डॉ. उदय कुलकर्णी - प्रमुख वक्ते श्री. पांडुरंगजी बलकवडे - विशेष उपस्थिती श्री.

पुन्हा पानिपत!

मनो ·
elephant भारताच्या इतिहासाला कलाटणी देणाऱ्या, पानिपतावर झालेल्या, मराठे आणि अब्दाली यांच्यातील युद्धाचा १४ जानेवारी २०२१ हा २६० वा स्मृतिदिन. "स्मृतीभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यति" असं गीतेच्या दुसऱ्या अध्यायात म्हणल्याप्रमाणे या युद्धाचे धडे आणि या युद्धाची स्मृती आजच्या काळातही उपयोगी आहे, त्यामुळेच आज पानिपत या विषयावर लिहिलेले, गेल्या १० वर्षातील माझ्या संशोधनाचे फलित असे " Battle of Panipat, in light of rediscovered paintings" हे इंग्रजी पुस्तक या स्मृतिदिनाच्या आधी पूर्ण करताना मला आज खूप समाधान वाटते आहे.

रॉकस्टार

महासंग्राम ·
मी त्याला पहिल्यांदा भेटलो २०११ साली, याच दिवशी. जनार्दन, बेजबाबदारपणाचं दुसरं नाव होता तो. फार उनाड. घर व्यवस्थित भरलेलं होतं, घरचा व्यवसाय मोठे भाऊ सांभाळत होते, तशी याच्यावर जवाबदारी नव्हती कसलीच. सकाळी सकाळी कॉलेजमध्ये जायचं, टवाळकी करायची, मित्रांच्या गराड्यात रमायचं हेच काय ते काम. तो गिटार मात्र फार छान वाजवायचा. (आयुष्यात अर्धवट सोडलेल्या गोष्टींपैकी एक म्हणजे त्याला बघून मीही गिटार शिकण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.) त्याचा आवाजही छान होता, वेगळ्या धाटणीचा. पण काही केल्या आयुष्यातील कला बहरत नाही अशी तक्रार होती त्याची.

महाराष्ट्र राज्य पक्षी सप्ताहाच्या निमित्ताने

सर्वसाक्षी ·
नमस्कार ५ नोव्हेंबर हा श्री मारुती चितमपल्लि यांचा जन्मदिन तर १२नोव्हेंबर हा डॉ सलिम अलींचा.

इव्हेंट होरायझोन : खूप चांगला भयपट

साहना ·
स्पेस होरर हा भयपटांचा प्रकार मला विशेष प्रिय आहे. नेहमीच्या भूता खेतांच्या चित्रपटा पेक्षा येथील भय हे वेगळ्या प्रकारचे असते. आवर्जून बघावे असे स्पेस हॉरर चित्रपट अनेक आहेत ह्यांतील एलियन हि सिरीज मला विशेष प्रिय आहे. पण इव्हेंट होरायझोन हा चित्रपट (एलियन सिरीज मधला नसला तरी) खरोखर सुरेख आहे. इव्हेंट होरायझोन हे पृथ्वीवरील एक स्पेस क्राफ्ट दुसऱ्या आकाशगंगेंत पाठवले जाते आणि अचानक गायब होते. सात वर्षांनी सौरमालिकेच्या बाहेर अचानक हे यां प्रकट होते आणि पृथीवर एक सिग्नल पाठवते. ह्या यानाची चौकशी करण्यासाठी एक टीम पाठवली जाते.