Skip to main content

धर्म

सेवाभावातील मानसिकता

लेखक हरिकथा यांनी मंगळवार, 10/01/2012 14:58 या दिवशी प्रकाशित केले.
चित्रकूटाच्या कारवी मठाचे महंत श्रीजगदेवदासजी मोठे सन्तसेवी म्हणून प्रसिद्ध होते. ते खूपच वैभवसंपन्न असल्यामुळे आपल्या जवळील वित्ताचा विनियोग अधिकाधिक साधुसेवेमध्ये कसा होईल याचाच विचार करायचे आणि तसेच आचरण ठेवायचे. दिवस असो का रात्र, त्यांच्या मठातील साधुसेवेमध्ये कधीच खंड पडला नाही. एक दिवस काही तीर्थयात्री आणि साधु फिरत फिरत वृंदावनातून चित्रकूटला आले. त्या सर्वांची महंतजींच्या मठामध्ये चांगली सोय झाली. प्रसादाचं भोजन आणि निवासाच्या व्यवस्थेमुळे त्या सर्वांनी महंतजींना अनेक धन्यवाद दिले. त्यांच्यातले वरिष्ठ साधुबाबा म्हणाले, "महंतजी, तुमच्यामुळे आमची इथे फार उत्तम सोय झाली.

दासबोध अभ्यास संकेतस्थळ उदघाटन आणि प.पू. चैतन्य महाराजांच्या प्रवचनाचा कार्यक्रम

लेखक विटेकर यांनी बुधवार, 14/12/2011 16:20 या दिवशी प्रकाशित केले.
|| श्रीराम समर्थ || नमस्कार, मागे मिपावर लिहल्याप्रमाणे दासबोध अभ्यास संकेतस्थळाच्या उद्घाटनाचा आणि प.पू. चैतन्य महाराजांच्या प्रवचनाचा कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे दोन्ही दिवस भरत नाट्य मंदिर भरले होते.समर्थ आणि वारकरी संप्रदायातील मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते. (येथे फोटो कसे लावतात याचे तांत्रिक माहीती नसल्याने चेपु चा दुवा देत आहे.

येळकोट येळकोट जय मल्हार!!

लेखक यकु यांनी मंगळवार, 06/12/2011 00:26 या दिवशी प्रकाशित केले.
गावाकडच्या बाजारात कांदे वांगे दिसायला सुरुवात होऊन दोन-चार आठवडे झाले तरी घरात मात्र ते आणले जात नसत. कारण सट (चंपाशष्‍ठी) अजून झालेली नसे ना. खंडोबा ज्यांचं कुलदैवत आहे किंवा ज्यांच्या देवघरात खंडोबाचे टाक आहेत त्या सगळ्यांच्याच घरात हा रिवाज पाळला जात असावा. आमच्या घरात आजी लग्न होऊन येत असताना तिच्यासोबत तिचं कुलदैवत असलेला खंडोबाही (टाक) आला होता. तेव्हापासून आमच्याकडेही सट पाळली जाऊ लागली असावी; निश्चित माहिती नाही कारण विचारायला सध्‍या जवळ वडीलधारं कुणीच नाहीय. खंडोबा हे तसं धनगरांचं कुलदैवत. पण श्रद्धेला बंधन नसतं.

गोटीपुअ

लेखक आळश्यांचा राजा यांनी गुरुवार, 01/12/2011 01:04 या दिवशी प्रकाशित केले.
हे नृत्य पहा. ओडिसी सदृश आहे. या नृत्याचे नाव आहे "गोटीपुअ". हे पाहताना आई म्हणाली, अरे या मुली छान नाचतायत, पण एकही दिसायला चांगली नाही, असं कसं काय? आणि अशा काय विचित्र चालतायत! मी म्हणालो, अगं आई, हे मुलगे आहेत. मुलगे. पुरुषासारखंच चालणार. आणि मुलींचे कपडे घालून मुलींसारखे साजूक नाजूक थोडेच दिसणार? गोटी म्हणजे एक, आणि पुअ म्हणजे मुलगा. मुलगा नाचतो, म्हणून नृत्याचे नाव गोटीपुअ. प्रत्यक्षात आठ दहा जण नाचतात. पण नाव पडले आहे.

प्.पू.चैतन्य महाराज प्रवचने- समर्थ रामदासांची करुणाष्टके

लेखक विटेकर यांनी शुक्रवार, 25/11/2011 15:09 या दिवशी प्रकाशित केले.
॥ श्रीराम समर्थ ॥ " मासानां मार्गशीर्षो s हम... असे भगवंताने भगवदगीतेत आपली विभूती सांगताना म्हटले आहे. दि. २६ नोव्हेंबरला मार्गशीर्ष महिना सुरु होत आहे. आपणा सर्वांच्या सदभाग्याने याच काळात वारकरी संप्रदायातील अधिकारी सत्पुरुष प. पू. चैतन्य महाराज देगलूरकर यांची अमृतवाणी ऐकायला मिळणार आहे, कृपया सर्वांनी या अपूर्व संधीचा लाभ घ्यावा. विषय - समर्थ रामदासांची करुणाष्टके स्थळ - भरत नाट्य मंदिर, सदाशिव पेठ, पुणे. वेळ - सकाळी ९ ते ११., शनिवार दि. २६ नोव्हे. आणि रविवार दि.

.(नेत्रपटलावरील चित्रांवेगळे)

लेखक राजेश घासकडवी यांनी बुधवार, 16/11/2011 09:04 या दिवशी प्रकाशित केले.
शब्द म्हणजे चिह्न - जगाचं ज्ञान करून घेण्यासाठी वापरलं जाणारं. ते कधी पांढऱ्यावर काळ्या रेषा म्हणून येतं, तर हवेत उमटणाऱ्या ध्वनिलहरींतून जाणवतं. पण जग जाणण्यासाठी आपण केवळ शब्दच वापरत नाही. चित्रंही वापरतो. कोणीतरी म्हटलं आहे की एक चित्र हजारो शब्दांइतकं महत्त्वाचं असतं. आपण प्रत्येकच अशी चित्रं वापरतो. ती वारंवार आपल्या नेत्रपटलावर उमटत असतात. म्हणून मी यशवंत कुलकर्णी यांच्या लेखात 'शब्द' या शब्दाच्या जागी 'नेत्रपटलावरील चित्र' वापरून हा लेख लिहिलेला आहे. खरं तर त्यांचाच सल्ला वापरून मी त्यांचा लेख अधिक व्यापक केला आहे असं म्हणता येईल.