Skip to main content

धर्म

|| वैभव संपन्न गणेश ||

लेखक मदनबाण यांनी रविवार, 14/08/2011 23:14 या दिवशी प्रकाशित केले.
|| वैभव संपन्न गणेश || १९७८ साली मी विद्यार्थी दशेत असताना बेलूर आणि हळेबीड येथील मंदिरे पहावयास गेलो होतो.तेथे असलेल्या गणेशमूर्ती पाहिल्या आणि मी भारावून गेलो.त्या दागिन्याने खूप सजवलेल्या होत्या पण मला ते दागिने जास्त बोजड वाटले. माझ्या डोक्यात एक कल्पना आली की आपल्या पारंपारिक मूर्तीला असे दागिने घातले तर आणि जरा नवीन पद्धतीचे दागिने घातले तर ती मूर्ती कशी दिसेल!म्हणुन मी दागिन्यांचा अभ्यास करु लागलो.

"प्यार का पंचनामा"... सिनेमाची ओळख

लेखक भडकमकर मास्तर यांनी मंगळवार, 26/07/2011 18:03 या दिवशी प्रकाशित केले.
प्यार का पंचनामा. दोन महिन्यांपूर्वी "प्यार का पंचनामा" नावाचा सिनेमा येऊन गेला.. आला कधी गेला कधी कळलाही नाही या टाईपातला हा सिनेमा. तूनळीवरती याच्या संवादांच्या काही क्लिप्स पाहिल्या होत्या. हे प्रोमोज आवडलेही होते. पण बर्‍याचदा प्रोमोज बरे असतात आणि सिनेमा कंटाळवाणा असतो त्यामुळे सिनेमाकडून फ़ार अपेक्षा नव्हती...तरीही पाहिला आणि हा सिनेमा चक्क आवडला. मजा आली. तूनळीवरची झलक http://www.youtube.com/watch?v=pwSmmJV1XvY गोष्ट सोपी आहे. रजत, निशांत आणि चौधरी या नावाचे तीन बॅचलर आय्टी इन्जिनियर्स फ़्लॅटमेट्स आहेत.

श्रावणमास कहाणी: वर्षभर प्रसिद्ध नारायणाची कहाणी

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 24/07/2011 13:29 या दिवशी प्रकाशित केले.
श्रावणमास कहाणी: वर्षभर प्रसिद्ध नारायणाची कहाणी
आटपाट संकेतस्थळ होतं. आंतरजालावरती त्याचं नाव होतं. तेथे येणारा प्रत्येक सदस्य त्याचप्रमाणे सहज म्हणून येणारा पाहूणा तेथे देहभान विसरत होता. तेथील सुविधांना भुलत होता. देशोदेशातील व्यक्तींना तेथे मुक्त प्रवेश होता. म्हणूनच तेथे अनेक व्यक्तीस्वभावांचे प्रदर्शन भरले होते. असल्याच अनेक व्यक्तींपैकी राजा रवी हा एक तेथील सदस्य होता. तो मोठा पराक्रमी, मानी होता. त्याचा स्वभाव दिलदार होता. पण तो तत्वाला जागणारा होता. आपल्या तत्वाच्या बाहेर काही करण्यास त्याचा नकार असे.

योगिराणा

लेखक स्पा यांनी रविवार, 24/07/2011 10:53 या दिवशी प्रकाशित केले.
"हनुमंत अमुची कुळवल्ली, राम मंडपा वेला गेली ,श्रीराम भक्तीने फळली, रामदास बोलिया नामे" पहाटेच्या पवित्र वातावरणात कल्याणाची काकड आरती संपत आलेली असते. समर्थांना जाग येते. कल्याणाचा खणखणीत आवाज कानावर येतो " अमुचे कुळी हनुमंत, हनुमंत अमुचे कुलदैवत, तयावीण अमुचा परमार्थ सिद्धी ते न पावे" समर्थ उठून बसतात , क्षणभर डोळे मिटून रामाच आणि हनुमंताच स्मरण करतात. सज्जन गड कडाक्याच्या थंडीमुळे धुक्यात लपेटलेला असतो,. बाहेर राममंदिरात समईच्या प्रकाशात रामाची मूर्ती उजळून निघालेली असते.