Skip to main content

धर्म

धर्माच्या अड्ड्यात निधर्मी देश

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी मंगळवार, 18/10/2011 00:07 या दिवशी प्रकाशित केले.
या कवितेची प्रेरणा---प्रकाश१११ यांची निधर्मी देशात..!! ही कविता,हे उघड आहे.पण तरीही दोन्ही मध्ये एक मूलभूत फरकही आहे.
काव्यरस

काही श्लोक

लेखक शुचि यांनी शुक्रवार, 07/10/2011 03:12 या दिवशी प्रकाशित केले.
आपण जे काही वाचतो, पहातो त्याचे आपल्या मनःपटलावर विचारतरंग उमटत असतात. आणि हे बरेवाईट विचारतरंग मूर्त स्वरुपात घटना बनून आपल्या आयुष्यात येतात. मला याचा इतक्यादा अनुभव आला आहे की योगायोग म्हणवत नाही. आतापर्यंत देवाची भक्ती करताना मी जे काही मंत्र म्हटले आहेत त्यामध्ये ढोबळमानाने मला पुढील प्रकार आढळले - (१) देवतेची स्तुती, (२) रक्षण करणारे कवच, (३) सुप्रभात, (४) धूप, शेज आदि आरती, (५)पाळणा.

अ सेपरेशन – इराणी घटस्फोट की इराणपासून घटस्फोट?

लेखक चिंतातुर जंतू यांनी सोमवार, 03/10/2011 19:33 या दिवशी प्रकाशित केले.
A Separation - Poster गेल्या काही वर्षांत अहमदीनेजादच्या अधिपत्याखाली इराण हा आपल्या सर्वसामान्य नागरिकांवर अधिकाधिक बळजबरी करू लागला आहे. सरकारला विरोध केला म्हणून जाफर पनाहीसारख्या जगविख्यात दिग्दर्शकाला सहा वर्षं कैद आणि २० वर्षं चित्रपट बनवायला आणि देशाबाहेर जायला बंदी अशी शिक्षा भोगायला लागते आहे. नागरिकांच्या सर्व प्रकारच्या अभिव्यक्तीवर सरकारची कडक नजर आहे. अर्थात, चित्रपटासारख्या माध्यमावर कडक सेन्सॉरशिप आहे.

‘फोर लायन्स’ – बावळट जिहादींची आचरट ब्रिटिश कॉमेडी

लेखक चिंतातुर जंतू यांनी गुरुवार, 29/09/2011 17:40 या दिवशी प्रकाशित केले.
Four Lions - Poster कोणतीही गोष्ट पवित्र न मानता कशाचीही यथेच्छ चेष्टा करण्यात ब्रिटिश लोक पारंगत आहेत. मग जिहादी दहशतवाद याला अपवाद कसा ठरेल? दहशतवाद्यांची आणि त्याला तोंड देणाऱ्या ब्रिटिशांचीही खिल्ली उडवणारा ‘फोर लायन्स’ हा ब्रिटिश चित्रपट Channel 4वर नुकताच ११ सप्टेंबरच्या दशकपूर्तीनिमित्त दाखवण्यात आला. असला नमुना चित्रपट अशा वेळी दाखवून ब्रिटिशांनी आपली विनोदबुद्धी आजही शाबूत आहे याचाच निर्वाळा दिला.

आजचा सवाल-'?'

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी सोमवार, 26/09/2011 10:01 या दिवशी प्रकाशित केले.
मानव जेंव्हा अदीम अवस्थेतून पुढे सरकला,त्या काळात धर्म कल्पना बाल्यावस्थेत होत्या,पुरुष प्रक्रुती यांच्या मिलनातून स्रुष्टी घडली...हा सामान्यतः भारतीय पौरुषी धर्मांचा पाया आहे.ही कल्पना कमी अधिक फरकानी सगळीकडे आलेली आहे. याच कल्पनेला आधारभूत मानून पुढचा पुरुष/प्रक्रुती यांचा आजचा सवाल-जबाब लिहिला आहे... पु-मरणं येऊ दे याचे तेंव्हा,काशास चिंता आज करू?

देवळातला शंकर

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी रविवार, 18/09/2011 18:07 या दिवशी प्रकाशित केले.
एकदा शंकर देवळात कान उघडुन बसला भक्तांच्या ललकाय्रा ऐकुन खुदकन मनात हसला भं...भोले..ही अरोळी खरोखरच छप्परतोड कुणाच्या मनाची जखम तर कुणाचा नुसताच फोड माझ्याकडे येणारे असेच कुणी शांत,कुणी भेदरलेले आयुष्याच्या कलहात कुणी मिटलेले,कुणी विटलेले होते काहो ती अरोळी.. जीवनरोगाचे औषध? का थोड्या वेळाचं मलम नी शेवटी नुसतीच खदखद तुंम्ही म्हणाल या खेरीज दुसरा जालीम उपाय काय? का तुंम्हीही अमच्यासारखेच..? समस्या आली...की बाय बाय मी तुम्हाला सांगेन...की मीही तुमच्यातलाच आहे फार पूर्वी माणुस होतो अता मात्र 'देव' आहे मोडुन टाका ते देऊळ अणी मुक्त करा मला माझा आधार..कशाला? एकमेकांचा घेऊ...चला..! पुरे झालं म

मोर्गे सेहर - हे बुलबुलांनो उठा !

लेखक जयंत कुलकर्णी यांनी शनिवार, 17/09/2011 20:55 या दिवशी प्रकाशित केले.
हा फोटो टाकला आणि खालचे लिहिले ! या दोन्हीचा संबंध आहे का ? माझ्या मनात निश्चितच आहे. का कोणास ठाऊक बुलबुल बघितला की मला हे गाणे आठवते. अर्थात मला ते अत्यंत आवडतेही. या कवितेतला भाव या गाण्यात आणि त्याच्या संगितात इतका भव्यपणे उतरला आहे की बस ! मोर्गे सेहर-एक लोकप्रिय इराणी गाणे. त्यांचे स्वातंत्र्यगीत !

धर्माच्या नावाचे ब्रॆन्डींग, पण फक्त सोयीचे असेल तिथेच...

लेखक चेतन सुभाष गुगळे यांनी बुधवार, 14/09/2011 14:36 या दिवशी प्रकाशित केले.
जैन धर्म हा जगात आणि भारतात देखील अत्यल्पसंख्य असलेला आणि तरी देखील मोठ्या प्रमाणात आपला प्रभाव टिकवून असलेला ब्रॆंड आहे. होय हा ब्रॆंड आहे असे मी म्हणतोय कारण मी हॊटेलात मेनूकार्ड वर जैन पावभाजी पाहतो. जैन पिझ्झा देखील सर्वांना परिचयाचा असेलच. पण मी कधी बौद्ध, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन आणि हिंदू असे शब्द मागे लावलेल्या नावांचे पदार्थ अजून पाहिलेले नाहीत. त्याचप्रमाणे जैन धर्मीयांमध्ये अनेक व्यक्ती आपले आडनाव जैन असे लावतात. हा प्रकार देखील मी इतर ठिकाणी पाहिलेला नाही म्हणजे मंहमद मुस्लीम, रमेश हिंदू, अशोक बौद्ध किंवा डेव्हीड ख्रिश्चन मी अजून पाहिले नाहीत.

मरणावेळेच्या शूटिंगची सोय आणि इतर सेवा पुरवल्या जातील. अधिक माहीतीसाठी वाचा..

लेखक Nile यांनी रविवार, 11/09/2011 14:27 या दिवशी प्रकाशित केले.
काही लोकांनी मरणाचेवेळी त्यांचे व्हिडो शुटिंग केले जावे अशी अपेक्षा आम्हाजवळ व्यक्त केली. सदर इच्छेची दखल घेऊन आम्ही इनिशीएटीव्ह घेतलेला आहे. त्या धाग्यावर अवांतर होऊन इतर सदस्यांना भलते सलते अनुभव येऊ नयेत म्हणून आम्ही हा प्रतिसाद वेगळ्या धाग्यात हलवत आहोत. मूर्खांसाठी, गाढवांसाठी अन नीट न वाचता येणार्‍यांसाठी विशेष सूचना.( रडारडी करायच्या आधी धागा कोणत्या सदरांत आहे हे पहावे. ) वरील सर्व मरणेच्छुक लोकांना विडो शुटिंगचा लाभ देण्याची सोय आम्ही करू.

पर्यावरणपूरक गणेशोत्सव

लेखक विकास यांनी शुक्रवार, 09/09/2011 23:20 या दिवशी प्रकाशित केले.
मध्यंतरी पुण्यातील शाश्वत फाउंडेशनच्या सौ. प्रज्ञा ठाकूर यांच्याशी संवाद झाला त्यातून त्यांच्या "पर्यावरणपूरक गणपती मुर्तीच्या" प्रकल्पाबाबत समजले. त्यांन या संदर्भात मिपाकरांसाठी माहिती देण्याची विनंती केली होती. ती खाली त्यांच्याच शब्दात देत आहे.
पर्यावरणपूरक गणेशोत्सव
गणाधीश जो ईश सर्व गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा
सकळ गुणांचा अधिपती असलेल्या गणेशाच्या पूजनाने सर्व कार्याचा शुभारंभ आपण करीत असतो.